नाते जुळून आले
नाते जुळून आले
"आटोपला का सीमा तुझं",?......... वरद घाई करत होता, "तुला कालच सांगितल होत मी, लवकर निघायच ते",
"हो हो आले हो, किती ती घाई",....... सीमा
वरदच्या चेहर्यावर उत्साह ओसंडून वाहत होता, अतिशय आनंद झाला होता त्याला, काय करू काय नको असे झाले होते
सीमाने छान जांभळी पैठणी नेसली होती, मुळातच सुंदर सीमा खूपच छान दिसत होती, वरद ने स्वच्छ पंधरा कुर्ता पायजमा घातला होता
आज सोनलचा पदवीदान समारंभ होता, त्यासाठी सुरू होती एवढी तयारी, सत्कार होणार होता, सोनल त्यांची एकुलती एक लेक, कार्यक्रमासाठी आई बाबांची एवढी घाई सुरू होती, सोनल अभ्यासात खूप हुशार होती , वर्गात पहिला नंबर सोडला नव्हता तिने, शाळेत पहिली यायची ती, शिकून डॉक्टर झाली, आई वडिलांचे स्वप्नं पूर्ण केले, आजी आजोबा, मामा मामी, काका काकू सगळे आले होते कार्यक्रमाला, बाबांच्या डोळ्यात अभिमान भरला होता, सगळ्यांना सांगत होते..... आहे की आहे की नाही माझी मुलगी माझ्या सारखी हुशार, सोनल खूप गुणी मुलगी होती, स्वभाव ही खूप छान, सगळे नातलग लागायचे तिला, त्याला कारण ही तसच होत , अनाथाश्रमात वाढलेल्या मुलीला सगळ्या नात्यांची किम्मत वाटतेच,
आठवत नाही तिला कोण होते आई वडील तिचे? , का सोडल तिला अनाथाश्रमात? , लहान पणा पासुन सविता मावशींना ती आई समजत होती, हा प्रश्न किती तरी वेळा तिच्या मनात येत असे की कुठे आहे माझी आई? समजायला लागल्या पासून मावशी जे सांगितल ते ऐकत होती ती ,लाजरी बुजरी सोनल जशी जशी मोठी होत गेली, तसही अजून हुशार वाटत होती , तिच्या बरोबरीचा एक एक मुल दत्तक घेतले लोकांनी,
एक दिवस सकाळी एक आलिशान गाडी गेट वर आली, सविता मावशी ने तिला ऑफिस मध्ये बोलवल, समोर सीमा आणि वरद बसले होते,
सीमा आणि वरद एक सुखी जोडप, अतिशय श्रीमंत, घरात कसली कमी नाही, स्वतः चा व्यवसाय होता त्यांचा, दोघ खूप मेहेनत घ्यायचे
लग्नानंतर 10 वर्ष झाले तरी पाळणा हलला नव्हता त्यांच्याकडे, तसा दोष कोणात नव्हता, पण काय अडचण आहे समजत नव्हत, सुरुवातील खूप त्रास झाला सीमाला, आजूबाजूचे, नातलग, सारखी विचारपूस करायचे, त्यांच ऐकुन सासुबाई खूप बोलायच्या, सीमाने ते खूप मनाला लावून घेतल होत, बाहेर जाण, हसणं सगळ विसरून गेली होती ती, वरदला आता खूप काळजी वाटायला लागली, कस होणार हीच, एक दिवस फिरायला जायच्या बहाण्याने वरद सीमाला डॉ कडे घेवून गेला, डॉक्टरांनी सीमाला बदल हवा आहे अस सुचवले, जास्त विचार करायचा नाही आनंदी रहायचा सांगितल, वरद विचार करत होता काय करता येईल
एक दिवस वरदने संगीतल, "आम्ही मुल दत्तक घेणार आहोत, या पुढे घरात हा विषय बंद, सीमाला बोलायचं नाही कोणी काही, तिच्या तब्येतीवर खूप परिणाम होतो आहे, प्लीज तिला त्रास देण थांबवा, आम्हालाही आनंदी राहायचा हक्क आहे आणि एका निराधार जीवाला घरी मिळेल" ,
त्यांच्या या निर्णयाचा सुरवातीला खूप विरोध केला सगळ्यांनी, पण वरद त्याच्या निर्णयावर ठाम होता, हा एकाच मार्ग होता सीमाला यातून बाहेर काढायचा,
एक महिन्यापासून ते दत्तक प्रक्रिया करत होते, सीमा खूप खुश होती, तिचा त्रास ती विसरून गेली होती, आनंदी राहू लागली, शेवटी आज तो दिवस आला होता, सगळे लहान बाळ घ्यायला प्राधान्य द्यायचे पण सीमाने सोनलला बघून ठरवल हीच माझी मुलगी,
5 वर्षाच्या सोनलला काय चाललय समजत नव्हता ,निरागसता तिच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होती,
सविता मावशी बोलली,...... "आज पासून हे तुझे आई बाबा, जा भेट त्यांना, पोरी खूप सुखी रहा" ,
सोनल रडू लागली, आनंद होत होता तिला की तिच घर मिळाले पण सविता मावशीला सोडून जाव लागणार होता, सीमा उठली तिने सोनलला जवळ घेतल, सविता मावशीला खात्री पटली सोनल चा चांगला सांभाळ होईल या घरात, रीतसर फोरम्यालिटी करून सीमा सोनलला घरी घेवून आली,
खूप सुंदर घर होतं त्यांच, सोनलला स्वतंत्र खोली होती, आजी आजोबा ही खुश झाले सोनलला बघून , खूप जीव लावायचे सगळे तिला, सोनलला नवीन घर लोक तिथल वातावरण नवीन होत, सुरुवातीला ती मोकळी राहात नव्हती, नंतर आई बाबांनच प्रेम बघून ती कंफर्टेबल झाली सीमा आणि वरद तर तिच्या प्रेमात आणि बाललीलात अगदी वेडे होवुन गेले होते, दोन मिनिट ही सीमा तिला दृष्टी आड करायची नाही, सुखाचे दिवस आले होते सोनल मुळे त्यांच्या आयुष्यात, वरदने कुठल्याही गोष्टीची कमी ठेवली नव्हती सोनलच्या आयुष्यात, दरवर्षी तिच्या वाढदिवसाला त्याच अनाथाश्रमात जाऊन वरद आणि सीमा सोनालच्या हाताने सगळ्यांना शालेय वस्तू दान करत होते, मोठी देणगी देत होते,
सोनलच्या येण्याने सीमा वरद यांच्या जीवनात आनंद आला होता परत, शिवाय सोनलला हक्काचे घर मिळाले, नातलग मिळाले , एक घर परिपूर्ण झाल, सोनलने सीमाला आई म्हणून खूप आनंद दिला
....
ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले स्टेज अतिशय सुंदर फुलांनी सजवलेला होता, कॉलेजचे वातावरण प्रफुल्लित होते, सुंदर सुंदर मुलंमुली आसपास वावरत होते, त्यांचे आनंदित आणि अभिमानी झालेली आई-वडील सोबत होते
कॉलेजला पदवीदान समारंभ झाला, तिथून एक हॉल घेतला होता त्यांनी पुढच्या घरच्या प्रोग्राम साठी, तिथे सगळे जमले, कार्यक्रमाला सुरुवात झाली, सविता मावशी ही आली होती, सोनाली उठली बोलायला तिने आधी जाऊन मम्मी पप्पांचा पाया पडल्या, सविता मावशीला भेटली, आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आई बाबांन मुळे आहे, आई बाबा तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला जो आधार दिला त्याबद्दल मी तुमचे खूप ऋणी आहे, सविता मावशी मी खूप आभारी आहे की तू माझी वेळोवेळी खूप साथ दिली आणि आई तुझ्याबद्दल काय बोलू मी तू तुझं पूर्ण आयुष्यच माझ्यासाठी वेचलं, सगळं काम सोडून तू माझ्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेतली, माझ्या सारख्या अनेक मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली, शब्दात सांगता येणार नाही एवढं प्रेम केलं माझ्यावर, मी तुमच्या दोघांचे आभार मानणार नाही, कारण तसं केलं तर मी परकी होईल, मला या ऋणात राहायचं आहे कायमचं,
माझ्या आई बाबांन प्रमाणे मला ही सविता मावशी आणि अनाथाश्रमातील मुलांची जबाबदारी घ्यायची आहे, आई बाबा लव यु , तुम्ही खूप छान शिकवण दिली मला, खूप शिकवलं, आता तुम्ही आराम करा मला जबाबदारी घेवू द्या,
वरद अगदीच निशब्द झाला होता, सीमा आणि वरदच्या डोळ्यात अश्रू होते, दोघं एकमेकांचा हात धरून छान बसले होते, एक वेगळाच अभिमान त्यांच्या चेहर्यावर होता,
नाते संबंध किती छान असतात नाही, ते परिपूर्ण बनवतात आपल्याला, आपल्या आयुष्यात सुख आनंद आणतात, आधार देतात, जपायला हवे असे घरचे लोक, नातलगांन शिवाय आपल्या जिवनाला अर्थ नाही, मज्जा नाही, सगळे कार्यक्रम अपूर्ण आहेत, घरचे लोक टॉनिक च काम करतात, मानसिक बळ देतात,
देता आला तर आपण ही एखाद्याला आनंद देण्याचा प्रयत्न करावा, हक्काच घर देता आला तर द्याव, प्रेम द्यावे.
