Sanjana Kamat

Classics

2  

Sanjana Kamat

Classics

धार्मिक स्थळांमध्ये मनाचीशांती

धार्मिक स्थळांमध्ये मनाचीशांती

1 min
152


    आपल्या देशाची भूमी इतकी पवित्र आहे की आपले देव ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मानवी जीवन सार्थकी जगण्यास मार्गदर्शन करताना दिसतात. गुप्त काळापासून हिंदू धर्मिय देवालयांच्या रचनेस प्रारंभ झाला. १०-११व्या शतकात मंदिरांचे तीन प्रमुख प्रकार नागर, द्राविड, आणि वासर शैलीत होते.

उत्तर भारत (हिमालय) पासून ते विध्यपर्वता पर्यंत नागर शैलीत मंदिर आढळतात. कृष्णा नदीपासून कन्याकुमारी पर्यंत दक्षिण प्रदेशात द्राविड शैलीत व विध्यपर्वत ते दक्षिण पश्चिमेकडे वासर शैलीत मंदिरे आढळतात. तसेच ओरिसा व खजुराहो शैलीतील वास्तुविशारदांची शिल्पकलेतील अवर्णनीय कलाकृती पाहून डोळ्याचे पारणे तर फिटते त्याच बरोबर सुख,शांती, समाधानाच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा आनंद दिर्घकाळ टिकून राहतो.

      आपली धार्मिक स्थळांचे महत्व ग्रंथ, पुराणात ही सांगितले आहे. निसर्ग सौंदर्याचा व देवी शक्तीचा पुरेपूर आस्वाद देणारे सौंदर्य पूर्णपर्ण खजिना रुपी वारसा मिळालेला आहे तो संभाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.त्यातील सुंदर नक्षीकाम, कोरलेल्या मूर्ती त्यात प्रगत प्राचीन वास्तूकला पाहून आत्मा शांती बरोबर अलौकिक नवचैतन्य व उत्साहाने मन भारावून जाते.

   प्रत्येक धार्मिक मंदिरात काहीना काही देवतांचे रहस्य व दिव्य शक्तीची अनुभूतीची गाथा अतुल्यनीय आहे.ज्याच्या त्याच्या श्रध्देप्रमाणे भगवंताची लीला दिसून येते.मला धार्मिक तीर्थक्षेत्र पाहण्याची हौस आहे.आता पर्यंत तुळजापूर, गगनबावडा, शिर्डी, अक्लकोट,गाणगापूर, नरसोबाचीवाडी, पंढरपूर, रामेश्वर,तिरुपती,जगन्नाथपूरी, वैष्णवीदेवी,कलकत्ताची कालीका माता, अमरनाथ,कोणार्कचे सूर्य मंदिरे मी परमेश्वरी आशिर्वादामुळेच पाहू शकले.आता हाता पायात ताकद आहे तोपर्यंत मला केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री,गिरनार,नर्मदा परिक्रमा, कैलास आणि मानसरोवर इ.वैकुंठ डोळे भरून पाहण्याची इच्छा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics