Nilesh Desai

Tragedy Others

5.0  

Nilesh Desai

Tragedy Others

शापीत राजपूत्र – भाग सातवा

शापीत राजपूत्र – भाग सातवा

6 mins
1.0K


शेवट...


त्या दिवशी हाॅटलमध्ये नीरवला पाहून मेघना खरंतर एक क्षण हरखून गेली होती.. पण दुसर्याच क्षणी तिला जाणीव झाली की त्यांची भेटण्याची वेळ चुकली होती.


कसंबसं सागर आणि अमेयसमोर बोलताना त्या दोघांनी अगदी अनोळखीपणाच दाखवला. शाळेतलं प्रेम अश्याप्रकारे समोर आल्यानं मेघनाला काही सुचेनासं झालं होतं. 


त्यात सागरला अगोदरच दिलेल्या होकाराचा आता तिला पश्चात्ताप होत होता. पण ती तरी काय करू शकणार होती.. झाल्याप्रकारात तिची काहीच चुक नव्हती. आणि पुजा-नीरवचं काय झाले असेल हे पण तीला जाणून घ्यायचे होते.


नीरवच्या मनाची अवस्था तर त्याहूनही वाईट होती. जे प्रसंग विसरण्याच्या प्रयत्नात तो होता.. तेच आज पुन्हा मेघनाच्या रूपाने समोर आले. आणि जर आता ती सुबोधसोबत नाहीच आहे तर काय अर्थ होता शाळेतल्या त्यागाचा.. 


सुबोध आणि मेघनामध्ये नेमकं झालं तरी काय.. आणि आज अचानक सागरसोबत लग्न... नीरवचं मन खायला उठत होतं.. या असल्या बर्याच सवालांनी...


एव्हाना हाॅटेलमध्ये अमेयने वातावरण बरंच खेळकर बनवलं होतं. सागरही मेघना सोबत असल्याने खुश होता. नीरव आणि मेघनाच्या चेहर्यावरही थोडंफार हास्य होतं. पण ते हास्य कुठेतरी बनावटी आहे याची कल्पना अमेयला आली होती. 


त्या दोघांना पहील्यांदाच एकमेकांकडे पाहताना अमेयने पाहीलं होतं. त्यांच्या चेहर्यावरचे बदललेले भाव नक्कीच कोड्यात टाकणार होते..


लंचनंतर हाॅटेलमधून बाहेर पडताना मेघनानेच पुढाकार घेतला आणि सागरला म्हणाली.. "मी अमेय आणि नीरवचा नंबर घेतला तर काही हरकत नाही ना..? 


"अगं.. यात हरकत असण्यासारखे काय आहे.. उद्या आपल्यात भांडण होऊन मी घरातून बाहेर पडलो तर या दोघांशिवाय कुठे जाणार नाही..." सागरनं हसतच उत्तर दिले.


अमेयनेही सागरच्या हसण्यात साथ दिली. आणि नीरवनं मनातच मेघनाच्या चतुराईचं कौतुक केलं. नंबर शेअर करून झाल्यावर नीरव आणि अमेय त्यांचा निरोप घेऊन घरी निघाले. सागरही मेघनाला सोडायला गेला.


अमेय आणि नीरव रस्त्यावर चालत होते. नीरव आपल्या तंद्रीत हरवला होता. अमेय त्याचंच निरीक्षण करत होता. नीरवला सहज म्हणून विचारले तर तो सरळ सांगणार नाही याची अमेयला खात्री होती. म्हणूनच त्यानं रोखटोक विचारलं... "मेघनाशी तु यापूर्वीही भेटला आहेस ना...? 


नीरवनं एक कटाक्ष अमेयवर टाकला. पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेयनं पुन्हा जोर दिला.. "कधीतरी मोकळं कर तुझं मन.. आपल्या मैत्रीची काहीच किंमत नाही का तुला..?


अमेयच्या या वाक्याने शेवटी नीरवला बोलतं केलं. मेघनासोबतच्या आपल्या शाळेतल्या आठवणी त्यानं अमेयपुढं स्तब्धतेने मांडल्या.


"त्यानंतर मी विसरून गेलो सर्व.. आता आयुष्य फक्त शांततेत व्यतीत करायचं ठरवलं आहे. कोणी सोडून गेल्याचा त्रास नाही करून घ्यायचा मला कधी.." नीरव.


अमेयला नीरवबद्दल वाईट वाटत होतं पण करण्यासारखं काहीच नव्हतं. त्यात सागरने मेघनाविषयीच्या भावना आधीच मांडल्या असल्याकारणाने त्याच्याशीही काही बोलता येण्यासारखं नव्हतं. 


पुढे काहीच न बोलता चालत ते दोघं अमेयच्या घराकडे पोहोचले. तिथुन अमेयचा निरोप घेऊन नीरवही घरी जायला निघाला. पण मन मानायला तयार नव्हतं आपसुकच तो शाळेच्या पटांगणाजवळच आला. पायर्यांवर नेहमीच्याच जागी बसला. 


शाळेतले प्रसंग आठवून त्याला हसायला येऊ लागले. सुबोधशी मैत्री, गीताने मेघनाची केलेली वकीली, लव्हगुरू पुजा... मेघना.. नकळत त्याच्या गालावर खळी उमटली.. आणि सोनल... गालावरची खळी नाहीशी झाली.. त्या खळीमुळे पडलेल्या सुरकुत्यांवरनं आसवं घरंगळत खाली टपकू लागली... सुकलेल्या ओठांवर त्या आसवांच्या येण्यानं जगण्यातलं खारटपण नीरवला जाणवलं. 


मनात नसतानाही अश्रू पुसले.. उठला आणि घरी जायला निघाला.


दोन दिवसांनी मेघनाचा फोन आला.. "नीरव संध्याकाळी भेटायला येशील..?.


नीरवला अपेक्षा होतीच या फोनची. त्याला काही गोष्टींचा ताळमेळ लागत नव्हता. आणि या सर्वाची उकल होण्यासाठी मेघनाला भेटणं गरजेचे होतं.


"हो..., तुझ्याइथली जागा सांग मी येतो तिथे.." नीरव उत्तरला. 


खुश होऊन मेघनानं त्याला पत्ता सांगितला. ठरल्याप्रमाणे ऑफिसनंतर नीरव मेघनाने दिलेल्या पत्त्यानुसार एका हाॅटेलमध्ये बसला होता. काही वेळातच मेघना आली.


काॅफीची ऑर्डर देऊन झाल्यावर दोघे एकमेकांशी थोडे सहज होऊन बोलू लागले.


"कसा आहेस..? लग्न केलेस का..?" मेघना.


"ठिक.., आणि सागरने सांगितले नाही का माझं लग्न नाही झालं ते..? नीरवने हसुनच उत्तर दिले. पण तिचा चेहरा मात्र सागरचं नाव ऐकून पडला.


थोडं थांबूनच तिने विचारलं.."पुजाचं काय झालं..?"


नीरवच्या मनात आलं की इतक्या वर्षांनी सांगून टाकावं आता मेघनाला की ते फक्त नाटक होतं. पण त्यानं मेघनालाच प्रतिप्रश्न केला.. "तुझं आणि सुबोधचं का नाही जमलं.. कधी ब्रेक अप झालं तुमचं.?


मेघनाने एक सुस्कारा सोडला..


"आमचं ब्रेक अप होण्यासाठी अगोदर प्रेम जुळायला तर हवं होतं." मेघना किंचीत हसत पुढे बोलू लागली.. "मी नाटक केलं होतं तेव्हा पुजाने तुला हो म्हणावं म्हणून... नंतर सुबोधलाही त्या नाटकात सामील करून घेतलं होतं... आम्ही फक्त तुमच्यासमोर एकत्र असल्याचा आव आणत होतो... आमच्यात प्रेम वगैरे काही नव्हतं..." मेघनानं स्पष्टीकरण केलं.


ते ऐकत असतानाच नीरवचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तीचं बोलणं पूर्ण होईपर्यंत तो फक्त आ वासून तिला पाहत होता. शेवटी मेघनानेच त्याला भानावर आणले. 


"बोल काहीतरी, पुजा का सोडून गेली..?" मेघनानं पुन्हा विचारले..


त्याला बोलायचं होतं की, 'तीच्या मनात सुबोधविषयीची प्रेमभावना जागृत झाल्याची पाहून त्यानंही फक्त एक डाव खेळला होता. पण त्याला नुकतंच कळलं होतं की तो डाव तेव्हा त्याच्यावरच उलटला होता. त्या दोघांना परीस्थितीने आता आयुष्यात एका वेगळ्याच टप्प्यावर आणून ठेवले होते. 


एकीकडे सागर होता ज्याच्याशी मेघनाचं लग्न ठरलेले. दुसरीकडे शाळेतली मैत्रीण, तिच्यावरचं पहीलं प्रेम...


"काही नाही गं थोडे मतभेद झाले.." मेघनापासुन नजर फिरवत नीरव उत्तरला.


"आणि त्यानंतर... कुणी आली असेल ना इतक्या वर्षांत..." मेघनाने माहीती काढण्याचा प्रयत्न केला.


"नाही.. मला तितकासा वेळच नाही भेटला.." नीरवने यावेळी खरं सांगितले.


"काय....? तु इतकी वर्षे... एकटा..." मेघनाच्या चेहर्यावरचं गांभीर्य स्पष्ट दिसू लागलं होतं. "एकदा तरी मला भेटायचा प्रयत्न केला असतास.. आपण मित्र होतो एकमेकांचे.. तु तर शाळा संपल्यावर एकदाही तोंड दाखवले नाहीस... नीरव.. कम ऑन यार..." मेघना आता जरा मोकळं होऊनच बोलू लागली.


"अगं.. खरंच वेळ नाही भेटला.. कुणाचाच विचार नाही आला.. घरची जबाबदारी होती..मग मला इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालून चालणार नव्हतं." नीरव अगदी काकूळतीला येऊन सांगू लागला.


पाच मिनिटं शांततेत गेली.. 


मेघनाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले... "फक्त एकदा नीरव.. एकदा भेटून बोलला असतास.. मला विचारलं असतंस... एकदा प्रयत्न केला असतास.. मला शोधण्याचा.. तुझ्यासाठी कितीही वर्षे थांबायची तयारी होती माझी.. माझं पहीलं प्रेम आहेस तू..." मेघनाने मनात दाटलेल्या सगळ्या भावनांना रडतच मोकळी वाट करून दिली. 

तिला सावरण्यासाठी त्याचे हात साहजिकच सरसावले... पण तिच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत.. काय वल्गना आहे ही प्रेमाची... 


'मी सोनलचा असूनही.. तिचा नाही होऊ शकलो.. आणि मेघनाचा नसूनही कायम तिचा राहीलो... मी ठरवलं असतं तर सगळं बदललं असतं.. पण मी खरंच चुकीच्या हेतूने यातलं काही घडवून नव्हतं आणलं. नियतीने मला हतबल केलं.. तेव्हाही... आणि आजही.. नेहमीच..' नीरवचं अंतर्मन यावेळी रडू लागलं.


स्वतःचे भाव लपवत नीरव बोलू लागला.. "मेघना.. माझ्या मनात कधी तुझ्याबद्दल तसा विचार नाही आला.. मला माफ कर. मी फक्त तुझा मित्रंच आहे..."


नीरवचे शब्द ऐकून मेघनाला अश्रू आवरणं अवघड झाले. तीच्या हुंदक्याचा आवाज नीरवच्या काळजावर घाव देऊन गेला. ती अक्षरशः घाईतच उठली अन् निघून गेली. 


नीरवने तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला.. ती गेली अन् तीची पाठमोरी आकृती तो नजरेत सामावून ठेवत होता...


पुन्हा ते कधीच भेटले नाहीत. सागरच्या विनंतीवरही नीरव कधी त्यांच्यासोबत बाहेर भेटला नाही. काही महीन्यातच सागर आणि मेघनाचे लग्न ठरले. 


आज लग्न झाल्यावर वरातीमध्ये नीरवने आयुष्यातले सगळे तणाव बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रात्री अमेयच्या घरी झोपताना बाहेरचा मोठा होत गेलेला चंद्र पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊ लागला होता... आणि थकलेल्या नीरवच्या डोळ्यांत आसवं जमा होऊ लागली होती...


सहा महीन्यांनंतर....


"आणि साहीत्य संमेलनातील उत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार जात आहे....... 


प्रमुख पाहुण्यांनी थोडा पाॅज घेतला. इकडे याच्या मनात चलबिचल सुरू झाली. डोळे बंद, श्वास रोखलेला अन हातांची बोट एकमेकांत गुंफलेली नव्हे नाव ऐकण्यासाठी होत असलेल्या विलंबामूळे अधिकच ताण देऊन गुरफटलेली. 


"चिन्मय ऊतेकर.... अभिनंदन" प्रमुख पाहुणे. 


त्याच्या बाजूच्याच खुर्चीत हालचाल झाली अन् चिन्मय नावाची व्यक्ती आपला पुरस्कार घेण्यासाठी पुढे गेली. 


याच्या खुर्चीवर दोन एक क्षण निराशा पसरली. पण चिन्मयने पुरस्कार स्विकारताच याच्या गुरफटलेल्या हातांनी खिलाडूवृत्तीने टाळ्या वाजवल्या. पुरस्कार सोहळा संपताच हा तिथून बाहेर पडला. 


घरी पोहोचेपर्यंत याच्या डोक्यात स्पर्धेसाठी पाठवलेली कथा होती. ही कथा लिहीण्यासाठी कुठेकुठे फिरला होता तो, किती धडपड केली होती. कितीतरी निरनिराळ्या स्वभावाच्या माणसांशी प्रत्यक्ष आणि काॅलवर बोलणे केले होते या सर्व खटाटोपी फक्त त्यालाच माहीत होत्या. 


कथा लिहील्यावरही पन्नासदा ती वाचून, त्यात हवे तसे बदल करून घेतले होते. तरीही आज आपल्याला पुरस्कार मिळाला नाही याच विवंचनेत तो घरी येऊन झोपी गेला. 


दूसर्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा तो स्पर्धा आयोजकांकडे गेला. कालच्या पुरस्कार विजेत्या कथेची एक काॅपी वाचायला म्हणून घेतली. साधारण वीस मिनिटात त्याची कथा वाचून संपली. घेतलेली काॅपी पुन्हा जमा करून तो निघाला. बाहेर नाक्यावरच्या टपरीवर चहा घ्यायच्या विचाराने थांबला. चहाचे घोट घेत पुरस्कार विजेत्या लेखकाची कथा आठवायला लागला. 


"खरंच त्याचे लिखाण माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक चांगले आहे." "कुठेतरी मीच कमी पडलो वा माझे प्रयत्न अपूरे होते." "माझ्या कथेत स्पष्ट सरळ भाषा होती, त्याच्या लिखाणात अलंकारिक भाषेचा प्रभाव होता. "


मन खट्टू तर झालेलंच त्याचं. पण उमेद हरला नव्हता तो... 


नीरवच्या आयुष्यात असे प्रसंग शंभरपैकी शंभरवेळा त्याच्यासोबत घडले होते. अन् तो त्या प्रत्येक प्रसंगातील मिळालेल्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द बाळगणारा... 


निश्चल.. 


'शापीत राजपूत्र...'





Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy