फुलले रे क्षण माझे - एक लग्न गा
फुलले रे क्षण माझे - एक लग्न गा
"पूजा तू का वागलीस आईशी अस"?...... प्रकाश
" मी काहीही केल नाहिये प्रकाश, खर सांगते मी... , पूजा
"मग आई खोट बोलते का?,जा माफी माग तिची".,........ प्रकाश
"मी मुळीच माफी मागणार नाही".,........पूजा
"पूजा..... पूजा........ " पूजा निघून गेली .
"अजून लग्न झालं नाही तर हे हाल आहेत, पुढे कस होणार काय माहिती? बाबा ही ऐकत नाहीत माझ काही" .....स्वतःशीच बोलत धाडकन दार उघडून पूजा आत आली
"काय ग काय झाल" भेटले का प्रकाश? , झाल का बोलण? " नीट सांग??... आई
"काही नाही ग आई, वैताग आलाय सगळ्या गोष्टींनचा, अजिबात चांगले लोक नाहीत ते, काहीही मनासारखे होत नाही, माझ्या बाबतीत अस का ग आई?"...पूजा रडायला लागली....
आईला वाईट वाटत होत,........." एवढ्या सुंदर छान मुलीला अजिबात शांतता नाही की सुख नाही...का ही अशी लोक आलेत तिच्या आयुष्यात समजत नाही, आपण आहोत तो वर ठीक आहे, पुढे काय होणार कोणास ठाऊक??" ,
पूजा आधी पासून अशी नव्हती , अगदी उत्साहाने भरलेला झरा होती ती.....लग्न ठरल्यापासुन बिघडलय सगळ, अगदी सहा महिन्यांपुर्वी ....
"आज कॉलेजला जायचा नाही का? किती वेळ झोपणार.... पूजा उठ आता"..आई
" हो ग आई पहिल लेक्चर ऑफ़ आहे.... सर येणार नाहीत,"..पूजा
"हो का मग जरा घरात मदत करत जा, तुझ्या एवढी होते मी तेव्हा सगळा स्वयंपाक करायचे,"...आई
"आई प्लीज नको ना सुरु करू तेच, खूप वेळा एकलय माहिती आहे तू किती हुशार होती" ,..... बाबा बघा ना तुम्ही"....पूजा
"करेन ग ती, तिची वेळ आली की, पूजा आहे हुशार, तू काळजी करू नकोस ".... बाबांनी बाजू घेतली
पूजा होतीच आई बाबांची लाडकी एकुलती एक मुलगी, अतिशय सुंदर हुशार, शाळेत खूप एक्टीव होती ती, कॉलेजमध्ये ही सगळ्या कार्यक्रमात पुढे, काहीही असल की सगळे विचारायचे पूजा कुठे आहे, इम्प्रेस व्हायचे सगळे तिच्यावर.. राहुल त्यातला एक, पूर्ण इम्प्रेस झाला होता तो पूजा वर, उंच पुरा हँन्डसम राहुल सहज लक्ष वेधुन घ्यायचा, खूप हुशार, स्वाभिमानी, साधारण घरचा मुलगा ..पुजाच्याच कॉलेजमध्ये शिकायचा. ती आर्ट्सला होती तर राहुल सायन्सला होता त्याच बॅचला, तिचा मोठा ग्रुप होता कॉलेजला,त्याचे काही मित्र होते पूजाच्या ग्रुप मध्ये, राहुल यायचा त्यांच्या ग्रुप मधे मित्रांना भेटायला , जास्त बोलायचा नाहि तो कोणाशी, प्रॅक्टिस बघायचा, खर तर तो पूजासाठी यायचा तिथे, ती नसली की मात्र तो निघून जायचा
बर्याच मुलांना ही गोष्ट समजली होती, सगळे त्याला चिडवायला लागले होते, ही गोष्ट जेव्हा पूजाला समजली तेव्हा तिने राहुलला धडा शिकवायचा ठरवला, एक दिवस तो त्यांच्या तालमीच्या हॉल मध्ये आला तेव्हा पूजा समोर नव्हती, पाठांतर करत होती ती मागच्या रूम मध्ये , गुपचूप मागच्या दाराने येवून त्याच्या मागे उभी राहिली
" Hi राहुल,कोणाला शोधतो आहेस का?"...पूजा
राहुल एकदम दचकला त्याला अपेक्षा नव्हती पूजा अशी अचानक येईल असं...
"का येतो तू इथे रोज?"....पूजा
"तुला माहिती आहे ना पूजा... मग का विचारतेस?"....राहुल
"Shut up."..... पूजा
"तुझ्या कामाशी काम ठेव, उगीच मागे मागे करू नको" पूजा चिडली होती
"मी बघेन मला काय करायचा ते"... राहुल मिश्किलपणे बोलला
पूजा भांडत होती त्याच्याशी..... पण त्याला मजा वाटत होती ,
राहुलने आपला हेका सोडला नाही, त्याला पूजा मनापासून आवडली होती, पुढे मागे करत होता तो, सहामाही परीक्षा झाली आणि तिसर्या वर्षाच्या विद्यार्थींची पिकनिक ठरली, सगळे खूप इक्साइटेड होते, काय करायचा कोणते ठिकाण बघायचे वगैरे बोलण सुरू होत, पिकनिकचा दिवस उगवला, सगळे महाबळेश्वरला पोहोचले, हिरवगार निसर्ग सौंदर्य, उंच उंच डोंगर, अथांग तलाव, खूप छान वातावरण होत, महाबळेश्वरचि मज्जा काही और होती, सगळे आनंदी होते, दुसर्या दिवशी परिसर फिरायचा ठरल, सगळे निघाले व्ही शेप व्हॅली सगळे पॉईंट्स बघायचे होते , बोटिंग ही केली त्यांनी,
राहुल पूजा सोबत वेळ घालवत होते , तो तिची खूप काळजी घेत होता, पूजा कम्फर्टेबल होती त्याच्या सोबत
"आपण फ्रेंडशिप करू या का? म्हणजे तुला ही माझा स्वभाव समजेल, एकमेकांशी मोकळ बोलता येईल आपल्याला "...राहुल
" ओके" ...पूजा
तो दिवस मजेत गेला संध्याकाळी फायर कॅम्पमध्ये गाण्याच्या भेंड्या रंगल्या, मुला vs मुली, पूजा राहुल एकमेकांना छान साथ देत होते, दोघे एकमेकांन कडे बघून गाणे गात होते, दुसर्या दिवशी मार्केटमध्ये मस्त शॉपिंग केली, पाय निघत नव्हता तिथून, मस्त झाली होती ट्रीप, डोळ्यासमोरून प्रत्येक क्षण जसास तसा तरळत होता, दोघांनीही एकेमकांच्या सानिध्यात ट्रीप एन्जॉय केली होती.
रेग्युलर कॉलेज सुरू झाले,राहुल आता पूजाच्या ग्रुपमध्ये आला ,मस्त मैत्री झाली होती त्यांची, त्यात कॉलेजच गॅदरींग जवळ आल, प्रॅक्टिसचा वेळ वाढला,पूजा राहुलचि जवळीक वाढत चालली होती, दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायला लागले होते, आता हळूहळू पूजासुद्धा राहुलच्या प्रेमात पडायला लागली होती,पण ती त्याला तसं दाखवत नव्हती आता तिला केव्हा एकदा कॉलेजला जाऊ, केव्हा राहुलला बघू असे व्हायला लागले होते.. आता तर तिला राहुल सगळीकडे दिसू लागला होता, राहुलला तिच्यातील हा बदल समजत होत , आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज करायचे ठरवले... आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे ठरवले..
कॉलेज, क्लासेस होईपर्यंत बरेचदा रात्र व्हायची, राहुल तिला घरापर्यंत पोहचवून द्यायचा...अश्याच एका संध्याकाळी शेवटी त्याने तिला आपल्या मनातले सांगितलेच....
"पूजा, पहिल्यांदा बघितले तुला, आणि त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो....खूप आवडते तू मला...मला माझं अख्खं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे.... आवडेल तुला माझ्यासोबत तुझं आयुष्य घालवायला??होशील माझी लाईफ पार्टनर??"...राहुल
पूजाला हे अपेक्षित होत तरी मुद्दाम ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती...
"हे बघ पूजा मला माहिती आहे, जरा घाई होते आहे...पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे,माझे कॅम्पस सिकेक्शन झाले आहे,कॉलेज नंतर लगेच नोकरी सुद्धा सुरू होतील... मग रीतसर मागणी घालेल"...राहुल
पूजाने लाजतच राहुलला होकार दिला...आता ती राहुलसोबत भावी आयुष्याचे स्वप्नं बघत होती. एक दिवस राहूल पूजाला सोडायला घरी आला कोपर्यावर उभा राहून दोघे बोलत होते, ऑफिस मधून घरी येताना पूजाच्या वडिलांना पूजा आणि राहुलला सोबत बघितले...रस्त्यावर तमाशा नको,घरी गेल्यावर बोलू विचार करत ते घरी आले...राहुलला बाय करत पूजा घरी निघून आली.
" कोण आहे तो मुलगा?"...बाबा, पूजाने खर खर सांगितले
"कॉलेजला अभ्यासाला जातात की मजा करायला, हेच शिकवलं का मी"....बाबा खुप चिडले होते, आईला आणि पूजाला ते खूप बोलत होते,
"बाबा,राहुल खरंच खूप चांगला मुलगा आहे, हुशार आहे, सुस्वभावी आहे......"...पूजा बाबांना खूप समजवायचा प्रयत्न करत होती .
"हे अजिबात चालणार नाही मला...हे चुकीचं आहे, तुला माहिती आहे आपल्या घरात हे चालत नाही,माझ्या मित्राला मी वचन दिलय तुझ लग्न प्रकाशशी होणार, या पुढे या घरात हा विषय मला नकोय"....बाबा
" पण बाबा राहुल खूप चांगला मुलगा आहे, तुम्ही एकदा त्याला भेटा,तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही म्हणाल तस करू".... पूजा
बाबा ऐकायला तयार नव्हते,जुने विचार,जूने संस्कार यातून ते बाहेर पडत नव्हते ,आईने खूप समजवले पण उलट ते आईवर चिडले, तिचा ही नाईलाज झाला. आता पूजाला ते स्वतः सोडवायला जात कॉलेजला,घेवून येत,राहुलचा नाईलाज झाला होता, कस तरी मैत्रिणींकडून निरोप देवाण घेवाण होत होते,अगदी 15 दिवस होते त्यांच्या हातात नंतर परीक्षा झाली की पूजाला घरा बाहेर निघायला चान्स नव्हता.
" बाबा प्लीज अस करू नका,मी राहुल शिवाय राहू शकत नाही" ...पूजा कळकळून बाबांना विनंती करत होती..पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
त्यात एकदिवस पूजाला बघायला ,प्रकाश आणी त्याचे आई बाबा बहीण जिजाजी सगळे आले होते. पूजाला तयार रहायला सांगितल, ती नाराज होती,आईच काही चालत नव्हत बाबांन पुढे. पाहुण्यांचा होकार आला...त्यानंतर पुजाची खूप चिडचिड वाढली होती...तिने हर एक प्रकारे वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला...."बाबा,एकदाच भेटा राहुलला???बाबा मला हे लग्न करायचे नाही...मी राहुल शिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही"....
"तुला माझा ऐकायच नाही का?तू आमचा विश्वासघात केला आहे,कॉलेजच्या नावाखाली तू राहुल बरोबर फिरत होती,हे तू बरोबर वागली का? ,तुला माहिती होता ना प्रकाश सोबत तुझं लग्न ठरलाय ते? जर तू माझा ऐकल नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेइल"...बाबा
पूजाचा नाईलाज झाला,तिने लग्नाला होकार दिला, लग्नाची बैठक ठरली,बैठकीत बरीच मंडळी आली होती, मानपान.... हुंडा सगळ हवा होता त्यांना,जेवण झाली बरच सामान,दागिने मागितल त्यांनी,सूरुवातीला बाबांनी विरोध केला पण ते ऐकायला तयार नव्हते.. शेवटी द्यायचे कबूल केल, पूजा विरोध करत होती पण ते ऐकत नव्हते ,तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या... तिला बघून आईचे सुद्धा मन खूप भरून आले..पण बाबांपुढे तिचा सुद्धा नाईलाज होता.
दुसर्या दिवशी मुलाच्या आईचा फोन आला की आमचा मानपान नीट राखला गेला नाही, दिलेल्या साड्या आवडल्या नाहीत त्या परत करा आणि नवीन चांगल्या साड्या पाठवून द्या.
"आई मला तर ते लोकं चांगले वाटत नाहीत, फारच लोभी आहेत, तू बाबांना समजाव".....पूजा जीव तोडून सांगत होती
"ते ऐकण्यासाच्या मनस्थितीत नाहीत, पहिल्यापासून हेका सोडला नाही त्यांनी, हट्टी माणूस आहे"...आई अगतिक झाली होती
इकडे राहुल पूर्ण तुटून गेला होता,मित्रांसोबत तो ठरवत होता काय करता येईल ,पूजाला ही हे सहन होत नव्हते...
"काहीही करून हे लग्न थांबवा,पूजा आनि मी नाही जगू शकत एकमेकांशिवाय"...राहुल देवाच्या धावा करत होता, एक आशा होती काही तरी चमत्कार होईल
सकाळी विहिणबाईंचा फोन आला आज जायचय खरेदीला तर डायरेक्ट दुकानात या,ठरल्या प्रमाणे आई बाबा पूजा गेले,चांगल्या साड्या दाखवा नवरी साठी, पूजाला अजिबात रस नव्हता,होणारा नवरा बाजूला उभा होता ,पूजाकडे ठूंकूनही बघितला नव्हता त्याने....
ज्या साड्या पूजाची आई पसंद करायची त्या लगेच ते लोकं कॅन्सल करत होते , नीट खरेदी झाली ही नाही, प्रकाश रागात होता जरा..
"पूजा जरा एक मिनिट मला बोलायचा तुझ्याशी..बाजूला ये"...प्रकाश, तशी पूजा साइडला गेली.
"पूजा तुझ्या आई बाबांना समजत नाही का कस वागायचे ते?"...प्रकाश
"अरे काय झाल?"...पूजा
"आमचं एक स्टेटस आहे समजत नाही का तुम्हाला? किती हलक्या प्रतीचे कपडे पसंद करतात तुम्ही"...प्रकाश डाफरला
पूजाने काहीच उत्तर दिलं नाही,ती बाबांकडे बघत होती, दागिने घेतांना ही सासुबाई मध्ये मध्ये करत होत्या थोड्या वरुन ती ही खरेदी राहून गेली
या दरम्यान प्रकाश एकदाही पूजाला भेटायला आला नव्हता की त्याने साध बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता तिच्याशी, फक्त देण घेण भारी वस्तू याच आकर्षण होत त्याला,बाबा हे सगळ बघत होते, पूजाच्या आईच्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं सगळे दुःखी होते
"आई काय होतय?"...पूजा, पहाटे आईच्या छातीत दुखू लागले होते ..
" बाबा आई तळमळते आहे"...पूजा ओरडली...धावपळ करत हॉस्पिटलला पोहोचले,अति स्ट्रेसमुळे झालाय डॉ बोलले,पूजा पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये आईची काळजी घेत होती.
इकडे बाबांच्या फोनवर सासरच्या मंडळींचा फोन आला की गाडी बघायला आलो आहोत आम्ही शोरूममध्ये, इकडे या पेमेंट करायला... बाबानी सांगितला नंतर बघू पूजाची आई आजारी आहे,साधी चौकशी ही केली नाही त्यांनी उलट गाडीचा पेमेंट करायला आले नाहीत म्हणून प्रकाशने पूजाला बोल लावले,बाबा बघत होते सगळ... हे आत्ताच असे वागतात तर लग्न झाल्यावर काय होईल मुलीच????
आईला घरी सोडलं,पूजा स्वैपाक करत होती,
"तू कसली काळजी करू नकोस आशा आता सगळ ठीक होणार आहे तू नीट हो आधी, पूजा बेटा इकडे ये?"....बाबा ,
बाबा आईजवळ बसत बोलत होते
"काय बाबा??"...पूजा
" बस अशी माझ्या जवळ , मला माहिती आहे तुला राग आलाय माझा"...बाबा
"नाही बाबा बोलाना".... पुजा
"पूजा राहुलला बोलवून घे भेटायला,मला बघायचय माझ्या मुलीची पसंद कशी आहे?"...बाबा
" खर बोलतायत का बाबा??"....पूजा ,पुजाने आनंदाने बाबांना मिठी मारली
"बेटा मला माफ कर, माझी निवड चुकली होती,मी नकळत तुला दुःखाच्या खाईत लोटत होतो,जुने विचार मागे सारले आता मी,आता तू जे बोलशील...तुझ्या मताप्रमाणे तुझ्या आवडीने करू सगळं"....बाबा
आई ही उठून बसली,खुश दिसत होती ती ,पूजाने लगेच राहुलला फोन करून आनंदाची बातमी दिली
बाबांना अजून काय हव होत,
ठरल्याप्रमाणे राहुल,त्याचे आई बाबा संध्याकाळी घरी आले,अतिशय साधे माणस दिसत होती ती,पूजा खूप खुश होती हे बाबांच्या डोळ्यातून हे सुटले नाही
बाबांनी राहुल पूजाच्या लग्नासाठी होकार दिला .
"तुमच्या लग्नाबद्दल काही अपेक्षा??मानपान काही...सगळं आधीच बोलून घेऊ"....बाबा
"आम्हाला पूजा आवडली आहे....आम्हाला मुलगी नाही...मुलगी तेवढी द्या"....राहुलचे बाबा
"राहुल...तुझ्या काही अपेक्षा??"...बाबा
"बाबा, कॉलेज नंतर मला लगेचच जॉब लागला आहे....मला फक्त सहा महिन्यांचा वेळ द्या...घरदार सगळं नीट सेट झाले की लग्नाची तारीख काढावी, तोपर्यंत पुजाला पण पुढे शिकायचं असेल, जॉब काही बघायचे असेल तर तिला पण वेळ मिळेल.. मला फक्त पूजाचा आनंद हवा आहे ."....राहुल
त्या सगळ्यांचे बोलणे ऐकून बाबांना आपल्या मुलीवर गर्व वाटला.... एक स्वाभिमानी मुलगा तिने स्वतःसाठी निवडला होता...सगळं बोलणं आटोपत राहुल पुजाचे लग्न ठरले होते..दोन्ही घरात खूप आनंद पसरला होता.
"पण बाबा प्रकाशच काय??"...पूजा
"मी बघतो तू निश्चिंत रहा"....बाबा
दुसर्या दिवशी प्रकाशचा फोन आला पूजाला भेटायच आहे, बाबानी सांगितलं हे लग्न आता होणार नाही, तुम्ही या पुढे इकडे फोन करू नका
"का काय झालं?तुम्ही अस करू शकत नाहीत??"...प्रकाश
"काय झालाय हे तुम्ही स्वतःला विचारा, दुसर्याचा काही विचार आहे की नाही, किती त्रास देणार आम्हाला???लग्नाआधी तुम्ही सगळे असे वागत आहेत
तर नंतर माझी मुलगी कशी राहील तिकडे...??? आमचा निर्णय झालाय,आता हे लग्न होणार नाही"....बाबांनी फोन ठेवून दिला.
बर्याचदा असे खराब प्रवृत्तीचे लोक समाजात आहेत, या लोकांमुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो, याला विरोध करायला हवा, हुंडा देणे घेणे गुन्हा आहे, अश्या लोकांना सपोर्ट केल्याने त्यांच्या धिटाई वाढत जाते, अश्या लोकांना वेळेवर समज द्यायला हवी. एखाद्या निर्णयाने आपल्या कुटुंबच किंवा आपल भल होत असेल तर तो निर्णय घ्यायला उशीर करू नये.
हुंडा पद्धती, देणे घेणे ,मानपान ही आपल्या विवाह संस्थेला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे . रीतिभाती , हुंडा याचे मुलीच्या आईवडिलांवर खूप मोठं ओझं असते,याचे दुष्परिणाम किती भयानक होतात हे आपल्याला आपल्या समाजात आजूबाजूला,न्यूज मधून समजूनच येते.बरं हुंडा देऊनही आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहीलच याची काही शाश्वती नाही आहे.हुंड्या न दिल्यामुळे मुलींचा जीव घेतल्याही जातो, आणि कधी कधी याला त्रासून ती जीवही देते. कदाचित हे सुद्धा एक कारण असते भ्रूण हत्याचे...मुलीला जन्म घेण्या आधीच मारण्याचे....
हुंडा देणे आणि घेणे दोन्हीही गुन्हा आहे...या प्रवृत्तीला सपोर्ट करणारे तेवढेच गुन्हेगार आहेत.अशा या खराब प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणं , त्यांना वेळीच समज देणे खूप गरजेचे आहे, नाहीतर यांची ही धिटाई वाढतच जाते. मुलं नेहमीच चूक असतात, त्यांची निवड चूक असते असे नाही, एकदा तरी त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार नक्कीच असावा.आपल्या परिवाराचे, आपल्या मुलांचे हित लक्षात घेत योग्य तो निर्णय वेळीच घ्यायला हवा, नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.स्टेटस,रुतबा, परंपरा जपण्यापेक्षा आपल्या परिवाराचे,आपले भले होत असेल तर तो योग्य निर्णय घ्यायला उशीर करू नये.

