Revati Shinde

Inspirational

3  

Revati Shinde

Inspirational

दिशा

दिशा

1 min
252


रितेशच्या फोटोवर हार चढवताना अरुंधतीच्या डोळ्यात पाणी आले. त्याच्या आठवणीनी तिची नजर धूसर झाली. गतस्मृती जाग्या झाल्या.

रितेश तिचा एकुलता मुलगा. तो सात वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडिल गेले. अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण रितेशसाठी तिने स्वतःला सावरले. रितेशच्या वडिलांच्या जागेवर अरुंधती बँकेत लागली.


रितेश हुशार होता. त्यामुळे तो सगळ्या परीक्षांमध्ये अव्वल येत होता. ती निर्धास्त होती. मेरिटवर त्याला चांगली नोकरीही मिळाली. जगातल्या स्पर्धेत तोही सामील झाला. तीही आता मोठ्या हुद्द्यावर होती. जबाबदारी वाढत होती. रितेशकडे दुर्लक्ष होत होते ह्याची तिला खंत होती. एकदिवस अचानक समजले तो ड्रगच्या विळख्यात सापडलाय. व्यसनाधींन झालाय.काही कळलेच नाही. एका क्षणात सारे संपले. स्पर्धेत तो मागे पडला होता.

फ्रस्टेशन आले होते. पण मार्ग चुकला होता. अरुंधतीने स्वतःला दोषी मानले. आपल्या मुलाला जेव्हा आपली गरज होती तेव्हा आपण त्याच्या सोबत नव्हतो हीच टोचणी तिला लागली होती. परत एकदा ती एकटी पडली. पण किती दिवस. काळ कुणासाठी थांबत नाही. तिच्या मनाने तिला समजावले आणि त्यातूनच 'दिशा' या व्यसनमुक्ती केंद्राचा जन्म झाला. एक रितेश तिने गमावला पण हजारो रितेश तिला या विळख्यातून वाचवायचे होते. तिने स्वतःची जमापुंजी या कामासाठी वाहिली. स्वतः कार्य केले आणि आज तिला त्यासाठीच विशेष सन्मानपत्र मिळणार होते. तिने हार चढवला. क्षणभर मन हेलावले, अनेक प्रश्न मनात आले पण पुढल्याच क्षणी ती कणखरतेने उभी रहिली. तिने फोटोकडे पाहिले. रितेशच्या चेहऱ्यावरील मंद हास्याने तिच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि एका वेगळ्याच ऊर्जेने तिची पावले दाराबाहेर पडली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational