shubham gawade Jadhav

Romance Tragedy

3  

shubham gawade Jadhav

Romance Tragedy

दुसरं प्रेम....

दुसरं प्रेम....

12 mins
400


      काहीवेळा माणूस पहिलं आणि दुसरं प्रेम याच्या तुलनेत इतका अडकतो की तो स्वतःला हरवून बसतो .तूलना करतो आणि आनंदाचे क्षण गमावून बसतो .काहीवेळा काहींचे पहिले प्रेम चुकीचे असतें तर काहींना ते आवडत असूनही भेटत नाही .सगळा काही नियतीचा खेळ आहे त्याने फासे टाकायचे आणि आपण सोंगटीसारखे त्याच्या ईशाऱ्यावरती नाचायचे .प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम मिळतच असं नाही .काहींना ते दुसऱ्या प्रेमाच्या स्वरूपातही मिळू शकत .


            पूजा ही एक सावळीच पण नाकी डोळी छान असणारी मुलगी .तिला देवाने रंग दिला नव्हता पण समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करणारे मृगासारखे डोळे आणि गुलाबाच्या पाकळीसारखे हलके, नाजूक, रेखीव ओठ होते .एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर तीळ कसा शोभून दिसतो अगदी तसच सौंदर्य पुजाचं होत त्या तिळासारखं सौंदर्यात भर पाडण्यासारखं .जिथेही ती जाईल तिथे सगळ्यांनाच तिझा लळा लागायचा .हसणं ,बोलणं तिझ्या प्रत्येक छबीत एक निराळच आकर्षण होत .सगळ्यांना समजून घेणारी स्वीट आणि क्युट मुलगी .पूजा IT कंपनी मध्ये कामाला होती .

दिसण्याप्रमाणे बुद्धीही तेज, तल्लख .केतकी आणि पूजा रूममेट होत्या .एकाच कंपनी मध्ये कामाला होत्या .एकदम पक्क्या मैत्रिणी .

"पुजा ,अगं पुजा .आवर ना कामाला नाही का जायचं आज ." केतकी तिला ओरडून सांगत होती .

पूजा आसल्यासारखी शरीराला आडेवेडे देत तोंडावरच पांघरूण खाली न घेताच बोलली "बास .फक्त पाच मिनिट झोपूदे ना आलेच ."

"पूजा ,उठ ना ग,तुझं हे रोजचच आहे " केतकी पुन्हा एकदा तिच्यावर ओरडली .

पूजाने तोंडावरच पांघरूण खाली घेतलं तशी उन्हाची तिरीप तिझ्या गालांना स्पर्श करून तिझ्या सावळ्या रुपाला सोनेरी छटा देत होती .पण त्या सूर्यकिरणांना फक्त काही क्षणांसाठीच तिझ्या गालांना स्पर्श करता आला कारण तिने त्यांना चेहऱ्यावरती येण्यापासून हात लावून रोखलं होत.

"ओके " असं बोलून ती अंथरुणातून उठली आणि आवरू लागली . मस्त आवरून झालं मग त्या दोघीनी नाश्ता वगैरे केला आणि निघाले कामासाठी ऑफिसला .


         जवळच्याच बसस्टॅण्ड जवळ येऊन त्या उभ्या राहिल्या कारण तेथून न्यायला त्यांना कंपनीची बस येणार होती .त्यांचा तो रोजचाच स्टॉप .खूप सारी त्यांच्या वयाची मुलं त्यांना आजूबाजूला दिसत होती .केतकी तशी थोडी आगाऊच मुलगी .ती मस्त मुलांकडे पाहत होती .एक सुंदर मुलगा दिसताच.

केतकी - " यार .किती हँडसम आहे ना हा ."

पूजा - "गप ग .तुझं हे रोजचंच आहे .तुला रोज कोण ना कोण नवीन आवडत असत "

केतकी - नाक मुरडत तू राहूदे .तुला नाही आवडत तर तू नको बघू .मी पाहते ना.

असं म्हणून ती हसू लागली .

पूजा - Carry On म्हणाली आणि शांत बसली .

तेवढ्यात त्यांच्या कंपनीची बस आली आणि त्या दोघी त्यात बसून कंपनीला पोहोचल्या .

आपापल्या कॅबिन मध्ये गेल्या आणि कामात गर्क झाल्या .

थोड्या वेळाने त्यांच्या बॉसचा आवाज झाला. क्लॅप करत सगळ्यांना स्वतःकडे बोलावत होते ."come on guy's"

He is नैतिक .हा आपल्या इथे आजच जॉईन झालाय .

आजपासून हा आपल्या ऑफिस मध्ये काम करणार आहे .सो त्याला मिक्स करून घ्या .okay .


             नैतिक एक उंचा ,पुरा ,घारे डोळे असणारा युवक .वर्ण गोरा ,जिम ची बॉडी त्याने तो खूपच आकर्षक दिसत होता तो. केतकीने त्याला पाहिलं आणि लगेच पुजाला म्हणाली ,"कसला हॉट आहे ना हा ." तिने लगेच जाऊन नैतिक सोबत ओळख करून घेतली आणि दुरवरूनच पुजाकडे बोट दाखवत तिझीही ओळख त्याला सांगितली .

त्याने पुजाकडे पाहिलं त्यांची नी पुजाची नजरानजर झाली .तिझ्याकडे पाहत असताना आपल्या समोर तिझी मैत्रीण केतकी उभी आहे तो विसरलाच आणि त्याच्या तोंडून आपसूकच, "she is so cute".

केतकी हे ऐकून म्हणाली "आ"

तिझे हे शब्द ऐकताच तो भानावर आला आणि गरबडल्या सारखा झाला.nothing असं म्हणत स्वतः च्या नेमून दिलेल्या कामाला निघून गेला .


           आठवड्याभरातच त्याच्या स्वभावामुळे तो सगळ्यांच्यात मिक्स झाला.केतकी ची आणि त्याची चांगलीच गट्टी जमली होती .नैतिक पुजा च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता .कारण त्याला केतकी खूप आवडली होती .केतकीचे नेचर त्याला खूप आवडले होते .त्यादिवशी दुपारी लंच ब्रेक मध्ये केतकी आणि पूजा कँटीन मध्ये बसले होते .तेवढ्यात तिकडून नैतिक चा आवाज आला "केतकी " .केतकी ने लगेच त्याला ये ना इथे जेवायला असं म्हणाली त्याचबरोबर पुजा तिझ्याकडे रागाने डोळे फाडत बघत होती .तेवढ्या वेळात नैतिक त्यांच्याजवळ आलाही होता .तरीही पुजा केतकीकडे रागाने पाहतच होती .नैतिकला समजले की आपले येणे बहुतेक पूजाला आवडले नसावे .तो पूजाला हळूच म्हणाला "पुजा, बास ती तुझ्या डोळ्यात मावणार नाही." असं म्हणताच नैतिक आणि केतकी हसू लागले .पूजाचा रागाचा पारा वर चढला आणि पुजा रागारागाने तिथून निघून गेली .

नैतिक - केतकी तुझी मैत्रीण एवढी रागीट का बरं आहे .

केतकी - काही नाही रे असच .स्वभाव छानय तिझा अधून मधून होत तिला असं .

नैतिक - अच्छा .

एवढं बोलून दोघेही जेवण करून आपापल्या कामाला निघून गेले .


            दिवसांमाघून दिवस जात होते .पूजा आणि नैतिक कंपनी मध्ये नवा उचांक गाठत होते .दोघांमध्ये हुशारीची कमी नव्हती पण त्यांच कणभरही एकमेकांशी पटत नव्हतं .नैतिक स्मार्ट मुलगा होता त्यानं थोड्याच कालावधीत सगळ्यांना आपलसं करून घेतलं होत .अधून मधून नैतिक आणि पुजाची नजरा नजर होयची पण पुजाचा जळजळीत कटाक्ष पाहताच नैतिक बाजूला पाहायचा .त्याला मनात वाटायचं की हिला आपला येवडा राग का बरं येत असेल ? आपण विचारायचं का ? त्याने तिला तसं विचारायचं ठरवलं .लंच ब्रेक झाला आणि सगळे कँटीन मध्ये निघाले जेवायला सगळ्यांनी डिश घेतली आणि एका लाइन मध्ये उभा राहिले शेवटी नैतिक होता .पूजा आणि केतकीला जायला उशीर झाला होता .केतकीला डिश भेटली पण पूजाला नाही हे पाहताच नैतिक ने आपली डिश पूजाला देऊ केली तेवढ्यात कँटीन मधल्या वेटरने तिला एक डिश धुवून पूजाच्या हातात दिली .केतकी आणि नैतिक ला इतका राग आला त्या वेटरचा की बास .पूजा मनातल्या मनात थोडी हसली या प्रसंगावरती .नैतिक वेळो वेळी पूजा च्या जवळ जायचा प्रयत्न करत होता पण प्रत्येक वेळी तेवढाच दूर लोटला जात होता .त्याचा प्रत्येक वेळी तो पूजा ला इंप्रेस करायचा प्रयत्न करायचा पण प्रत्येक वेळी तोंडघशी पडायचा. पूजाला मनोमन हे सगळं आवडत होत पण ती त्याला तसं कधीच दाखवत नव्हती .


ऑफिस नंतर रूमवर गेल्यावर ती नैतिकचाच विचार करायची पण तिझ मन ते मान्य करायला तयार नव्हते .कारण तिझ एका मुलावर खूप प्रेम होत आणि तो एका ऍक्सिडेंट मध्ये निधन पावला होता .दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम होत .तो ही तिझ्यावर जीवापाड प्रेम करायचा पण नियतीच्या मनात काही वेगळच होत .बहुतेक वृषभ हा पुजा साठी बनलेला नव्हताच .

       

  हे दुसरं प्रेम होत ती वृषभलाही मनातून काढू शकत नव्हती पण तिला नैतिकही खूप आवडू लागला होता . कारण त्याच्या प्रत्येक हालचालीत वृषभची छबी जाणवत होती .तिझे डोळे नैतिकला पाहून सुखावत होते पण मन मात्र व्दिअवस्थेत फसलं होत .ती दोघांपैकी कोणालाच दूर करू शकत नव्हती .वृषभ मनात खोलवर रुतलेला होता तर नैतिक डोळ्यात साठत होता .वृषभ तिझा भूतकाळ होता .पण नैतिक मात्र वर्तमानकाळ होता . भूतकाळ आणि वर्तमान यात पूजा कोलमडत होत .मनात असंख्य विचारांचा डोंब उसळत होता .दोघांपैकी ती कोणालाच दुखावू शकत नव्हती अगदी वृषभ जिवंत नसतानाही . तिझ्या त्या मनाचे हाल कोणीच समजू शकत नव्हतं.तिला होणाऱ्या वेदना कोणीच समजू शकत नव्हतं .ती भूतकाळ आणि वर्तमान यांच्या कात्रीत पूर्णपणे अडकली होती .

        

          पावसाळ्याच्या दिवसात पूजा आणि वृषभ बाईकवरून रूमवर चालले असताना बाईक स्लिप झाली आणि वृषभ ट्रक खाली आला. तो जागीच ठार झाला पण पूजा मात्र वाचली .तिला थोडंफार लागलं होत .आत्ताशी कुठे ती या धक्क्यातून सावरली होती आता तिला पुन्हा यात नव्हतं पडायचं .कारण वृषभ (पूजाचा मृत्यू पावलेला बॉयफ्रेंड ) गेल्यावर खूप त्रास झाला होता तिझ्या डोक्यावर परिणाम झाला होता .खूप परिश्रमानंतर ती आत्ताशी नीट झाली होती .त्यामुळे ती नैतिकला स्वतःपासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवत होती .


नैतिक पाहिल्यादिशी आला सर त्याचं इंट्रो करून देत होते त्याचवेळी त्याची चेहऱ्यावरची स्माईल आणि हावभाव तिला वृषभ सारखे भासले होते .त्याला पाहताच तिझ संतुलन बिघडत होत तिला डॉक्टरांनी सांगितलं होत जास्त वृषभ केलास तर कोमा मध्ये जाऊ शकतेस .त्यामुळे तिने पहिल्या दिवसापासूनच ठरवलं होत की जमेल तेवढं नैतिकला आपल्यापासून दूर ठेवायचं .असं करताना तिला त्रास खूप होत होता पण तिझ्याकडे पर्याय नव्हता कारण तिझ्या आई बाबांना ती एकटीच होती .त्यांचे वृषभच्या वेळी झालेलं हाल तिला पुन्हा होऊ द्यायचे नव्हते .

        

          इकडे नैतिकला वाटत होत की किती पाषाण हृदयी बाबी घमंडी आहे ही पूजा .माझी तळमळ तिला का समजत नाही .का ? नैतिकला हे प्रश्न सतावत होते .नैतिक केतकीला विचारायचा पण केतकीला पुजाने बजावले होते नैतिकला तू यातले काहीच सांगायचे नाही .

त्यामुळे केतकी सगळं समजूनही अबोल होती तिला नैतिकची खूप कीव यायची पण ती काहीच करू शकत नव्हती .


            आज नैतिकच बर्थडे होता .ऑफिसमध्ये पुजा सोडून त्याला सगळ्यांनी विष केल .बर्थडे असूनही तो खूप उदास होता कारण त्याला आणखी पूजाने विश केल नव्हतं .केतकी पूजाला समजावत होती की," पूजा कमीत कमी आजतरी तू नैतिकला विष करायला हवं ".पण ऐकेल ती पूजा कसली .ती स्वतःशी ठाम होती की तिला नैतिकला एकही चांन्स नव्हता द्यायचा तिझ्या जवळ येण्याचा .नैतिक ने तो पूर्ण दिवस उदास मनाने घातला .

आता मात्र नैतिक खूप चिडला होता .ती समजते कोण स्वतःला , कुठली राणी वेगैरे लागून गेली का ? की स्वतःला मिस वर्ल्ड समजते . नैतिकचा पारा हलला होता .रागारागाने नैतिक पूजासामोरून बाईकवर वेगाने निघून गेला .पूजाने त्याचा राग हेरला होता .त्याच्या बाईकच स्पीड पाहून पूजा ची पायाखालची जमीनच सरकली .तिने केतकी कडे पाहिलं आणि तिझा हात घट्ट पकडला .केतकी समजली तिने लगेच वृषभला कॉल केला आणि तुला पूजा ने भेटायला बोलावलं आहे असं सांगितलं .वृषभच्या तर खुशीचा ठिकाणाच नाही राहिला .पूजा शब्द ऐकताच त्याचा राग शांत झाला .तो थोडाच पुढे गेलेला पुन्हा माघारी आला .

केतकी त्याला ओरडली की किती बाईक फास्ट चालवतो रे .

पूजा - हैप्पी बर्थडे नैतिक . I am sorry for my misbehavior .

नैतिक - अरे its okay .

केतकी - पुन्हा एकदा हैप्पी बर्थडे नैतिक .

आणि दोघांनीही एकमेकांना बघून हलकीशी स्माईल दिली .

नैतिक - चला ना आपण चहा घेऊ .इथे जवळच एक मस्त चहाची टपरी आहे .

पूजा - नको .आम्हाला उशीर होतोय .

नैतिक - okay .

पूजा - चल केतकी निघुयात .

आणि दोघी निघून गेल्या .


       पूजाला ज्याची भीती वाटत होती तेच झालं .त्यादिवसापासून नैतिक तिझ्या अधिक जवळ यायचा प्रयत्न करू लागला .एक दिवशी पूजा एकटीच ऑफिस ला आली कारण केतकी आजारी होती .त्या दिवशी पावसाने सकाळपासून चांगलाच जोर धरला होता .आज पूजाला एकटीला पाहून नैतिकला आश्चर्य वाटल .त्याला केतकी का आली नाही ? यापेक्षा पूजा एकटीच आली याची जास्त काही वाटत होती .दिवस कसा गेला कळलच नाही .अजूनही पूजाच काम बाकी होत नैतिकच आवरलं होत तरीही तो पूजासाठी थांबला होता .पूजालाही वेळेचं भान उरलं नाही ८ वाजले .मग स्वतःहून नैतिक जवळ आला आणि पूजाला म्हणाला.


नैतिक - पूजा ८ वाजलेत .

पूजा - ओ .मग ती भानावर आली .अरे खरच की आता तर बसही गेली असेल .

नैतिक मनातल्या मनात खूप खूष झाला होता .

नैतिक - Don't worry मी आहे सोडेल मी तुला .

पूजा - नाही नको .मी जाते रिक्षा करून .

नैतिक - अगं .या भागात रिक्षा ७ लाच बंद होतात .

नाविलाजाने पूजाला हो म्हणावं लागलं .


दोघेही आवरून खाली पार्किंग मध्ये आले .नैतिक ने बाईक काढली आणि पूजाला बसायला सांगितलं .पूजा बाईक वर बसताच त्याने हेल्मेट तिला दिल .तिला लगेच वृषभ ची आठवण झाली .तिझ काळीज खूप वेगाने धडधडू लागलं .कारण वृषभ ने ही तिला असच हेल्मेट दिल होत स्वतः न घालता आणि ऍक्सिडेंटमध्ये त्याच्या डोक्यालाच मार लागून तो तिला सोडून गेला होता .ती त्याच विचारात होती तेवढ्यात नैतिकचा आवाज आला "are you okay." तशी ती भानावर आली आणि हो म्हणाली .तो तिला हेल्मेट देत होता पण ती नको म्हणाली .त्याने हट्ट करताच ती रागावून ओरडली आणि म्हणाली , मी माझी जाते चालत मग .असं ऐकताच नैतिकने गुपचूप हेल्मेट घातलं आणि निघाले .तिला त्याच्या काळजीची जाणीव होती पण तिला पुन्हा पुनरावृत्ती नको होती .म्हणून तिने रागावून नैतिकला हेल्मेट घालायला लावलं होत .

            

बाईक पुन्हा एकदा त्या वळणावर आली जिथे वृषभचा आणि तिझा अपघात झाला होता .तिझ काळीज आता जोरजोराने धडधडू लागलं होत .तिने नैतिकचे खांदे आता घट्ट पकडले .नैतिक ला ते जाणवले आणि तो तिला Are You Okay as विचारत होता पण तिझा काहीच रिस्पॉन्स नव्हता .काही क्षणात विजेच्या गतीने भूतकाळात घडलेली घटना तिझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागली .तेवढ्यात मोठा ट्रक समोरून आला आणि जोराचा हॉर्न दिला तशी बाईक व्हायबल झाली .नैतिक थोडा गरबडला कारण हॉर्न आणि समोरून येणारा मोठा डार्क प्रकाश बाईक थोडी एका साइडला झुकली .तशी पूजा वृषभ असं जोरान ओरडून जवळ जवळ खाली कोसळीच .तिझ्या अचानकच्या कोसळल्याने आणि ओरडण्याने नैतिक आता पूर्णच गरबडला .पूजा रोडवर पडली होती .ती बेशुद्ध झाली होती .नैतिक ने बाईक थांबवली आणि ऍम्ब्युलन्स ला कॉल करून बोलावून घेऊ लागला .केतकीलाही त्याने घडलेला प्रसंग कळवला .नैतिक धाडसी होता त्याने त्या वेळेला व्यवस्थित हाताळलं होत .ऍम्ब्युलन्स आली त्यात पूजाला टाकलं आणि गाडी हॉस्पिटलला पोहचली. केतकीही हॉस्पिटलला पोहचली होती .पुजाला स्ट्रेचरवर टाकून आत नेण्यात आलं होत .


    नैतिक घडलेला प्रकार केतकीला समजावत होता .पण आता त्याला कळत नव्हतं की हा वृषभ कोण ? कोण असेल हा ? तिला आवडणारा मुलगा .आता नैतिक अस्वस्थ झाला. हजारो प्रश्न मुंग्या होऊन त्याच्या मनाला डसत होत्या .मन गर्भगळीत झालं होत .ही त्याची हालत केतकीने ओळखली .तिने त्याला शांत केल आणि सगळं समजावून सांगितलं .तेव्हा कुठे नैतिक शांत झाला .सगळे प्रश्न उलघडल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती साफ दिसत होता .एवढ्यात डॉक्टर बाहेर आले .

नैतिक - डॉक्टर पूजा कशी आहे ? , आम्ही तिला भेटू शकतो ?

डॉक्टर - घाबरायचं काही कारण नाही .ती ठीक आहे तिला चक्कर आली होती आणि ती बेशुद्ध झाली होती .

तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता .

वृषभ तुम्हीच का ? तुमच्या नावाचा जप चालूये आत .जावा लवकर .


केतकी आणि नैतिक दोघे आत गेले .पूजाने दोघांना पाहताच हंबरडा फोडला .खूप रडली .केतकी ने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. तिने उठून चक्क नैतिकला घट्ट मिठीची मारली .त्याला कुठे लागलं नाही ना हे चेक करू लागली . ती मिठी दुसऱ्यांदा झालेल्या प्रेमाची होती .काळजाने तुडुंब भरलेल्या नदीसारखी .जी ती पहिल्या प्रेमाला कधीच देऊ शकली नव्हती .ज्याला कसलाच वासनेचा स्पर्श नव्हता .त्यात निखळ प्रेमभावना होती अगदी काचेसारखी .त्यात कितीतरी काळजी ,प्रेम ,अव्यक्त भावना काटोकाट भरुन वाहत होत्या .तिझ्या प्रत्येक अश्रूत लाखमोलाची काळजी टपकत होती .नैतिक ही आता भावुक झाला होता .कसबस त्याने स्वतःला आणि पूजाला सांभाळलं आणि बोलला .

       सॉरी पूजा मी तुला समजू शकलो नाही .खरच पहिलं प्रेम हे पहिलच असत .

पुजा - तू sorry नको म्हणूस .खरं तर माझच चुकलं .मी अजूनही भूतकाळांच्याच गर्तेत हरवून बसले होते स्वतःला .मला भूतकाळ आणि माझा वर्तमानकाळ यात मी पुरती अडकून बसले होते .मला दोन्हीपैकी कोणालाच सोडायचं नव्हतं .मला कोणाला निवडावं हेच कळत नव्हतं. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा भूतकाळ की माझ्यासाठी रोज तीळतीळ तुटणारा वर्तमानकाळ .माझी खूप मोठी चूक झाली .भूतकाळातल्या आठवणीतून मला बाहेरच पडता नाही आलं .


तुझी रोजची घालमेल ,मला बोलण्यासाठीची तुझी धडपड,माझ्या जळजळीत कटाक्षाला नजर भिडवण्याची गरज मला कळत होती पण मी भूतकाळातच अडकले होते माझ्या पहिल्या प्रेमात . पण मला समजलंच नाही की त्याचं अस्तित्व आता संपलं होत आणि उरल्या होत्या फक्त आठवणी आणि आभास . त्या नसलेल्या अस्तित्वाच्या नादात मी समोरच दुसऱ्या आणि तितक्याच लाघवी प्रेमाला क्षणोक्षणी पायदळी तुडवत होते .भूतकाळाच्या आठवणीने मला जखडून ठेवलं होत .नियतीच्या त्या खेळाला कोणीच रोखू शकत नव्हतं आणि बदलूही शकत नव्हतं .त्या भूतकाळाच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीने मी तुझ्याकडे पाहुच शकले नाही .मला माफ कर .मी तुला खूप सतावल ,खूप रागराग केला .तुझ्या भावनांना मी क्षुल्लक किंमत दिली .

मला खरच माफ कर .


आभासी जगण्याला मला माघेच सोडून द्यायला हाव होत आणि नियतीच्या खेळीला मान्य करायला हव होत .भूतकाळाच्या धुंदीत मी तुझ्या प्रेमाला मुकत चालले होते . तिचे ते प्रेमभराचे आणि हृदयातून निघणारे बोल केतकी आणि नैतिक कोंबडीने धान्याचे दाणे टिपावेत तसे टिपत होते .त्याला या परिस्थितीवर काय बोलाव कळतच नव्हतं .पण तिझ्या प्रेमळ मिठीने तिझ्या भावना त्याला समजल्या होत्या .

आज दुसरं प्रेम जिंकलं होत आणी विजयाचा गुलाल मिठीतुन उधळत होत पण पराभव पहिल्या प्रेमाचाही नव्हता झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance