दुग्धशर्करा
दुग्धशर्करा


हॉलीबॉल चा खेळ चालू होता. मुले रंगात आली होती. तिथे एक छोटासा मुलगा खेळ पहाण्यात दंग झाला होता. आई ओरडत होती. कबीर कबीर! तो ऐकत नव्हता.
"कबीर थांब आले मी खाली. किती वेळ झालाय घरातून गेलाय. लवकर वर ये." तसा कबीर धावतच आला.
"आई किती मस्त खेळ चालला होता. मधेच तु बोलवलेस." कबीर म्हणाला.
"अभ्यास कर लहान आहेस तू. तुझं लक्ष सगळं खेळण्याकडे." "आई मला तो खेळ खूप आवडतो. मोठा झाल्यावर मी सुद्धा हॉलीबॉल खेळणार."
"हो आणि खाणार काय. खेळ तुला खायला देणार आहे. चल अभ्यासाला लाग." असे म्हणत आईने त्याच्या हातात दप्तर दिले. हळूहळू तो मोठा हो लागला. पण त्याचं लक्ष हॉलीबॉल कडेच असे. हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलांना तो आवडू लागला. चेंडू इकडे तिकडे गेला तर कबीर आणून देत असे. त्यामुळे तो सर्वांचा लाडका झला.
तो खेळाचे पूर्ण निरीक्षण करीत असे. हॉलीबॉल मध्ये पारंगत झाला. सायंकाळी दोन-दोन तास खेळायला जात असे.
"कबीर अभ्यास खूप कर. शिकला असता काहीतरी पुढे साहेब बनशील."
"अग खेळात सुद्धा साहेब बनू शकतो."
"ते कसे?", आई ने विचारले. "एखाद्या खेळात पारंगत असेल तर कंपनी खेळासाठी ठेवते. पगार वगैरे सगळं साहेबांसारखा मिळतो."
"खरंच की काय!"
"अगदी खरं आई. तसे असेल तर ठीक आहे तुझी आवडही जपली जाईल व तुला पैसाही मिळेल." कबीर खुश झाला. चला आईला तरी कळले. आता ती मला अडवणार नाही.
कॉलेजमधून पण तो खेळायला जाऊ लागला. अनेक ट्रॉफी जिंकू लागला. त्याचे नाव होऊ लागले. खेळात कबीर आहे म्हटल्यावर तोच जिंकणार याची प्रत्येकाला खात्री असे. नॅशनल लेव्हल पर्यंत त्याने स्पर्धा जिंकली. बऱ्याच कंपन्या ची ऑफर येऊ लागल्या. त्याने एक नोकरी पकडली. मोठी पोस्ट होती. पण काम कमी व खेळण्यासाठी जास्त. तो खूप आनंदी होता.
त्याने आईला सांगितले,"आई मला नोकरी चांगली मिळाली. आणि मला खेळायला पण मिळणार आहे."
"फक्त खेळच आहे की पगार पण आहे.
"आई मोठा पगार आहे. मोठ्या पदावर आहे आणि खेळ पण आहे."
"अरे वाह! मग दुधात साखरच की!"
" होय! मी पण खुश, तू पण खुश हो ना आई!"
" थांब जरा देवा जवळ पेढा ठेवते. माझ्या लेकराचे चांगले झाले अशीच कृपा ठेव देवा!" कबीर म्हणाला,"माझ्या सारखे सगळे आई बाबांना पण बुद्धी दे.अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व आहे हे पटवून दे. खेळ सुद्धा घर चालू शकतो. हे सगळ्यांना समजले पाहिजे.
प्रत्येक आई-बाबांनी आपल्या मुलाच्या आवडीनुसार करिअर करु दिले तर तो यशस्वी होऊ शकतो. त्या करिअर विषयक त्याला माहिती दिली, त्यात फायदा काय तोटा काय हे सगळं त्याला समजावून दिले व नंतर त्याला निर्णय घ्यायला लावला तर तो आपल्या जीवनात आनंदी व यशस्वी राहील."
"हो गं माझं शाहणं बाळ. खूप मोठा झाला. लोकांना समजावून सांगण्या इतका!", आई म्हणाली.
"खिलाडी वृत्ती व जबाबदारी दोन्ही तू सांभाळल आहे."
"आई आवड असेल तर सवड मिळते असं म्हणतात ना. मग आवड असेल तर कितीही कष्ट करण्याची तयारी असते. मेहनत करताना समाधान असतं. त्यामुळे लगेचच यश धावत येतो.", कबीर म्हणाला.