दहशतवादी
दहशतवादी


लेख...."दहशतवाद्यांचा हल्ला"
आपल्या देशाला वाचविण्याची जवाबदारी घेण्यास प्रत्येक नागरिक पुढे यायला पाहिजे.
किती विषन्न करणारी ही बातमी होती. हा हल्ला झाला तेंव्हा सीमा सुरक्षा दल कुठे होते? गुप्तहेर संघटना आधी काहिच शोध लावत नाहीत काय? प्रत्येक वेळी हे कट्टरवादी सीमा पार करून कसे काय आपल्या देशात घुसतात.घटना झाल्या नंतरच हालचाल सुरू होत असते. याला जवाबदार कोण आहेत? गुप्तहेर संघटना भारत सरकारला थोडी तरी माहिती मिळत नाही काय ? गुप्तहेर संघटना अकार्यक्षम असेल तर त्यांना बरखास्त करायला पाहिजे. नेहमी नेहमी सारख्या हल्ल्यांना सहन करावे लागते आहे . आता अजून किती सहन कराव लागेल .भारत सरकारमध्ये धमक नसेल तर लाचारी पत्करून ती स्विकार करावी. परंतू देशवासियाना या अतोनात दु:खापासून निवृत्त करावे.आपल्या देशाची यंत्रना बाकी देशाच्या यंत्रनेपेक्षा फारच कुचकामी ठरते आहे.याकडे लक्ष देणे आता आवश्यक झालेले आहे.
डोक्यावर हात देवून बसल्याने काय होणार या देशाचे, असेच जर असेल तर आमच्या भारतात सुशिक्षीत बेरोजगार तरून युवकांची कमी नाही.त्यांना या कामावर तैनात केले पाहिजे.
तसेच नकळत २६/११ चा मूंबई हल्ला झाला होता. कोणालाच आधी भनक सुद्धा लागली नाही.त्यांनी
बिनधास्त पणे हल्ला केला.किती विरांना आपला जीव गमवावा लागला होता.शिपाई पोलीस ही मानव असतात. कुणी ही यावे आणि त्यांना तुडवून मारून टाकावे. कधी चिन तर कधी पाकिस्तान तर कधी कुवैत या सारखे छोटेछोटे देश सुद्धा हावी होतांना दिसतात.किती हास्यास्पद गोष्ट आहे ही.आधीही कट्टरपंथिंनी लष्करावर हल्ले केलेले आहेत.
आताच्या या हल्ल्यात देशाचे रक्षक सीमेच्या आत मारून टाकले. अश्या अतिरेकी हल्लाने जवानांच्या मनोबलावर किती वाईट परिणाम होत असतील बिचाऱ्या त्यांच्या आई बाबा, भाऊ बहिन, मुले कुटूंब ही सर्व निरागसांचा काय दोष होता.त्यांना जीवंत असतांनाच मरण यातना भोगव्या लागल्या आहेत.त्यांच्या आप्त परिजनांना तुकड्यात रूपांतर झालेले त्यांचे शरीर पाहून डोळ्यातून किती रक्ताळलेल्या अश्रृंच्या धारा पडल्या असतील. ह्रदय फाटून निर्जीव हाताने तिरंग्यात लपेटलेले जीवाभावाच्या आपल्या प्रिय सपुतास कशी श्रद्धांजली वाहिली असेल. त्यांची हे अतिव दु:ख कश्याने दूर होणार व कोण करणार आहे? पर्वतापेक्षा ही जड हे दु:ख कसे पेलायचे. आता खुप झालय,
आपल्या देशाला वाचविण्याची जवाबदारी घेण्यास प्रत्येक नागरिक पुढे यायला पाहिजे. या देशाला भवितव्य देण्याकरीता आपण शासणावर अवलंबून न राहता काहीतरी करायला पाहिजे. सभ्यतेच्या बुरक्यातून बाहेर निघायला पाहिजे. सतर्क होवून स्वता:ला दक्ष गुप्तहेर बणविला पाहिजे. प्रत्येक हालचालीवर निगा ठेवली पाहिजे.अन्यथा कधी ही दुष्मन घात करू शकतोय.आणि नक्कीच साऱ्या देशाची अधोगती होवू शकते.एक गोष्ट लक्षात असावी, मेणबत्त्या लावून व शांतीवार्ता करून हा दहशत वाद संपणारा नाही.आता पाणी डोक्यावरून वाहते आहे.आरोप प्रत्यारोप करून आपण काय साधणार आहोत.देशातील सर्व लोकांनी आणि नेत्यांनी एकत्र येवून देशहिताचा योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आहे. एकतेने नारा बुलन्द झाला पाहिजे.तेंव्हाच आपण सुखाने राहू शकतो.या अतिरेक्याचे अनेक मोठे हितचिंतक राज्यात उथळ माथ्याने वावरत आहेत.त्यानां कायद्यात अडकवून जेरबन्द केले पाहिजे.जे खतपाणी घालतील त्यांना शासन होईल असा संदेश सर्वदूर गेला पाहिजे.जे शेजारी देश मदत करत आहेत त्यानां तर धड़ा शिकवणे आवश्यक आहेच पण जे आत मधील आपल्या देशातील दहशतवादी आहेत त्यांची नांगी ठेचणे हे काम प्रथम करावे लागेल.नाही तर "घरका भेदी लंका ढाये" ही म्हण खरी होण्याची दाट शक्यता आहे.
देशात भारतीय जनतेने राष्ट्गीत,आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करायला पाहिजे.युद्धाने अनेक समस्या वाढतील. चलन,वलन,मनन विस्कटल्या जाईल मानसिक रित्या आपण सक्षम असायला पाहिजे आहे.सर्व भारतीय जनतेने सहिष्णुता बाळगली पाहिजे. त्यासाठी सहकार्याची भावना ठेवावी लागेल आहे.आपण आपले घर जर व्यवस्थीत ठेवले तर शेजाऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी त्यात तो सफल होणार नाही. शासनाने सुरु ही केलेली दिसते आहे. पण सर्व भारतीय जनतेने त्यासाठी सहकार्य करायला तयार असायला पाहिजे आहे.
आपले सेनादल पूर्ण सक्षम आहे.ती आपल्या देशासाठी प्राण द्यायला ही मागेपुढे बघत नाही. त्यांचे कौतूक जितके केले तितके कमीच आहे.