Shilpa Sutar

Classics Inspirational

4.0  

Shilpa Sutar

Classics Inspirational

एक आगळी वेगळी आई

एक आगळी वेगळी आई

3 mins
230


सकाळ पासून नवरंग अनाथाश्रमात मुलांची धावपळ सूरु होती, कारण आज त्यांच्या आवडत्या टीचर उमाचा वाढदिवस होता, काय करू काय नको असं झाल होतं मुलांना, फुल पताकांनी परिसर सजवला होता, सडा टाकून रांगोळी काढून परिसर स्वच्छ केला होता, टीचरचा आवडता लाल गुलाबाचा गुच्छ आणून ठेवला होता, 


उमा होतीच तशी एकदम प्रेमळ आवडती टीचर , मोठ्या घराण्यातील लाडकी मुलगी होती ती, खूप शिकलेली होती ती, सहज मोठ्या पगाराची नौकरी करता आली असती, पण समाजसेवेची फार आवड होती तिला, आपण या मुलांसाठी काहीतरी करायला हवे असे वाटत होते तिला, मुल लहान होते खोडकर होते आता शिस्त नाही लावली तर वाया जातील ते, मुलांना आई सारखी माया करत होती ती, 


 या वर्षा अखेरीस उमा टीचर म्हणून जॉईन झाली होती शाळेत , पूर्वीचा अनुभव होता तिला शिकवण्याचा, पाहिल्याच दिवशी उनाड मुलांचा वर्ग तिला मिळाला, सहशिक्षकांनी सावध केले, मुल अजिबात ऐकत नाहीत काळजी घ्या, खोड्या करण्यात पटाईत आहेत, कोणत्याच शिक्षकाला टिकू देत नाहीत ते शाळेत, त्यांना काहीही करायचा नाही भविष्यात, थोडे दिवस बघा तुम्ही ही बदली करून घ्या, सुधारणार नाहीत ते 


उमाने सगळ ऐकून घेतल, ती अशी हार पत्करणारी नव्हती, मुलांची मन प्रेमाने जिंकता येतील यावर तिचा ठाम विश्वास होता, वर्गात गेली तेव्हा सगळ नॉर्मल वाटल, अनाथाश्रमातील मुला तिला निरागस भासत होती, ओळख वगैरे करून झाली, शिकवायला सुरुवात केली तेव्हा लक्ष्यात आला की खुर्चीला कोणी तरी डिंक लावून ठेवला होता.... त्यात साडी अडकुन उमा पडली, साडी ही थोडी फाटली, तिला ही थोडा लागलं, सगळा वर्ग हसायला लागला, टीचर तुमचा स्वागत असो या वर्गात 


 मुख्याध्यापक तिथून जात होते ते वर्गात आले, काय चाललय ? कसला गोंधळ आहे? त्यांनी उमाला विचारले काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? उमा बोलली काही नाही सगळ ठिक आहे सर, माझा पाय घसरला, तिला माहिती होत की आज आपण मुलांना सांभाळ नाही तर मुलांचा विश्वास संपादन करू शकणार नाही, प्रेम दिलं तर प्रेम मिळेल यावर विश्वास होता तिचा, परत शिकवायला सुरुवात केली, 


मुख्याध्यापक गेल्यानंतर मुलांनी विचारल मॅडम आमच नाव का नाही सांगितल? त्यावर उमा बोलली एवढ्याश्या गोष्टी साठी कश्याला वेळ वाया घालवायचा, मला माहिती आहे तुम्ही मुल अस करणार नाही, माझी साडी अडकली खुर्चीत,


 मुलांनी टीचरची माफी मागितली, त्यांना कळल ही टीचर वेगळी आहे प्रेमळ आहे, मुलांनी प्रेम आपलेपणा कधी अनुभवलेला नव्हता हे वेगळ वाटत होत.... त्यांच्यासाठी, नेहमी मार मिळाला मुलांना , रागच राग केला सगळ्यांनी , प्रेमाने कोणी बघितला नाही कधी, त्या मुळे मुले असे खोडकर झाले होते, पण आज टीचरच प्रेमळ वागण बघून मुल भावूक झाली, सॉरी मॅडम, या पुढे आम्ही अस वागणार नाही तुम्ही सांगाल तसं करू, नीट अभ्यास करायचा वचन दिल त्यांनी, येणारा पुढचा काळ मुलांचा उज्ज्वल भविष्यकाळ घेवून येईन उमा ला दिसत होत


त्या नंतर अशी काही गट्टी जमली मुलांची आणि तिची, टीचर जे सांगेल ते मुला ऐकायचे , एक दिवस जरी टीचर आली नाही तर करमायच नाही त्यांना, खूप सुधारणा झाली होती मुलांमध्ये, अभ्यास नियमित करत होते, स्वच्छतेचे, संस्काराची धडे ही मिळतात होते त्यांना, उज्ज्वल भवितव्यासाठी पर्यन्त करतांना दिसत होते मुल 


वाढदिवसानिमित्त मुलानी गिफ्ट आणले होते कोणी गाणं म्हणणार होत, साफसफाई सकाळ पासून सुरू होती, अल्पोपाहार ही ठेवला होता, टीचर आली सगळ्यांनी फुल चाॅकलेट देवून शुभेछा दिल्या, उमा बोलली धन्यवाद माझ्या छोट्या मित्रानो, या गिफ्ट पेक्षा तुमची चांगली वागणूक प्रेम माझ्यासाठी मोठा गिफ्ट आहे, आज मी ही तुम्हाला माझ्या वाढदिवसानिम्मीत्त एक गिफ्ट देणार आहे, 


यापुढे तुम्ही सगळे माझी मुल म्हणून ओळखली जाल, दत्तक घेतले होत उमाने सगळ्यांना, त्यांच्या पुढच पालन पोषण, शिक्षणाची जबाबदारी तिने घेतली होती, एकाच वेळी डोळ्यात हसू आणि रडू होते मुलांच्या, उमा टीचरच्या परिस स्पर्शाने मुलांच जिवन बदलून गेले होते 


 एवढ अनोखा गिफ्ट मुलांना कधीच मिळाल नव्हत, अनोखी प्रीत अजून बहरून आली होती. उमा सगळ्या मुलांची आई झाली होती 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics