साथ हवी तुझी मला
साथ हवी तुझी मला
शारदा काकू म्हणजे एक उत्साहाचा झरा , नेहमी प्रसन्न असायच्या , चापून चोपून नेसलेली साडी, आंबाडा घातलेला, खूप छान दिसायच्या त्या, त्यांचे विचार ही खूप चांगले होते, वाचन खुप, कुठल्याही विषयावर त्या भरभरून बोलायच्या, वृद्धाश्रमाच्या झोपाळ्यावर शारदा काकू तयार होवुन बसल्या होत्या, आज त्यांचा वृद्धाश्रमतला शेवटचा दिवस होता, सगळी रूम फुगे पताका नी सजवली होती, त्यांच्या आवडीची बासुंदी केली होती छायाने, दाते काका, पटवर्धन, सुलभा ताई, बरेच मित्र मैत्रिणी ही सगळे सोबत होते, त्यांचे उतार वयातील सोबती होते, खूप उत्साही होते सगळे, संध्याकाळी सोबत फिरायचे बागेत सगळे , छान ग्रुप होता त्यांचा, सुखदुःखाचे सोबती होते तेच,
आज शारदा काकू दाते काकांसोबत रहायला त्यांच्या घरी जाणारा च्या म्हणून वृद्धाश्रमात त्यांच्या सेंड ऑफ होता
काका गेल्या वर्षी वारले होते, काकू एकट्या पडल्या होत्या, इतके वर्ष काकांनी खूप छान काकूंना साथ दिली,
नवीन लग्न झाल होत, काका न चुकता रोज गजरा आणायचे काकूंना, काकांच्या प्रेमाच्या रंगात काकू रंगून गेल्या होत्या, समरस झाल्या होत्या, सुखी संसारात रोहित जन्माला आला, मुळातच हुशार होता रोहित, शाळेत नेहमी पहिला नंबर असायचा, खूप शिकला, नौकरी निम्मीत्त परदेशात शिकायला गेला तिकडे स्थाईक झाला, ऑफिस मधल्या परदेशात जन्म झालेली मोनाशी लग्न केल त्याने, घरच्यांनी बरेच सांगितला की भारतात ये आता परत पण त्याला तिकडे आवडत होत, शिवाय मोनाचा विरोध होता परत यायला , तो लग्नानंतर दोन वर्षानी भारतात आला... आई बाबांना भेटायला, एक दिवस घरी राहिला दुसर्या दिवशी डायरेक्ट 5 स्टार हॉटेल मध्ये रूम घेतली त्याने , दोघी नवरा बायको कम्फर्टेबल नव्हते म्हणे घरात......
दर वेळी रोहित परदेशात जाणार असला की काकूंनची खूप धावपळ असायची, त्याच्यासाठी चिवडा लाडू इतर फराळाचे पदार्थ करणे, लोणची पापड वगैरे बनवणे... सगळे पदार्थ सोबत द्यायला तयार असायचे, परत एअरपोर्टला जायला गाडी बूक करणे,
"या वेळी काहीही तयारी नाही तुझी? काय झालाय शारदा" ?....... काका विचारात होते,
"काही नाही.... खरच वापरणार आहे का तो या वस्तू आपण दिलेल्या, खरच खाणार का चिवडा लाडू फराळ?? कश्याला दमू मी उगाच, आणि तुम्ही ही मनाची समजूत करून घ्या, प्रॅक्टिकल्स व्हा त्याच्यासारखं, त्याला नाही आवडत मध्ये मध्ये केलेल, प्रायव्हसी हवी त्यांना",...... काकू समजावत होत्या.
" अग पण तिकडे ते दोघे आहेत ना, मग इथे आपल्यात मिसळायला काय होत त्यांना, चांगला 2 बेडरूमचा ब्लॉक आहे स्वतंत्र खोली आहे त्यांना आणि इथे नेहमी थोडी रहायचय 15 दिवसाचा प्रश्न आहे" ,... काका
" तुम्ही त्रास करून घेऊ नका, येणार आहे तो संध्याकाळी जेवायला, बाहेरून जेवण मागवलं त्याने , त्याच्या बायकोला तिखट तेल जेवणात चालत नाही, जातील ते उद्या", ... काकू समजावत होत्या.
मुलगा गेला, काका काकू हळवे झाले, एका आठवड्यात बरेच सावरले,
" आपल्याला दोघांना रहायच आहे आता, टेंशन घेऊ नका ",.... काकू समजावत होत्या
मुलाच्या वागण्याने काका दुखावले गेले होते, काकानी वकीलाला भेटून विल बदलल.... सगळी संपत्ती काकूंच्या नावे केली, जणू काही त्यांना माहिती होत शेवट जवळ आला आहे, एक दिवस अचानक झोपेत काका देवा घरी गेले, काहीही त्रास नाही, काही बोलले नाही, काकूंनी रोहितला कळवला... त्यांने जमणार नाही यायला सांगितला, हे अपेक्षित होत काकूंना, काका गेल्यानंतर काकू एकट्या पडल्या, दिवस भर काय करणार, घर खायला उठायचा, संध्याकाळी बागेत फिरायला जायला लागल्या, तिथे बरेच मित्र मैत्रिणी जमले , त्यातले काही जवळच्या वृद्धाश्रमात राहत होते, शारदा काकूंनी एकदा तिकडे जायचं ठरवल, वृद्धाश्रम कस आहे हे बघायच होत
सुलभाताईंना सोबत घेवून काकू वृद्धाश्रमात पोहोचल्या , खूप छान सोय होती, सेपरेट रूम, डबल शेअरिंग सगळे ऑप्शन होते त्यात सुलभा ताई सोबत काकुंनी रहायच ठरवला.
स्वतः चा घर भाड्याने दिल, भाडेकरू छान मिळाले, वृद्धाश्रमाची सकाळ भजनाने होत होती, त्यानंतर चहा घेवून कोणी वॉकला जायचे तर कोणी तिथे लाॅनवर बसुन व्यायाम करायचे, काकू जायच्या फिरायला,
बागेत त्यांची ओळख दाते काकांशी झाली, दाते काका एकटे रहायचे, बंगला होता त्यांचा जवळच, एक मुलगी होती, तीच ही लग्न झालेल ती जवळच रहायची, लक्ष देवून असायची ती , त्यांची पत्नी दोन वर्ष झाले वारली होती, दाते काका म्हणजे एक उत्साही व्यक्तिमत्व होत, त्यांना बागकाम ची आवड होती, बंगल्याच्या परिसरात त्यानी वेगवेगळी झाडे लागवड केली होती, स्वपाका पुरती भाजी ते लावत असत, वाचनाची आवड होती त्यांना, रोज वेगवेगळ्या मुद्यावरून गप्पा रंगायच्या त्यांच्या, त्यामुळे शारदा काकू आणी त्यांच खुप पटायच, तासनतास ते गप्प मरत बसायचे
एक दिवस दाते काकानी सगळ्यांना घरी जेवायला बोलावले, सुंदर बंगला आजूबाजूची झाडे, स्वच्छता बघून सगळे उत्साहित झाले, काकांनी स्वतः फिरून सगळा बंगला दाखवला, काका ही खूप उत्साहित होते, कारण होत शारदा काकू, त्या आल्या की वातावरण आनंदी होवुन जायच, काकूंना खूप आवडल घर, काकांची मुलगी ही आली सगळ्यांना भेटायला ती जरा वेळ थांबून परत गेली.
आता नेहमीच येत असत काकू दाते काकांकडे, वेगवेगळे पदार्थ बनवण्याची छंद होता त्यांना, खाण्यासोबत त्यांच्या गप्पा खूप रंगत, असच छान हसत खेळत दिवस जातील तर बर होईल असा नेहमी वाटायचं काकांना, त्यांनी काकूंशी बोलायचा ठरवल....
एक दिवस नेहमी प्रमाणे काकु आल्या काकांचे आवडते ढोकळे घेवून, बर्याच वेळ बोलत बसले ते,.... "आपण सोबत राहू या का शारदा? काय वाटतय तुला, आपली मैत्री ही छान झाली, दिवसभर कंटाळतो मी या घरात, संध्याकाळी कधी आपल्या ग्रुपला भेटतो अस होत, तुला भेटून बोलून मी आनंदी राहतो, माझी BP चि गोळी कमी केली डॉ नी, आपण एकत्र राहिलो तर दोघांचा एकमेकांना आधार होईल" ,
" विचार छान आहे मला ही चालेल पण तुमच्या मुलीला चालेल का? तरी एकदा सांगून बघा, उगीच आपण एकमेकांना सोबत रहायचो अणि वाद वाढायचे",..... काकू
" तिचा काय प्रश्न, हा निर्णय माझा आहे, माझ आयुष मी आता एकट जगतो आहे नंतर तुझ्या सोबत जगेन आणि तू मला अहो वगैरे म्हणू नकोस मित्र आहोत आपण, तू म्हणते तर एकदा सांगून बघतो, तुझ्या घरी सांगायच आहे का कोणाला"?,...... काका
" नाही, माझा मुलगा परदेशात आहे पण गेल्या वर्ष भरात त्याचा फोन नाही, मी स्वतंत्र आहे निर्णय घ्यायला आणी माझा होकार आहे..... आपण राहु सोबत ",..... काकू
काकानी त्यांच्या मुलीला या बाबत कल्पना दिली, तिला हे बाबांच अस वागण अजिबात आवडल नाही,
"लोक काय म्हणतील बाबा ? आम्ही आहोत सोबत, हव तर इकडे येवून रहा",....... वगैरे बरेच सांगितलं तिने,
काकानी आपला हट्ट सोडला नाही,
" जर काकू आल्या तुमच्या कडे राह्यलाय तर मी येणार नाही घरी" ,......... मुलगी चिडली होती
" जरा समजून घे, राहता तर राहू दे सोबत आपण आपल्या कामात बिझी असतो त्यांना आधार होईल",...... जावई समजूतदार होते
मुलीने हेका सोडला नाही, काका ही ठाम होते
मुलगी रागावली हे काकूंना आवडल नाही, काय करावे एकीकडे दाते काका ऐकत नव्हते, काकूंना स्वतः त्यांच्या सोबत रहायचा होत, शेवटी त्यांनी मनाच ऐकायच ठरवल, त्या शिफ्ट झाल्या काकांन सोबत....
दोघ खुश होते एकमेकांना सोबत... शेवटी काय हवय उतार वयात... कोणाचा तरी आधार असला की जगायला बळ येत.... शारीरिक आकर्षण संपले होते.... कसलीही अपेक्षा नसते एकमेकांना कडून... हवा असतो तो फक्त आधार... एकट कस अणि किती जगणार....
खूप टीका झाली समाजात, पण काकानी त्या कडे दुर्लक्ष करायचं ठरवल, हेच ते लोक... जेव्हा काका एकटे होते तेव्हा कुठे होते? आणि कधी भविष्यात जर या लोकांवर अशी वेळ आली तर ते ही असाच निर्णय घेतील बहुतेक, सगळे स्वतः च बघतात ,
काकुंची काकांन सोबत रहायची बातमी अमेरिकेत जावून पोहोचली, रोहन पुढच्या आठवड्यात भारतात आला,
आईला फोन केला,...... "कुठे आहेस तू? " ,
"हॉटेल वर उतर, मी घर भाड्याने दिल आहे" ,...... काकू
"आई तू जे वागते ते आवडत नाही मला, आपण घर विकु तू माझ्या सोबत चल अमेरिकेत" ,.....
काकूंनी स्पष्ट नकार दिला,...... "विल नुसार सगळी प्रॉपर्टी माझी आहे, मला जेव्हा आधार हवा होता तेव्हा तू कुठे होतास? आता मी माझा आनंद शोधला आहे, मला जे करायचे ते मी करेन, तू मला नको ते सल्ले देवू नकोस",
मुलगा आईला न भेटत निघून गेला,
आता काका काकु मजेत आहेत, हसत खेळत वेळ जातो त्यांचा, वृद्धाश्रमात अजून एक दोन काका काकू येणार आहेत म्हणे सोबत रहायला , त्यांनी त्यांचा आनंद शोधलाय,
एक नाही अनेक अडचणी येतात जेव्हा दोघांना एकत्र रहायच असत, सगळे नातेवाईक, समाजातील लोकाना तेव्हाच नियम आठवतात, इज्जत वगैरे जाते सगळ्यांची पण जेव्हा ते लोक एकटे असतात तेव्हा कोणीच त्यांच्या मदतीला येत नाहीत, विषय वेगळा आहे, दोघे एकटे राहण्यापेक्षा स्वतःचा इच्छेने सोबत मजेत राहता आहेत तर काय हरकत आहे एकत्र रहायला, त्यांना जगण्याचा अधिकार नाही का?.....?
