STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Romance Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Romance Inspirational

परी ग परी..

परी ग परी..

3 mins
212

अगदी लहानपणी म्हणजे मी शिकायला असताना परी कथा,पऱ्यांच्या कविता मला खूपच आवडायच्या.मी पुस्तकातील परी कथा,परी कविता खूपच आवडीने वाचत होतो.मी परी कथा, कविता वाचली, पुस्तकातील परीचं चित्र पाहिलं.केवढी सुंदर असते परी ! मी पण ते सुंदर परीच चित्र पाहून तसेच सुंदर चित्र काढण्याचा प्रयत्न केला.. ते सुंदर परीच चित्र काढून मी गुरुजींना, मुलांना, मित्रांना, आईला ही दाखवलं आणि आईला विचारलं," आई खरंच परी असते का ? असते तर ती कुठे असते ?" आई म्हणाली," स्वर्गात,परी स्वर्गात असते." आणि तेव्हापासून परीला पाहिले पाहिजे,कधी नी कुठे भेटेल? कसं भेटावे ? असे कितीतरी विचार माझ्या डोक्यात येऊ लागले.परीला पाहण्याची इच्छा होऊ लागली.

   एके दिवशी जेवण करून रात्रीच्या वेळी अभ्यास करत असताना पुस्तक डोळ्यासमोर धरुन तसाच झोपी गेलो.....नी एक सुंदर परी येऊन मला पंखावर घेऊन आकाशात उडत उडत मला स्वर्गात घेऊन गेली..परी संगे आकाशात उडताना स्वर्गासारखंच वाटू लागलं पण प्रत्यक्षात स्वर्गात पोहचलो नी आनंदाने मी नाचू लागलो. स्वर्ग तो स्वर्गच... एकापेक्षा एक कितीतरी सुंदर पऱ्या...पऱ्या च पऱ्या...पऱ्यांना पाहून मला कितीतरी आनंद झाला...पण मला पाहून त्यांना ही आनंद झाला होता... मला पाहून सर्व पऱ्या माझ्या भोवती गोळा झाल्या... जेवढा आनंद मला झाला होता त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाल्याचं दिसून आले... मला काय हवं ते विचारायच्या नी जे मागेल ते मला देत होत्या...नवे कपडे,बॅट ,बॉल, पतंग, विमान, गाडी, हवी ती खेळणी रेल्वे,जहाज,कार,ट्रक...जे हवे ते... खायला चॉकलेट, बिस्कीट, आईस्क्रीम, दूध... सर्व काही.. हवं ते..काय मजा च मज्जा... कपडे,खेळणी,खाऊ... पहायला.खेळायला, खायला, प्यायला,लेवायला, नेसायला सर्व काही हवं ते...जे हवे ते मिळाले... सुंदर सुंदर तारे, चांदण्या, रंगीबेरंगी आकाश,झाडे, डोंगर,झरे, नद्या,तलाव, कारंजे,.. सुंदर सुंदर रंगीबेरंगी झाडे, फुले, फुलपाखरे,फळे, पक्षी,मोर , मोरांचा नाच,पोपट..

पक्ष्यांची गाणी नाच कितीतरी मज्जा,गोड मिठाई नी खायला गोड गोड फळे.... पऱ्या सोबत खेळ, गाणी,नाच नी त्यांच्याबरोबर आकाशात, तळ्यात, बागेत,नदीत, खेळायला, फिरायला कितीतरी मज्जा यायची.त्यांच्या पंखावर बसून फिरायला, उडायला आनंदी आनंद वाटायचा... कितीतरी आनंद... मज्जाच मज्जा..

      अंधार पडू लागला, रात्रीचीवेळ झाली नी झोपीची आठवण झाली नी मला काळजी वाटू लागली...रात्री मी रोज अभ्यास करत.. जेवण करून आईच्या कुशीत झोपत... मला आईची,घराची भावाची, बहिणीची नी वडील,आजी सर्वांचीच आठवण येवू लागली...वाटू लागलं.इथं आपलं कोणी नाही... गाव नाही...घर नाही... सर्व काही असून आईवडील नाहीत आता अंधार पडल्यावर कुठे नी कसे झोपायचे ? फार मोठा प्रश्न पडला... दुःख दाटून आले.. सर्व पऱ्या जवळ आल्या विणवू लागल्या, विचारपूस करु लागल्या हसू,खेळू, नाचू,गाऊ लागल्या सर्व काही द्यायला लागल्या पण मला माझी आई हवी होती... मी आईला सोडून कधीच झोपलो नव्हतो..आई शिवाय झोप येत नव्हती नी मी कुठे आहे? आई कुठे आहे? मला कितीतरी प्रश्न पडले . घराच्या नी आईच्या आठवणीने मला रडू यायला लागले.मी मोठ्या मोठ्याने ओरडलो आई....आई... आणि ओरडून रडू लागलो... सर्व पऱ्यांना सांगितले मला माझी आई हवी...माझी आई कुठे आहे ? मी कुठे आहे ? मला आई हवी.. सर्व पऱ्या मला समजावू लागल्या..पण इलाज चालेना...माझे रडणे थांबेना... शेवटी मी सांगीतलं मला माझ्या घरी जायचं आहे... मला माझी आई हवी आणि मला आईच्या कुशीत झोपायचे आहे... नाईलाज झाला...पऱ्यांनी मला माझ्या घरी, माझ्या आईकडे नेऊन सोडायचं ठरवलं तेव्हा जो आनंद झाला तो आनंदच होता...

     आईने पोळ्या केल्या होत्या.. अंधार पडू लागला होता...लेकरु कुठे गेलं म्हणून मला सारे शोधत होते... आणि मी... परीच्या पंखावर बसून घराकडे निघालो होतो... सुंदर सुंदर रंगीबेरंगी झाडे,पक्षी, फुले,फळे,तळे, नद्या, कारंजे, फुलपाखरे सारं सारं पहात दूर दूर वरुन येत होतो.घर आणि आई कधी दिसेल असं वाटू लागलं नी खाली वाकून पाहिलं माझं घर दिसलं...आई दिसली.... मी जोराने ओरडलो...आई...आई.... झोपेतच...

    माझी आई घाबरून गेली..आईचा हात माझ्या कपाळावर नी पोटावर होता...आई पहात होती.. मला ताप आला होता.. मला आई म्हणाली," काय झाल ? काय झालं ? मी तुझ्या जवळच आहे" मी आईला सांगितलं मी परी पाहिली...

आई म्हणाली," ते काही नसतं, ते स्वप्न होतं.परी बिरी काही नाही..मी तुझ्या जवळच आहे.घाबरु नकोस.."

   खरंच तेंव्हा पासून परी, परी करतोय, अजूनही ती परी मला भेटली नाही... माझ्या स्वप्नातील परी मला कधी भेटेल का...


Rate this content
Log in