रस्ता सापडतोच
रस्ता सापडतोच
सरला नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती, अभ्यासात अतिशय हुशार होती ती, एकपाठी होती ती, शाळेतही पहिल्या पाचात नंबर असायचा, पुढे शिकायचं होतं तिला पण परिस्थिती आडवी आली, घरची परिस्थिती जेमतेमच होती, सरला सगळं बघत होती, समजूतदार सरलाने नोकरी शोधायला सुरुवात केली
ती सकाळी उठली, झाडलोट केलं, चहा ठेवला, भाऊ रमेश अभ्यास करत होता, वडील दिसत नाही तरी बारीक डोळे करून जुन्या चश्मातुन पेपर वाचायचा प्रयत्न करत होते, बाबांची कंपनी बंद पडली होती, बरेच दिवस त्यांनी एका वर्क शॉप मध्ये काम केल पण आता तब्येत साथ देत नाही, ते घरी असत... ही गोष्ट त्यांनी खूप मनाला लावून घेतली होती , पण सगळे त्यांना सांभाळून घेत असत ,
"आई कुठे गेली रे रमेश",..... सरला विचारत होती
"कामाला गेली आहे आई... किती वेळा सांगितलं तिला काम बंद कर.... ऐकत नाही ती", ... थकली आहे तरी आई काम करते याचं रमेशला फार वाईट वाटत होत
"जाऊ दे... तुझं हे हे शेवटचं वर्ष आहे कॉलेजच, नीट अभ्यास कर आणि मग आईला हवा तसा आराम दे", ..... सरला रमेशला समजावत होती
"मी जरा बाहेर जाऊन येते ",...... सरला
"कुठे जाते आहेस गं सरला"?.. बाबांनी विचारल
"बाबा आज इंटरव्यू आहे एका ठिकाणी, काल पेपर मध्ये वाचल, जाऊन बघते तिकडे ",..... सरला
"होईल तुझं काम, काळजी करू नको", ..... बाबांनी आशीर्वाद दिले
मुळातच हुशार सरलाला अभ्यासात , शिक्षण क्षेत्रात तिला काही तरी करायचे होते पण परिस्थितीने तिला अजून शिक्षण घ्यायला जमणार नव्हत, ही खंत सतत तिच्या मनात असायची... सरला इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोचली, आधीच बरेच कॅन्डीडेट्स येऊन बसलेले होते, कोणी एकदम फॉर्मल मध्ये तर कोणी सुटाबुटात होते, पाच-सहा लेडीज ही होत्या, इंटरव्यू सुरू झाला सरलाचा नंबर आला, आत गेल्यानंतर फाईल बघून थोडे प्रश्न विचारले,
"तुम्ही बाहेर बसा, जरा वेळाने निकाल लागेल",...... सरला बाहेर जाऊन बसली,
सेल्स रिप्रेझेंटेटिव्हच्या जागेसाठी इंटरव्ह्यू होता, त्यांनी दिलेल सामान सेल करायचं होतं, त्यासाठी वेगवेगळ्या शॉप मध्ये..... ऑफिस मध्ये जावे लागणार होतं, खरंतर हा जॉब सरलाला आवडला नव्हता, पण घरची परिस्थिती बघता जे मिळेल ते काम हातात घ्यायचा निर्णय सरला ने केला होता , तिचं शिक्षण जास्त होत या जॉब साठी, बराच वेळ ती बसून होती, शेवटी संध्याकाळी पाच वाजता जे सिलेक्ट झाले त्यांचे नाव वाचले गेले... त्यात सरलाच नाव नव्हतं, ती त्या ऑफिसमधून निघाली
आजही इंटरव्ह्यूमध्ये नकार मिळाला होता सरलाला, काय करावे कळे ना, एकही रस्ता दिसत नव्हता पुढचा, एवढ शिकून उपयोग काय, जिथे तिथे ओळखीचे लोक घेतात, जे गरजू असतिल ते तसेच राहतात, सरला ग्रॅज्युएट होती , तिला या नौकरी चि गरज होती, घरकामात अतिशय हुशार होती ती , लग्नाच वय होता तिच, पण काय करणार घरची परिस्थिती बघता तिला घरी सपोर्ट करण गरजेच होत,
घरी गेली की काय सांगायचं आईला? घरच भाड थकल होत तीन महिन्यापासून, आई आजारी असायची, तरी तिने दोन-तीन घरचे पोळ्यांचे कामे धरली होती, तिची ही नीट ट्रीटमेंट करायला हवी, बाबांचा चश्मा बदलायला हवा नंबर बदलला आहे त्यांचा, वाचता येत नाही त्यांना तरी जुनाच चश्मा वापरतात, काय करणार?? भाऊ रमेश शिकतो आहे अजून, त्याला आत्ताच कामाला लागलं तर शिक्षण राहून जाईल, विचार करत चालत होती ती,
तेवढ्यात..... "सरला... ये..... सरला" ,.... भाजीवाल्या मावशींनी हाक मारली,
"आईला म्हणा लोणचं छान झाला, किती आवडल घरी, शेजारी विचारत होते कसं केलं? अजून बनवता येईल का? 5-10 लोक आहेत घेणारे" ,..... मावशी
सरलाच्या डोळ्यात चमक आली,..... "हो मावशी मी आणते संध्याकाळी, तुमच्या कडे दिल तर चालेल ना", ?
"हो चालेल मी पोहचवेन पुढे", ... मावशी
आईला विचारायला हव कस केल लोणच, तिच्या हाताला खूप चव आहे, त्यांचा फायदा घेता येईल आपल्याला नाही तरी ती ऐकत नाही पोळ्यांनच कामे घेतली आहेत, त्या पेक्षा लोणचं बनवणे चांगले, धावपळ तरी वाचेल तिची, रमेश जावून देवून येईन होम डिलेवरी, नवीन रस्ता उघडला होता हा, आईच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, विचार करत ती घरी आली...
"नोकरी लागली का सरला" ?...... आई
"नाही आई.... नाही मिळाला जॉब, आजही ओळखीच्या लोकांना मिळाला जॉब",...... सरला
ठीक आहे तू स्वयंपाकाची तयारी कर, तोपर्यंत मी माझं पोळ्याचं काम करून येते", ... आई उठली
"आई तू बस घरी मी करून येते पोळ्याचं काम, आणि त्या भाजीवाल्या मावशींनी लोणच्याची ऑर्डर दिली आहे, बघ ते जमतय का? असेल लोणच घरी तर पॅक कर, मी जावून देवून येईन, पुढल्या ऑर्डर साठी आपण उद्या तयारी करू लोणच्याची ",....... सरला
आईला आनंद झाला ती तयारीला लागली. हो नाही करता करता सरला समोरच्या बिल्डींगमध्ये कामाला गेली. आत गेली तसं त्या ताईंची मुलगी अभ्यास करत होती. तिला एक गणित सुटत नव्हतं. सरला बराच वेळ बघत होती.
शेवटी तिने विचारलं ,....."मी मदत करू का? गणित सोडवुन दाखवू का",?
सगळे आश्चर्याने सरला कडे बघत होते, तिने पाच मिनिटात गणित सोडवलं ....
"आजपासून तू हिची शिकवणी घेशील का? हिच्या बर्याच मैत्रिणी जॉईन होतील",...... ताई
"जागेची अडचण आहे ताई", ..... सरलाच घर लहान होत
"आमचा हा हॉल वापर तू.... सकाळी ही एक बॅच घेवू शकते",...... ताई
सरलाला नवा मार्ग सापडला होता, मुलांना शिकवणं तीच आवडत काम होत, पुढे जावून स्वतः चे क्लासेस काढता येतील, एखादा हॉल ही भाड्याने घेऊन शकतो पुढे, सरला आनंदात होती, तिच्या बेरोजगार आयुष्याला नवा सुखद किनारा मिळाला होता, तिने लगेच होकार दिला, उद्यापासून सुरू करू क्लासेस... सरला घरी आली, आई बाबा रमेशला सांगितल क्लास बद्दल, सगळ्यांना आनंद झाला,
"तुला होईल तेवढी मदत आम्ही करू", ... भाऊ
"आणि आईला ही मी मदत करेन गृहउद्योगात", ..... बाबा
रस्ता अवघड असो की सोपा चालत राहिल पाहिजे, प्रयत्न सुरू ठेवला पाहिजे, एक दिवस ध्येय साध्य होणारच, सोबत कोणी असो वा नसो, पुढे जात राहायचा, मार्ग आपोआप सापडतो...
