एक नवीन सुरुवात...बालपण...
एक नवीन सुरुवात...बालपण...
आईपणाचा प्रवास हा जेवढा सुखद तेवढाच त्यात जबाबदाऱ्यांनी भरलेला असतो. प्रत्येक मुलीची लग्नानंतरच आईपण अनुभवताना एक कसोटीच असते. एक निरागस जीव पूर्ण आईवर अवलंबून असतो. तो जीव जपताना प्रत्येक स्त्री स्वतःला विसरत असते.
माधवीही लहानपणापासून अशीच आईचा पदर कधीच न सोडलेली भित्रट . आईशिवाय तिचं कधी पानही हलत नसे. बाहेर कोणाकडे गेलं तरी ही बाकीच्या मुलांसारखं ही खेळतही नसे. आईलाच चिटकून राही.आईला सोडायच नाव घेत नसे. बालपणी मामाची, काकांची अतिशय लाडाची माधवी. मामाच्या गावाला तर तिचा वेगळाच थाट माट असे. आजीआजोबांकडून तर मागेल ते मिळायचं. जिलेबी तिच्या खूप आवडीची तिला न विसरता आणत. मामा तिला पोहायला नदीवर नेत असे. भित्रट पणा तिचा पळवण्यासाठी.काका काकूकडून भरमसाठ चॉकलेट, बिस्कीट, तिला मिळायचे .
माधवी लाडाकोडात हळू हळू मोठी होत होती. आईला सारखं वाटे माझ्याशिवाय कसं होईच पोरीचं . आईचं बोलणं तिने ऐकताच, " मी नाही लग्न करणार,मी इथंच राहणार.....! असं म्हणून आईला शांत बसवत . मी तुम्हा दोघांना सोडून नाही जाणार, "माधवी म्हणत.
आई तिला समजावून सांगत, "अग मुलीच्या जातीला ऐक ना एक दिवस सासरी जावंच लागत. एक दिवस तुझा राजकुमार तुला नेईला येईल. आई मी नाही जाणार सासरी. पुन्हा विषय हा नको काढू.तिचं ऐकून आई शांत राही.
माधवी एकुलती एक त्यामुळे आई तिचे खूप लाड करत असे . बाबांची तर माधवी परीच. त्यात एकुलती एक असल्याने अतिशय लाडात वाढलेली होती ती. तेवढीच समजदार जरा भित्रा स्वभाव होता तिचा. ती मोठी होऊ लागली होती.
माधवी दिसायला सुंदर, उंच, कमनीय बांधा, घारे डोळे तिच्याकडे बघतच राहावं अशी ती दिसायची. तिने उच्च शिक्षण घेतले होतें . शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला स्थळ पाहायला सुरुवात केली. तिचा पहिल्यादा स्थळ पाहायला नकार होता. आईबाबांनी खूप समजवल्यावर ती स्थळ पाहायला तयार झाली. पण दुःख होतंच आईबाबांना सोडून जाण्याचं हे मनात टोचत होत.
पहिलच स्थळ रोहितच आलं. रोहित मोठा व्यावसायिक होता. त्यानेही उच्च शिक्षण घेतले होतें. वडिलांबरोबर तोही त्यांचा व्यवसाय सांभाळायला मदत करत होता. नाकी डोळी छान,दिसायला हँडसम होता रोहित. कोणीही लगेच त्याच्या प्रेमात पडेल असाच होता.
रोहितची आई म्हणजे कडक लक्ष्मीच. राहणीमान ताट, बोलणं फटकळ होत खूप. हे स्थळ पहिल्यांदा माधवीला आलं.
माधवीला पाहताच रोहित लग्नाला तयार झाला. माधवी दिसत होतीही तशीच. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होतें. जांभळा रंग तिच्या गोऱ्या अंगावर खूपच शोभून दिसत होता.त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. फिकट पिंक कलरची लिपस्टिक, मॅचिंग टिकली आणि क्लिप रोहितने तिला बघताच पसंद केलं.
पोह्याचा कार्यक्रम उरकला. कसलाही वेळ न घेता रोहितला विचारून त्याच्या बाबांनी तिथंच होकार कळवला.
तुम्हीही तुमचा विचार कळवा, मुलीला विचारून असं जाताना सांगून गेले.
माधवीचे आईबाबा खुश होतें,रोहित आणि त्याच्या घरचे लोक त्यांना चांगले वाटले, माधवीला रोहित पसंद होता. पण आईबाबांना सोडून जायला तिचं मन तयार नव्हतं. त्यादिवशी माधवी आईच्या गळ्यात पडून रडली, आई जावंच लागतं का ग सासरी....?
माधवीची आई पण हळवी झाली होती. पोरीची अवस्था त्यांना कळत होती.
आईने तिला समजावलं, "अग प्रत्येक मुलीला यातून जायचं असतं. रोहित खूप छान मुलगा आहे. तुला आमच्यापेक्षा जास्त प्रेम देईल.
आईने तिला विचारले, "तुला स्थळ आवडल का....?रोहित तुला आवडला का...?
तिने लाजून मान हलवली,तिचे आईबाबा एकमेकांकडे बघून हसत होतें.
कसलाही विलंब न लावता रोहितच्या घरी स्थळ पसंद असल्याचे सांगितलं.
रितीरिवाज प्रमाणे काही महिन्यातच माधवी आणि रोहितचे लग्न झाले. माधवी लग्न करून रोहितच्या घरी आली. माधवीला सगळं अगदी स्वप्नवत वाटत होत. पूजा, देवदर्शन झालं की दोघांना हनिमूनला पाठवले.
आता खरी सुरुवात झाली माधवीच्या संसाराला. लाडात वाढलेली माधवी घरी कोणत्याही कामाचा अनुभव नसलेली आज किचनमध्ये उभी होती. सासूबाईनी तर किचनमधून रजाच घेतली होती. माधवीला कोठून सुरुवात करावी हेच कळत नव्हते. सांगणारे पण कोणी नव्हतं. तीचा चेहरा बघताच रोहित तिथं आला.
माधवी काय झालं अशी का उभी आहेस....?
माधवीच्या डोळ्यात पाणी आलं मला काही येत नाही किचनमध्ये,काय करावं काही कळत नाही...!
तू रडू नकोस मी आहे ना...? थांब मी तुला मदत करतो.
आज तुझा पाहिला दिवस आहे किचन मध्ये तर तू गोड काहीतरी कर नाष्ट्याला...!
शिरा येतो तुला करायला...?
तिने नकाराथी मान हलवली.
मी आईला विचारते,"माधवी म्हणाली.
तू आईला कॉल कर.
तोपर्यंत सासूबाईचा आवाज आला.
"मिळेल का नाष्टा आज...?
हो हो करते लगेच माधवीने सांगितले.
तिने आईला कॉल करून विचारले, आईने शिऱ्याची रेसिपी सांगितली.
माधवीने आईने सांगित्याप्रमाणे शिरा केला. शिरा सर्वाना आवडला. सर्वांनी तिचं कौतुकं केलं.
जेवण बनवण तर माधवीसाठी खूप अवघड गोष्ट, तरीही त्यात पीठ कसं मळायचं, कुकर कसा लावायचा सगळ्या गोष्टी माधवीला नवीनच काही येत नव्हत्या. तरीही आईला विचारून ती त्या करत होती. आईची तिला खूप आठवण येत. कधी कधी रडूही पण करणार काय...!
सासूबाई मधेअधे जेवणाला नाक मुरडत पण रोहित आणि त्याचे बाबा कधीच जेवणाबद्दल तक्रार करत नसत.
असेल तसें खात.
माधवी संसारात रुळू लागली. जेवण बनवताना तिची खूप धांदल उडत, पण हळूहळू त्यात तिचा जम बसू लागला. सासूबाईंची किरकिर ही असे, त्यांना ती जरा भिऊनच राहत असे.
काही महिन्यातच माधवीला दिवस गेले या बातमीने सासरी, माहेरी दोन्हीकडे आनंदाला उधाण आलं. काकू काका तिची गाठ घेण्यासाठी गेले. जाताना तिच्या आवडीचा खाऊ घेऊन गेले.माधवीच्या मामालाही आनंद झाला.सगळ्यांच्या कोडकौतुकाने माधवी भारावून गेली.
सासरी काम मात्र माधवीला चुकलं नव्हतं. होईल तसं ती काम पार पाडत होती. स्वतःला जास्त जपत होती. लहान जीव पोटात वाढत असल्याने तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. योगासन, ध्यान त्याबरोबर गरोदर पणातील व्यायाम ती मिळेल त्या वेळत करत. सासूबाई काम तर करत नसे पण किरकिर मात्र त्याची कशावरून तरी सतत चालू असे.
रोहित त्याच काम पाहत त्याला होईल तशी माधवीला मदत करत. तिची काळजी घेत असे. तिला गर्भसंस्काराचा, क्लास जॉईन करायला सांगितला सासूबाई लगेच म्हणाल्या, "आमच्या वेळेस नव्हतं बाई असले क्लास. त्यावेळी माधवीला खूप वाईट वाटलं. त्यात त्यांच्या नातवाचच कल्याण आहे,तरीही त्यांना त्यामध्येही प्रॉब्लेम वाटत होता .
एक दिवस न राहवून रोहित आईला म्हणालाच, "आई अग तिची अवस्था तरी बघ आणि तसं वाग. नाहीतर त्या बाळावर पण तसाच परिणाम होईल. तू तिला आधार देईचा, तर तूच तिला त्रास देतेस. मुलाचं बोलणं ऐकून सासूबाई नरमल्या पुन्हा बोलताना, वागताना विचार करून वागू लागल्या.
माधवीचा आठवा महिना संपत आला.नववा महिना लागला, ती माहेरी जाणार होती. रोहितला तसं आधीच कल्पना तिने देऊन ठेवली होती. माहेरी जायची तिला खूप ओढ लागली होती. कधी एकदा आईला भेटतेय असं तिला वाटत होत. तिच्या आईचीही तिचं अवस्था मुलीला डोळे भरून कधी पाहतेय असं त्यांना वाटत होत. तिचे आईबाबा तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होतें. एकुलता एक काळजाचा तुकडा त्यांचा जीव तिला पाहण्यासाठी तुटत होता.
रोहित माधवीला सोडण्यासाठी घरून निघाला. तिच्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होत. कसलाही नाजूकपणा न दाखवता पोरीनं नऊ महिने सगळं काम केलं. एवढी लाडात वाढली असून तेही त्यांची कसलीही अपेक्षा न धरता. पण थोडंफार तिच्या सासूबाईंनी केलं असतं आईच्या प्रेमानं तर तिलाही बरं वाटलं असतं.
आईबाबा तिचे दारामध्ये तिच्या येण्याची वाट पाहत होतें. त्यांची गाडी दिसताच दोघाना आनंद झाला. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. माधवी उतरताच आईला जाऊन बिलगली. तिच्याही डोळ्यात पाणी होत. आईचा पदर कधीही न सोडणारी माधवी आज स्वतः आई बनणार होती. माहेरी तिची आई तिची खूप काळजी घेत.आज तिच्यातील झालेले बदल आईला जाणवत होतें. कधीही स्वतःची काळजी न घेणारी माधवी स्वतःला खूप जपत होती. कारण तिच्या पोटात एक जीव वाढत होता.
रोहितने माधवीला सोडले, त्याचा पाहुणचार घेऊन तो घरी निघाला. त्याला माधवीचे बाबा राहण्यासाठी आग्रह करत होतें पण कामामुळे तो नंतर नक्की राहिलं असा म्हणून तो निघाला. त्याला जाताना पाहून माधवीचे डोळे भरून आले.
आईने ते बरोबर हेरले, काय झालं माधवी तुझ्या डोळ्यात पाणी...?
काय नाही आई ते काहीतरी डोळ्यात गेलं वाटतं.
नक्की का...? का कोणाची तरी खूप आठवण येईल ...?," असं तिची आई म्हणाली.
माधवी लाजून आतमध्ये गेली. आईबाबा दोघंही हसत होतें.
माहेरी माधवीचे लाड आई सगळे पुरवीत होती. तिचे मामा,काका तिची खाण्याची इच्छा असणारे सगळे पदार्थ तिला आणून खाऊ घालत .तिला हवं नको ते पाहत होती . लहानपणीची माधवी तिच्या आईला सारखी आठवत. आता बदलेली माधवी एक सक्षम आई होण्यासाठी यात जमीन आसमानाचा फरक होता. बाबा तिला हवं ते बघत . माधवीचे दिवस एकदम मजेत चालेले होतें.
काही दिवसांनी माधवीला डिलेव्हरीच्या कळा चालू झाल्या. तिला दवाखान्यात ऍडमिट केलं. तिच्या सासरकडील लोक सगळे आले.तिने एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला. सासूबाई मुलाला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही .आईबाबाना गोंडस मुलाला पाहताच आनंद झाला. माधवीच्या डोळयांतून आनंदाश्रू वाहत होतें.
" बाईपणाला आईपण प्राप्त झालं होत. तिला एक सुखद अनुभूती मिळाली. तिच्या स्त्रीपणाला पूर्णत्व प्राप्त झालं. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला की माधवी बाळाला घेऊन घरी आली. घरी आल्यावर तीच्या आई बाबांनी घर सजवून ठेवलं होत. माधवी आणि तिच्या बाळाचं जंगी स्वागत झालं. घरात बाळासाठी पाळणा, मऊ गादि , विविध रंगाच्या टोप्या,बाळाच्या सामानाच एक किट,बाळाचे सुगंधित तेल, शाम्पू, पावडर, साबण,मसाज ऑइल इ. तयारी बाबानी केली. दोन किलोचे डिंकाचे लाडूची ऑर्डर दिली होती.
दारासमोर रांगोळीची आरास होती,ओक्षण करून दोघा माईलेकाला घरात घेतले. सजवलेल घर पाहून माधवीला खूप छान वाटले. माधवीच आयुष्य आता बदलले होतें. रोहितला तर बाळाला सोडून जाऊच वाटत नव्हते. कामामुळे त्याला त्याच्यापाशी राहूनही चालणार नव्हते. तिच्या आईचीही खूप धावपळ होत होती.
आता तिला बाळंत पणाचे दिवस अनुभवायचे होतें.दुसऱ्या दिवसापासून आईने माधवीला लवकर उठवले. तिला आणि तिच्या बाळाला मालिश करून आंघोळ घातली. कमरेला शेक मिळावा म्हणून विस्तु फुलवला. वावडंग्या, शेपा,ओवा धुरी दोघांना दिली. माधवीला आता खूप भूक लागली होती.
आई आता मला काहीतरी खायला दे.
तिच्या आईने तिच्यासाठी मऊ तुपात केलेला शिरा आणला,आणि तिच्या हातात दिला. शिराच्या वासाने तिची भूक आणखीनच चाळवली. ती तोंडात शिऱ्याचा घास घेत होती आणि बाळाने रडून जोरात टाहो फोडला. अग आधी खाऊन घे मी बाळाला बघते.तिची आई म्हणाली, तिने घास तसाच ठेवून डिश बाजूला ठेवून दिली, आणि बाळ मांडीवर घेतले. आई बाळाला दूध पाजून शांत करते आणि नंतर खाते तिचं बोलणं ऐकून आईची मुलांच्या प्रति असणारी तळमळदिसून आली.आपल्या बाळाने आधी जेवावे यासाठी असणारी धडपड दोन्ही आईमध्ये दिसत होती.
*******समाप्त *********
