एक लग्न असेही
एक लग्न असेही


मिहीर आणि सान्वी इंजिनीरिंग ला एकाच कॉलेज मध्ये शिकायला होते..मिहीरच्या बाबांचं मोठा business होता तर सान्वी सामान्य कुटुंबातील होती.. मिहीरच्या घरचे जुन्या विचारांचे होते. .काही दिवसातच त्या दोघांमध्ये एक चांगली मैत्री झाली.. दोघांचे विचार आधुनिक व एकमेकांशी मिळते जुळते होते.. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचं... हळूहळू दोघांनाही कळून चुकलं की आपण प्रेमात पडलोय... पण दोघेही ही गोष्ट व्यक्त करायला घाबरत होते.. आपण सांगितलो/सांगितले आणि आपली मैत्री तुटली तर त्यापेक्षा नको... जे चाललाय ते चालू दे.. असं करत करत त्यांचा शेवटचा वर्ष संपला. .
आधीसारख भेटणं शक्य नसलं तरी अधून मधून ते भेटायचे.. कॉल्स वर बोलायचे...अशा लांब जाण्याने तर अजून त्यांना एकमेकांची ओढ लागली.. मिहीरला पुणे मध्ये एका कंपनीकडून ऑफर आली व तो तिथे जॉईन झाला.. सान्वी ही मग पुणे मध्येच नोकरीं शोधायला लागली.. काही दिवसातच तिलाही तिथे नोकरीं मिळाली.. आणि त्यांचं अव्यक्त प्रेम परत बहरायला लागलं..
इकडे सान्वीच्या घरी तिला मुले बघायला चालू केलं हे जेव्हा तिने मिहीरला सांगितलं तेव्हा तो नाराज झाला.. सान्वीच काही लग्नाचं होण्याआधी आपण पाऊल उचलायला हवं ह्याची त्याला जाणीव झाली.. एके दिवशी संध्याकाळी डिनर ला बोलावून त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं.. तेव्हा सान्वी थोडा विचार करू दे असं बोलून भाव खाऊन गेली... पण मनोमन ती खूप खुश झाली होती.. दोन दिवसाने सान्वीने मिहीरला आपल्या घरी जेवायला बोलावलंय.. का बोलावलं असेल ह्याचा विचार करतच तो तिच्या घरी पोहचला.. सान्वीच्या आईने खूप छान स्वागत केलं त्याच.. गप्पा गोष्टी चालू झाल्या.. थोड्या वेळाने आईने दही वडे आणून दिले तेव्हा मला दही वडे आवडतात हे तुम्हाला सान्वीने सांगितलं का असं विचारलं तेव्हा तीची आई म्हणाली.. “हो मग होणाऱ्या जावईच्या आवडी निवडी नकोत का जपायला” हे ऐकून मिहीरला समझलं की सान्वीचा लग्नासाठी होकार आहे तर.. खूप खुश झाला तो... त्याला वाटत होता उठाव आणि तिला मिठी मारावी पण आई होती म्हणून दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघत राहिले..
सान्वीची आई म्हणाली.. “ सान्वीने मला सगळं सांगितलंय.. मला आणि तिच्या बाबांना काही प्रॉब्लेम नाहीय.. कारण आम्ही तुला आधीपासूनच ओळखतो.. तू तुझ्या घरी बोलला आहेस का”
मिहीर म्हणाला.. “ नाही आई.. मी लवकरच बोलेन”
सान्वीची आई म्हणाली.. “ठीक आहे तू बोलून घे मग पुढचं बघूया आपण”
मिहीर तिथून निघाला आणि सरळ आपल्या घरी पोहचला.. त्याने आज ठरवलंच होता की लग्नाविषयी आई बाबांबरोबर बोलायचं.. जेवणे झाली आणि सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा मिहीर ने विषय काढला.. तेव्हा आई बाबा थोडे नाराज झाले.. जर मुलीच्या घरातले लग्न आणि मानपान सगळं नीट करणार असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही..मिहीर म्हणाला.. " आई तुला सान्वीच्या घरची परिस्थिती माहीत आहे.. त्यांना जसं जमेल तसं लग्न करून देऊ दे.. तू जास्त अपेक्षा नको करू.."
आई म्हणाली.. “ तू मुलगी शोधली आहे ना बाकीचं आम्हाला बघू दे.. ह्या मोठ्यांच्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस”
मिहीरचा नाईलाज झाला..लग्नाची बोलणी करायला रविवारचा दिवस ठरला..
रविवारी मिहीरकडचे सगळी लोक सान्वीच्या घरी गेली.. चहा पाणी झालं आणि बोलणीला सुरुवात झाली..
मिहीर कडच्या लोकांनी लग्न आणि मानपान सगळं नीट झालं पाहिजे आणि आम्हाला शोभेल असं मुलाच्या आणि मुलीच्या अंगावर सोने घालायची मागणी केली.. सान्वी कडची परिस्थिती थोडी गरीब होती.. सान्वीचे बाबा बोलले..” आमची परिस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे..खूप मोठा नाही पण नीट लग्न करून देऊ.. आम्हाला सोनं खूप जमणार नाही पण जेवढे जमेल तेवढं घालू”
असच हां-ना चालू होत.. इतक्यात मिहीर ला कोणाचं तरी कॉल आला.. तो घाई घाईने मेडिकल emergency आहे म्हणून निघून गेला... इकडे देण्या घेण्याच्या बोलणीत एकमत होईना... मिहीरचे घरचे नाराज होऊन घरी परतले..
सान्वीने मिहीरला कॉल करायचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलेना.. तिला कळत ही नव्हत की तो गेला कुठे... थोड्या वेळाने मिहीरचा कॉल आला आणि तेव्हा तिला कळालं की मिहीरचा गावाकडचा शेतातला कामगार निलेशच्या 3 वर्षच्या मुलाला ऍडमिट केलंय कारण त्याच्या हृदयाला hole आहे.. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय..त्याला शहरातलं काही माहीत नाही ना म्हणून मला कॉल केला.. सान्वीने मिहीरला इकडे झालेला सगळा प्रकार सांगितला.. मिहीर खरतर लग्नातील देणं-घेणं मानपान ह्या सगळ्याच्या विरोधातच होता.. तो सान्वीला बोलला.. “सान्वी, मला काय वाटत की असही आपल्या घरातल्यांचा देण्या घेण्यावरून एकमत होत नाहीय... तो निलेश तर माहितीय तुला.. खूप वर्षांपासून प्रामाणिकपणे आपल्या शेतात काम करतो तो..त्याच्या मुलाच ताबडतोब हार्ट ऑपेरेशन करायला सांगितलंय.. जर आपण कोर्ट marriage केलं आणि लग्नावर खर्च होणारा पैसा त्याला मदत म्हणून दिली तर.. पूर्णपणे खचलाय ग तो... 8 लाख खर्च सांगितलंय त्याला.. तू विचार कर आणि आई बाबांशीही बोल.. “
सान्वी म्हणाली. “खरंच खूप चांगल होईल असं झालं तर त्याला मदत ही होईल आणि त्याचा मुलगा ही बरा होईल.. “
सान्वीच्या आई बाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता.. ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे मदत म्हणून द्यायला तयार होते.. राहिला प्रश्न मिहीरच्या आई बाबांचा.. आई आधी तरी तयार नव्हती... असं कसं लोक काय म्हणतील.. एकुलता एक मुलगा आहेस.. साधेपणाने कसं लग्न करणार... मिहीर म्हणाला.. “अग आई लोकांचं सोड.. तू विचार कर.. लग्नावर खर्च करून दिखावा, आपली हौस मौज करण्यापेक्षा त्या पैशानी कोणाचा जीव वाचत असेल तर चांगला नाही का.. तुला, तुझ्या मुलाला पुण्य लाभेल आणि निलेशचा मुलगा पूर्णपणे बरा होईल..किती वर्षांपासून आपलं शेत बघतो ग तो..तो आहे म्हणून आपल्याला टेन्शन तरी आहे का शेताचा.. “
खूप समझवल्यावर आईला ही पटलं ते आणि ती तयार झाली.. जवळचाच मुहूर्त बघून मिहीर आणि सान्वीने कोर्ट marriage केलं आणि लग्नासारख्या गोष्टीवर होणाऱ्या अमाप खर्चाला फाटा देत एका मुलाला जीवदानही दिल.. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब हॉस्पिटलमध्ये गेले आणि निलेशला 5 लाखाचा चेक दिला..निलेशनी मिहीरला मिठी मारली आणि म्हणाला..”साहेब तुमचं हे ऋण मी कधी नाही फेडू शकणार..तुम्ही दोघंही स्वतःच लग्न साधेपणाने करून तो पैसा माझ्या मुलासाठी दिला..खरच समाजासमोर तुम्ही एक आदर्श निर्माण केलं आहे..देव प्रत्येक आईच्या पोटी तुमच्यासारखा सारखा मुलगा आणि सान्वी मॅडमसारखी मुलगी देऊ देत”.
खरच आहे ना..लग्नासारख्या गोष्टीवर खूप पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा अशा चांगल्या गोष्टीसाठी वापरता आला तर खूप जणांचे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि त्यातून मिळणारा आनंद वेगळाच आहे..खूप वेळा लग्नातील मानपान घेणं देणं हा एक दिखावाच असतो..हा दिखावा न करता कोणाला जीवदान किंवा कोणाच्या भल्यासाठी वापरता आला तर समाजाचं देणंही फेडलं जाईल...नाही का?
मला वाटत आजच्या तरुण पिढीने ह्याचा जरूर विचार करावा..