विषय- कुटुंबातील मृत्यु झालेतर
विषय- कुटुंबातील मृत्यु झालेतर
अंध,मुक,बहिऱ्याची शाळा सोडल्यावर आठ वर्षाने बहिणीच्या ओळखीने टाटा मध्ये समुपदेशक म्हणून दिड वर्ष काम केले.दहा वर्ष लढत तिच्या आजार चौथ्या टप्प्यात आहे हे घरात तिने सांगितले नव्हते. डॉक्टर ही तिच्या सहनशीलतेचे गुणगान गात. शेवटचे दोन वर्षच मी तिची काळजी घेऊ शकले.
बांद्रा बोरजेसला वारी असायची,स्वतः आपली सर्व काम करत होती. अखेर तो दिवस आला, तिने . डॉक्टराना विचारले मी चांगली का होत नाही? तेव्हा ते म्हणाले तुझे शरीर साथ देत नाही. ते शब्द ऐकून अधिकच खचली. घरातील सर्वांना भेटी साठी तिने श्वास रोखून ठेवलाय,सर्वांना बोलवण्यास सांगितले.तिने सर्वांना उत्साहाने पाहिले, त्या मुळे मलाही तीची जगण्याची आशा वाटली. ती रात्र घरी गेले. सकाळी मला फोन आला तीचा मृत्युदेह टाटात नेला आहे तू ये. तिने तिचा अंतिम संस्कार, शव वाहक यान नंबर तसेच दहावे बारावे करू नये. तेच रुपये दरवर्षी अनाथालयास दान करणे असे लिहून ठेवले.
दुसऱ्याला उपदेश देणे व स्वतः अनुभवने ह्यातला फरक मला समजला जेव्हा माझे पती कोरोनामुळे सोडून गेले. आठवणीने बेचैन होणे, कशात लक्ष न लागणे,रडू न आवरणे, सर्व संपले वाटणे,ती घटना झाली असे मन मानत नव्हते,ते येतील असे वाटत होते.
समूपदेशच्या त्या कोर्स मुळे अशा वेळी मला कसे सामोरे जावे ते समजले. आपल्या पेशींवर ताण,तणाव इ. चा होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी,स्वतःची काळजी व आहाराकडे विशेष लक्ष देण गरजेचे असतेे,आपल्या आवडत्या कला,छंदात मन रमवणे,जवळच्या मैत्रिणी व नातेवाईकांनशी फोन वर बोलणे, लिहणे व वाचणे, आवडती गाणे ऐकणे व गाणे,लहान मुलांमध्ये वेळ काढणे, बागेत फिरणे,योगा व ध्यानात इ.दैनंदिन कार्या बरोबर संसाराच्या व समाजिक कार्यात आपले कर्म करत राहणे हाच खरा मानव धर्म आहे.
स्टोरी मिररचे मी मनस्वी धन्यवाद मानते मी कविताच्या पुढील कथा लेख टाईम करू शकत नाही अशी जी भिती मनात होती ती घालवल्याबाबत पुन्हा मनस्वी धन्यवाद.
