क्रांतीज्योत सावित्रीबाईस पत्र
क्रांतीज्योत सावित्रीबाईस पत्र
माननीय क्रांतीज्योत सावित्रीबाईस,
स.न.वि.विशेष.. तुमची ओळख पुस्तकामुळे झाली. स्त्री शिक्षणाची जन्मदात्री माय तुमची क्षणाक्षणाला आठवण येते.रूढी व दुष्ट समाजाच्या परिवर्तननासाठी केलेला संघर्ष अतुलनीय आहे. विधवा,पुनर्विवाह, सती प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, व दलितांचे अन्याय इ.समस्येना अष्टपैलू देत देश कोहिनूर होत चमकवला.
ह्या कलयुगात स्त्री ही गगनभेदी झेप घेत आहे. कल्पना,इंदिरा अशा अनेक स्त्रियांचे कर्तृत्व चमकताने दिसते. तुम्हच्यामुळेच मी काव्यरत्न पुरस्कार घेऊ शकले. एकविसाव्या शतकात ही अजून स्त्री भ्रूणहत्या होताना दिसते.भ्रष्टाचार, बलात्कार कोवळ्या मुलीस ही सोडत नाही.
तुम्ही दिलेला स्त्री शिक्षणाचा अमृतुल्य ठेवा. शतकानोशतके अखंड झरस्त्रोत, दैदिप्यमान होऊन झरताना पाहून तुमचा आनंद गगनाला भिडेल. देशहितासाठी तुम्हा उभयतांची कर्तृत्वाची ज्योत विश्वागंणी दरवळतेय. कलियुगात समाजाची रसातळाला जाणारी दैना पाहून, ती चिकाटी, सहनशीलता, धैर्य व व सत्याची कास धरून सामर्थ्याने जगण्याचे बळ कमी होत चालले आहे.वाढणारे गुन्हे, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचाराची वाढणारी किड थांबवण्यास, त्या सळसळत्या रक्ताची ह्या कलयुगात खरच काळाची गरज आहे तेव्हा पुन्हा जन्म घेऊन यावे असे सारखे वाटते.अश्या पुण्यवान व्यक्तीमत्व असल्याचे मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
आपली आज्ञाधारक
