आरामात रहा ग आई...
आरामात रहा ग आई...
अनु एक गृहिणी, स्वभावाने एकदम साधी.... चांगली, आपल घर मुल नवरा हेच तीच जग, त्यांच्या साठी काहीही करायला नेहमी तयार, अनुला सांगितल आणि झाल काम हे समीकरण जणू ठरलेल, एवढी मदतीला तत्पर की स्वत कडे अजिबात लक्ष नव्हत तीच,
"आई मला उद्या लवकरच उठव, माझी एक्झाम आहे तर सकाळी उठून वाचणार आहे मी" ,....... प्रिया
Ok अनुने अलार्म लावला, 5.30 ला उठवायच लेकीला म्हणजे मी 5 ला उठते,
"काहीही काय आई तू कशाला अर्धा तास आधी उठते, दे तो अलार्म इकडे मी उठते माझी बेल झाली की, तू आराम कर" ,....... प्रिया
पण कसला काय मोबाईल वरून अलार्म लावून अनूने ठरवल की उठु 5 ला.....
घड्याळाचा अलार्म वाजला, अनु खडबडून जागी झाली,
"काय झालं ग झोप जरा वेळ, तू एवढी का दचकते अलार्म झाला की"?.......... सतिश तिचा नवरा काळजी करत होता,
" नाही उठाव लागेल, खूप काम पडलय",....... अनु उठली लेकीसाठी चहा ठेवला, तिला आवडत म्हणून खारी काढून ठेवली, हळूच जावुन बघितला 5.30 होत आले होते, प्रिया उठली,
"आई कशाला करते अस, thank you चहा बद्दल" ,...... एकदम मिठी मारली प्रिया ने,
"या साठी" ,..... अनु खुश होवुन रूम मध्ये गेली
प्रियाची -10 वी ची प्रॅक्टीकल एक्झाम होती आज,
"झाल का अटोप लवकर प्रिया .... घेतल का सगळ, देवाच्या पाया पड, प्रश्न नीट वाच",....... अनु काळजी करत होती ,
" आई..... प्रॅक्टीकल एक्झाम आहे ....... आणी प्लीज चिल, एवढ्या लवकर जावून करू काय? निघते अर्ध्या तासात" ,....... प्रिया
तरी अनुला थरथर होत होत, परीक्षा मुलीची हीच टेंशन घेत होती, स्वतः च्या परीक्षेच्या वेळी एवढ टेंशन आला नव्हता
दुसर्या दिवशी सतीशला बिझनेस ट्रीपला जायच होत, पॅकिंग बाकी होत, टेंशन अनुलाच, सतीश करत होता त्याची तयारी पण अनु ला समाधान नव्हत, स्वतः भरली पूर्ण बॅग, दुसर्या दिवशीची नाश्त्याची तयारी केली, रात्र भर नीट झोपली नाही अनु , नवरा गेला गावाला, आता 7 दिवसांनी येणार, दिवस भर काय करावे, अनुला करमत नव्हते, रात्रीही अनु ला झोप येईना, उठून दार चेक केल, बाल्कनी बंद आहे का बघितल, मुल झोपली की नाही अस सुरू होत तीच
"काय ग आई काय चाललय तुझ? कशाला एवढ टेंशन घेतेस सगळ्या गोष्टीच, मुव्ही लावून देवू का तुला? बघत बस की आरामात, नाही तर तुला ईतर वेळी वेळ नसतो" ,..... प्रिया विचारत होती
"नको मी जाते रूम मध्ये तू कर स्टडी", ... अनु बोलली
सकाळी मुल स्कूल कॉलेजला गेली, त्यांच्या आवडीचे सँडविचेस वगैरे बनवले, अनुला नाही आवडत ब्रेड, पण स्वतः साठी कोण करेन एवढा स्वैपाक , नवरा घरी असला की होतात पोहे उपमा, साग्रसंगीत स्वैपाक, अनुने एक सँडविच बनवून खावून घेतलं, दुपारी प्रिया आली घरी,......... "आई काय आहे जेवायला"? ,
"काही नाही केल आज, तू सांग आता बनवू या" ,...... अनु
"मग तू काय खाल्लं",........ प्रिया ,
सँडविच ,.......
"पण तुला नाही आवडत ना ,ब्रेड, तुला पोळी भाजी लागते ना",....... प्रिया
"हो, जाऊ दे खाल्ले तरी" ,........ अनु
"धन्य आहे, आई तू ", ........ प्रिया
आई तू बस मी करते मस्त पोहे आणि चहा,
हो नाही करता करता दोघींनी मिळून केले पोहे,
....…..
"संध्याकाळ पासून तुझ्या बाबांचा फोन नाही ग प्रिया",....... अनु काळजीत होती,
"आई अग बाबा बोलले होते मोठी कॉन्फरन्स आहे करतील फोन , मेसेज टाकून ठेव,",...... प्रिया समजावत होती
तरी अनु घाबरून गेली होती दर 5 मीनटांनी फोन चेक करत होती , जेवली ही नाही नीट, शेवटी रात्री 10.30 ला नवऱ्याचा फोन आला,......." दिवस भर बिझी होतो, आता डिनर झाल, रूम वर आलो",
बर्याच वेळ सतीश बोलत होता, आता अनुला बर वाटत होत ,
"मी बोलत होती ना आई बाबा बिझी असतिल तू उगीच घाबरते आणि टेंशन घेते " ,....... प्रिया
असे एक नाही अनेक प्रसंग आहेत, बर अनु काही हुशार नाही अस नाही, स्कूल मध्ये पहिल्या पाचात असायची, ग्रजुएट आहे ती, पाहिले 5-6 वर्ष जॉब ही केलाय, मुलांना सांभाळण्यासाठी जॉब सोडला, घरच पूर्ण तिच बघते , नवर्याला भाजी कुठून घेता, गॅस वाला कोण माहिती नाही, शाळेत जाण मुलांचा अभ्यास सगळ मॅनेज करते ती , काही त्रास झाला त्याला स्वतः तोंड देते, पण मूल नवरा यांची वेळ आली की हळवी होते घाबरते, हे एवढ्यात जास्त होतय, पूर्वी अशी नव्हती ती
सतीश घरी आला टूर होऊन, रुटीन सुरू झाल, अनुची अस्वस्थता वाढत होती, कोणाला घरी यायला उशिरा झाला की ती घाबरून जायची, कोणी जोरात जरी बोलाल तरी धड धड वाढत होती तिची, थोड जरी काम केल तरी दमायला व्हायच, या बाबत तिने सतीशला सांगितल...
"तू काळजी करू नकोस, मी घेतो डॉ ची अपाॅइंटमेंट",....... सतीश ला हि काळजी वाटत होती
"आजकाल फार अस्वस्थ झालाय मला डॉ , सगळ असून काही तरी कमी आहे अस वाटतय, सगळे आहेत घरी, सगळे व्यवस्थित वागतात, तरी मनात एक अनामिक भीती सदोदित असते,काही चूक तर नाही ना होणार, सकाळी आवरेल का लवकर? सगळ काम झालय का?, दूध बर्याच वेळ बाहेर आहे खराब नाही ना होणार? प्रत्येक्षात कोणी काही बोलत नाही मला .... तरी उशीर झाला उठायला तर आवरेल ना लवकर? मुलांचा आवडता पदार्थ जमला नाही करायला ते नाराज तर नसतील ना? असे अनेक प्रश्न मला शांतता मिळू देत नाहीत ",........ अनु
काय झालाय डॉ मला.....
" काहीही नाही तुम्ही perfectly fine आहात, हे कॉमन symptoms आहेत, हार्मोनियम ईम्बॅलन्स मुळे होत असा, आता एक करायचा अजिबात काळजी करायची नाही स्वतःला वेळ द्यायला हवा, आपण ही एक महत्त्वाची व्यक्ति आहोत हे लक्षात ठेवायचा" ,........ डॉक्टर
स्वतःला वेळ द्या......
"वॉक सुरू करा, मित्र मैत्रिणी ना भेटा, एखादा छंद असेल तर तो जोपासा, टीव्ही वर आवडता सिनेमा बघा, प्रोग्रॅम बघा, मोकळा हसा, कामासाठी मदतनीस हवी असेल तर ती घ्या, स्वतःला वेळ द्या, आनंदी रहा, तुम्ही आनंदी तर घर आनंदी",...... डॉक्टर
अनु घरी आली, तिने विचार केला आपली तब्येत ठीक करणे आपल्या हातात आहे, आता अस दुर्लक्ष करायचं नाही,
आता मस्त दिनक्रम सुरू आहे अनुचा, स्वतःकडे लक्ष देते ती आता, ड्रॉइंग पेंटिंग चे क्लासेस ही घेते लहान मुलांचे, कामाला एक मदतनीस ठेवली आहे, संध्याकाळी मस्त फिरून येते ती, घरचे खुश आहेत, त्यांना अनु आनंदी झालेली आवडल आहे
काय होतय ना आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही, काहीही करायला सांग घरच्यांसाठी आनंदाने करतो आपण, पण स्वतःला गृहीत धरतो, घरच्यांना हवा तो पदार्थ करुन देतो स्वतः असेल ते खावून घेतो, आराम नाही की वेळेवर गोळ्या औषध नाही, काहीही झाले की वाटेल उद्या बर जरा झोपून बघु , पण जस वय वाढत तसा त्रास व्हायला लागतो, एवढे अडकतो आपण संसारात मुलांमध्ये नवर्यात की काहीही सुचत नाही दुसरे, घरचे सांगत नाही अस आपल्याला की आमचंच काम कर... आपणच स्वतःहून अतिकाळजी करतो, आणि इमोशनली ही अडकतो, अगदी बंद करा हे सगळ अस मी नाही म्हणत, मी ही त्यातली आहे, पण हे पाश कमी करायला हवे तरच त्रास कमी होतो, विचार करून बघा...
