STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational Others

एक प्रॉमिस असंही....

एक प्रॉमिस असंही....

7 mins
287

मीरा एक साधी सरळ मुलगी होती. तिचं शिक्षण चालू होतं. ती एका कंपनीत जॉबदेखील करत होती. ती शहरात आपल्या मैत्रिणींसोबत राहायची. घरचे नेहमी तिला लग्नासाठी मागे लागायचे. पण तिला लगेच लग्न करायच नव्हतं. ती एका लहानशा गावातून आली होती तर कुठेतरी आताच ती लाईफ एन्जॉय करायला शिकली होती. शहरात कामात तिचं बिझी लाईफ होतं तरीसुध्दा मैत्रिणींसोबत तिला छान वाटत होतं. एक दिवशी थोडं बोअर झाल्याने तिने बर्‍याच दिवसांनंतर फेसबुक ओपन करून बघितलं त्यात तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट दिसली.  साहिल नावाच्या मुलाची होती. तिने सहजच रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. त्या दिवशी संध्याकाळी त्यावर हाय...चा मेसेज आला. मग मीराने हेल्लो... म्हणून बोलायला सुरूवात केली. मग थोडी ओळख झाली. दोघेही वेगवेगळ्या शहरांत राहात होते. मीरा आणि साहिल रोज बोलू लागले... त्यांची पुढे छान मैत्री झाली....दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले...


साहिलही जॉब करणारा होता. त्याला फार कमी वेळ मिळत असे. रविवार सुट्टी असल्यावर ते जास्त बोलायचे. जेव्हा मीराला खूप एकटं आणि बोअर वाटायचं तेव्हा ती साहिलला बोलत असे. साहिलशी बोलताना मीराला नेहमी आपलेपणा वाटायचा...तिला आता त्याची सवय झाली होती. कितीही बिझी असले तरी ते एकमेकांची विचारपुस करायचे. पण ऑनलाईनवरून ते कधीही भांडत नव्हते. खूप समजून घ्यायला लागले होते ते दोघेही... मीराच्या मैत्रिणी नेहमी गप्पा मारताना त्यांच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगत असत. त्यामुळे मीरालाही साहिल आवडू लागला होता. त्यांच्यात फक्त मैत्री होती. तिने तसं कधी त्याला विचारलं नव्हतं. पण साहिलही मीराला एक दिवस बोलल्याशिवाय राहत नसे. हळूहळू ते रोजच जेव्हा वेळ असेल तेव्ह फेसबुकवरच मेसेज करत असत... सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करत होते. दोघांचीही गुड मॉर्निंग विश केल्याशिवाय दिवसाची सुरूवात होत नसे...आणि कधी जास्तच कामात बिझी असले तर तस मेसेज करून एकमेकांना कळवत असत. रात्री गुड नाईटचा मेसेज केल्याशिवाय दोघेही झोपत नसत. त्यांना एकमेकांची खूप सवय झाली होती. ते रोज मेसेंजरवर बोलत होते.

 

तर साहिलने मीराला थोड्या दिवसांनंतर मोबाईल नंबर मागितला....तर तिला प्रश्न पडला की जर आपण नंबर याला दिला... आणि काही प्रोब्लेम झाला तर.... पण तिने नंबर दिला नाही....तरी साहिलने समजून घेतलं. त्याने नंबर परत नाही मागितला. तो म्हणाला, राहू दे. निदान आपली मैत्री तरी या नंबर प्रकरणावरून तोडू नकोस. तो खूप समजदार मुलगा आहे, हे तेव्हा मीराच्या लक्षात आलं. त्याच बोलणं, समजून घेणं आणि मुलींचा आदर करणे, तो स्वभावाने सरळ व साधा मुलगा होता. म्हणून त्याच्या या स्वभावामुळे मीराला तो अजून जास्त आवडायला लागला... रोज नव्याने ती त्याला ओळखू लागली. त्यांच्यातील मैत्रीच्या नात्याच रूपांतर केव्हाप्रेमामध्ये झाल त्यांना कळलच नाही.कारण ते दोघेही एकमेकांना बोलल्याशिवाय राहू शकत नव्हते.... हे त्या दोघांच्याही लक्षात आल होत....आणि तितकच महत्वाच दोघांचाही एकमेकांवर खूप विश्वास होता. आजकालच्या फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या मैत्रीबाबत किती फसवणुकीचे प्रकार घडतात, हे तर आपण नेहमीच वाचतो.... बघतो.... पण हे दोघे आणि यांच्यातील मैत्री याला अपवाद होती. दोघेही खरोखर मनापासून एकमेकांवर प्रेम करत होते... जसे ते दोघेही एकमेकांसाठी बनले होते... रोज दोघेही एकमेकांची ऑनलाईन येण्याची वाट बघायचे. हे तर रोजचंच झालं होतं. रोज थोडा वेळ का होईना बोलल्याशिवाय मनाला चैन पडत नसे. साहिल कधी नाही तिला बोलला तर तिला खूप बोअर वाटायचं... आणि साहिलचंही काही वेगळं नव्हतंच.... त्यालाही मीराला नाही बोलली तर कामात मन लागत नसे.... कधी जर मेसेजला रीप्लाय नाही आले तर दोघांनाहीएकमेकांची काळजी वाटायची. रीप्लायची आतुरतेने वाट बघायचे.

 

ते प्रत्यक्ष कधी भेटले नव्हतेच पण एकमेकांची रोजच विचारपूस करून काळजी घ्यायचे. त्यांना बर वाटायचं....दूर असूनही ते दोघे मनाने एकमेकांशी जोडले गेले होते. रोजच्या गप्पांमुळे ऑफीसमधला दिवस कितीही कामात गेला ना तरी त्यांचा कामाचा सगळा ताण निघून जायचा....ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते....हे दोघांनाही कळून चुकलं होतं....कारण ते एक दिवस पण एकमेकांना बोलल्याशिवाय राहत नव्हते...पण दोघांना ही वाटायच.... त्याला वाटायच तिने आधी बोलाव... अन् तिला वाटायच त्याने आधी प्रेम व्यक्त कराव.... दोघांनाही भिती होती की जर अस काही मनात नसेल आणि आपणमनातील बोलून मोकळ झाल....खरंच तसं काही नसेल तर चांगली मैत्री तरी नाही गमावली पाहिजे. दोघांनाही एकमेकांना गमावण्याची खुपभिती वाटायची.... सूरजचा तर गोंधळ ऊडाला होता.काय करू नि काय नाही, सांगु की नको तिला, जर तिच्या मनात तस काही नसल, ती काय समजेलमला... काय कराव ? समजत नाही आहे....असच छान चाललं होतं.... अजूनपर्यंत प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत कुणीही केली नव्हती.... कारण मैत्रीच छान नातं होत.... ते त्यांना तुटायला नको होत... एखाद्या दिवशी दोघातून कुणी ऑनलाईन नाही आले तर ते खूप काळजी करायचे....मोबाईलकडे डोळे लावूनवाट बघत बसायचे. एक दिवस अस झाल....साहिलच्या बाबांची अचानक तब्येत बिघडली.त्यांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं.... त्यातच त्याचा मोबाईलचा रिजार्च संपलेला. बाबांची तब्येत अशी अचानक क्रिटीकल झाली, या टेन्शनमध्ये त्याला कशाचंही भान नव्हतं... त्यांना सोडून तो कुठेही जाऊ शकत नव्हता... त्यामुळे दोन दिवस तो फेसबुकवर ऑनलाईन आलाच नाही.

 

इकडे मीरा त्याची वाट बघत होती आणि तिला अजुनच जास्त काळजी वाटु लागली होती. काही झाल तर नसेल त्याला, आजारी नसेल ना ? असे खूप सारे विचार येत होते. पण काय करणार? कुणाला विचारूही शकत नाही....त्याचे फ्रेंड्स अस मी कुणालाओळखतच नाही.आपलच चुकल तो नंबर मागत होता तर मी दिलानाही. या गोष्टीच तिला खुप वाईट वाटल. स्वतःला दोष देत होती. तिला त्याचा स्वभाव माहीत झाला होता... त्याला ती ओळखु लागली होती. तिला वाटल हा रागवला असेल कींवा कामात असेल म्हणून नसेल आला अस तिच्या मनाची समजूत घालत होती...वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता....एक पूर्ण दिवस साहिलचा हॉस्पिटलमध्ये गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी बाबांना थोड बर वाटायला लागल.डाॅक्टरांनी ही काळजी करू नका, अस सांगितल तेव्हा कुठे साहिलला बर वाटू लागलं.... त्याने देवाचे आभार मानले. बाबाही साहिलसोबत थोडे बोलले आणि आईही आता आली होती. साहिलने मोबाईल बघितल.आईला हॉस्पिटलमध्ये थांबवून तो घरी निघाला. तेव्हा त्याने रिचार्ज केला अगोदर... मोबाईल चार्जींगला लावला....त्याला मीराचे खूप सारे कॉल आणि मेसेज दिसू लागले.... मीरा साहिलच्या फोनची मेसेजची वाटच बघत होती.... ऑफिसची तयारी झाली होती. मन कशातच लागत नव्हतं....तिचा चेहराच उतरला होता. खरंतर आज ऑफिसला जावं असं वाटत नव्हतं. पण आजच महत्वाचं काम होतं. तेवढ्यात मोबाईल वाजला. साहिलने मेसेंजरवर हाय... कशी आहेस? मेसेज केला. तिने पाहील तिला काय कराव कळत नव्हत. तिला बर वाटल होत आणि डोळ्यांत पाणी आले.... तिला तो ठीक आहे याची खात्री झाली... तिची काळजी मिटली होती. तेव्हा तिनेही मेसेज केला. मी ठीक आहे. पण साहिल तू कुठे गेला होतास आणि कसा आहेस तू? ये मला सांग तू ठीक आहेस ना आता.... साहिल - अग हो हो...थांब सांगतो... किती ते प्रश्न... सगळं सांगतो.... मला बोलू तर दे आधी...

मीरा - सॉरी साहिल, बोल तू... मी पण ना....अग सॉरी का म्हणतेस... मला पण तुला सांगायचं होतं पण खरंच जमलं नाही... मीच सॉरी म्हणतो... काल बाबांना ॲडमिट केलं होतं, त्यांची अचानक तब्येत खूप बिघडली. मला यामुळे तुला सांगायला जमलंच नाही... 

मीरा - अरे इट्स ओके...बाबा आता कसे आहेत?

साहिल - "आता ठीक आहेत, बर वाटतय त्यांना...."

मीरा - " अरे काल मी खूप काळजी करत होते ....काय करू नि काय नाही अस झाल होत..."पण साहिल यापुढे काही झाल तरी एक कॉल नाही तर मेसेज करून तरी कळवत जा....

साहिल - "हो कळतंय गं मला... मी समजू शकतो...." तुला काल काय वाटलं असेल ....पण खरच काल बाबांना सोडून मी कुठे जाणार होतो...मी एकटाच होतो. त्यामुळे खुप गोंधळलो होतो.... हो रे मी समजू शकते.

मीरा - " साहिल ठीक आहे आता तू बाबांची काळजी घे." 

 

मीराने स्वतःहून साहिलला मोबाईल नंबर दिला....ते आता एकमेकांना काही काम असेल किंवा कामात बिझी असले तर कॉल करून कळवत होते.... दोघांनी फेसबुक सोडून दिल होत.... थोड्या दिवसांनी साहिलवर ऑफिसच्या कामाची जबाबदारी वाढली होती... तो मीराला कमी वेळ देत होता पण दोघेही एकमेकांना समजून घेत होते.... फोन किंवा मेसेज चालू होते...दोघांनी एकमेकांना फोटोमध्ये बघितलं होतं... पण मैत्रीही फोटो न बघता सुरू झाली होती... आणि ते मैत्रीचं नातं आता छान फुललं होतं... मनाने मनाशी जोडलेलं नातं.... दोघांनाही एकमेकांना भेटायची खूप ओढ असायची....पण कधी वेळ नाही भेटला....एक वर्षांनंतर ते दोघे एकमेकांना भेटले....इतक्या दिवस फक्त फोन आणि मेसेजवर बोलणारे मीरा आणि साहिल आज एकमेकांना समोर बघत होते... दोघेही एकमेकांना बघत होते.... दोघांनाही बोलायचं तर होतं पण असं समोर काय बोलावं दोघांनाही कळत नव्हतं... कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांना बघत होते... हसत होते... मग साहिलने ओळखलंही काही बोलणार नाही... त्यानेच बोलायला सूरूवात केली... थोड्या गप्पा मारल्या... दोघेही आज समोर खूप काही मनातलं बोलत होते...

 

साहिलने मीराला प्रपोझ केलं नि लग्नासाठी विचारलं... तर मीरानेही लगेच होकार दिला. कारण तिचं साहिलवर मनापासून प्रेम होतं. साहिलचंही मीरावर प्रेम होतं. त्याने फक्त लग्नासाठी तिचाच विचार केला होता. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांचा हा निर्णय दोघांनीही आपल्या घरी सांगितला. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना होकार दिला... घरचेही आपल्या मुलांना समजून घेणारे होते... साहिलच्या घरचे सगळे उच्चशिक्षित असले तरी मीराच्या बाबांनीही आपल्या मुलीच्या आयुष्याचा विचार केला. कारण साहिलसारखा मुलगा मिळणं कठीणच होतं आणि त्यात साहिलचं मीरावर असलेल प्रेम या सगळ्यांचा विचार करून तिच्या बाबांनी होकार दिला. मैत्रीच्या छान नात्यापासून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. असा हा साहिल आणि मीरा यांच्या प्रेमाचा प्रवास आता त्यांनी घरच्यांच्या संमतीने लग्नही केलं. त्यांना दोघांनाही जाणीव झाली होती की आपण तर एकमेकांशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्यांनी एकमेकांना लग्न करून आयुष्यभर काही झालं तरी एकमेकांची साथ न सोडण्याचं प्रॉमिस केलं होतं. नवरा बायकोच्या नात्यातही छान मैत्री असली तर ते नातं छान असतं... साहिल आणि मीरा एकमेकांना दिलेल प्रॉमिस पाळत आहेत... दोघेही आपल्या आयुष्यात सुखी आहेत....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance