Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Swarup Sawant

Inspirational


3.8  

Swarup Sawant

Inspirational


ध्येयाचा ध्यास लागला

ध्येयाचा ध्यास लागला

2 mins 1.5K 2 mins 1.5K

  विराज आणि त्याचे मित्र असेच प्रवासाला निघाले होते. सहल नेपाळ ला गेली होती.त्याच्या मित्रांना ट्रेकिंग ची खूप आवड होती. नेपाळमधील एव्हरेष्ट शिखर त्यावर पादाक्रांत केलेल्या विरांची माहिती वाचता त्यांच्या अंगावर रोमांच उठला. जन्माला आल्यावर आपणही आयुष्यात असे काहितरी भव्यदिव्य करावे असे त्यांना वाटत होते. आपणाला काही हे शिखर चढणे जमणार नाही.त्यासाठी करावी लागणारी अविरत मेहनत तर मुळीच जमणार नाही . असे मनाशी ठरवून ते तिथून निघाले. चार दिवस तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहिली. माहिती मिळवली आणि निघाले.

 पण विराज च्या मनात खूप खळबळ माजली होती. शेर्पा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. आपणही असे काहीतरी भव्यदिव्य करावे असे त्याला वाटत होते. पण त्याचे मन कच खाई. त्याने याविषयी मित्रांमध्ये चर्चा केली पण त्यांनीही त्याला वेडात काढले. कामाचा व्याप किती?कामावरून सुट्टी ,घरातल्या लोकांची परवानगी ,लागणारा पैसा याचा मेळ बसणे कठीणच .काय करायचे असे भव्यदिव्य करून. चार दिवस लोक वाहवा करणार .मग विसरणार पण त्यासाठी एव्हडी मेहनत कशाला?

  विराजला कळत होते पण वळत नव्हते. त्याला शांत झोप लागेना.नेपाळ डोळ्यासमोरुन जात नव्हते.अन्नपाणी गोड लागेना. असेच किती दिवस चालायचे.कशातच मन रमेना. 

   शेवटी त्याने निश्चय केला. की एव्हरेस्ट शिखर सर करणे कठीन .पण आपल्या गावाजवळील अवघड समजला जाणारा किल्ला आपण चढायचाच.  

  मित्रांनी हसण्यावरी नेले. पण त्याचे ध्येय ठाम होते.इतके की आता काहीही होवो गड चढायचाच .त्याप्रमाणे त्याने तयारी सुरु केली . नोकरी तर तो सोडू शकत नव्हता . नाहीतर खाणार काय? पहाटे उठून तो व्यायाम करी. धावणे व इतर आवश्यक व्यायाम करत असे. सुरुवातीला त्याचे अंग खूप दुखून य़ेई . झोप पुर्ण न झाल्याने कामावर झोप येई. नको वाटे . पण त्याचे ध्येय त्याला स्वस्थ बसू देईना.अगदी खूप आजारपण येईल असे वाटत होते. घरातील लोक ,मित्रमंडळी परावृत्त करु लागली. आजारी पडशील म्हणून घरातील ओरडू लागले. रोज अंगावर कुठे ना कुठ खरचटू लागले. जखमा झाल्या. रक्त आले.पण छे!विराज वर कसलाच परिणाम होत नव्हता . आता पण पूर्ण करायचाच. सकाळी उठताना अंग मोडून येई .पण त्याकडे तो दूर्लक्ष करी.नित्यनेम चालू ठेवी.कुणीही कितीही बोलले तरी दुर्लक्ष करी

  अथक परिश्रमानंतर तो दिवस उजाडला. मिडिया ,विक्रम नोंद टीम ,आप्तेष्ट मित्र जमले. कोणाला वाटत होते. हा हसे करणार पण त्याच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून हा बाजी मारणार असे वाटत होते.पण त्याच्या असीम ध्येयाने कधीच बाजी मारली होती.

अंगात कणकण होती. पण तो डगमगला नाही .उंच पर्वत भरभर चढत होता.लागत होते . खरचटत होते. रक्तही आले. ताप वाढल्यासारखा वाटत होता.पण कशाची पर्वा न करता तो पर्वताच्या टोकावर पोहोचला.झेंडा रोवला. स्वप्नपुर्तीच्या आनंदात सर्व दु:ख विसरला।

  सगळ्यांनी त्याला व त्याच्या ध्येयाला सलामी दिली. दुसर्‍या दिवशी सर्व वर्तमानपत्रात झळकला. सरकारकडून भरपूर बक्षिसेही मिळाली.


Rate this content
Log in

More marathi story from Swarup Sawant

Similar marathi story from Inspirational