Ratnadeep Sawant

Others inspirational

3  

Ratnadeep Sawant

Others inspirational

स्वर्गात वसलेला टिकलेश्वर

स्वर्गात वसलेला टिकलेश्वर

5 mins
226


लहानपणापासून प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. मला पण खूप आहेत; पण त्यातला माझा दुसरा आवडता छंद म्हणजे फिरणं, हिंडण इ. तस आज पर्यंत खूप ठिकाण फिरून झाली. पण मला आवडलेला आतापर्यंतचा एक प्रवास म्हणजे टिकलेश्वर मंदिर. खरतर देवस्थान फिरण्यात एका तरुणाला कसली इतकी मजा आली असेल, हा प्रश्न पडण साहजिक आहे. पण खरी मजा तर तिथे गेल्यावर कळते. मुळात मित्रच असे भेटले की ज्यांना तुमच्या सारखेच छंद आहेत. तर त्या मैत्रीला घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि तसच काहीस आमचं होत. "एक दिवस आधी पटकन झालेला प्लॅन उद्या मोडू नये म्हणून रात्रभर न झोपता उद्याचा विचार करायचा". आता हा आमचा फंडा होता. वेळेत निघून सूर्य मावळायच्या आत-मध्ये घरी जायचं हे ठरलेलं असायचं. त्या दिवशी आमचा प्लॅन ठरला आणि आणि दुसऱ्या दिवशी निघालो. 

             देवरुख जवळ संगमेश्वर तालुक्या मध्ये तलवडे या गावाजवळ सुंदर पवित्र स्थान म्हणजे टिकलेश्वर मंदिर आहे . सह्याद्रीच्या रांगांमध्ये टिकलेश्वर मंदिर सर्वात उंच शिखरावर आहे. टिकलेश्वर पर्वताच्या शिखरावर उभे राहून, लांब पसरलेले दाट हिरवेगार जंगल आणि खोल दरया आणि सह्याद्रीच वैभवशाली सौंदर्य पाहायला मिळत. आम्ही रत्नागिरी हुन निघालो त्यामुळे तिकडून 48 km चा प्रवास करावा लागतो. जाताना रस्त्याच्या आजूबाजूला जंगल आणि तुम्ही त्या रस्त्या मध्ये म्हणजे एक प्रकारचं कोकण किती सुंदर आहे. याच हुबेहूब दृश्य पाहायला मिळत. सकाळी नऊ वाजता सुरू केलेला प्रवास आम्ही दहा वाजून तीस मिनिटांनी देवरुख मध्ये पूर्ण केला. व थोडा वेळ थांबून निघालो. देवरूखपासून 4 किलोमीटर अंतरावर टिकलेश्वरच्या पायथ्याशी असलेले तलावडे गाव आहे. पायथ्यापासून टिकलेश्वर डोंगरापर्यंत एक नवीन छोटा मोतीबल रस्ता तयार करण्यात आला आहे. पण शेवटचा क्वार्टर मैलाचा प्रवास पायी चढणे आवश्यक आहे आणि ते एक अतिशय ताठ आणि कठोर म्हणून ओळखले जाते. तलवडे गाव खुप मोठं होत. तिथून प्रत्येक वाटेला चिकटुन सगळ्यांची घर आणि तो रस्ता त्या मंदिराकडे जाणारा. शेती वाडीची काम ह्या पावसाळी दिवसांतून चालू होती. शेतजमीन एक दोन एकर मध्ये वेगवेगळी कुटुंब करताना दिसत होती. एवढ्या क्षेत्रात फक्त भातलागवड, आणि काही जण स्वतः भाजीपाला लावताना दिसले. ते शेत जणू हिरव्या रंगाच पांघरूण अंगावर घेऊन होत. जिथे नजर जाईल तिकडे हिरवं गार, आणि आनंदी होत. मध्येच फोटो काढण्यात आम्ही व्यस्त होतो आणि नेमका रस्ता चुकलो, तिथे असलेल्या स्थायिक माणसांनी हातवारे करून छोटा मोतीबल रस्ता तिकडे जातो तो लवकर पोहचवेल अस सांगितलं. मग आम्ही सुद्धा तोच मार्ग धरला आणि गाडी सुरू केली. 

             थोडा वेळ पाऊस सुद्धा थांबून 'आमचं स्वागत करत होता'. कारण आता आम्ही उंच वसलेल्या मंदिराच्या पायथ्या जवळ पोहचलो होतो. उंच उंच सह्याद्रीच्या रांगा सर्वत्र आणि त्यातल्याच एका रांगेच्या कुशीत आम्ही उभे होतो. आम्ही आमच्या दुचाकी इथेच ठेवल्या आणि पायऱ्यांनी चालायला सुरूवात केली. व्यायामाची सवय रोज असेल तर तुम्ही न दमता अंतर पार करू शकता. पण इथे गोष्ट जरा वेगळी होती.पाऊस पडल्याने रान खुप वाढलं होत. व रान त्या वाटेला मिठी मारत होत; आम्ही त्यांच्या मधूनच चालत जात होतो. जस जस वरती जात होतो. तस तसा गारवा जाणवत होता. अर्धा सफर पूर्ण झाला आणि फक्त थोडाच राहिलेला. व मंदिर अगदी जवळ डोळ्यासमोरून दिसत होतं. अश्या ठिकाणी जाताना तुम्ही खूप तयारीने गेलात तर प्रवासात काहीच अडचण येत नाही. जस की जाण्या आधी त्या ठिकाणा बद्दल पुरे पूर माहिती आणि काय अडचण येऊ शकते. तश्या तयारी ने आम्ही नेहमी जायचो. पाय दुखायला लागल्यावर थोडा वेळ बसलो. ती हवा खुप थंड होती, अतिशय थंड 'समोर सह्याद्री ची रांग थोडी थोडी दिसत होती,' त्यामुळे आता बसून उपयोग नव्हता, 'आम्हाला वरती शेवट करायचाच होता'. मग तिथून जी चालायला परत सुरुवात केली ते मंदिरा पर्यंत. शेवटचा श्वास पूर्ण सोडला आणि मोठा श्वास घेतला, कारण आम्ही मंदिराजवळ पोहचलो होतो. दोन मिनिटं माझं तोंड उघडच राहिलेलं. जस एखादी सुंदर मुलगी स्वतःहून आपल्याला म्हणेल की तू मला आवडतोस ह्या वाक्यानंतर समोरच्या मुलाच जस तोंड उघड राहून आश्चर्य वाटेल, सेम माझी पण तशीच खळबळ ते दृश्य बघून झाली होती. मी फक्त बघतच राहिलेलो. या व्यतिरिक मला अजून काही सुचतच नव्हतं. मी सगळं विसरलेलो' मी कोणासोबत आहे, कोण माझ्याशी बोलतंय सगळंच, 'आयुष्यात पहिल्यांदा अस दृश्य मी पाहिलेलं'. मंदिरात पोहचल्यानंतर सर्वप्रथम सर्वांनी टिकलेश्वर देवाला नमस्कार केला. तिथे पुजारी देवाची पूजा करत होते. आणि ते खूप वृद्ध होते. त्यांनी लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध त्या ठिकाणची अजून मान उंचावत होता. व ते वातावरण निर्माण करत होता. मंदिर अगदी सह्याद्रीच्या एका डोंगरावर वसलं आहे. आजूबाजूला थोडी फिरण्या साठी जागा आहे. पण खूप नाहीय थोडी आहे. सर्वत्र पर्वत आणि त्यात दिसणार धुकं, फक्त दोन रंग खुप जास्त दिसत होते हिरवा आणि निळा आभाळ आणि हिरवी पांघरलेली शाल. थोडक्यात सांगायचं झाल तर 'ढग त्या हिरव्या शालीवर आले होते'. सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी आणि डोळ्यांना प्रभावित करणारे मुख्य घटक ते होते. डोळ्यांच्या कॅमेरामध्ये मी त्याला अस टिपलय की ते कधीच डिलीट होणार नाही. सह्याद्रीची रांग सगळीकडे, ढगांची मैफिल समोर वसलेली, पाऊस समोरून, आणि त्याचे पाणी खाली पडताना थेंबांची तऱ्हे तऱ्हे ने विघटन होऊन जमिनीवर जात होते. पहिल्यांदा मी समोरून ढग बघितले होते. त्यांना मी हात लावताच ते लांब पळत होते आणि माझा हात ओला चिंब होत होता. कारण ते पाण्यांनी भरलेले होते. त्याच ढगांच्या वरून घारी उंच उडत होत्या आणि पक्षी मंदिरा खाली उंचावर उडत होते. एक प्रकारे "जिवंतपणे स्वर्ग पाहिला अस म्हणायला हरकत नाहीय". शिखरावर अगदी खाली प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या मार्गावर स्वच्छ, शुद्ध पाण्यासह काही गुहा आणि दगडी कुंड सापडतात. पूर्वेकडे मैमेटगड आणि डोंगराच्या शिखरावरुन मार्लेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तुम्हाला दिसतो. अर्धा दिवस तिथे गेला पण घरी जायचं मनच करत नव्हतं. कारण त्या जागेने आमच्या मनात तिची भक्कम जागा निर्माण केली होती. 

             ह्या सह्याद्रीच्या रांगा आणि हे ठिकाण म्हटल्यावर इथे पर्यटकांची गर्दी होत होतीच. पण येताना थोडा त्रास सहन करावा लागत होता तो म्हणजे खडबडीत रस्त्यांचा, अस म्हणतात की पर्यटन संदर्भातला विकास करायला घेतला की गावच सौन्दर्य आणि इथे असलेली शांतता निघून जाते. कदाचित म्हणून इथली माणस निसर्गाच्या दृष्टीने विचार करत असावी. पण खरं बघता हा पर्यटन क्षेत्रांपैकी एक भाग आहे. आणि बरेच तरुण या भागाकडे वेढले जातात. पण रास्ता थोडा खराब असल्या मुळे इथे येण्यासाठी बरेच जण टाळतात. एक प्रकारे बघता इथल्या लोकांचे प्रगतीचे मार्ग हे स्थळ होऊ शकत. नैसर्गिक रित्या भरभरून असलेलं हे गाव आणि हे स्थळ, निसर्गाचा एक अभिमानास्पद मान मिळवणारी इथली माणस आणि आपल्याच शहरापासून जवळ असल्यामुळे होणारा आनंद हे शब्दात मंडण्या इतकं सोप्प नव्हतं. 

                                 

              ह्या निसर्गात वसलेला टिकलेश्वर देव मन प्रसन्न करतो. इतका सुंदर गाव आणि त्या गावाजवळ असलेले हे टिकलेश्वर मंदिर आमच्या कायम लक्षात राहील. आपल्या गडबडीच्या जगात आपण आपल्या आजूबाजूला असणारया गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सगळ्यात खरी मैत्री वनस्पती, झाड झुडप यांच्याशी केली तर ते हि खूप भरभरून देतात. कधी एकटेपणा जाणवला तर मनोसोक्त फिरून यायचं. वाईट विचार मनातून निघून, नवीन विचारांचा साठा मनात तयार होतो. मला आवडलेलं हे ठिकाण त्याच्या बद्दल तुम्ही ऐकलत तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच ह्या ठिकाणी जाऊन या, मनातील सगळा दुरावा निघुन जाईल. आणि तुम्हाला न दिसणारा आयुष्याचा मार्ग मोकळा दिसेल.


Rate this content
Log in