STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

2  

Sanjana Kamat

Inspirational

मोकळ्या वेळेचा उपयोग

मोकळ्या वेळेचा उपयोग

1 min
86

      खरच ईश्वराने आपल्याला मानव बनवून,कलात्मक दृष्टीचेे वरदान देऊन जन्म धन्य केला आहे. मोकळा वेळे काढणे हे एका स्त्रीला अवघड होते. घरातील प्रत्येकांची मने राखत, तारेवरची कसरतच असते आणि हौस ही स्वतःसाठी कमी पण ती प्रपंचासाठी अग्नीकुंडातून ही आनंदाने जाते. बाबाच्या कामावर हरताळ झाला,तेव्हा आईने फावल्या वेळात भरतकाम करून मिळालेल्या पैसा उपयोगात आला होता.

     आपल्यातील कलागुणांकडे दुर्लक्ष करतो. कारण काटकसर करण्याचा छंद असतो. तसेच माझ्या काकीने फोन वर विडिओ पाहून बॅग व मास्क बनवून विकली एक हौस म्हणून.

     मी माझ्यातील प्रत्येक कलेला न्याय देण्याचा प्रयत्न करते. मला चित्रकला,(फेब्रीक पेंटिंग,वाळू पेंटिंग,इ.) विणकाम, भरतकाम शिवणकाम,माळा बनवणे,मेणबत्ती बनवणे, टाकाऊतून टिकावू ,रांगोळी जी नंतर भिंती वर टांगता येईल अशा वस्तू बनवून रूकवात म्हणून किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ मिळतो त्या वेळेचा उपयोग करते. तसेच गणपतीसाठी मागिल पडदा व इ.सजावटीसाठी ही उपयोगी येतात. त्याच प्रमाणे मी ३०० कविता व २००० चारोळ्या लिहून कावरत्न पुरस्कार व १५० प्रमाणपत्र ही घेतली आहेत.त्याच बरोबर नेहमी योगा व पारायण करण्याचे कधी विसरत नाही.तसेच माझ्यातील सुगरणीचा चविष्ट शोध घेते.

       नव नविन शिकत राहावे व आपल्या जन्माचे सार्थकी लागण्याचे समाधान मिळवावे. थेंबे थेंबे तळे साठी व आनंदी व तंदरूस्त राहण्याचा सोपा मार्ग आहे. माझ्या कलेचा सद्उपयोग समाज कल्याणासाठी ही करण्याचा मानस आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational