धनु कोष्ठक - २४
धनु कोष्ठक - २४
लेखक: सिर्गेइ नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास
15.05
जेवण झाल्यावर कपितोनव शो-केसकडे येतो. जॅमचे डबे ठेवलेले आहेत – रास्पबेरी, स्ट्राबेरी, ब्लूबेरीचे. आन्कासाठी घेऊं का – पीटरहून गिफ्ट? आठवला तिचा पुरळ आलेला, ब्लूबेरीचे डाग पडलेला चेहरा, जेव्हां ते तिघं जंगलांत बेरीज़ गोळा करंत होते – तेव्हां नीन्काचा चेहरापण जांभळा झाला होता, आणि संध्याकाळी, जेव्हां ते व्हरांड्यात बसून बाऊलमधून खात होते, तेव्हां नीनाचे ओठ आणखी गडद काळे पडले होते, जसे सुरेख डाकिणीचे असतांत, आणि, आन्काला झोपवल्यानंतरसुद्धां तिने त्यांना धुतलं नव्हतं...पण, कपितोनव स्वतःशीच म्हणतो, हा डबा ब्रीफकेसमधे नाही घुसणार, सध्यां ह्याला ठेवायला कुठे जागापण नाहीये. विकत तर घ्यायचा आहे, पण नंतर.
किनीकिन त्याच्याजवळ येतो:
“तो वाट बघतोय.”
15.07
“आणि तुम्हीं इतके घाबरंत होते. चला.”
हे फार बेफिकिरीने म्हटलं होतं. आपल्या सगळ्या हाव-भावाने किनीकिन कपितोनवला हे समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की ब्रीफकेसेसच्या अदला-बदलीची गरंज त्याच्या तुलनेंत कपितोनवला जास्त आहे, आणि ह्यामुद्द्यावर कपितोनव सहमति दाखवायला तयार आहे – त्याला समजंत नाहीये, की ह्या हेरा-फेरीवाल्या – उठाइगीर जादुगाराला कैबेजच्या कटलेट्समधे काय विशेष आढळलंय.
बर्फाच्या ढिगांपासून स्वतःला वाचवंत ते रस्ता पार करतात, भूतपूर्व दिवाळखोर लोकांची मदत करणा-या सोसाइटीच्या बिल्डिंगमधे जातात. “सी-9”च्या कॉरीडोरमधे येतात.
“नाही, नक्कीच, मला कळतंय,” किनीकिनच्या मागे-मागे चालंत कपितोनव म्हणतो, “मांजरींना खायचे आहेत, तुम्हांला मांजरी आवडतात...पण तुम्हीं ह्या कटलेट्सच्यामागे इतके कां लागले आहांत? कदाचित, तुम्हीं त्यांना काही केलंय? कदाचित, ते विषारी असतील?”
“मला तुमचं बोलणं ऐकूं येत नाहीये,” किनीकिन न वळतां म्हणतो.
“असं? आणि, मी म्हणतोय, की पैसा कमावण्याचे शेकडों जास्त चांगले मार्ग आहेत...तुमच्यासारखी योग्यता असताना...जसं लंचमधे मासे दिले होते...ह्या कटलेट्समधे असं काय विशेष आहे?”
“मला शंका आहे, की तुम्हांला कळणार नाही,” आपला वेग कमी करंत किनीकिन उत्तर देतो, “प्रत्येकाचा आपापला एजेण्डा असतो. माझा – कटलेट्स आहे. आणि मी त्याला एखाद्या फालतू गैरसमजामुळे बदलायचा इच्छुक नाहीये. जास्त गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला नको, बिल्कुल नाही.”
‘खरंच, मला काय फरक पडतोय’ – बेकारच्या उत्सुकतेसाठी स्वतःला दोष देत कपितोनव विचार करतो. आणि खरंच, ह्या गोष्टीने त्याला काय फरक पडतो, की आपल्या कार्यकलापांसाठी किनीकिनला कुठून प्रेरणा मिळते. आणि किनीकिनच्या डोक्यांत एक नवा विचार येतो – अचानक तो थांबतो आणि कपितोनवकडे एकटक बघतो.
“मला असं वाटतं, की तुम्हीं मला कोणी छोटा-मोठा बदमाश, चोरटा समजतां आहांत. तुम्हांला कळतंय कां, की तुम्हीं मला काय म्हणता आहांत? तुम्हांला माहीत आहे का, की ‘बुफे’ आणि ‘ला कार्ते’मधे काय फरक असतो? त्यावेळेस ‘बुफे’ चालला होता. प्रत्येक माणूस, ज्याचे कटलेट्स गायब झाले होते, पुन्हां जाऊन तसंच एक किंवा जास्तसुद्धां, कटलेट्स घेऊं शकंत होता. आश्चर्याची गोष्ट आहे, आणि जर आता तुमच्या प्लेटमधला मासा गायब झाला असता, तर काय – तुम्हीं दुस-यांदा देण्याची मागणी केली असती, हँ? जर मी तसं केलं असतं, जसं तुम्हीं म्हणताय, तर मी तुमचं जेवणंच गायब करून टाकलं असतं. पण, मी चोर नाहीये. तुम्हीं ही गोष्ट समजून घ्या, चांगलं राहील.”
“पण,” पण ह्या ‘पण’च्या नंतर काय म्हणावं, कपितोनवला माहीत नाही.
“माझ्या मागे-मागे या,” किनीकिन म्हणतो.
नेक्रोमैन्सर कॉरीडोरमधे उभा आहे आणि भिंतीवर लावलेले मंगोलियन चित्र बघतोय. त्याचे हात पाठीच्या मागे आहेत, आणि दोन्हीं हातांनी त्याने हैण्डलने ब्रीफकेस पकडली आहे.
“तर,” किनीकिन म्हणतो, “नेक्रोमैन्सर महाशय, कृपाकरून प्रेमाने मेहेरबानी करा.”
“चांगली एक्ज़िबीशन आहे,” नेक्रोमैन्सर कपितोनवला म्हणतो. “गोबीचं वाळवन्ट, स्तेपी, तलाव. म्हणतात की तिथे मेंढ्यांची संख्या तिथल्या निवासांच्या दहापट आहे. तुम्हीं मंगोलियाला गेला आहांत कां?”
कपितोनवने थोडक्यांत उत्तर देण्याचा निश्चय केला.
“नाही.”
“मी पण,” किनीकिनने उत्तर दिलं, तसं त्याला कुणीही विचारलं नव्हतं. “तुम्हीं जेवले नाहीत ना?”
“मी कुणाच्यातरी घरी खाल्लं,” नेक्रोमैन्सर महाशय बेफिकीरपणे म्हणतो.
“चला, तर बदलून घेऊं. तुमच्याकडे कपितोनव महाशयांची ब्रीफकेस आहे, माझ्याकडे – तुमची आणि कपितोनव महाशयाकडे – माझी. प्रत्येकाने खिडकीवर ब्रीफकेस ठेवावी आणि प्रत्येकजण आपापली घेऊन घेईल.”
ठेवल्या – घेऊन घेतल्या.
किनीकिन लगेच आपली ब्रीफकेस घेतो, उघडतो आणि, कटलेट्स बघून निःश्वास सोडतो.
कपितोनव किनीकिनच्या दूर जाण्याची वाट बघतो, आणि मग आपली ब्रीफकेस उघडतो.
“मला हेंच वाटलं होतं!” कपितोनव उद्गारतो. “आणि, माझी नोटबुक कुठे आहे?”
“ती तुमची नोटबुक नाहीये,” नेक्रोमैन्सर महाशय उत्तर देतात. “ती मरीना वालेरेव्ना मूखिनाची प्रॉपर्टी आहे.”
“तुम्हांला कसं माहीत?”
“त्यांत तिचं विज़िटिंग कार्ड पडलं होतं. स्वाभाविकंच आहे, की मी ती नोटबुक तिला परत केली, मरीना वालेरेव्नाला फोन करून, तिच्याशी मीटिंग फिक्स करून. तुम्हांला हे माहीत आहे.”
“तुम्हांला कसं माहीत की मला माहीत आहे?”
“तुम्हांला मरीना वालेरेव्नाचा मैसेज आला होता, तिने तुम्हांला सूचित केलं होतं की नोटबुक तिच्याकडे आहे, आणि हे पण लिहिलं होतं की कुणी तिला दिली होती.”
“इन्नोकेन्ती पित्रोविच.”
“हो, तिच्यासाठी,” नेक्रोमैन्सर म्हणतो, “मी इन्
नोकेन्ती पित्रोविच आहे. मित्रांमधे मला माझ्या विशिष्ठ नावाने बोलावतांत – नेक्रोमैन्सर महाशय. जगासाठी मी – इन्नोकेन्ती पित्रोविच आहे.”तर
सगळं ठीक आहे, तो खरंच सांगतोय : कपितोनव तेव्हांच, लंचच्या आधीच समजून गेला होता, की इन्नोकेन्ती पित्रोविच – हे नेक्रोमैन्सर महाशयंच आहेत.
पण.
“थांबा. तुम्हांला कसं माहीत, की मला मैसेज मिळालाय?”
“मरीना वालेरेव्नाने माझासमोरंच लिहिला होता. आणि, काही प्रमाणांत माझ्याच सल्ल्यावरून.”
“तुम्हीं तिला सल्ला दिला – मला मैसेज पाठवण्याचा?! तुम्हीं – तिला?!”
“तिला तुम्हांला धीर द्यायचा होता. तिला माहीत होतं, की नोटबुकमुळे तुम्हीं घाबरून जाल आणि तुम्हांला कल्पनासुद्धां करता येणार नाही, की नोटबुक परत केलेली आहे. तुम्हांला तर माहीतंच आहे, की नोटबुकसाठी ती कॉन्फ्रेन्समधे येण्याची तयारी करंत होती – तुमच्याकडे, इथे, पण परिस्थिति बदलली. मला कळंत नाहीये की तुम्हीं इतके कां वैतागंत आहांत. सगळं ठीक-ठाक झालंय . आम्हीं काही वेळ बसलो, गोष्टी केल्या. तिचं किचन खूप छान आहे. ती, बाइ द वे, माझ्याबरोबर तुमचं झोपेचं औषध पाठवणार होती, जे तुम्हीं तिच्या घरी विसरले होते. पण मी, सैद्धांतिक रूपाने वालोकोर्दीनच्या विरुद्ध आहे. माफ करा, मी नाही घेतलं.”
“हे सगळं, माहीत नाही कां, माझ्या डोक्यांत उतरंत नाहीये...ऐका. पण ही माझी ब्रीफकेस आहे, नोटबुक माझ्या ब्रीफकेसमधे पडली होती!...हे माझं काम आहे, तुमचं नाही, की त्यांत ठेवलेल्या वस्तूंचं काय करायचं!...नोटबुक मी परंत करायला पाहिजे होती, तुम्हीं नाही.”
“सॉरी, ब्रीफकेसवर हे लिहिलेलं नव्हतं की ती कुणाची आहे. पण विज़िटिंग कार्डने मला अचूक निर्णय घेण्यास मदत केली: मी त्या पत्त्यावर गेलो. मरीना वालेरेव्ना आणि कन्स्तान्तिन अन्द्रेयेविच फार भाग्यवान आहेत, की नोटबुक माझ्या हातांत पडली.”
“कन्स्तान्तिन अन्द्रेयेविच ह्या जगांत नाहीये.”
“मला माहीत आहे.”
“तर मग असं नका म्हणूं की तो भाग्यवान आहे. मी नोटबुकच्या मालकिणीला शब्द दिला होता, की माझ्याशिवाय कुणी दुसरं हे नोट्स बघणार नाही. आणि तुम्हीं, कबूल करताय, की तुम्हीं नोटबुकमधे डोकावले आहांत, हो न?”
“डोकावलो आहे? मी पूर्ण वाचलीपण आहे – अथपासून इतिपर्यंत. लगेच – नोटबुक उघडताक्षणीच. तिनेच मला लगेच हालचाल करायची प्रेरणा दिली.”
“तुम्हीं परवानगीशिवाय दुस-याचे नोट्स वाचलेत.”
“मरीना वालेरेव्नाने न केवळ मला माफ केलं, तर मोठ्या उत्सुकतेने तिच्याबद्दल माझं मतसुद्धां ऐकलं. आधीतर ती सतर्कतेने वागत होती, पण, जेव्हां तिला समजलं, की कोणाशी बोलते आहे, तर तिने ब-याचश्या गोष्टी मला सांगितल्या. तिला बरेचसे प्रश्न विचारायचे होते.”
“असं कसं?... आणि तुम्हीं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत?”
“अनेक प्रश्नांची उत्तर माहीत नसणं तिच्यासाठी जास्त चांगलं आहे. असल्या प्रश्नांची, साहजिक आहे, मी उत्तरं नाही दिली.”
“हो, खरंय...आणखीही...” कपितोनव स्वतःशी पुटपुटतो, हे बघून की नेक्रोमैन्सरला आपली ब्रीफकेस उघडायची काहीच घाई नाहीये.
“आणि मग,” नेक्रोमैन्सर महाशय, तोच इन्नोकेन्ती पित्रोविच आहे, म्हणतात, “चला, प्रामाणिकपणे बोलूं या. “ह्या बाबतीत तुम्हांला मरीना वालेरेव्नाला काहीही सांगायचं नव्हतं. आणि मला बरंच काही सांगायचं होतं.”
“ह्याच्यावर तुमचा विश्वास आहे?”
“पूर्णपणे.”
“आणि नवरा?”
“काय नवरा?” नेक्रोमैन्सरने प्रतिप्रश्न केला.
“तुम्हीं बोलंत असताना तो तिथे होता कां?”
“सुदैवाने, नवरा घरी नव्हता. नाहीतर बोलतांच आलं नसतं. त्यालातर नोटबुकबद्दल काहीच माहीत नाहीये.”
“तुम्हांला हेसुद्धां माहीत आहे...तर, हा ‘डेवेलपर’ कोण आहे?”
“संशोधक,” नेक्रोमैन्सर महाशय चूक दुरुस्त करतो. “तुम्हांला त्याबद्दल विचार करायची काय गरंज आहे? तुम्हीं संख्या ओळखंत राहा. आणि त्या भानगडीपासून तुम्हांला दूर राहायला पाहिजे. मी स्वतःचं सोडवीन. तुम्हीं झोपायचा प्रयत्न करा, तुम्हांला झोपलं पाहिजे. टैब्लेट्स आणि वालोकार्दिन न घेतां.”
“माहीत आहे, मला वाटतं की तुम्हीं स्वतःवर फार मोठी जवाबदारी घेत आहांत!”
“ओह, हो,” नेक्रोमैन्सर महाशय सहमति दर्शवतो. “मी खरंच स्वतःवर फार मोठी जवाबदारी घेतो आहे.”
कपितोनव ब्रीफकेस बंद करणारंच होता, की तेवढ्यांत त्याला वाटलं की कोणचीतरी वस्तू कमी आहे. डेलिगेट्सच्या नावांच ब्रोश्यूर, नोटपैड, पेन्स, पीटरबुर्गच्या रहस्यमय स्मारकांबद्दल पुस्तक-सुवेनीर – हे सगळंतर आहे, पण ‘जादूची छडी’ नव्हती. ह्या ‘जादूच्या छडी’ची खरं म्हणजे त्याला बिल्कुल गरज नव्हती, पण नेक्रोमैन्सर इन्नोकेन्ती पित्रोविचबद्दल त्याच्या मनांत इतकी घृणा भरून गेली आहे, की जर मौका मिळालाय तर तिला प्रकट न करणं पाप ठरलं असतं.
“माझ्यामते ह्यांत आणखी एक वस्तू होती,” खुनशीपणाने स्मित करंत कपितोनव म्हणतो.
“आह, हो,” थोडा वेळ विचार केल्यावर नेक्रोमैन्सरला आठवण येते. “ती मी ठेवून घेतलीये. माफी मागतो.”
तो कोटाच्या आतल्या खिशांतून एक चामड्याची ‘केस’ काढतो, अशी जशी किल्ल्यांसाठी असते, पण त्यांत ना तर किल्ल्या होत्या, ना कैची, जर, उदाहरणार्थ ती चाकूची ‘केस’ असती, उलट तिच्यातून दोन छड्या बाहेर डोकावंत होत्या. कपितोनवच्या पुढे करतो, आणि जेव्हां कपितोनव पहिल्या छडीकडे हात करतो, तेव्हां त्याला दुरुस्त करतो:
“ही माझी आहे. तुमची दुसरी आहे.”
कपितोनव जी स्वतःची नाहीये, ती छडी परंत करतो आणि आपली, दुसरीवाली, अगदी तश्शीच छडी घेतो. छड्यांमधे जराही फरक नाहीये. त्याला वाईट वाटलं, की त्याने कां हा खेळ सुरू केला – स्वतःला मूर्ख समजण्यांत आनंद नाही वाटंत.