Nilesh Desai

Tragedy

3  

Nilesh Desai

Tragedy

शापीत राजपूत्र – भाग पाचवा

शापीत राजपूत्र – भाग पाचवा

5 mins
1.0K


मनात उसळणार्या लाटांची अवखळ खळखळ... अन् तरीही तो शांत सागरासारखा.. तिला पळताना पाहत... गालांत हसत...


नीरव त्या रात्री जेवलाच नाही. घरी आईला काहीबाही कारण सांगून तो झोपला. झोप कसली येत होती.. तरीही या कुशीवरून त्या कुशीवर वळावळी चालूच होती त्याची. संध्याकाळचा प्रसंग आठवला.. सोनल समोर आली. कसली गोड दिसत होती ती. 


तिच्या मोरपीसी साडीवरचं लालसर धाग्यांतलं नक्षीकाम. बाॅब कट केसांमुळे तिच्या सौंदर्याला चारचांद लागले होते. काही विशिष्ट मुलींनाच शोभतो बाॅब कट. खाली उतरताना एका हातात तीने पकडलेलं पदराचं टोक. दुसर्या हातानं साडी जमिनीला लागू नये म्हणून पकडलेल्या नीर्र्या.. 


'नीर्र्या...!' मलापण मित्र नीर्र्याच बोलतात. हा नीर्र्यापण लोळायचा बाकी आहे आता जमिनीवर.. त्याला अलगद पकडायचा विचार नाही आला का तिला..? 


'आणि आताच तर कुठे हीची दहावी झाली आहे. एवढी काय घाई पडलीय घरच्यांना तीच्या लग्नाची..? अहो अजुन निकाल पण लागला नाही.. इतक्या कमी वयात कसं काय लग्न लावू शकतात हे?' ..नीरवच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं.


दुसरा दिवस त्याच विवंचनेत निघून चालला होता. संध्याकाळ झाली आणि त्याची पावलं आपोआप शाळेच्या पटांगणाकडे वळली. नेहमीच्या जागेवर तो जाऊन बसला. थोड्याच वेळात सोनलही आली. आणि त्याच्या बाजूला बसून स्माईल दिलं. नीरवनं तिच्याकडे पाहीलं. 


"अभिनंदन.." ..तुटक्या स्वरात नीरव.


"कश्याबद्दल.." गोंधळलेली सोनल.


"तुझं लग्न ठरलेय ना.. काल तुला पाहायला आलेले ना घरी.. यावेळी नीरवच्या आवाजात थोडा रुक्षपणा आला.


हे ऐकलं आणि सोनल हसत सुटली... "काय रे तु..." मधेच आलेलं हसु दाबत ती आणखीनच खळखळून हसली. 


"अरे माझ्या ताईला पाहायला आले होते ते... मंद..च.. आहेस..अगदी.." तीचे हसता हसता मोडके शब्द नीरवच्या कानावर पडले.


"माझं वय आहे का लग्नाचं? तू पण ना.." सोनलचं हसू आताकुठे जरा कमी होऊ लागलं होतं.


एवढ्या वेळात फुगलेल्या नीरवच्या चेहर्यातील हवा ते ऐकून भस्सकन निघुन गेली. खजिल होऊन त्यानं नजर खाली केली आणि गालावर छानशी खळी उमटली.


"एक मिनिटं.. तुला राग आलेला का? एवढा चिडलेलास म्हणजे..?" तिनं विचारलं.


"नाही गं.. तू मला काही सांगितले नाहीस असं डोक्यात येऊन वाईट वाटले फक्त.. बाकी काही नाही..." नीरव.


"खरंच की अजून काही...तुझ्या मनातही माझ्यासारखंच काही चाललेय का?" सोनल. एव्हाना तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली होती. 


नीरवही तिच्याकडेच पाहत होता. अन् तिचे बदललेले भाव त्याच्या लक्षात येत होते.


"नाही हं म्हणजे तू तर अगोदरचं पूर्णविराम देऊन सांगितलेयस की तू झंझटमध्ये पडणार नाहीयस... मग मला काही विचारण्यासाठी तू जागाच नाही ठेवलीस... सोनल अजून खुलासा करून बोलू लागली. 


नीरवला तीचा इशारा कळला.. "अगं तसं नाही, ते माझं दोन महिन्यांपूर्वीचं मत होतं... आणि मी झंझटबद्दल म्हणालो होतो.. तू थोडी झंझट आहेस.... तु मला आवडू लागली... आणि बोलता बोलता नीरव गप्प झाला. 


सोनललाही ऐकायचं होतं पुढचं.. पण तीही गप्प राहीली. तिला त्याचा स्वभाव माहीत होता. थोडावेळ कुणीच काही बोलले नाही. दोघांच्या नजरा जमिनीकडे होत्या अन् चेहर्यावर मोजकंच हसू. 


घरी निघायची वेळ झाली तशी तिनं सभोवताली नजर फिरवली. साडेसात वाजले होते.. अंधारानं एव्हाना सभोवतालचं सगळं आपल्या कुशीत घेतलं होतं. शाळेच्या पटांगणात तुरळकच मुले होती. कोणाचंही लक्ष नव्हतं इकडे यांच्याकडे... 


"मलाही तू खुप आवडतोस.... अगदी दोन सेकंदामध्ये हे वाक्य संपवून सोनलने नीरवच्या गालावर चुंबन घेतले अन् पळत सुटली.


काय झाले हे समजायलाच नीरवचे पुढचे चार सेकंद गेले. मनात उसळणार्या लाटांची अवखळ खळखळ... अन् तरीही तो शांत सागरासारखा.. तीला पळताना पाहत... गालांत हसत...


प्रेमाच्या कळीनं खुलायला सुरूवात केली होती. आपलं नातं दोघांनीही मान्य केलं होतं. 


आता त्यांच भेटणं औपचारीक राहीलं नव्हतं. रोज बाजूला बसताना हात हातात असायचे. स्पर्शातून प्रेम व्यक्त केलं जायचे पण नैतिकता सांभाळून. तो स्पर्श फक्त हातावंर फिरणार्या बोटांतून जाणवावा असा. त्यात उगाचंच वेळेआधी केलं जाणारं आगाऊपण नव्हतं. 


डोळ्यांत स्वप्ने असायची... जगण्याची.. एकमेकांसोबत.. 


पुढचं शिक्षण, काॅलेज कसं करायचं; कुठे करायचं.. भेटायची जागा आता बदलायला हवी, या अन् असल्या अनेक विषयांवर चर्चा व्हायची. 


पाहता पाहता दिवस भूर्रकन उडून गेले. दहावीचा निकाल लागला. दोघंही फर्स्ट क्लास मध्ये पास झाले. एकाच काॅलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मार्ग आता अधिकच सुलभ झाला होता. सगळं अगदी मनासारखं घडत होतं त्यांच्या. मनसोक्त आता ती दोघं बाहेरही भेटू शकत होते, कारण आसपास घरापासून जवळ असे कोणतेही काॅलेज नव्हते.


"उद्या सर्व घरातल्यांसोबत गावी देवदर्शनासाठी जायचं आहे.., ताईच्या लग्नासंबंधी बोलणी करायला बाबाही तिथुनच बाजूच्या गावी जाणार आहेत.." सोनल म्हणाली.


"परत कधी येणार..? तिकडचा फोन नंबर आहे का?" नीरवनं काळजीतच विचारलं.


"अरे हो बाबा... चार दिवसांत लगेच येणार आहोत. अजून काही लग्नाचे ठरले नाही तीच्या.. आणि माझं अॅडमिशन पण करायचं आहे ना..? आणि हो, गावच्या घरी फोन नाही.. पण तू काळजी करू नको.. मी तीथं कुणाचा हात धरून पळून जाणार नाही..." सोनलच्या बोलण्यात खोडकरपणा होता. 


"ठिक आहे गं.. असंच आठवण आली तर काहीतरी मार्ग असावा बोलण्याचा म्हणून विचारले मी.." नीरव अजूनही चिंताग्रस्त अवस्थेत होता.


"नको रे टेन्शन घेऊ.. मी लगेच परत येईन. आणि काळजी घे स्वतःची." सोनललाही थोडं वाईट वाटत होतं.

"ओके.. गाडी संध्याकाळची असेल नां.. मग दुपारी येशील भेटायला..?" नीरवने व्याकुळतेनं सवाल केला.


"किती प्रेम करतोस माझ्यावर.. चार दिवसपण नाही निघत वाटतेय तुला.." तिचे डोळे भरून आले. "उद्या सकाळीच काकांकडे जाणार आहोत, तिथून मग त्यांच्या कारने गावी जाणार.." सोनल.


"अच्छा असं आहे होय.. ठिक आहे जावा नीट.. आणि आठवणीत ठेवा आम्हा गरीबाला.." नीरवनं खेळकर वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. 


तीही खुदकन हसली. त्याचा हात घट्ट पकडत अलविदा करून गेली..


दोघांचंही नितांत प्रेम होतं एकमेकांवर. त्याचाच भाग म्हणून की काय दुसर्या दिवशी रात्री झोपलेल्या नीरवच्या स्वप्नात ती आली. तशी बर्याचदा नीरवच्या रात्री तीनं जागवलेल्या. पण या स्वप्नात तीचं प्रेम जरा जास्तच ओसंडू पाहत होतं...


'शाळेच्या पटांगणातल्या पायर्यांवर सोनल मोरपीसी साडी नेसून बसली होती. तीच्या मांडीवर डोकं ठेवून नीरव शांत पहुडला होता. त्याच्या इवल्याश्या केसांवर फिरणारे तीचे हात जणू त्याच्या कधीकाळच्या दुःखावर फुंकर मारत होते.' 


कसलासा आवाज झाला अन् त्याची तंद्री भंग पावली. सोनलही चटकन गायब झाली आणि त्याचं डोकं पायर्यांवर आपटलं. त्याने डोळे उघडून पाहीलं तर उशी तशीच होती डोक्याखाली. घरातलंच कोणीतरी उठलं होतं वाटते असा विचार करून नीरव पुन्हा झोपी गेला. 


चार दिवस-आठ दिवस गेले, सोनलच्या घरी पंधरा ते वीस चकरा झाल्या नीरवच्या, पण घर बंदच होते. तिच्या आसपास कोणी ओळखीचे पण राहत नव्हते. महीना गेला. न राहवून नीरवने सोनलच्या शेजारी सहज म्हणून विचारले.


"अरे, त्यांच्या गाडीचा अपघात झाला गावी जाताना.. पवार, त्यांच्या मिसेस, मोठी मुलगी गंभीर दुखापतीतून वाचले पण त्यांची लहान मुलगी सोनल आणि पवारांचे भाऊ दगावले." शेजारी खंत करत म्हणाला. 


पुढेही काहीतरी सांगत होता शेजारी.. सोनल खुप चांगली होती का कायतरी... 


पण ते न ऐकण्याइतपत कान बधीर झाले होते नीरवचे. असं वाटत होतं की कुणीतरी घन घेऊन आलटून पालटून तो दोन्ही कानांवर मारला होता. त्यामुळंच सगळं सुन्न होत चाललेलं...


ढासळलेल्या बुरूजासारखं कोसळून जावं असं क्षणभर वाटलं त्याला. अगदी क्षणभरचं.. दुसर्या घडीला आईवडील आठवले. सहा महीन्यातला हा दुसरा आघात पचवायचा होता.. 


अन् तो मनात दाटलेल्या सगळ्या भावनांवर अंकुश ठेवून स्थितप्रज्ञतेने चालत राहीला.. सोनलच्या गोड आठवणींत..क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy