एक अभागी
एक अभागी
सकाळपासून नक्कीच उपाशी असेल तीच्या चेहऱ्यावरून दिसत होती.कारण ती माहेरी भावाकडे तुकडे मोडत होती. आज ५o वर्षांपूर्वी वडिलांनी लाडकी लेक एका सुसंस्कृत घरात एक माऊली ह.भ.प. यांचे घरात एक शेतकरी सदन कटुंबात दिले होते. अगदी दृष्ट लागेल असा संसार चालु होता दोन मुले व एक मुलगी अशी फुले ऊमलेली. भरलेल्या घराला दृष्ट लागावी तशी दृष्ट लागली (ह.भ.प.) हळुच भलतीकडे पळू लागला. दारुचे व्यसन लागले घरी लक्ष नाही लक्ष्मीने घराकडे पाठ फिरवली. मुलांचे शिक्षणाची हेळसांड झाली त्यात एक अपत्य मतिमंद निघाले शेवटी मोलमजुरीची वेळ आली. त्याने टॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. तीही ब्लास्टिंग ट्रॅक्टरवर काम चातु असतांना अचानक स्फोट झाला व स्वतःचा विहीरीतून वर फेकला गेला. मात्र पुण्याईने वाचला एक वर्ष दवाखाना हातपाय फ्रॅक्चर . पैसे देूवून टॅक्टर मालकाने प्रकरण मिटविले व घरि बसवले. मात्र विचारशक्ती दुबळी झाली .व्यसन वाढले. आणि दोन वर्षात निधन झाले. ते ही विहिरीत स्फोटकात? ना विमा? ना भरपाई? ही "अभागी " फक्त बघत राहिली . त्यांच्या बहिणीने मुलगी सून म्हणून पदरात घेतली. मुलगा कामाला नेला शिक्षण सोडले ना ?आईचा वा बापाचा धाक वाईट वळण लागले . भाऊबंदकीने शेतीवर डोळा ठेवून शेती विकण्यास भाग पाडले. यात नवीन शेती घेवून देतो सांगून स्वतःची बंजर जमीन दिली पैसा बरबाद झाला. ती जमीन खरेदी झाली नाही. शेवटी मोठ्या मुलाचे लग्न लावून दिले तो घर जावई म्हणून गेला. मात्र ती ही जमीन निपुत्रिकाची होती. तेही आज कळाले मुलाचाही संसार सुंदर चालला होता.
दोन मूल झाली आईचा व भावाचा सांभाळ करत होता . पण वळण चांगले नाही पैसा संपला.मजुरी करून पोट भरणे लहान भावू बकऱ्या वाळून पोट भरू लागला वडिलांचे श्राद्ध होत नाही . तोच मजुरी साठी विहिरी वरून पाणी भरणे व शेतावर जाणे रात्री पाणी भरण्यासाठी मातिमंद भाऊ गेला पाय घसरून तोही अपघाती मेला ते दुसऱ्या दिवशी सकाळी कळाले . विहीवर हंडा चप्पल तशीच होती .या "अभागी "ला दुसरे श्राद्ध घालावे लागले.सगळे दुःख पचवून या अभागीला वात, पित्त. बीपी' चा त्रास दवाखाण्यासाठी पैसा नाही स्वतः मजुरी साठी जाऊ शकत नाही . हालचाल होत नाही त्यात सूनबाईचे आईबाप व हि एक अभागी.तीन म्हतारी, तीन मूल अन्नबरोबर शिव्या? खावून दुःख. वेदनेच्या गोळया खावून हि अभागी जगत होती त्याच वेळी सूनेचा बापाचे श्राध्द घालावे लागले ? दोन्ही म्हाताऱ्या मांजरी सारख्या भांडत. रोज तमाशा एकश्राद्ध संपले कि पुढच्या श्राद्ध पूर्वी दुसऱ्याचे ठरलेले असे . नियतीने या अभागी साठी काय ढेवले अचानक एक दिवस मुलगाही वारला निमित्त गाडी वरून पडल्याचे त्याचे श्राद्ध झाले?
सून मुलांना घेवून माहेरी निघून गेली गावात इंदिरानगर (बेघर) मध्ये घरे घेवून रहायला गेली.मला हाकलून दिल भावाने आधार दिला आज तोही निराधाराप्रमाणे त्याच्या घरात वागतो.इथे आल्यावर भावाच्या बायकोचे श्राद्ध घातले ?या अभागी स आज भावाची सून त्यालाही व मलाही आज पोटासाठी शिव्या व अन्नासाठी वाट बघावी लागते . या अभागीला त्यात एकुलती एक मुलगी तीही संसार सोडून आजारपणात मध्येच गेली . अंत्यविधीसाठी मला नेले फक्त तिचे मुख दर्शन झाले . आज निराधार म्हणून सरकारचे आधारकार्ड ही नाही.तरिही हि अभागी का ? जगते ते तुमीच सांगा. कुणासाठी ? मेल्याहुन मेल्यागत जीवन , मणुष्य जीवन एकदाच मिळते अस म्हणतात ते नेहमी आनंदी जगा . निखळ प्रेम . आनंद लुटा पृथ्वी हाच स्वर्ग असतो.एक "नारी "साऱ्या जगाला उद्यारी ?. मग मी सांगा कुणाचा उद्दार करित आहे .आयुष्यातील सर्व नाती नियती का कापत आहे . कि अजुन माझे कोणते नशिबाचे भोग?वा नियतीला अजुन काय दाखवायचे असेल शेवटी मी स्वतः ना मरू शकत वा इतंरासाठी जगु शकत फक्त या क्षणभंगूर शरिरात आत्मा आहे म्हणून क्रिया चालु आहेत मन .भावना . असुन नसल्या प्रमाणे जगत आहे . कारण मी खरच एक"अभागी "आहे .
