Shobha Wagle

Inspirational

2  

Shobha Wagle

Inspirational

एक छंद आगळा वेगळा

एक छंद आगळा वेगळा

4 mins
177


मी लिहिलेली पहिली कथा 'जगा वेगळी आवड' ही वाचकांना खूप आवडली. २००४ मध्ये गोव्याला नातवाच्या पहिल्या वाढदिवसाला मांडवी एक्सप्रेसने प्रवास करताना सहज प्लॅटफॉर्मवरच्या हमालावर नजर गेली. जवळ असलेल्या कागदावर दहा मिनिटात कथा लिहिली व माझ्या मुलीला वाचायला दिली. तिला ती खूप आवडली व माझ्या कथेचा जन्म झाला. खरं म्हणजे ती माझी कथा काल्पनिक होती. पण पंधरा वर्षांनी त्या कथेतल्या हिरो सारखा माणूस मला गवसला आणि मी अक्षरशः चकित झाले. जगात अशी माणसे असतात! त्या माणसाच्या परवानगीनेच मी हा लेख लिहिते.


श्री. सदानंद अमृते मुळ जोगेश्वरी, मुंबईत राहणारे. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असलेल. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुन्सिपाल्टी शाळा सरस्वती बागमध्ये झाले जोगेश्वरी पूर्वेला सारस्वत बाग आहे. इथे शंभर वर्षा पुर्वीची दगडी घरे आहेत. आपले महान लेखक पु. ल. देशपांडे जी लहानपणी इथे राहत होते म्हणे. गोलाकार घरे व मध्ये शांताराम मंगेश हॉल व त्याच जागेत मुन्सिपाल्टीची शाळा भरायची. ह्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरत. याच शाळेतून मि.अमृतेनी प्राथमिक म्हणजे चौथी पर्यन्त शिक्षण घेतले व नंतर पाचवी ते अकरावी त्याच्या घराजवळ असलेल्या बांदीवली शाळेतून झाले होते.


इंजिनीयरिंगची पदवी संपादन केल्यावर गोरेगांवला एक- दीड वर्षे सुप्रिम इडंस्टीट मध्ये 'ओपरेटर' म्हणून काम केले व नंतर त्यांना "महेद्र टाटा मोटर्स" कंपनित काम मिळाले व त्या कंपनितून ते सेवा निवृत झालेले सद्गृहस्थ. जोगेश्वरीत दहावी अकरावीत असताना रिक्षाचे लायसन्स काढून ठेवलेले. घरची परिस्थिती काही खास नव्हती. वडील एकटे कमवणारे व खाणारी तोंडे जास्त. अकरावी झाल्यावर वडिलांना थोडा संसारात हातभार लावता यावा ह्या उद्धेशाने लायसन्स काढून ठेवले. पण वडिलांचा त्याच्यावर खूप जीव होता. मुलाला खूप शिकवायचे ह्या उद्धेशाने कॉलेज मध्ये दाखल केले व सदानंदने इंजिनियरची पदवी संपादन केली. इंटरव्यू झाला व 'टाटा मोटर्स' मध्ये सर्विस लागली. त्यांचे बाबा पहिल्यांदा त्यांना पुण्याला कंपनीत घेऊन आले होते. बाबा परत काही येऊ शकले नाहीत हे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. मलाही खूप वाईट वाटले. मुलाला शिकून सवरून चांगल्या नोकरीला लावले त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले व ते मुंबईला परतले.


टाटा कंपनीत १९७८ साली रुजू झाले. एक वर्ष मुंबईत कांदीवलीत ऑपरेटर म्हणून ट्रेंनिग घेतले. नंतर पुण्याला टाटा मध्ये ३५ वर्षे काम करून २०१३ मध्ये निवृत्त झाले. त्यांना दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. वडिलांचा सोनाराचा धंदा होता. त्यांचा मागचा भाऊ ही शिकून सवरून कांदिवलीत मंहेद्र कंपनित लागून तेथेच सेवा निवृती घेतली. त्याच सगळ नीट झाले दुसरा भाऊ एस. एस. सी. झाला व तिसरा रिक्षा चालवतो. अमृतेंच लग्न १९८० साली झालं. अमृतेंची बायको गृहलक्ष्मी व त्याना एक मुलगा आहे. तो आय टी मध्ये इंजिनीयर आहे. त्याला ही फोटोग्राफीचा छंद आहे. त्याची सुनबाई मेकप आर्टिस्ट आहे. सध्या ते पुण्यात डांगे चौक मध्ये सगळे एकत्र राहतात. बंगला मोठा आहे. खालच्या दोन खोल्या भाड्याने दिल्यात व वरचे दोन स्वतः करता ठेवले आहेत. गच्चीवर सुंदर बागायत केली आहे. आंबा, चिकू, पेरु, लिंबं, पपया अशी व वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुलझाडे बादली व मोठ्या कुंडीत लावलेली आहेत. 


सोलर एनर्जीचा ही प्रकल्प आहे. पुण्यात तुळशी बागेत त्यांचे जुने घर आहे, ते त्यांनी भाड्याने दिलेले आहे. पंधरा वर्षे तेथे वास्तव्य करून नंतर स्वतः जमीन विकत घेऊन डांगे चौकात त्यांनी घर बांधले. जोगेश्वरीला त्यांची आई तीन मुलांबरोबर राहते व हे येऊन जाऊन असतात. चार चाकी, दोन चाकी सगळ्या सुखसोई आहेत. दहावी अकरावीला असताना आर. टी .ओ. मधुन रिक्षाचा बँच मिळवला होता, तसेच नंतर त्यांनी ट्रक व लाँरी चे ही लायसन्स मिळवले व थोडे दिवस ते ही चालवले. 


टाटा कंपनीत सुरळीत नोकरी करून २०१३ मध्ये ते सेवा निवृत झाले. दोन वर्षे त्यांनी कशीबशी काढली. पण त्यांना स्वस्थ बसता येईना. नदीत पोहणे व पावसाळ्यात वाहत्या नदीत पोहण्याच्या मित्राबरोबर शर्यती लावणे सायकलिंग, ट्रेकिंग व भटकंती चालू होतीच तरी जीवाला चैन पडेना. रिकामटेकडं बसवेना. रिक्षाचे लायसन्स होतेच व चालवायचीही आवड होती. मग विचार केला, असाच वेळ घालवण्या पेक्षा सकाळ संध्याकाळ रिक्षा चालवू भटकंती होईल व वेळ ही सत्कारणी लागेल. म्हणून २०१५ साली रिक्षा घेऊन रिक्षा चालक बनले व 'ओला' या कंपनीशी संलग्न झाले. तीन तास सकाळी व तीन तास संध्याकाळी, त्यांच्या सोयीनुसार ते रिक्षा चालवतात. पैशांकरता नसून निवृती काळ आनंदात घालवण्यास व लहानपणापासून रिक्षा चालवायचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यास असा आगळा वेगळा छंद ते जोपासतात.


माझ्या "जगावेगळी आवड" या कथेतल्या नायकाने आपली आवड त्याच्या घरच्यांपासून लपवली होती. तर ह्या अमृतेंनी आपली आवड सर्वांना जगजाहीर केलेली आहे. रिक्षा चालवणे हे त्यांना लाजिरवाणे मुळीच वाटत नाही, उलट त्यांना त्याचा अभिमान वाटतो. एवढेच नव्हे तर ते त्या रिक्षाने व्ययस्कर आजारी व गरजूना विना मोबदला ने आण करायची मदत करतात. इथे त्यांची कैवारी वृत्ती ही दिसून येते. आपला वेळ व पैसा असे क्वचितंच कुणी दुसऱ्याकरता खर्च करतात.


आपला छंद जोपासून समाजसेवेत ही स्वतःला झोकून देणारे अमृते जगावेगळेच. निवृतीनंतर आपला वेळ कसा घालवावा हा प्रश्न बायकांना जास्त त्रासदायक नसतो जेवढा तो पुरुषांना असतो. बाई स्वतःला घरकाम, स्वयंपाकपाणी, घराची टापटीप, नातवंडात रमते व गप्पात वेळ घालवते. त्यामुळे नवरा नसला तरी ती स्वतःला कामात मग्न करुन घेते. पण पुरुष निवृत्त झाला किंवा त्याची बायको हयात नसली तर तो एकाकी पडतो. त्याचे जर काही छंद असले किंवा समाजसेवेचे गुण असले तर त्याचा निवृत्ती काळ सुखद होऊ शकतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational