STORYMIRROR

Ratnadeep Sawant

Action Inspirational Thriller

2  

Ratnadeep Sawant

Action Inspirational Thriller

दि रिअल हिरो

दि रिअल हिरो

6 mins
81

     रोजच्या दगडगीतून मला थोडा फ्री टाईम हवा होता. पण बॉस ने दिला नव्हता. उलट जे सहा दिवस होते ते सुद्धा त्याने मला एका कामासाठी जंगलातल्या एका आदिवासी पाड्या मध्ये प्रोजेक्ट कम्प्लिट करायला पाठवलं. 

     माझी सगळी काम आटपून चौथ्या दिवशीच मी निघत होतो. माझ्या तिन्ही बस चुकल्या आणि एक शेवटची बस मला भेटली. ड्रायव्हर ने ती बस पुन्हा एकदा थांबवली आणि एका पेट्रोल पंपावरती बाजूला लावली. तिच्या टायर मध्ये कायतरी प्रॉब्लम आहे. अस एक माणूस म्हणत होता. मी जाग्यावरून उठून आजूबाजूला कोण आहे बघितलं. माझ्या बाजूच्या सीट वरती एक वृद्ध महिला आणि एक दहा बारा वर्षाची मुलगी होती. माझ्या बाजूला एक गर्भवती महिला येऊन बसली. तिचा पाचवा महिना चालू होता. आणि तोहि ती एकट्याने प्रवास करत होती. तीने मला हॅपी जर्नी म्हणत विष केल. रात्री चे एकरा वाजले होते. थोड्या वेळात गाडी जेवणासाठी थांबवली जाणार होती. बस चा वेग ड्रायव्हर ने वाढवला आणि तो तीव्र होता, पण मला का माहित नाही पण वेगळं वाटत होत. माझा सिक्स सेन्स जागा झाला. मनात काय आल व मी बाजूला असणाऱ्या गर्भवती महिलेच्या एक हात पोटावरती आणि एक हात माझ्या डोक्यावरती ठेवला. आणि बस घसरली. तेव्हा बस एका घाटात होती. बस पूर्ण पणे ड्राइव्हर कंट्रोल् करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचा ताबा बस वरून सुटला आणि बस जाऊन दरीत घसरत गेली. दोन मिनिटासाठी मला माझं मरण दिसलं. बस हिकडून तिकडून आदळत गेली. आणि एकदाची आदळली व जोरात आपटली. ती ज्या वेगाने आपटली तेव्हा माझं डोक टक कन् वाजलं माझ्या डोक्याला लागलं होत. रक्ताची धार वाहू लागली. अर्धा तास मी बेशुद्ध पडलो होतो. नंतर सर्व नाती गोती आठवायला लागली. एक मोठा श्वास घेत मी शुद्धीत आलो. सर्व माणस एकमेकांवर पडली होती. माझ्या अंगावरती गर्भवती महिला पडली होती. मला बस मधून बाहेर पडता येत नव्हतं. कारण सर्वच माणस मरण पावली होती. बस आडवी पडली होती. मी कसाबसा स्वतःला सावरलं. गर्भवती महिलेला हळूच बाजूला केल. आणि आपात कालीन खिडकी मधून स्वतःला बाहेर काढलं.मी जसा बाहेर पडलो तसा मागून त्या गर्भवती महिलेचा आवज आला. मला वाचला मी जिवंत आहे. तिला बाहेर काढायला मी पुन्हा आत गेलो. तेव्हा समोर असणारी लहान मुलगी सुद्धा जिवंत होती. तीने माझा शर्ट जोरात धरला आणि सोडलाच नाही. ती मुलगी जोर जोरात रडत होती.कारण तिची आजी तिच्या समोर मरण पावली होती. तिला धीर देत दोघींना बाहेर काढत आम्ही तिघ बाहेर आलो. रात्रीच्या बाराचा सुमार असावा. आम्ही तिघ सुद्धा गंभीर रित्या झखमी होतो. पोटात अन्नाचा एक कण नव्हता. माझा मोबाईल फुटला होता. त्या दोघी घाबरल्या होत्या. परिस्तिथी बिकट होती आणि आम्ही एका खोल दरीत जंगलात अडकलो होतो. वाट शोधण लांब राहील काळोख इतका होता. की समोर काय आहे हे आम्हाला दिसत नव्हतं. माझ्याकडे पर्याय नव्हता. गर्भवती महिलेच नाव निधी आणि लहान मुलीच नाव राई होत. निधी ची हालत खूपच खराब झाली होती. तिच्या पोटा मुळे तिला चालता येत नव्हतं. आणि राई काळोखात घाबरली होती. 

     थोडा फार जंगलाचा अभ्यास माझा झालेला होता. माझी काम बॉस माझा आदिवासी पाड्यांवरती त्या लोकांचा अभ्यास करण्या साठी पाठवत राहायचा. त्यामुळे त्यांच्यात राहून मला अश्या गोष्टी कळून आलेल्या होत्या. समोर नियती ने भलमोठ जाळ टाकलं होत. मला त्या जाळ्या मधून सुटायचं होत. आम्ही रस्ता शोधायला सुरु वात केली. सगळी घसरट आणि उतार भाग होता. निधी ला जरा सुद्धा तो चढाव चढायला जमत नव्हतं. तिला उचलून घेऊन चालण्या व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नव्हता. मी तिला उचलल आणि राई ला वाट मोकळी करायला सांगितलं. जवळ जवळ दोन तास आम्ही वरती चालत गेलो. आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. जंगल काटेरी झुडूप अंगाला लागून कपडे फाटले होते. पायात काटे रुतून पाय रक्ताने ओतांबले होते. भूक लागली होती. ना पायात चपला त्यात आम्हाला तिघांना डोक्याला लागलं होती. आणि त्या जखमे मधून खुप रक्त वाहत होती. दरड खुप मोठी होती. थोड्या वेळाने निधी ने स्वतःला सावरत मला म्हटलं, " तु खुप बलवान आहेस. तुझ्या जिद्दीला मी नमस्कार करते". ऐक ह्या पुढे मी स्वतःहा चालण्याचा प्रयत्न करते. तितक्यात राई बेशुद्ध पडली. एकीने जिद्द धरलीच होती. की दुसरीने सोडून दिली. तिला पावसाच्या पाण्या मुळे फार थंडी वाजत होती. ती थंडी त्या एकरा वर्षाच्या मुलीला सहन झाली नाही. बस मध्ये एकूण पन्नास माणस होती.त्यातून फक्त आम्ही तिघच वाचलो होतो. पुढचा प्रवास करायला माझ्या अंगात जरा सुद्धा ताकद नव्हती पण निधी ची जिद्द पाहून आम्ही चालायला सुरु वात केली. 

     काटेरी झाडांमध्ये जात जात असताना समोर आमच्या एक कोल्हा आला. त्याचे डोळे चकाकत होते. त्याने निधी च्या अंगावर उडी मारली. आणि तिच्या हाताला चावा घेतला. राई ला खाली ठेवत मी त्याच्या अंगावर धावत गेलो. त्याने माझ्यावर उडी मारली. जितकी होती नव्हती तितकी ताकद काढून मी त्याच्या जबड्यात हात घातला व ओढण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याची नख ओरभडायला सुरु वात केली. माझ्या छातीवर त्याने त्याचे पंजे मारून फाडून काढल, त्याचा जबडा आणि दात भयंकर होते. त्याची मान हलवून मला फाडत होता. तितक्यात निधी उठली. तीने एका झाडाची फांदी तोडली मी त्याचा जबडा मोठ्याने ओढला आणि येऊन तीने कोल्ह्याच्या घश्यात ती काठी कोंबली. त्याने पूर्ण जीव काढला. ती काठी इतकी आत गेली की तो श्वासच घेऊ शकला नाही. तो तिथेच मरण पावला. पण माझी हालत पहिल्याहून खराब झाली. छातीवर रक्त डोक्यातून वाहणार रक्त. माझे डोळे बंद पडत होते. निधी ने आपल्या ओढणीने माझ्या अंगाला बांधून घेरलं. रक्त थांबत नव्हतं पण त्या ओढणीच्या घट्ट पिळून आवळल्याने आधार नक्कीच वाटला. 

     थोडा वेळ बसून आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केली. वरती येई पर्यंत आम्हाला सकाळ झाली. पाच वाजल्याच्या सुमारास ती दरड पार करू शकलो. वरती येताच एक झाड दिसलं. त्या झाडाच्या खाली आम्ही बसलो. राई पूर्ण बेशुद्ध नी निधी तिकडेच येऊन पडली. आणि माझे डोळे राई ला खाली ठेवताच मिटले. आम्ही तिघेही तिकडे पडलो. 

     जस जशी सकाळ होत गेली पाऊस थांबला. बातमी पसरली बस पोहचली नाही. बस च लोकेशन ट्रेस केल तर बस एका घाटात अडकलेली दिसली. शोधकाम सुरु झाल. सर्व पॅसेंजर मरण पावले होते. आणि तीन जण बेपत्ता होती. ती तीन जण आम्हीच होतो. एका पर्यटकाला आम्ही दिसलो होतो. त्याने जवळ येऊन आमची मदत केली. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो. निधी च बाळ वाचू शकलं नाही. पण हे समजलं की ती एका मोठ्या PSI officer ची पत्नी आहे. राई सुद्धा शुद्धीवर आली होती. राई एका शिक्षकांची मुलगी होती. तिला लिहायचा खुप छंद होता. एक पंधरा दिवस आम्ही त्या हॉस्पिटल मधून बाहेर आलो. माझे वडील मला घरी घेऊन आले. 

     घरी येताच एक महिन्या नंतर मला भेटायला निधी ची फॅमिली आणि राई व फॅमिली आल्या होत्या. ती सर्व मंडळी मला धन्यवाद बोलायला आली होती. राई ने मला घट्ट मिठी मारली. आणि म्हणाली "I lost my grandmother, but thank you for saving my life." You are the real hero. माझ्या डोळ्या मधून पाणी आल. निधी ने मला एका कार ची चावी दिली. आणि म्हणाली पुढचा प्रवास बस ने नाही ह्या कार ने करायचा. आज पासून हि कार तुमची आणि हे उपकार नाही गिफ्ट म्हणून घ्या. राई ने जाताना मला एक पुस्तक दिल. व म्हणाली मी तुम्हाला मोठ काही नाही देऊ शकत पण हे पुस्तक तुमचं पुढील जीवन बदलायला प्रेरणा देईल मी निघुन गेल्या नंतर उघडून पाहा. चला बाय भेटू लवकरच. अस म्हणत ती ते पुस्तक मला देऊन गेली. त्या पुस्तकाच्या फ्रंट पेज वरती. एक मुलगा एका महिलेला पाठीवरती घेऊन, एका लहान मुलीचा हात पकडून चालताना दिसत होता. त्यांच्या मागे पडलेली बस आणि जंगल होत. त्या पुस्तकाच नाव होत. दि रियल हिरो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action