एक प्रेम असेही
एक प्रेम असेही
आदित्य आणि अवनी एकमेकांवर खुप प्रेम करत होते.
तशी त्यांची ओळख सोशल मिडियावर झालेली होती.
पुढे ओळखीतुन त्यांची मैत्री झाली. ते खुप बोलायचे एकमेकांना,
या दोघांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे लेखन.
दोघांनाही लिहण्याच वेड होतं. त्याला खुप सुंदर कविता सुचायच्या.
तो त्या ॲपवर टाकायचा. त्याचे खूप फॅन होते.
लोक त्याच्या कविता वाचण्यासाठी आतुर असे.
अगदी मनापासुनो तो जीव ओतुन लिहायचा.
त्याच्या कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेत
तसेच त्याला कथाही उत्तम लिहता यायच्या.
एक दिवस त्याला ती भेटली म्हणजे अवनी.
तिने त्याची एक कविता लाईक करुन कमेंट केली.
त्यादिवशी त्याला ती कमेंट खुप आवडली.
त्याने तिच प्रोफाईल चेक केलं.
तिनेही खुप छान स्टोरिज लिहल्या होत्या.
त्याने त्या वाचुन काढल्या. त्याला समजलं
की ही पण खुप सुंदर लिहते.
त्यानेही तिच्या स्टोरीज वाचुन कमेंट केली. ते
वाचुन तिलाही आनंद झाला. पुढे या
लेखनाच्या प्रवासातुन दोघांमध्ये बोलण
होऊ लागलं. मैत्री झाली. पुढे तर तो
तिच्यावर कविता लिहू लागला. तिच्या
नकळत तो प्रेमात पडला होता. तिला
नव्हत माहीती.
एक दिवस कविता वाचुन अवनी
म्हणाली, "तु ती प्रेम यावर लिहलेली कविता
मला खुप आवडली.काय यार किती
भारी कविता करतोस रे, कस रे तुला
जमत."तसा आदित्य हसला आणि मनातच
म्हणाला," मी तर तुझ्यामुळे अजुन
छान लिहायला लागलो."
खर तर अवनी त्याच्या आयुष्यात आल्या
पासून आदित्य खुप खुश होता. तो एक
कवी तर होता. पण त्याला छान गाताही
यायचं. त्याच्या कविता वाचण्यासाठी
अवनी नेहमी उत्सुक असायची. ती त्याला
नेहमी प्रोत्साहन द्यायची. तिच्या अश्या
स्वभावामुळे तो प्रेमात पडला होता तिच्या,
ती त्याला आवडू लागली होती. तशी
अवनीलाही आदीत्यची खुप सवय झाली
होती. ती त्याला नेहमी तब्येतीविषयी
विचारायची. जास्त दिवस त्याने कविता
वगैरे नाही टाकली तर ती त्याला थेट
विचारायची. आदित्यही तिच्याशी बोलल्या
शिवाय एक दिवस राहत नव्हता.
रोज तिला मेसेज करायची त्याला सवय
झाली होती. रोज एकमेकांच्या मेसेजशिवाय
त्यांची सकाळ होत नव्हती. आपापल्या
कामात दिवसभर कीतीही व्यस्त राहू देत,
पण एकदा तरी ते एकमेकांना विचारत.
दोघेही लिहत असायचे नेहमी वेळ काढून
खुप छान दिवस जात होते.
आदित्यने ठरवल की आता तरी
आपण प्रेमाच अवनीला सांगूया.
एक दिवस तो तिला म्हणाला,
"अवनी, मला तुला काहि सांगायच आहे. "
"हो सांग ना आदित्य"
आदित्य- "पण प्रॉमिस कर आधी तू
की काही झाल तरी तु आपली मैत्री
कधीही तोडणार नाही. "
अवनी-"काय झाल आदी?"
"असं का बोलत आहे. ओके मी प्रॉमिस
करते.आता तरी सांगशिल"
तो स्माईल करतो, एक दिर्घ श्वास घेतो.
"अवनी, माझं तुझ्यावर प्रेम आहे,
मला तु खुप आवडतेस" तो अस बोलून
जातो. अवनी मात्र शांत होते. ती आपण
नंतर बोलू म्हणते आणि ऑफलाईन जाते.
खर तर आधी प्रेमात तिला धोका
मिळाल्याने तिचा फारसा कुणावर विश्वास
उरला नव्हता. ती फक्त सर्वांशी मैत्रीच्या
नात्याने बोलायची. तिला ना खुप राग
आला होता. ती त्याच्यावर चिडली होती.
तो तिला कॉल मेसेज करतो पण अवनी
रिप्लायच देत नाही. आदित्यही मग
शांत बसतो एक दिवस. कदाचित माझ्या
बोलण्यामुळे ती दुखावली असेल. त्याला
खूप टेन्शन येतं. मी तिला अस बोललो
म्हणून तर नाही ना तिला माझा राग
आला असेल, पण काही असो मला
अवनीला गमवायच नाही आहे, तिचं
प्रेम माझ्या नशिबात नसेल पण
तिच्याशी असलेली मैत्री तरी हवी.
तो खुप विचार करत असतो रात्रभर
कधी त्याचा डोळा लागतो त्यालाही
कळत नाही.
दुसर्या दिवशी सकाळी आदित्य
उठतो, तर पहिला मोबाईल चेक करतो.
बघतो तर रोज आठवणीने मेसेज करणारी
अवनीने आज काहीच बोलली नाही.
अवनीही विचार करते, तिला समजत की
आपणही आदित्यशिवाय राहू शकत नाही.
आपल्याबाबतीत जे काही झालय त्यात
त्याची काय चुक? आपण कालपासुन
त्याच्या कॉल मेसेजला रिप्लाय नाही केला.
नाही.निदान त्याच्याशी असलेली मैत्री
तरी ठेवूया.तिलाही माहीती होत तो खूप
चांगला मुलगा होता. ती ही आता हळूहळू
त्याला ओळखायला लागली होती.
आदित्य तिला कॉल करतो, सॉरी म्हणतो.
"काल मी जे काहि बोललो ते तुला
मान्य नसेल तर प्लीज आपली मैत्री
तरी पहिल्यासारखी ठेवशील ना, मला
तुझी मैत्री हवी आहे" अवनी.
तिलाही त्याची मैत्री हवी होती. त्यामुळे
ती त्याची मैत्री स्विकारते आणि ते परत
पहील्यासारखं बोलायला लागतात.
त्यांचं नातं परत पहील्यासारखं अजुन
बहरू लागलं. उलट ते पहील्यापेक्षा
आता मनमोकळेपणाने सर्व गोष्टी
एकमेकांना शेअर करायचे. आपल्या
भावना व्यक्त करू लागले.
ती एक दिवस नाही बोलली, तिचा मेसेज
नाही दिसला तर आदित्यचं मन कासावीस
व्हायचं. हा तिची खुप काळजी करायचा.
ती मात्र बिनधास्त राहायची. कसलही
टेन्शन नाही घ्यायची. खुप पॉझिटीव्ह
नेहमी राहायची. ती यालाही अस
राहायला सांगायची. आदीत्य अवनीकडून
खुप चांगल्या गोष्टी शिकायचा. ति नेहमी
आजारी पडायची. तर हा नेहमी तिच्या
साठी देवाकडे प्रार्थना करायचा.
"तिला नेहमी आनंदात ठेव" म्हणुन.
तिला बर नसली की ती कॉल घेत नसे
तर आदित्यला अवनीला एक मिनिट
तरी बघायच असायचं. त्याच्या मनाच
समाधान व्हायच." तिला बघितलं
की तिला सुखरूप बघून त्याला छान
वाटायचं. अवनी आणि आदीत्य बरेच
दिवसांपासून एकमेकांना बोलायचे,
पण त्यांची भेट झाली नव्हती. ती
त्याला भेटली नव्हती, कधी भेटेल की
नाही हेही तिला माहीती नव्हत. पण नंतर
तिही त्याच्या प्रेमात पडली होती पण
तिने त्याला सांगितल नाही. त्याच्यापासुन
लपवून ठेवल होतं. याला कारण होत.
ती नेहमी आजारी असायची. तिला
त्रास व्हायचा. तिला एकदा डॉक्टरांनी
तपासण्या केल्या, तेव्हा तिला ब्लड
कॅन्सर असल्याच निदान झालं. तेव्हापासून
तिच्यात जगण्याची उमेदच संपून गेली
होती. पण आदित्य भेटल्यापासून तिचं
आयुष्यच बदललं. ती सगळं विसरून
गेली होती. निदान त्याच्या तिच्या आयुष्यात
पॉझिटीव्ह विचार करायची. रोज स्टोरी
लिहायची, वाचायची. रोजचा दिवस छान
मस्त आनंदात घालवायची. हे सगळं
ती आदित्यामुळे करू लागली होती.
अवनी आता नव्याने जगायला लागली
होती. खरं तर तिने तिच्या आजाराबाबतीत
जे काहि होतं ते सत्य तिने त्याच्यापासुन
लपवून ठेवलं होतं नि ती त्याला ते कधी
सांगणारही नव्हती. याबाबतीत तिने पूर्ण
विचार करून ठेवला होता.
"आदित्य माझ्याबाबतीत आधीच खुप
हळवा आहे. थोड आजारी असल तरी
किती काळजी करतो.हे अस जर
त्याला खर सांगितलं तर तो कोलमडून
जाईल त्यापेक्षा आहे तेवढे दिवस
त्याच्यासोबत छान, मस्त जगायच
अस आनंदी ठरवते.
आदित्य त्याच्या नोकरीमध्ये खुप बिझी
झाला होता, तरी तो अवनीसाठी वेळ
काढायचा. त्याचं लेखन आता कमी
होऊ लागलेल पण फक्त तिच्यामुळे
तो लिहायचा. त्यातही तो खुप पुढे
होता. अवनी रोज त्याच्याशी बोलायची.
दोघेही खूप गप्पा मारायचे वेळ कसा
निघून जायचा याचही भान राहत नसे.
ती त्याचं नेहमी खुप कौतुक करत असत.
ती नेहमी लवस्टोरीज वाचायची. तिलाही
पूर्वी अस वाटायचं की आपणही कुणाच्या
तरी प्रेमात पडावं, आणि कुणीतरी
आपल्यालाही प्रेमात पडावं. प्रेमात
पडल्यावर सगळं जग कीती सुंदर
वाटु लागतं हे सगळं ती स्टोरिजमध्ये
वाचायची. त्यात रमून जायची आणि
आता तिच्यासोबत ते सगळ घडत होतं.
तिला ना खुप छान वाटायचं. अवनीला
मुव्हीज बघायला खुप आवडायचं.
अवनिची बेस्ट फ्रेंड पूजा. हिला नेहमी
ती सोबत घेऊन जायची. पूजालाही
अवनी आदित्यच्या प्रेमात पडली आहे
हे तिला तिच्या बोलण्यातुन, वागण्यातून
दिसत होतं. तेव्हा एकदा मुव्ही बघताना
अवनी एकटक एका सिनकडे बघत होती.
तेव्हा पूजा तिला चिडवत होती.
"काय ग तु अवनी, तु त्याच्यावर एवढं
प्रेम करतेस ना, मग त्याला तस
सांगत का नाही "
अवनी पूजाला गप्प करते म्हणते,
"तुला तर सगळंच माहीती आहे
माझ्याबद्दल, कुठलीही गोष्ट मी तुझ्या
पासुन लपवत नाही. तु माझी जवळची
मैत्रिण आहेस. माझ्याविषयी जितकी तू
हळवी आहेस ना, तसाच तो आहे ग,
कधी काही झालं तर माझ्यामुळे तो
कोलमडेल गं, मला त्याला तस नाही
बघायचं. तो नेहमी आनंदात असला
पाहीजे."
पूजाच्या डोळ्यांत पाणी येत ती
स्वतःला सावरते नि अवनीला म्हणते.
"काय ग तु अस नको बोलू प्लीज ,
आता कुठे आयुष्यात छान दिवस
आले आहेत, मस्त जगायच"
पूजा- "अवनी, तुला माहीती आहे,
तु एक दिवस जरी नाही त्याला
दिसली नाही तर तो मला
विचारतो. खरंच त्याच तुझ्यावर खुप
प्रेम आहे. मी त्या दिवशी त्या दिवशी
त्याच्या डोळ्यांत दिसलं.
अवनी- "हो पूजा मला सगळ माहीती
आहे, कळतय पण काय करू?"
तिचे डोळे भरून येतात. माझही खुप
प्रेम आहे त्याच्यावर पण माझ्या आजार
पणामुळे मीच सगळं त्याला काहीच
सांगितलं नाही आणि अजुन एक
तो आमच्या दोघांविषयी खुप पुढची
स्पप्ने बघतो.मलाही सांगत असतो.
"मी यावर काय बोलू शकते गं,
देवाने पण आयुष्यात प्रेम दिलंय पण
तो जास्तीच आयुष्य द्यायला तो विसरला."
पूजा अवनीला जवळ घेते, मी समजु
शकते तुला म्हणते. अवनीला खुप भरून
येत.पूजा तिचे डोळे पुसते. तीला शांत
करते. तशी अवनीही डोळे पुसते, एक
छोटीशी स्माईल तिच्या ओठांवर येते.
मग ती पूजाला म्हणते, मला देवाने हे
जोपर्यंत आयुष्य आहे. तोपर्यंत एकही
दिवस वायाला न घालवता मी आदिसोबत
मस्त, आनंदाने जगेन. प्रत्येक क्षण साजरे
करेल. त्याच्या आनंदातच माझा आनंद
आहे. त्यादिवशी पासुन ती त्याच्यासोबत
प्रत्येक दिवस आनंदाने जगायची.
आदित्य नंतर ऑफीसच्या कामात तसेच
बिझनेस मध्ये खुप बिझी होतो. पण एक
तो न चुकता तिला रोज बोलायचा. त्याला
तिची खुप काळजी वाटायची. काही महीने
मस्त आनंदात जातात. अवनीला आदीत्यला
भेटावं वाटत होतं पण नेमक त्याला
त्याच्या कामासाठी अमेरिकेला जावं
लागत. तो तिला सांगतो की मी तिथुन
आलो की पहीले तुला भेटेन. तीही त्याचं
महत्वाचं काम आहे, त्याला तिला खुप
पुढे गेलेलं बघायचं होत म्हणुन ती
समजून घेते. पण अचानक अवनीची
तब्येत बिघडते. तिला हॉस्पिटलमध्ये
भरती केले जात. तिथे तिच्या मनात
खुप विचार येतात. ती आदीत्यला खुप
कॉल करते. त्याला एकदा तरी भेटावं
अस तिला वाटत होत. त्याला एकदा
मनभरून बघावं, आणि जवळ घ्यावं
अस तिला वाटत होतं. तिला तो जवळ
असावा या क्षणी अस वाटत होत.
मग काय व्हायच ते होऊ दे अस तिच
मन म्हणत होतं.
पण नियतीपुढे कुणाच काय चालतं?
तिची तब्येत जास्तच क्रिटीकल होत गेली,
तेव्हा तिने पूजाला मेसेज करून
सांगितलं की, तु परिक्षा देऊन आली
की माझी ती डायरी तु आदीत्यला
देशील. ती ही हो म्हणाली. बाकी
अवनी पुजाने प्रश्न विचारू नये म्हणुन
तिच्याशी छान बोलली. पूजा परिक्षेसाठी
दुर गेली होती.
अखेर तिने या जगाचा निरोप घेतला.
जगण्यासाठी चाललेली तिची लढाई
अयशस्वी ठरली.
आदित्य दोन दिवसांनी भारतात आला.
तसा तो अवनीला भेटायला आला.
तिथे तो पूजाला भेटला, पण त्याला
बघुन पूजाला रडू कोसळल. आदित्यला
काहिच समजेना. पण त्याला भिती
वाटत होती की अवनीचा कॉल, मेसेज
एकही रिप्लाय नाही.
"काय झालय पूजा?"
पूजाला काय बोलाव, कसं त्याला सांगाव
काहीच कळतं नव्हतं. पण तो सांग म्हणतो,
पूजा त्याला अवनी आपल्याला सोडून
गेली आहे आणि अवनीने आदित्यपासून
लपवून ठेवलेलं सगळ त्याला शेअर
करते. तेव्हा तो खुप रडतो. असं कसं
होऊ शकत त्याला कळत नाही. पण
पूजा त्याला स्वतःला सावर म्हणते.
"त्याच्या हातात एक डायरी देते "
त्यातुन त्याला सगळं समजतं.
"मला माहीती आहे आदीत्य, ही डायरी
एक दिवस नक्की तुझ्या हातात येईल,
पण तेव्हा मी या जगात नसेन पण
या डायरीच्या रूपाने मी नेहमी तुझ्या
सोबत असेन. "खरं तर मि तुला खोटं
बोलले. माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे,
होत आणि कायम राहील. सॉरी त्यासाठी.
मी तुझ्यापासून माझ आजाराचं लपवून
ठेवलं, कारण मला तुला नेहमी आनंदात
बघायचं आहे. माझ्या सांगितल्यावर तु
दुःखी झाला असता ते मला नको होत.
पण माझ्या जाण्यानंतरही तु कधीही
दुःखी होणार नाही. तु तुझ लाईफ
आनंदात जगावं आणि हो तुझ्या
चेहर्यावरची स्माईल कधिही हरवू देऊ
नको.मी नेहमी सोबत आहे अस समज.
पण प्रॉमिस कर की तु नेहमी आनंदात
राहशील आणि छान छान स्टोरिज
आणि कविता लिहीत राहशिल.
आपल्या दोघांसाठी.आपल्या प्रेमासाठी.
एक सांगायचं आहे, तुच माझ्या आयुष्यातील
पहीलं प्रेम आहेस.मी नेहमी तुझीच
असेन.प्लिज स्वतःची काळजी घे.
तुझीच अवनी
आदित्यने ती डायरी वाचली. त्याचे
डोळे भरून आले. पण तो स्वतःला
सावरतो. मनातच तिला प्रॉमिस करतो.
मी तुला वाटत तसच छान, आनंदात
जगेन.
समाप्त

