The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Nilesh Desai

Tragedy

2.4  

Nilesh Desai

Tragedy

शापीत राजपूत्र – भाग तिसरा

शापीत राजपूत्र – भाग तिसरा

6 mins
953'प्रेम' कि 'मैत्री' यावर आपलं काय उत्तर असेल..? नीरवने खरंच योग्य केलं का?


"काय....? शुद्धीवर आहेस का..?" मेघनाने गीताला रागातच विचारले.


गीताने शाळेत आल्याआल्याच कालचा वृत्तांत मेघनाला सांगितला तसा मेघनाचा पारा चढला होता. 'नीरव, तेही पुजासोबत.. कसं शक्य आहे हे? दोघेही दोन टोकाची माणसं.. आणि नीरवनी पुजाला प्रपोज करणे हेच नेमकं मेघनाला रूचलं नव्हतं. 


यामागचं सत्य काय याची शहानिशा करणे आता मेघनासाठी निकडीचे होते. सरळ जाऊन तीने पुजाला गाठले आणि कालच्या प्रकाराबद्दल विचारले.


 पुजाने कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितले, "हो गं.., मलापण अनपेक्षित होतं हे त्याचं प्रपोज करणं. पण मी तर नाही म्हटले त्याला. माझ्या टाईपचा नाही गं तो. आणि मला माहीत नाही का गं.. तो तुला किती आवडतो ते..! माझं उत्तर ऐकून कसलं तोंड झालं होतं माहीत आहे का त्याचं." पुजाने जाणीवपूर्वक हे सर्व मेघनाला सांगताना आपल्या चेहर्यावरती खट्याळपणाचे भाव आणले होते.


आणि त्याचा व्हायचा तो परिणाम मेघनावर झाला. तीच्या समोर नीरवचा बिच्चारा चेहरा येऊ लागला होता. प्रेमात ठुकरावलेल्या नीरवबद्दल तिच्या मनात अजूनच सहानुभूती वाटू लागली. 


कसंना.. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना आपल्या मनात त्याला आपलंस करून घेण्याची सुप्त इच्छा असते. त्याच व्यक्तीने मग आपल्याला कळत नकळत दिलेला त्रासही क्षुल्लक वाटू लागतो, आणि त्यापुढंही जाऊन त्या व्यक्तीला इतर कोणी दिलेला त्रास मात्र आपल्याला जाणवू लागतो. प्रेमाच्या परिभाषेत ही बाब प्रकर्षाने येते.

नकळत नीरवने आपल्याला नकार दिलाय. पुजाकडून प्रेमात मिळालेल्या नकाराने नीरवची अवस्थाही माझ्यासारखी नको व्हायला. 


मेघनाच्या मनात राहून राहून हेच विचार येत होते. नीरव आपल्यापासून लांब जातोय हे दिसत असुनही त्याला होऊ शकणार्या प्रेमभंगाच्या वेदना मेघनाला जाणवू लागल्या होत्या. 


"काय गं, कुठे हरवलीस?" पुजाच्या प्रश्नानं मेघना भानावर आली. 


"नाही गं.. असंच थोडं." मेघनाच प्रत्युत्तर.


"ऐक ना.. उदया संध्याकाळी येणार आहेस ना माझ्या घरी. माझा वाढदिवस आहे. आपल्या शाळेतली बरेचशी मुलं येणार आहेत." पुजाने अगदी हट्टानेच मेघनाला यायला सांगितले.


"सगळे येणार आहेत तर येईनच मी. घरी सांगेन तसं. पण किती वाजता..? मेघनाने विचारले.


"सात वाजता तू सुबोधच्या घराजवळ येऊन थांब.. मी येते तुम्हाला घ्यायला.. " पुजाच्या वाढदिवसाला बोलावण्यामागचा मतितार्थ मेघनाने चटकन ओळखला. पण तसं न दाखवता तीनं यायचं कबूल केलं.

मेघनानंही इकडे आपला वेगळाच प्लान आखला. तिला माहीत होतं की पुजा आपल्याला सुबोधविषयीच समजावण्याचा प्रयत्न करणार. तरीही मेघना सुबोधच्या घरी येण्यासाठी तयार झाली होती.


दुसर्या दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मेघना नीरवच्या दरवाज्यात उभी होती. 


"नीरव, चल आपल्याला लौकर निघायचं आहे." ..मेघना.


"अगं पण कुणीकडं..? नीरवने विचारले.


"नाही सांगितले तर येणार नाहीस का तू..? माझ्यावर विश्वास नाही का तुला..? जराश्या रागातच मेघनाने उत्तर दिले. "ठिक आहे बाबा चिडू नकोस.." असं बोलून नीरव चप्पल घालून निघू लागला. 


दोघेही एकमेकांशी न बोलताच चालत होते. खरंतर बोलण्यासारखं खुप काही होतं दोघांकडे. पण शब्द ओठांची साथ देत नव्हते. ज्युनियर केजी पासूनची मैत्री.. तेव्हा तर मैत्री काय असते हे ही त्यांना माहीत नव्हते. तरी त्यांनी एकमेकांसाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी अजुनही लक्षात होत्या त्यांच्या. 


तीच्या मनावर तर याचंच अधिराज्य होतं अगदी अगोदरपासून. मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे तीचं तिलाच कळलं नव्हतं. आणि आता तर ते प्रेम इतकं परिपक्व झालेलं की स्वार्थ, ईर्षा यापलीकडे जाऊन समजू लागलं होतं. 


सात वाजायच्या सुमारास दोघेही सुबोधच्या घराजवळ पोहोचले. तिथे अगोदरच उपस्थीत असलेल्या पुजाने नीरवच्याही येण्यावर आश्चर्य व्यक्त केले. कुठल्याही विषयाला मग गोल गोल न फिरवता मेघनाने सर्वांसमक्ष थेट मुद्द्याला हात घातला.


"पुजा, मला माहीत आहे तू फक्त तूझ्या वाढदिवसानिमित्त मला इथे नाही बोलावलेले..."... मेघना शांतपणे म्हणाली. 


समोर उभे असलेले सुबोध आणि नीरव गपचूप सगळं ऐकत होते. 


" बरं, तुला जर माहीतच आहे तर मग प्राॅब्लेम काय आहे मेघना.. आज ही गोष्ट आपण क्लियरच करूया. काय कमी आहे गं सुबोध मध्ये?" "खरं प्रेम करतो तो तुझ्यावर.. तुझ्या इतक्या नकारांनी जर दुसरा कोणी असता तर कधीच बाजूला झाला असता.." पुजा अनुभवी व्यक्तीसारखी मेघनाला समजावत होती.


सुबोध डोळ्यात पाणी आणून चुपचाप होणारा प्रकार ऐकत होता.


आणि नीरव...


नीरवला समोर फक्त मेघना दिसत होती. नाजूकशी बाहुली... या बाहुलीला आपलं करावं असं खुप मनात आल त्याच्या. किती छान होईल ना.. आमच्या म्हातारपणी आठवण्यासाठी फक्त आमचं तारूण्यच नसेल.. तर आमचं निरागस बालपणही असेल.. शाळेच्या सुरूवातीपासूनच्या दिवसांतलं. आजपर्यंतचा मेघनासोबतचा प्रवास किती छान घडला... तीनं मैत्रीपूर्वक दिलेली ग्रीटींग्स अजुनही कपाटात आहेत.. कसं कधीच मनात नाही आलं माझ्या की आमचं नात मैत्रीपलीकडचं आहे की मनात अगोदरपासूनच तीला गृहीत धरलं होतं.... असो आता तरी व्यक्त व्हावं तीच्यापुढे.. 


नीरव मनातले विचार थांबवत पुजा आणि मेघनाचं संभाषण ऐकू लागला.


पुजाने जमेल त्या तर्हेने मेघनाला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. जोडीला सुबोधनेही आपलं मन मोकळं केलं होतं. तो त्याच्या विचारांवर ठाम होता. सर्व ऐकून मेघनाच्या चेहर्यावरून तरी असं वाटत होतं की ती सुद्धा सहमत होत आहे त्यांच्याशी. 


"बघ मेघना.. प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो....," पुजाने आपल्याकडून शेवटचं सांगितले. 


"खरंच पुजा, तु म्हणतेस ते खरंच आहे.. मला पटलंय तुझं म्हणणं आणि सुबोधचं माझ्यावरचं प्रेम.. मेघना उत्तरली.


मेघनाचं उत्तर ऐकून नीरवच्या काळजात धस्स झालं. ते शब्द ह्रदयाची चिरफाड करायला पुरेसे होते. नीरव डोळ्यांत येणारी आसवं थांबवण्याच्या वायफळ प्रयत्न करू लागला. सुदैवानं ते तिघं आपल्या चर्चेमध्येच व्यस्त होते. त्यामुळे आसवं पुसताना कोणी पाहू शकलं नाही.


मेघना पुढं बोलू लागली.. "सुबोध, माझा होकार तू अगदी या क्षणापासून समजू शकतोस.. पण तरीही मला थोडा वेळ दे. सध्याची माझ्या मनाची परिस्थिती तितकीशी चांगली नाही.."


"तुला अगदी हवा तितका वेळ घे.. मी तसंही तुझी वाट पाहतच आहे. आणि तुझ्यावर कसलाही दबाव टाकून मला हे प्रेम नाही मिळवायचं. अगं तुला पाहताक्षणीच तुझ्या प्रेमात पडलेला मी. तु भेटशील या एका आशेवरच आहे .." ....सुबोध.


सुबोधच्या उत्तरानं जितकी मेघना खुश झाली तितकाच नीरव गोंधळून गेला. साला सुबोध एकदा जरी काही चुकीचं बोलला असता तर प्रश्नच मिटला असता. पण हा प्रत्येकवेळी मेघनाच्या विषयात सेन्टी होतोय म्हणजे नक्कीच हा तिच्या प्रेमात वेडा झालाय. मित्र की प्रेम या द्विधामनस्थितीत अडकलेला नीरव कोणत्याही एका मतावर ठाम होत नव्हता. दोलायमान स्थितीतलं पारडं प्रत्येकाच्या नव्यानव्या खुलाशानुसार कधी मित्राकडं तर कधी प्रेमाकडं झुकत होतं.


"ओके ठिक आहे मग.. थॅक्स.." असे बोलून मेघना पुजाकडे वळली.


"पुजा.., प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो खरं ना..?" मेघना.


"हो अगदी खरं, मी खुप खुश आहे शेवटी तु आणि सुबोध एकत्र आलात.." पुजा.


"मग नीरवबद्दल काय विचार आहे तुझा...?" मेघना.


मघापासूनच्या चर्चासत्रात या एका प्रश्नाने भयाण शांतता पसरली.


मेघनाचा डाव नीरवच्या लक्षात आला.. अन् जराही वेळ न दवडता त्याचा हात पुजाच्या हातात गेला.. ही कृती नीरवने जाणून केली की नकळत एक प्रतिक्रिया म्हणून घडली हे खुद्द नीरवला कधीच कळाले नाही. पुजाही पुरती बावरली.. आणि सुबोधला यांचं नेमकं काय चाललंय हेच उमगत नव्हतं...


"माझ्याबद्दल काय विचार असणार आहे हीचा. आम्ही तर अगोदरच एंगेज्ड आहोत.." नीरव चेहर्यावर हास्य आणत आणि पुजाचा हात हलकाचा दाबत म्हणाला.


"हो ना.. म.ई.. मी नां.. काल संध्याकाळीच नीरवला भेटून होकार कळवला.. राहवलंच नाही गं बाई मला, शेवटी 'प्रेम त्याच्यावर करावं जो आपल्यावर प्रेम करतो....हो ना?' पुजानं कसंबसं वेळ मारायचं काम केलं.


या तिच्या स्पष्टीकरणावर चौघे हसु लागले. 


"चला घरी निघू आता.. अगं पुजा तुझा वाढदिवस..?" मेघनानं पटकन आठवल्या सरशी विचारलं.


"वाढदिवस..? ते काय असतं.." म्हणत पुजा हसु लागली तशी सुबोधनंही तिला साथ दिली.


"खोटारडे.. पाप लागेल तुला.. " खोट्या रागात मेघना म्हणाली.


"अरे.. किसीको उसका प्यार मिलाके देना पुण्य का काम होता है!" पुजानेही लव्हगुरूच्या थाटात आपल्या कामगिरीचं कौतुक करून घेतलं. 


साधारण एक तासाच्या चर्चासत्राला पूर्णविराम लागून चौघे निघाले. मेघनाला सोडायला सुबोध सोबत गेला. इकडे पुजा आणि नीरव हळूहळू चालत होते. पुजाचं घर जवळच होतं. बोलता बोलता पुजाने नीरवच्या प्रसंगावधाचं कौतुक केलं. नीरवनेही पुजाचे अगदी परवाच्या भेटीपासून ते आतापर्यंतच्या तीच्या अॅक्टींगबद्दल आभार मानले.

नीरवंच पुजाला प्रपोज करणं, तीचा नकार, शाळेतला बोभाटा हे सर्व त्यांच्यात अगोदरच ठरलेलं होतं. पण मेघना थोडी स्मार्ट निघाल्यामुळे त्या नकाराला ऐनवेळेस होकारात बदलावं लागलं होतं. 


"नीरव.. आता पुढे काय आणि किती दिवस...?" पुजा.


"दहावी संपायला चारच महीने उरलेत तोवर हे नाटक करू.. नंतर आपल्या वाटा वेगळ्याच होतील ना. तोपर्यंत त्यांचही प्रेम फुलेल.." नीरवचं बोलणं संपता संपता दोघेही हसू लागले.


"पुजा, आपली वाट आताच वेगळी झाली की गं.." पुजाच्या घराकडे बोट दाखवत नीरव म्हणाला.


"हो ना.. चल बाय, थॅक्स..." पुजा.


"बाय.. थॅक यु..." नीरव.


पुजाला सोडून निघालेल्या नीरवची पावलं आता झपाझप पडू लागली.. कसलंस ओझं मनावर असल्यासारखं.. काहीतरी हक्काचं हरवल्यासारखं.. रस्त्यावर दिसणारे माणसांचे चेहरे काहीसे उर्मट काहीसे त्रासिक दिसत होते. कुत्रेही एकमेकांवर भुंकत राग व्यक्त करत होते. मनातलं दुःख सभोवतालच्या सर्वच नजार्यावर हावी होऊ लागलेलं. रात्रीच्या अंधारातलं टपोरं चांदणं आज तितकसं खास दिसत नव्हते. आकाशातला चंद्र स्पष्ट दिसत होता... 


पण त्याचा चंद्र.. दुसर्या कोणाबरोबर तरी होता. 


हो झालं प्रेम तिच्यावरती पण तीचं आपल्यावरचं प्रेम कळाल्यानंतर. मित्र तर अगोदरपासूनच तिच्यावर प्रेम करत होता. परीस्थिती सगळी कळुन वळलीही होती. पण तरीही धाडस झालं नाही त्याचं, मित्राच्या स्वप्नाआड यायचं..

तिलाही दुखावणं सपशेल चुकीचंच होतं पण उद्या 'मैत्री की प्रेम' या प्रश्नाला उत्तर देताना जगातलं सर्वात सुंदर नातंच जपायचं होतं..


त्याचं शाळेतलं पहीलं प्रेम सुरू होण्याआधीच संपलं....क्रमशः


Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Desai

Similar marathi story from Tragedy