Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Ravindra Gaikwad

Inspirational Others

4.1  

Ravindra Gaikwad

Inspirational Others

देव भेटायला आला..

देव भेटायला आला..

3 mins
59


एकदा देवाने विचार केला.. लोक आपली खूपच आराधना करतात. आपल्याला प्राप्त करण्यासाठी तपश्र्चर्या करतात.. कितीतरी जप, तप, नवस करतात, यात्रा, उरुस भरवतात.. नको नको ते करतात.... मी या माणसाला भेटलो तर...!

 

खरंच मी जर माणसाला भेटलो तर माणूस काय करील..? देवाच्या मनात कितीतरी विचार येऊ लागले.. मी जर माणसाला भेटलो.. तर माणसं मरुन जातील.. कारण मी एक आणि लोकं अनंत, अगणित, प्रत्येकाला वाटेल देव मला भेटला पाहिजे.. मला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण तुटून पडेल आणि माणसं एकमेकांचे जीव घेतील.. प्रत्येकाला वाटेल देव मला भेटला पाहिजे.. मला भेटला पाहिजे.. मला नाही तर कुणालाच नाही.. आणि यातून नको ते घडेल.. आकांत माजेल आणि लोकांचा देवावरचा विश्र्वासच उडून जाईल.. एकदा का विश्वास उडाला की संपलं...


देव विचारात पडला.. माणसाला तर भेटायचं पण ते कसं? ते कसं शक्य आहे? त्यासाठी काय करावं? शेवटी देवाला युक्ती सुचली आणि आकाशवाणी झाली... देवाने संपूर्ण माणूस जातीला सांगून टाकले की धरतीवर अवतरणार.. मी तुम्हाला भेटणार.. जरुर भेटणार.. पण... पण... मी त्यालाच भेटणार ज्यानं आपल्या पूर्ण आयुष्यात एकही पाप केले नाही.. ज्यानं कोणतंच पाप केले नाही त्यालाच देव भेटणार.. आणि तुमचं पाप-पुण्य तुम्हाला माहिती आहेच... सकाळी सुर्योदयाच्या वेळी देव बरोबर अवतरणार ज्याला भेटायचे त्याची वाट पाहणार. सुर्यास्तापर्यंत वाट पाहणार... ज्याला कुणाला विश्वास आहे आपण कोणतंच पाप केले नाही त्यानी सुर्योदयाच्या वेळी नदीकाठी येऊन सुर्याकडे तोंड करून डोळे मिटून उभे राहावे. त्याला देव भेटेल, पावन होईल आणि अखील मानवजातीच्या कल्याणाचे वरदान त्याला मिळेल. पण पापी माणसाचं तोंडही पाहणार नाही... चुकूनही एखाद्या पापीने समोर येण्याचा प्रयत्न केला तर सारा हाहाकार होऊन जाईल.. तो भस्म होऊन जाईल...

 

आकाशवाणी झाली आणि पृथ्वीवर सारा गोंधळ उडाला देव भेटणार.. देव भेटणार.. पण कुणाला? ज्यानं चुकूनही कोणतं पाप केले नाही त्याला आणि पापी तो भस्म होऊन जाईल... जो तो विचारात पडला.. देव कोणाला भेटणार? कोणाला भेटणार? कोण आहे ज्यानं जीवनात पापच केले नाही.. आणि प्रत्येक जण आपापल्या पाप-पुण्याच्या हिशोबात गुंतून पडला. आपल्या पापाचे पाढे वाचता वाचता प्रत्येक जण स्वतःला अपात्र, नालायक घोषीत करू लागला.. प्रत्येकाला कळून चुकले देव काही आपणास भेटणार नाही.. कारण आपण जेवढे पाप केले तेवढं पाप दुसऱ्यानं कोणी केलं नसावे.. स्वतःला लायक समजून भस्म होण्याचं साहस कोण करणार..?

 

झाले सकाळ झाली... सुर्योदय झाला पण सगळे बंद घरात.. नदीच्या काठी काय घराच्या बाहेर कोणी यायला तयार नाही... चुकूनही कोणी घराबाहेर निघालं नाही... निघणार तरी कसं? कशाला कोण भस्म होणार? तेव्हापासून देव शोधात आहे त्याच्या ज्यानं आयुष्यात पापच केले नाही... पण माणूस, माणूस खूप खूपच पापी स्वार्थी ..या स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत. ज्याला देव पावन होईल, देव भेटेल आणि विश्र्वाच्या कल्याणाचे वरदान देईल असा पुण्यवान, भाग्यवान, नशीबवान देव शोधत फिरतोय.. पण असा माणूसच या धर्तीवर झाला नाही... प्रत्येकजण पुण्य करण्याचं नाटकच करतोय.. नुसतं नाटक.. आणि शेवटी नरकात जातोय.. किती किती पाप.. माणसानं या धरतीवर सारं सारं पापच करून ठेवलंय.. पण लक्षात ठेवा.. देव पाहतोय.. सारं पाहतोय.. शेवटी सारे जाणार.. नरकात.. तुमच्या पापांची सजा तुम्हाला जरूर, जरुर मिळणार.. देव तुम्हाला नरकात.. नरकातच पाठवणार.. तुमचा हिशोब चुकता होणार.. पुण्याचं नाटक नाही पुण्य करा.. देव अजूनही त्या पुण्यवंताच्या शोधात आहे.. जो विश्र्वाचे कल्याण करेल.. तुम्ही पुण्य करा.. देव तुम्हाला नक्की पावन होईल.. हे मी नाही.. देव, देव सांगतोय.. ही आकाशवाणी आहे.. त्या ईश्वराची..! विधात्याची..! अनादी अनंत परमेश्वराची... तो पाहतोय, सारं पाहतोय.. देव आहे... आपल्यात आहे.. तो पाप्याला कधीच सोडणार नाही. पापाला क्षमा नाही...


दुनिया बुडून जाईल ही आकाशवाणी होईल याची वाट पाहू नका... माणुसकी जपा, माणसात या..तो सारं पहातोय..तो देव आहे..!! तो देव आहे...!!!


Rate this content
Log in