Nilesh Desai

Drama Romance

1.0  

Nilesh Desai

Drama Romance

एक आठवण...

एक आठवण...

3 mins
730


लिहायलो बसलो खरा आज पण मनात इतके काही विषय आहेत की नेमकं कोणत्या विषयावर लिहू अन् सुरूवात कुठून करू सुचत नव्हतं. पीसीवर लावलेल्या माझ्या फेवरेट कलेक्शन मधलं एक गाण संपले आणि सुरू झाले.... "पीया बसंती रे, काहे सताये आजा..."

"जाने क्या जादू किया.. "


खरंच की एकदम ती आठवली, जादू झाल्यासारखी अचानक इतक्या वर्षांनी... अगदी जसे च्या तसे सर्व नजरेसमोर आले अन् थोड्या वेळासाठी भूतकाळात त्याच बसस्टॉपवर जाऊन बसलो जिथून मी काहीच न बोलता निघून गेलो होतो...


जूलै २००६ मध्ये बीईएसटी मध्ये मी अॅप्रेंटीस म्हणून एक वर्षासाठी रूजू झालो. प्रत्येकी चार महीने वेगवेगळ्या तीन डेपोंमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता. १२०० रूपये विद्यावेतन भेटणार होते आणि महत्वाचं म्हणजे एक वर्ष बसप्रवास मोफत. मी बराच खूश होतो. अख्खी मुंबई फुकटात कमीतकमी दहा वेळा पालथी घातली. त्याच दरम्यान मला पाचव्या महीन्यापासून सायन जवळचा प्रतिक्षानगर डेपो भेटला. सकाळी साडेसात ते दूपारी साडेतीनची ड्यूटी. मस्त उरलेला अर्धा दिवस भेटायचा ईतर कामासाठी.


प्रतिक्षानगरला जाण्यासाठी मला विक्रोळी वरून पहीले घाटकोपर डेपोला जावे लागायचे. तिथून मग स्टाफबस असायची. सुरूवातीचे दोन दिवस नवलाईत गेले. अन् मग इकडेतिकडे नजर बाकी गोष्टी न्याहाळत जायला लागलो. शेवटची सीट अन् खिडकी ही माझी अत्यंत आवडती जागा. ते यासाठी कारण एकतर तिथून सगळीकडे नजर ठेवता येते अन् दूसरे म्हणजे आपल्यावर कोणाची नजर पडत नाही म्हणून. 


असंच चारपाच दिवस गेले अन् एक दिवशी घाटकोपर डेपो सोडल्यावर बाहेरच्या पहील्याच स्टाॅपवर पाहीले. 'ओह् माय गुडनेस्...' नकळत ओठांतून शब्द बाहेर पडले. काय सुंदर दिसत होती ती... बसस्टॉपवर आतमध्ये ती बसलेली. तिचा चेहरा एकदाच पाहून लक्षात राहण्यासारखा होता. गोरीपान, नाजूक शरीरयष्टी आकाशी रंगाचा ड्रेस तोही फूल स्लीव्ह् चा अहाहा.. तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होता. मी तिला पाहतच राहीलो अन् बस पूढे निघाली. मी अगदी बस वळण घेईपर्यंत पाहत होतो. पण तिचे काय माझ्याकडे लक्ष गेले नाही. 


एक दिवस तिला प्रपोज करायचाच मग काय होईल ते होईल असा ठाम निश्चय मनाशी केला. दूसर्या दिवशी पून्हा तेच.. ती दूसरीकडेच पाहतेय आणि मी तिच्याकडे पाहतोय काही कळायच्या आत बस निघाली. तिसरा दिवस.. बस तिच्या स्टॉपवर आली ती तशीच कुठेतरी भलतीकडे हरवलेली. मी बसमधल्या सर्व स्टाफ कडे अगोदर पासूनच नजर ठेवून होतो. सगळे आपापल्या गप्पांत व्यस्त होते, त्याचा फायदा उचलत मी ऊगीचच काहीतरी ओरडलो अन् त्याचा फायदाही झाला. तिची नजर माझ्यावर पडलीच. मीही एक छानशी स्माईल दिली पण तिने रागाने माझ्याकडे बघत नजर फिरवली.. "अरर् हे काय, सुरूवात अशी व्हायला नको हवी होती". मी मनाशीच म्हटलं.


आता काही होवो तिच्याकडे रोज असेच पाहायचे तसेही मी बसमध्ये आणि ती स्टॉपवर म्हणजे काही ऊलट व्हायची भीती नव्हती. आणि स्टाफबस असल्यामुळे ती काय आपल्याला मारायला आतही येऊ शकणार नाही याची खात्री होती. असो हे आता रोज होऊ लागले तीला पाहून मी स्माईल द्यायचो अन् ती रागाने माझ्याकडे डोळे वटारून पाहायची. असेच मोजू सतरा दिवस गेले, आणि तो दिवस आला. माझ्या स्माईलला तिनेही हसून रीप्लाय दिला. काय सांगू काय आनंद झाला मला तेव्हा. ठरवलं मग उद्या कामाला दांडी.. मस्त तिला प्रपोज करून लगेच कुठेतरी फिरायला जायचं.


दूसर्या दिवशी सकाळी लौकरच ती येण्याच्या आधी तिच्या स्टॉपवर जाऊन बसलो. दिवसभराचं प्लानिंग माझ्या डोक्यात चाललेलं. आज पहिल्यांदाच तिला जवळून पाहणार होतो. तीने मला नीट पाहीले असेल का? खिडकीत माझा फक्त चेहराच दिसत असेल असा अंदाज लावत माझी नजर वळली. आकाशी रंगाचा तोच ड्रेस जो पहील्या दिवशी तीने घातलेला तोच ड्रेस घालून ती समोरून आली अन् माझ्यापासून थोडं अंतर ठेवून माझ्या डावीकडे बसली. मी दुसरीकडेे पाहीले दोन शाळेची मूले होती. पून्हा तिच्याकडे पाहीले तिचे लक्ष नव्हते माझ्याकडे. माझी स्टाफबस आली अन् तिची नजर त्याला शोधू लागली पण तो आज नव्हताच तिथे.. तीने चेहरा पाडून मान खाली घातली. 


मीही चेहरा पाडून तिथून निघालो. चालता चालता विचार करू लागलो की मान्य आहे ती नेहमी बसलेलीच दिसली मला पण तिच्या बसण्यावरूनही साधा आपण तिच्या ऊंचीचा अंदाज लाऊ शकलो नाही. अहो चक्क चारपाच इंच तरी मोठी असेल ती आमच्यापेक्षा. दिसायला आम्ही मस्त चिकनं पोर, पण हाईट आमची फाईव्ह पाॅईंट फोर... कदाचित चालूनही जाईल मनात विचार आला पण नाही जमलं पुढं जाऊन बोलणं.


त्याचदिवशी कामाला जाऊन उरलेले तीन महीने कायमची सेकंड शिफ्ट करून घेतली.


. पून्हा कधीच तिला पाहता आले नाही.. "पीया बसंती रे.. काहे.. सताये.. आ..जा....." गाणे संपले अन् डोळे नकळत पाणावले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama