भावंडासोबतचा सहलीचा प्रवास
भावंडासोबतचा सहलीचा प्रवास
आई-बाबा हे खरे प्रेमळ ऋणानुबंधाचे निःस्वार्थपणे झरणारे अमृत झरे.त्यांच्या मुळेच आम्हाला मिळाले शिक्षण, सुसंस्काराचे माणूसकीची धडे .स्वतःच्या पोटाला चिमटा मारून,चंदन होऊन दरवळले. बालपणीच धरली बाबाने भावंडासाठी मुंबईची वाट. साऱ्यांच्या छप्परा उभा होऊन संयमाचा घाट,दाखवत होते सर्वांना ज्ञानदायी शिक्षणाची पहाट.
सगेसोयरे तेव्हा फिरवत होते पाट. खाणावळ ताईने झोपण्यास दिली गॅलरीत खाट,दैव योगाने मिळाला कुर्ला प्रिमियर(गाडी) कारखान्यात नोकरीचा थाट.आपण जे भोग भोगले ते दुसऱ्यांच्या वाट्याला नको म्हणून गणगोतांस नोकरी लावणे, जेवण,राहण्याची फुकट सेवाही होती तेव्हा मोठ्या जोमात.आईनेही अन्नपूर्णा होऊन साऱ्यांना वाढले प्रेमात.वहिनीच्या बांगड्या चित्रपट टिव्हीवर सांगत होता पुढील भविष्याची वाटचाल. एकत्र कुटुंब संस्कृतीचा वारसा जपण्याचा होता तिचा ध्यास.
बाबांना ऐतिहासिक चित्रपट पाहणे व तिर्थक्षेत्री एकत्र कुटुंब सहपरिवार व भावाचे कुटुंबांसोबत सहल प्रवास करणे आवडतहोते.शिर्डी, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, वणी, शनिशिंगणापूर, हजीमलंग इ. भावंडासोबत सहलीचा प्रवास मोठ्या आनंदाने करत होतो थाटात.लहानपणी माझा छोटा भाऊ सहलीसाठी व दानधर्मासाठी बचत पेटीत पैसै साठवत असे.चढन चढताना आम्हा भावंडा स्पर्धा लागायची.कशी तेव्हा ताकद अंगात याची कोण जाणे. बालपणीचा तो काळ जणू कस्तुरी गंध पसरवत होता.मन मोकळेपणे हसणे,खेळणे व सामंजस्याने स्नेहवेल बहरताना अनुभवताना मोठा अभिमान वाटत होता. त्या निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंदी मोहरण्याचा क्षणच अलौकिक होता. येताना मोठ्या भावाच्या हट्टासाठी पोपट पिंजऱ्यासह घेतला, मुंबईच्या घरी आल्यावर बघण्यासाठी त्यावरचे कापड काढले तसा तो उडून गेला.
हळूहळू घराची एकत्र कुटुंब संस्कृती शेवटी विलयाला गेली, ऋणानुबंध दाखवायचा तेव्हाच मान वर करून पाहतो. बाबांच्या म्हणण्यानुसार गावचा गणपती गावीच पुजतो, त्यामुळे कुठेतरी त्या नात्यात प्राण आहे असे वाटते.माहेरी आईला भेटायला जाते तर बहिण समानहक्कासाठी येते असे वाटते.जुने ते सोने असणारी माणस होती म्हणून घराला घरपण होते.बाबांच्या व बहिणीच्या जाण्याने आईच्या जीवाची होणारी तळमळ जेवढी एक मुलगी समजते तेवढी सून समजून घेत का? नाही.खालेल्या मिठाला जागणारे तिच्या नशिबी कुणीही नाही भेटावे.
परदेशात हिंदु संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतोय. घराघरात आता इंग्रजी संस्कृतीचा पेहराव व राहणीमान वाढताना दिसतोय.भावाला भाव म्हणायला लाजतोय. आधुनिक तंत्रज्ञानाने कुठित मन हे ईषा, जळमट, सुखलोलुपणामुळे प्रेम,जिव्हाळा, आपुलकीचा ऱ्हास होताना दिसतोय. आपल्यातील नाती टिकवण्यासाठी आपल्या रूढी,परंपरा, संस्कार, ऐतिहासिक, आधात्मिक जाण पुढील पिढी पर्यंत पोहचवणे आपले सर्वांचे मोठे कर्तव्य आहे.मराठी शाळे प्रमाणे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास न होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
