खरेदीची हौस...
खरेदीची हौस...
राकेशला त्याच्या शर्ट सापडत नव्हता, आज त्याला पांढरा शर्ट हवा होता, स्वतःचं कपाट शोधून झाल्यानंतर त्याने राधिकाच कपाट उघडलं, एवढं गच्च भरलेले कपाट बघून तो दोन मिनिटे थांबलाच, थोडे दोन-चार कपडे इकडे तिकडे केले तर पूर्ण कपड्याचा गठ्ठा अंगावर पडला,
"राधिका...... राधिका.... काय आहे हे सगळं",..... राकेश
राधिका पळत आली, सगळीकडे कपडे पडलेले दिसले,
"माझ्या कपाटाला कशाला हात लावला",.....
"किती कपडे कोंबून ठेवले आहे कपाटात, एवढे कपडे आहे तरी तू कपडे नाही... कपडे नाही करते, आणि नवीन खरेदी करत राहते",...... राकेश
"मान्य आहे मला एवढे कपडे आहेत, पण त्यातले अर्धे मला होत नाहीत, अर्धे एखाद्या ठिकाणी जायला सूट होत नाहीत, बाकीचे माझे फेवरेट आहेत, काही तू दिलेले आहेत, ते टाकवत नाही, अस आहे सगळं, पण नीट बघितले तर मला यातले अर्ध्या च्या वर कपडे मला होत नाहीत, कशाला एवढं कपाट विस्कटलं, एकदा लावायला घेतलं तर अर्धा दिवस जातो माझा",.... राधिका चिडली होती
"पण मी म्हणतो एवढी काय खरेदीची हौस तुला, आता आधी हे सगळे कपडे वापर, याशिवाय आता तुला काहीही घ्यायचं नाही",..... राकेश
"ठीक आहे",.... राधिका
"आणि जे कपडे लागत नसतील ते एका बॅगेत भरून वरती घेऊन वरती ठेवून दे, किंवा कोणाला देवून तरी टाक ",..... राकेश
"ठीक आहे पण तू काय शोधतो आहेस",....... राधिका
"मी माझा पांढरा शर्ट शोधतो आहे ",.... राकेश
"तो कशाला येईल माझ्या कपाटात",.... राधिकाने पांढरा शर्ट शोधून दिला
"बघ हा शर्ट कसा घालणार, किती पिवळा पडला आहे, एवढ्या मोठ्या मीटिंगला हा चांगला दिसेल का", ?..... राकेश
"आता का? तुझ्याकडे ही पंधरा-वीस पांढरे शर्ट आहेत, ईतरही शर्ट ही 50 च्या वर आधी ते वापर याशिवाय दुसरे कपडे घ्यायचे नाही",.... राधिका
"अग काही शर्ट जूने आहेत, ते मला होत नाही, काही पिवळे पडले आहेत, काहींना शाईचे डाग पडले आहेत",..... राकेश
"म्हणजे तुझा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे आणि माझा प्रॉब्लेम म्हणजे खर्च का? नवीन कपडे मलाही लागतात, महत्त्वाच्या ठिकाणी मला हे जायचं असतं, दुसऱ्याला बोलायच्या आधी विचार कर जरा राकेश, तू पूर्वीपासून माझे कपडे बघितले की असाच रिऍक्ट होतो, ते बंद कर आता, मला माहिती नाही, आपण आता जुने कपडे वापरल्या शिवाय नवीन घेणार नाही, ठरल म्हणजे ठरल",..... राधिका
राकेशला आता थोडा फार राधिका चा प्रॉब्लेम समजला होता, त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं,
हा प्रोब्लेम सगळीकडे आहे, खरेदीचे हौस प्रत्येकालाच असते, कधी लागणार्या गोष्टीची तर कधी न लागणाऱ्या गोष्टी ही घेतल्या जातात,
राधिका राकेशच घर ही घरगुती सामान, मुलांचे कपडे, खेळणी, डेकोरेशन सामान, पडदे, चादरी, स्टेशनरी अशा अनेक गोष्टींनी खचाखच भरल होत, घरात काहीही ठेवायला जागा नव्हती, दोघ ही जबाबदार होते याला, काही घ्यायला गेल की लागणार्या वस्तूंन सोबत इतरही न लागणाऱ्या वस्तू घेतल्या जात होत्या ,
कपडे घेतांना प्रत्येकाच असंच होत, कधी दुकानात छान वाटणारा कपडा घरी येऊन जुनाट दिसतो, व्यवस्थित होत नाही तर कधी आपले वजन कमी जास्त होतं, कधी काय तर कधी काय, त्यामुळे घरातच ढिगभर कपडे, इतर सामान खेळणे तसेच पडून राहतात, साठत राहतात,
सदोदित शॉपिंग करणे हा ही एक प्रॉब्लेम आहे, बाजारात जातांना जे घ्यायच त्याची लिस्ट करून घेतली तर उत्तम आहे, कपडे घेतांना ही नीट बघून ट्राय करून घ्यावे, एखादी वस्तू आपल्याला लागते आहे का याचा नीट विचार करूनच खरेदी करावी, नुसत आवडत म्हणून भराभर खरेदी करू नये
आवश्यक सामान जरूर घ्याव, न लागणार सामान अवश्य दान कराव
कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जुना टीव्ही, कपाट उगाच पडून असतात त्या गरजूंना दिल्या तर बर होईल,
सध्या ऑनलाईन खरेदी खूप प्रमाणात होते, त्यात बऱ्याच प्रमाणात फसवणूक केली जाते, पेमेंट आधी देऊन वस्तू वेळेवर न येणे, कधी त्याची कॉलिटी नीट नसणे, फोटोत कपडे वेगळेच असतात आणि पाठवता ते वेगळेच, कधी एक्सचेंज होत नाहीत, त्यामुळे ऑनलाइन खरेदीचा मोह टाळलेला बरा.......
सेल हा फार घातक प्रकार आहे खरेदीसाठी, सेल हे नाव दिसलं की काय खरेदी करून काय नाही असं करतो आपण, बऱ्याचशा जुन्या वस्तू सेलमध्ये मिळतात, जुना रिजेक्ट झालेला माल सेल मध्ये असतो, त्याचा मोह टाळलेला बरा.....
