दुरून डोंगर साजरे !
दुरून डोंगर साजरे !


विजय त्याच्याच मस्तीत रस्त्याने चालत होता इतक्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या बऱ्यापैकी गुबगुबीत नसणाऱ्या स्त्रीवर पडली. तिच्या गळ्यातील बऱ्यापैकी नाजूक मंगळसुत्रही त्याच्या नजरेतून सुटले नाही. ती जवळ येताच त्याच्या मनात विचार आला हिच्यासारखी एखादी स्त्री माझ्यावर कितीही जिवापाड प्रेम करत असती तर मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला असता का ? विजयने स्वतःच स्वतःला स्वतःचीच मान नकारार्थी हलवून स्वतःलाच नकार दिला. इतक्यात त्याला समोरून एक गुबगुबीत आखुड कपडे परिधान केलेली स्त्री येताना दिसली तेव्हा तो मनात म्हणाला, ही विवाहित असती तरी हिच्या प्रेमात पडायला नव्हे ! तर पडून राहायला मला आवडले असते. विजय आता उंटासारखा तिरका तिच्या दिशेने चालू लागला. तो तिला धडकणार इतक्यात त्याने चाल बदलून हत्तीची चाल स्वीकारली पण ती स्वीकारतानाही त्याने तिच्या मोकळ्या खांदयाचा स्पर्श आणि तिच्या अंगावरील अत्तराचा सुगंध घेतलाच ! चुकून तो तिला धडकला असताही तरी ! बहुसंख्य सभ्य लोक सॉरी ! म्हणण्याचा जो गाढवपणा करतात तो ते नक्कीच करणार नव्हता. कारण आता तीच त्याला सॉरी ! म्हणणार होती. तिच्या गाढवपणामुळे ! ती तोच गाढवपणा करत होती जो आजच्या बहुसंख्य स्त्रिया करतात रस्त्याने चालत असताना मोबाईलवर बोलण्याचा. तो ती करत नसती तरी ती विजयलाच सॉरी म्हणाली असती कारण त्याच्या सारखा हिरो दिसणारा पुरुष तिच्यासारख्या गुबगुबीत स्त्रीला स्वतःहून धक्का का मारेल ? चुकूनच लागला असेल ! असा गोड गैरसमज करून घेत तो सॉरी बोलायच्या अगोदरच तीच त्याच्याकडे पाहून गोड हसली असती. विजयला या गुबगुबीत स्त्रिया का आवडतात ? देव जाणे ! त्या पाहण्यासाठीच तो परप्रांतीय चित्रपट आवर्जून पाहतो ते डोक्यात जात असतानाही. इतकेच नव्हे तर बायकांच्या दैनंदिन मालिकाही तो डोळे फोडून पाहतो. असे असताना तो आता चाळिशीतही अविवाहित आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटते की त्याला काहीतरी लैंगिक समस्या आहे किंवा तो समलिंगी वगैरे आहे . पण वास्तवात दोन डजन स्त्रिया त्याच्या मागे होत्या असे तो म्हणतो. फक्त म्हणत नाही तर त्यांच्या नाव पत्त्यासह त्यांच्यासोबतच्या त्याच्या प्रेमकथांची पारायणे करतो. ती ऐकताना ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होतात...लव्ह गुरू ! म्हणत ते त्याच्या चारणाचे दास होतात.
त्याच मस्तीत विजय रस्त्यावर पुढे - पुढे चालत असताना त्याला आणखी एक मादक तरुणी समोरून येताना दिसली तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. ती त्याच्या समोरून निघून गेल्यावर विजय स्वतःशीच म्हणाला , " रंभा मेनका आणि उर्वशी यांचं सौंदर्य हिच्यापेक्षा खचितच जास्त असेल नाही ? " पुढच्या क्षणाला त्याच्या मनात विचार आला, " पण सौंदर्य नश्वर असते. सौंदर्यालाही नश्वरतेचा शाप आहे. ती सुंदर आहे मादक आहे पण हे सौंदर्य ती ज्या शरीरावर मिरवतेय ते शरीर कशावरून आतून कोणत्यातरी व्याधीने पोखरलेलेले नसेल ? व्यक्ती सुंदर असण्यापेक्षा सदृढ असणे आज जास्त गरजेचं आहे. मला चांगलं आठवत मी पाहिलेलं रस्त्यावरील एका श्रमजीवी स्त्रीच सौंदर्य हिच्यापेक्षाही खूपच जास्त होत. ते ही ! कोणताही मेकप न करता. तिने जर मेकप केला असता तर नक्कीच एखाद्या चित्रपटातील हिरोईन शोभली असती. मी त्या मादक तरुणीकडे आकर्षित व्हायला कोणती गोष्ट कारणीभूत होती ? फक्त कामभावना की प्रेम ? प्रेम कसं शक्य आहे ! प्रेम नाही नक्कीच ही कामभावनाच आहे. आता मात्र कामभावनेचा विषय निघाला आणि विजयच डोकं आणि पाय दोन्ही भराभरा चालू लागले. कामभावना म्हणजे नक्की असते काय ? खरोखरच कामभावना आणि प्रेम यांचं काही नातं असतं का ?? लग्न आणि कामभावना यांचा काही संबंध आहे का की कामभावना प्रेम आणि लग्न या एकाच त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत ??? आतापर्यत स्त्री लंपट वाटणारा विजय आता एखाद्या तपस्वी साधुसारखा विचार करू लागला. मी शेकडो प्रेम कथा लिहिल्या पण प्रत्यक्षात कधीच कोणाच्या खऱ्या प्रेमात पडलो नाही. इतरांचं प्रेम , त्यांचं प्रेमात पडणं, प्रेमात वाहत जाण , प्रेमात सर्वस्व गमावण आणि प्रसंगी जीवही गमावणे माझ्यासाठी माझ्या कथेचे खाद्य ठरले पण वास्तवात मी खऱ्या प्रेमापासून कायमच दूरच राहिलो.
माझ्या प्रेमकथा वाचून कित्येकांना वाटत मी म्हणजे प्रेमवेडा ! कोणाच्यातरी प्रेमात मी अखंड बुडालेलो असणार आणि माझा प्रेमभंग झाल्यामुळेच मला इतक्या छान प्रेमकथा लिहिता येतात. मी कोणी मोठा लेखक नाही आणि होण्याची माझी इच्छाही नाही. वास्तवात वास्तवातील एखादा विषय मिळाला तरच माझी प्रेमकथा जन्माला येते. इतर वेळेला समाजातील भयाण वास्तवात मी कथा शोधत नाही, म्हणजे तेथे कथा नसते असे नव्हे पण ते मला जमत नाही. एक वर्ष झाला गेल्यावर्षी एका दिवाळी अंकासाठी एक कथा लिहिली होती तेव्हापासून म्हणजे त्यांनतर मी एकही कथा लिहिली नाही कशी लिहिणार ? आता कोणी कोणाच्या खऱ्या प्रेमात पडतच नाही. आता प्रेमकथा फुलतात त्या विवाहित स्त्री - पुरुषांच्या त्या कथेत सारं काही असतं पण प्रेम शोधावं लागत कारण या कथेत प्रेम वासना म्हणून वावरत असत. मी नेहमीच पवित्र, निर्मळ, निरागस, नाजूक आणि हळव्या प्रेमाच्या शोधात होतो पण आता ते सापडत नाही. मी माझ्या मनात तयार केलेली प्रेमाची परिभाषा बदलू पाहते आहे. माझ्या नवीन कथेसाठी प्रेमाच खाद्य न मिळाल्यामुळे माझ्यातील लेखक खपतो की काय अशी आता मला भीती वाटू लागली आहे म्हणूनच मी माझ्या कथेसाठी स्वतःचाच प्रेमावर बळी देऊन माझ्या नवीन कथेसाठी खाद्य तयार करण्याचा निर्णय घेतलाय खरा ! पण मी त्यात यशस्वी होईन ना ? विजय स्वतःलाच प्रश्न विचारून झोपेतून जागा झाल्यासारखा भानावर आला.
विजयला नेहमीच गुबगुबीत स्त्रियांबद्दल आकर्षण वाटायचं पण तो स्वतः मात्र सडपातळ राहण्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करायचा. त्याच्या सर्व मैत्रिणी सडपातळ आणि दिसायला अंत्यत सुंदर होत्या. विजयच्या आयुष्यात इतक्या स्त्रिया होत्या की वेगळ्या कोणा स्त्रीकडे आकर्षित होण्याची त्याला कधी गरजच भासली नाही. आजही त्याच्याशी एक वेळ बोलण्यासाठी आसुसलेल्या स्त्रिया कमी नाहीत. पण तो आजही कित्येकींशी बोलणे टाळतो. विजयचा मित्र परिवार फारच मोठा होता आणि तो सर्वाना आपला अंत्यत जवळचा मित्र वाटत असल्यामुळे सर्वच जण त्याच्या समोर आपले हृद्य मोकळे करून बसायचे आणि त्या मोकळ्या हृदयातून तो त्याची कथा अचूक वेचून घ्यायचा. पण जस जसा विजय बरा लेखक म्हणून प्रकाशात आला तेव्हा कित्येकांना त्याच्या कथेत आपले मोकळे हृदय दिसले आणि त्यांनतर काही वर्षांनी विजयला मोकळे हृदय मिळेनासे झाले तेंव्हा तो एकटाच एकतर्फी एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडायचा आणि तिच्या त्याच्या प्रेमात पडण्याभोवती एखादी छान प्रेमकथा गुंफायचा आणि ती गुंफून झाली की तिला विसरून जायचा. एक दिवस विजयची एक गोड - गोड प्रेमकथा वाचून विजयचा एक प्रेमभंग झालेला मित्र त्याला म्हणाला, तुला हे वाटतं ना तितकं प्रेम रम्य वगैरे काही नसतं , प्रेम म्हणजे वेदना, भांडण , तिरस्कार, आवेहलना, रितेपणा ! तू जे कल्पनेत प्रेम पाहतोस ते म्हणजे " दुरून डोंगर साजरे " असे आहे. एखदा तरी खरंच मनापासून कोणाच्यातरी प्रेमात पडून बघ ! प्रेमात पडल्यावर तीच तुला टाळणं अनुभव !! तीच तुला लाथाडून दुसऱ्याच्या मिठीत जण बघ ! आणि मग लिही एखादी प्रेम कथा ! ती वाचताना तुझ्या डोळ्यातूनही पाणी येईल तेव्हा तू झालेला असशील मोठा लेखक ! पण ते मोठेपणही तुझ्यासाठी कवडीमोल असेल तेव्हा ! तुला कळेल मी तुझ्या प्रेमाला " दुरून डोंगर साजरे ! " का म्हणालो ते ! त्यावर विजय, त्याला म्हणाला , मित्रा स्वीकारले मी तुझे आव्हान यापुढची कथा म्हणजे माझा स्वतःचा प्रेमाचा अनुभव असेल ! मित्रा प्रतीक्षा कर माझ्या पुढच्या प्रेमकथेची...
त्यांनतर विजयच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता आता प्रेमात पडायचं कोणाच्या ? कसं ?? कुठे आणि कधी ??? वास्तवातील एखाद्या तरुणीच्या प्रेमात पडण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं म्हणून त्याने त्याच्या डोक्यात एका काल्पनिक प्रेयसीच चित्र उभं केलं जी दिसायला एखाद्या परिसारखी असेल पाहताक्षणी जिच्या प्रेमात कोणीही पडेल. त्याने तिला एक नावही दिलं " प्रतिभा " त्याच्या मनात दुसरा प्रश्न घोळू लागला ती परिसारखी दिसणारी माझ्या प्रेमात का पडेल ? त्यासाठी मलाही रोज छान दिसावे लागेल ? विजय लेखक / कवी असल्यामुळे साधा सरळ राहत असे ! त्याने त्याचे राहणीमान बदलले, वाढलेले केस कापून टाकले, दाढी मिशा काढून टाकल्या, पिकलेले पांढरे केस काळे केले , नवीन कपडे बूट विकत घेतली. आता रोज नवीन इस्त्री केलेले कपडे घालायचे असा त्याने निर्धार केला. आपण प्रतिभेच्या प्रेमात पडलोय म्हणजे आपण व्हाट्स अँपवर दिवसभर तिच्यासोबत ऍक्टिव्ह राहायला हवं असा विचार करून तो रोज चार वेळा चार चार स्टेटस शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ आणि शुभ रात्री असे मधे - मधे आय लव्ह यु , आय मिस यु , यु आर माय स्वीट हार्ट टाकू लागला. रात्री दोनला तो शेवटचा स्टेटस टाकायचा तिच्यावर लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी ! यात भर म्हणून सकाळी गुड मॉर्निंग सोबत तो आपला अंघोळीनंतरचा उघडा सेल्फी तिच्यासाठी स्टेट्सवर टाकायचा. हे सर्व सुरू झाल्यावर पूर्वी त्याला त्याच्या ओळखीच्या ज्या तरुणी त्याला रोज गुड मॉर्निंग वगैरे करायच्या त्यांनी ते बंद केलं ! तो रस्त्याने चलताना तरुणी त्याच्याकडे वळून - वळून पाहू लागल्या. त्याचे मित्र त्याला म्हणून लागले अरें यार तू तर दिवसेन दिवस तरुण होत चाललास ? तू लग्न नाही केलंस हे बरं केलंस ?? सुखी आहेस यार तू ??? विजयला तरुणी थोड्या चिपकु लागल्या पूर्वीसारख्याच ! तेव्हा विजयच्या मनात विचार आला प्रेमात पडल्यावर माणूस आनंदी असतो तो कोणावर रागवत नाही, सर्वांशी प्रेमाने बोलतो - वागतो, विजयही आता सर्वांशी प्रेमाने वागू लागला सर्वांची काळजी करू लागला त्याला आवडत नसणाऱ्या पण इतरांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी तो आवडून घेऊ लागला. त्याच्यात झालेला हा बदल सर्वांनी टिपला आणि त्याला म्हणाले , हल्ली तू खूपच शांत झाला आहेस. विजयने आपले पुस्तकात खुपसले डोके बाहेर काढले तो रोमँटिक चित्रपट मालिका पाहू लागला. चावट विषयावर मित्रांसोबत गप्पा मारू लागला. सुंदर तरुणींचे मादक छायाचित्र इतरांना शेअर करू लागला. थोडक्यात काय सगळीकडे आनंदी आनंद झाला. आजूबाजूच्या सामाजिक समस्या त्याला भेडसावने बंद झाले. त्याला सर्वाधिक त्रास देणारा विषय म्हणजे लग्न तो त्रास देईनासा झाला कारण सर्वाना वाटू लागले हा आता नक्कीच कोणाच्यातरी प्रेमात पडलाय ! आता लवकरच तो तिच्याशी लग्न करेल आणि संसारात रमेल. विजयलाही हे काल्पनिक प्रेमात पडणं सुखावत होतं.
विजयचे हे प्रतिभाच्या प्रेमात पडून राहणे जवळ - जवळ एक महिनाभर टिकले त्यानंतर मात्र त्याला रोज दाढी करण्याचा, कपड्यांना इस्त्री करण्याचा, सकाळी लवकर उटण्याचा, रात्री उशिरा झोपण्याचा, विनाकारण गोड वागण्याचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक भान गुंडाळून ठेवण्याचा कंटाळा आला. स्त्रियांच्या सौंदर्याचं अथवा त्यांच्या तनाच आकर्षण त्याला कधीच नव्हत. स्त्रीकडे नेहमी तो एक माणूस म्हणूनच पाहत असे. स्त्री म्हणून स्त्रीचा पुरुषापेक्षा वेगळा विचार करणे त्याला मान्यच नव्हते. वेगळा विचार करणारी कोणतीही बंडखोर स्त्री त्याला आवडते. प्रेमाच्या नावाखाली आजही स्त्रियांचा अक्षरशः बळी घेतला जातो. प्रेमात पडण वाईट नाही पण प्रेमात पडणं हे दोन्ही बाजूनी सारखं असायला हवं एकाने तरी ते फक्त आपली गरज म्हणून स्वीकारलं तर प्रेमाचा जीव गुदमरतो ! विजयला कोणालाही त्याच प्रेम द्यायच नव्हतं ! ज्या व्यक्तीला त्याच्या प्रेमाची गरज असेल अशाच व्यक्तीच्या तो प्रेमात पडणार होता. विजयच्या दृष्टीत प्रेम म्हणजे "दुरून डोंगर साजरे" होते. कारण त्याला प्रेमात पडायचे होते, पडून राहायचे होते , पण ते प्रत्यक्षात अनुभवायचे नव्हते.
विजयने आपल्या मित्राचं बोलणं तात्पुरत मनावर घेतल होत आणि प्रेमात पडून त्याचा अनुभव घेऊन तो प्रेमकथा लिहिल असा म्हणाला होता पण मुळात त्याचा प्रेमावर विश्वासच नव्हता ! म्हणजे आज आपण ज्याला प्रेम म्हणतो ते त्याच्या दृष्टीने ते प्रेम नव्हतेच ! तो आजही खऱ्या प्रेमाच्या शोधात होता आणि आयुष्यभर राहणार होता... त्याच्याकडे आकर्षित झालेल्या त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार असणाऱ्या खूप होत्या पण त्यात प्रेम कळलेली एकही नव्हती. प्रेम हे सर्व भौतिक गोष्टींच्या पलीकडील आकर्षण आहे हे वैश्विक सत्य कोणी स्वीकारायला आज तयार नाही . प्रेम हे स्त्री - पुरुष या लैंगिक भेदापर्यत सीमित नाही.
असे तो मानतो. विजयने ठरवले असते तर आजचे प्रेम मिळविणे त्याला अवघड नव्हते पण प्रेम ही मिळविण्याची गोष्ट नाही ना देण्याची ती अनुभूतीची गोष्ट आहे असे विजय मानतो . विजयने प्रेमावर शेकडो कथा कविता लिहिल्या पण तो त्यांच्यात आणि त्या ज्यांच्यावर आणि ज्यांच्यासाठी लिहिल्या त्यांच्यातही फार गुंतून पडला नाही. गुंतून राहणे हा त्याचा स्वभावच नव्हता . विजयचे साऱ्या जगावर प्रेम आहे या जगातील जे जे सुंदर पवित्र आणि निर्मळ आहे त्यावर त्याचे प्रेम आहे. रस्त्याने चालण्याऱ्या कोणत्याही सुंदर स्त्रीच्या सौंदर्याच्या तो प्रेमात पडतो पण त्याला तिच्या सौंदर्याचे आकर्षण नसते...विजय या विश्वातील हे डोळस सत्य जाणतो की या विश्वातील प्रत्येक सजीवाचा देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे असे असताना विशिष्ट अशा एखाद्या देहाबद्दल आकर्षण ते का वाटावे देह मग तो कोणाचा कितीही सुंदर का असेना एक दिवस नष्ट होणारच आहे. आकर्षण आत्म्याला आत्म्याचे वाटायला हवे ! खूप विचार केल्यावर विजय, आपल्या मित्राला म्हणाला, मित्रा मी तुझे आव्हान स्वीकारले खरे पण मी माझी हार मान्य करतो खऱ्या प्रेमात पडणं माझ्यासाठी शक्यच नाही माझ्यासाठी प्रेम हे दुरून डोंगर साजरे आहे ते तसेच राहूदे ! यापुढे मी प्रेमकथा लिहिणार नाही आणि लिहिली तर ती माझी शेवटची प्रेम कथा असेल...