एक संक्रांत अशी ही
एक संक्रांत अशी ही
आई संक्रांती चा सण आला मग तू पुरणपोळी करशील का ग? मला ख़ुप आवडते. सात वर्षाची तनु, छाया ला विचारत होती. हो करीन, अजुन चार दिवस आहेत संक्रांत ला छाया बोलली. छाया चार घरी कपड़े भांडी चे काम करत होती. सात वर्षाची तनु आणि पाच वर्षाचा दीपक, दोन मूल आणि नवरा विलास ऊस कारखान्यात मजूर होता पण सगळा पगार दारूत घालवत होता. पैसे संपले की छाया कड़े मागत राहायचा, तिने नाही दिले की तिला मारहाण करायचा. छाया कसे बसे घर सांभाळत होती.पोरांना नगरपालिकेच्या शाळेत टाकले होते. रोजची भाजी भाकरी सोडून पोरांना गोडधोड़ खायला कमीच मिळायचे. कामा वर कोणी शिल्लक राहिलेले काही दिले की तेच पोर आवडी ने खात असायची. छाया ला प्रश्न पडला होता कि, पोरीला पूरणपोळी करून कशी खावु घालु. हातात पैसे नाहीत. घरात मोजेक सामान भरलेले. त्यात तिचा नवरा सारखे दारू ला पैसे घेवून जायचा. लपवून ठेवले तरी मारून तिच्या कडून पैसे घेवून जायचा.
आज ती कामावर आली.जानेवारीची हुडीहुडी भरणारी थंडी मी म्हणत होती. अशा थंडीत छाया लवकर येऊन सगळी काम करून दुपारी घरी जायची. आज ताई ना मागु का पैसे थोड़े, असा मनात विचार ती करत काम करत होती. राजश्री कड़े छाया काम करत होती. सकाळी राजश्री आणि तिच्या नवऱ्याचा थोड़ा वाद झाला होता. संक्रांती च्या खरेदी वरुन आणि हळदी कुंकु कार्यक्रमा वरुन, राजश्री चा नवरा म्हणाला की यंदा कोरोना मुळे पगार कपात केली आहे तेव्हा जे करायचे ते कमी बजेट मध्ये कर. त्या वरुन दोघात वाजले होते. भांडी घासुन लादी पुसून छाया घरी निघाली होती. ताई थोड़ पैसे आगवू पाहिजे होते जमेल का? भीत भीत छाया ने राजश्री ला विचारले. राजश्री सकाळ पासून तापलेलीच होती. काय ग आज तारीख कीती आणि तुला पगार तर मागच्या आठवड्यातच दिला ना मग अजुन पैसे मागतेस. आमच्या कड़े पण काही झाड़ नाही पैशाचे. तू केव्हाही मागायला आणि तू ते पैसे नवऱ्या ला नेवून दे दारू साठी. राजश्री रागातच बोलली. नाही ओ ताई, नवऱ्याला नाही देणार ते माझ्या पोरीला संक्राती ला पुरणपोळी पायजे हाय हट्टच धरून बसलीय पोर म्हणुन. छाया दिन पणे म्हणाली. हे बघ छाया आता काही पैसे नाहीत माझ्या कड़े नन्तर बघू. राजश्री म्हणाली. मग गुपचुप छाया घरी आली.
आज छाया लवकरच उठली, संक्रांती चा सण होता. पोराना चहा पाव खायला देवून कामावर जायला निघाली. आई आज पुरणपोळी करनार तू आणि तिळगुळ पण आन. तनु बोलली. हो आणते आणि साँचा ला करू पोळी अस म्हणत छाया बाहेर पडली. गळ्यात मंगळसूत्र म्हणुन एकच सोन्याचा मणी होता बाकी काळे मणी होते. तो सोन्याचा मणी विकु आणि पैसे आणू अस छाया ने ठरवले. ती कामा वर आली. राजश्री कड़े काम करत होती. राजश्री ने तिला आल्या आल्या चहा दिला. मग सगळ काम करून छाया घरी जायला निघाली. छाया थांब जरा म्हणत राजश्री किचन मध्ये गेली आणि एक डबा घेवून आली, तो डबा तीने छाया ला दिला हे काय ताई? छाया परवा तू माझ्या कड़े पैसे मगितलेस आणि मी उगाच ओरडले तुला. थंडी वारा याची पर्वा न करता तू काम करतेस. कधी पाहुने आले तरी जास्तीचे काम करतेस त्याचे जादा पैसे कधी मागत नाहीस. गरीब श्रीमंत सगळयांना सण साजरा करावा वाटतो आणि आजच तर वर्षातला पहिला सण मग तुझ्या ही घरात तो साजरा झाला पाहिजे म्हणुन या पुरणपोळी आणि तिळगुळ च्या वडया मुलांना घेवून जा. तुझ्या मुलीला खायच्या होत्या ना. ताई तुमचे आभार कसे मानू? आजचा दिस गोड केला तुम्ही आमचा. अग काही आभार वैगेरे नको आणि हा संध्याकाळी मुलांना घेवून घरी ये हळदी कुंकु आहे. आठवनीने ये. राजश्री म्हणाली. हो ताईं येते म्हणत आनंदाने झपझप पाय उचलत छाया घरा कड़े निघाली. आजची ही संक्रांत तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती.
समाप्त
