STORYMIRROR

Ajay Nannar

Horror Thriller

3  

Ajay Nannar

Horror Thriller

द लास्ट शिफ्ट

द लास्ट शिफ्ट

8 mins
397

- द लास्ट शिफ्ट 


संध्याकाळच्या चहाचा कप संपवताच बॉसचे निमंत्रण आले, आणि लागलीच कप

टेबलावर ठेवून त्यांच्या केबिन मध्ये गेलो,

बॉसने अजून काम वाढवून दिलेलं..

Office चा आज पहिलाच दिवस आणि पहील्याच दिवशी ज्यादाचे काम.

आधी वाटलं माझ्यासोबत अजून काहीजण असतील,

पण जसंतसं समजलंकी आज तरी मी एकटाच जास्त वेळ थांबणार.

नवीनच Office मध्येजॉईन झालेलो.

Office पहिलेया आधी कधी बघितलं किंवा ऐकलं नव्हतं, पण पेपर मध्ये

जाहिरात बघून इकडे येण्याचा अचानक विचार आला.

इंटरव्ह्यूलाही काही त्रास झाला नाही.

Office दुमजली होते, माझं बसण्याचं ठिकाण सुद्धा एकदम वरतीच.


खूप आड मार्गावर हे Office असल्या कारणाने इकडून रात्री -अपरात्री कोणती

Auto किंवा Bus मिळेल याची अपेक्षा खूप कमी असं म्हणण्यापेक्षा नाहीच म्हणा.

पण कधी जास्त उशीर झालाच, तर रेस्टरूम Office मधेच उपलब्ध होती,

तसंकाम एकदम फारसं नव्हतं, पण Office मध्येनवीन जॉईन झाल्या कारणाने

थोडा अवधी तरी लागणारच होता..

घडाळ्यात ९ वाजले,

Office सुटायची वेळ झाली, एक एक करून सगळे स्टाफ मला निरोप देऊन

आपापल्या घरी जायला निघाले.

सगळे गेल्यानंतर Office पुन्हा एकदा शांततेत गुडूगुडूप झाला.

माझा एकटेपणा घालवायला मी कानात Earphones टाकून माझ्याच धुंदीत गाणी

ऐकायला लागलो.

जस-जसेतास पुढे सरकत होते, तस-तसं माझ्या कामाचं ओझंही हलकं व्हायला

लागलेलं.

आरामात गाणी ऐकून कामा मध्ये व्यस्त होतो, 

मी नेहमी कधी कामाच्या धुंदीमध्येअसायचो, तेव्हा आजूबाजूला काय होतंय

कसलंच भान नसायचं,,,

आणि अश्यातही जर कोणी मला हाक मारली तरी त्या हाक मारणाऱ्यालाच

पश्चात्ताप व्हायचा, कारण माझ्याकडून काहीच प्रतिसाद नसायचा.

पण अश्या तल्लीन अवस्थेत सुद्धा साधारण १२ च्या सुमारास खिडकीतून हळुवार

असा 'टक्' आवाज माझ्या कानावर आला..

कानात Earphones घालून सुद्धा आवाज इतका स्पष्ट होता ,,, की डोक्यापर्यंत

त्याची चेतना सहजपणे गेली,

पण दुर्लक्ष करण्याजोगा आवाज होता, म्हणून मी ही इतकं लक्ष दिलं नाही.

पण हे दुर्लक्ष आता संशयाच्या रुपात पुन्हा जन्माला आलं, जेव्हा मघा सारखाच

आवाज माझ्याच मागच्या खिडकीतून पुन्हा एकदा मला ऐकू आला.

यावेळी मात्र जरा सावध झालो,

आणि उठून खिडकी उघडून बाहेर बघू लागलो,

बाहेर सर्वत्र एक भयाण शांतता पसरलेली.

पोलाच्या लाईटच्या प्रकाशाने रस्ता पिवळा धम्मक भासत होता.

लांब लांब पर्यंत फक्त ओसाड रस्ता, दुर कुठेतरी एका बल्बचे लूक लुकाट लक्ष

खेचून घेत होते..

खिडकी ठोठावेल असं बाहेर काहीच वाटत नव्हतं, आणि मुळात कोणी खिडकीवर

एकाएकी टक् टक् करेल हा विचारच अनाकलनीय होता, शक्यता तर दूरची गोष्ट,

कारण माझी बसायची जागाच दुसऱ्या मजल्यावर होती..

मनाचा भ्रम अजून काय?

मी खिडकी बंद करून परत माझ्या जागेवर येऊन काम करायला लागलो..

पण काम करत असतानाही मना मधे पुसट असा संशय अजूनही होता, कारण

पहिल्याच दिवशी ह्या Office बद्दल Office कर्मचाऱ्यांनकडून खूप काही ऐकायला मिळालं होतं,

फार वर्षांपूर्वी एक बायो-डिझेल Factory ह्याच जागेवर होती,

सर्वकाही सुरळीत चालूहोतं,

पण अचानक एक दिवस काही सुपरवाईजर्सच्या भल्या मोठ्या आणि अक्षम्य

चुकीमुळे Factory ला आग लागली,

त्या आगीची क्षमता एवढी जास्त होती, की त्यामुळे एक मोठा विस्फोट झाला आणि

होत्याच नव्हतं झालं...

त्या स्फोटमध्ये खूप जणांना आपले प्राण गमवावेलागले..

ज्या लोकांच्या चुकीमुळे आग लागली, ते नशिबानेतर बचावले,

पण खूप सारे निर्दोष कामगार फुकटात मारले गेले,

काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही आग मुद्दाम लावली गेली होती,

जे कामगार मेले त्यातले बहुतेक कामगार ह्याच Office च्या खाली पुरलेगेले,

दिवसा नजीक दिवस गेले, आणि ही जागा Haunted म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध

झाली,

आता ह्यात किती तथ्यता आणि मिथ्यता आहे ह्या मध्ये जाण्यात काही एक अर्थ

नव्हता,,,

नशिबानेका होईना मला हा Job खूप महत्त्वाचा होता..

लोकांच्या ह्या बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवलं काय आणि नाही ठेवलंकाय,

माझ्यासाठी दोन्ही सारखेच होते..


झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून मी परत Earphones कानात टाकून माझ्या

कामाला लागलो,

गाण्यामध्ये माझा आवडता गाणी वाजायला लागला,

आणि सवडीप्रमाणेमी गाणी गुणगुणायला लागलो..

"कभी जो बादल बरसे.."

गाण्याच्या फक्त दोनच ओळी गुणगु गुणगु ल्या असतील, की तेच Earphones मधून

कर्रर कर्रर असा कर्णकर्कश आवाज यायला सुरुवात झाली..

सगळ्यात आधी तर गाणी बंद झाला,

मी लगेचच Mobile चेक केला पण सर्वकाही ठीक होते...


मग हे अचानक गाण्याला काय झाले,

Earphones ना काय झालंय का हे बघायला लागलो,

ते बघण्यात मग्न असतानाच,

"मे देखू तुझे आँखे भरके.."

गाण्याची पुढची ओळ,,, पण आवाज Earphones मधून नव्हता, आवाज Mobile मधूनही नव्हता आणि मुख्य गोष्ट म्हणजेहा आवाज गाण्याच्या

सिंगरचा सुद्धा नव्हता..

मुळात तो आवाज कोणा माणसाचा किंवा बाईचा भासतच नव्हता..

ताबडतोब Earphones काढून जिकडून आवाज येत होता तिकडे कान

टवकारले..

गाणंचालूच राहिलं,

हळू हळू ते आवाज जवळ यायला लागले,

आवाज इतके स्पष्ट येत होते, की मला कळायला फार उशीर लागला नाही, की ते

आवाज अमानवी होते..

इकडे माझे हाल बेहाल व्हायला लागले,,, सर्वांगावरून सर सरुन काटा आला..

Office मधल्या AC च्या थंडाव्यात सुद्धा माझ्याच गरम आणि वाढत चाललेल्या

श्वासांची ऊब ओठांवर जाणवायला लागली…

हृदयाचे ठोके तर एका मागोमाग एक त्याचे गिअर वाढवत होते..

हातापायातले त्राण निघून गेलेले, पण त्या परिस्थितीतही मी तातडीने उठलो आणि

रूमच्या बाहेर धाव घेतली, कदाचीत Watchman काका तरी त्यांच्या केबीनमध्ये

असावेत..

पायऱ्या उतरून खाली गेलो, Watchman काका त्यांच्याच झोपेत मस्त तल्लीन

झालेले..

त्यांना बघून जरासं हायसं वाटलं,

लगेच त्यांना उठवून सगळी घडलेली हकीगत सांगितली, आणि त्यांना घेऊन वरती

आलो..

एक एक पायरी वर चढत होतो तशी मनातील अनामिक भीती परत एकदा जन्माला

येत होती..

Watchman काकांना घेऊन माझ्या डेस्क पर्यंत आलो सुद्धा, पण कोणाचाच

आवाज किंवा चाहूल नव्हती..

मी त्यांना खूप समजावले, की आता काही वेळा पूर्वी इकडूनच मला तो विचित्र

गाण्याचा आवाज ऐकू आलेला..

त्यांनी माझी परिस्थिती जाणली, आणि समजूत काढून परत माघारी फिरले..

मी सुद्धा हा माझ्या मनाचा भ्रम आहे असं समजून पुन्हा एकदा कामा मध्ये व्यस्त

राहण्याचा प्रयत्न करायला लागलो,

पण कितीही झालंतरी ते आवाज अजून कानात वाजत होते, मनामध्ये खळबळ

माजत होती, स्वतःची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला..

मनाचेच भास असावेत, नाहीतर Watchman काका असताना काहीतरी झालंच

असतं.. 

मी माझ्या कामाला लागलो,

बाजूला Mobile आणि Earphones होते, पण परत गाणी ऐकण्याचा प्रश्नच

नव्हता म्हणून ते तसेच बाजूला ठेवले...

मनात होणारी चल-बिचल सांगायला इतर कोणीच नव्हते..


काही काळ तरी शांततेत गेला,

पण नंतर दुरूनच कुठूनतरी पुन्हा एकदा गाण्याचेगीत गुणगु - गुणगु ण्याचे आवाज

कानावर यायला लागले,

आता मात्र मनातला संयम सुटत होता,

तेवढ्या थंड वातावरणात सुद्धा सर्वांग घामाने भिजून निघालेला,

हात पाय लटपटू लागले,.

तो दूरवर होणारा आवाज आणखी जवळ येऊ लागला, मग आणखी जवळ,

आणि मग एकदमच दरवाज्याच्या बाहेरूनच..

माझी नजर दरवाज्याकडे बघण्याची घाई करत होती,

ज्ञानेंद्रियांचा तर मनावरून कधीच ताबा सुटलेला..

आणि माझ्या बाबतीत ज्यावेळी ज्ञानेंद्रियांचा ताबा मनावरून सुटला आहे, नेमकं

त्याच वेळी काहीतरी अघटीत घडलंआहे..

ह्यावेळी माझ्या अथक संघर्षाने सुद्धा माझ्या डोळ्यांना त्या दरवाज्याकडे

बघण्यापासून अडवता नाही आले..

आणि समोर जेदिसले, ते माझे डोळे अजून सुद्धा विसरू शकत नाहीत..

समोर दरवाज्याच्या उंबरठ्यावरच एक बाई हातात मेणबत्ती घेऊन ते गाणं

गुणगु गुणत गु होती..

मेणबतीच्या प्रकाशाने तिचा चेहरा भयानक नसला तरी तसा भासत होता..

अधिकाधिक भीतीदायक..

"क...क...कोण?"

माझेशब्द माझ्याच गळ्यात अडकत होते,

त्या बाईकडून काहीच प्रतिक्रीया आली नाही, की तिने मुद्दाम ऐकून न-ऐकल्या

सारखंकेलं?

तिने गाणं गुणगुणण्याचा आवाज अजून वाढवला..

आणि चालत चालत एक एक पाऊल टाकत माझ्या जवळ येऊ लागली..

मी एका जागी स्तब्ध झालो, पाय हलेनासे झालेले..

तिच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न तर लांबच, मी एकाच जागी बर्फासारखा गोठून

गेलो..

आणि एकाएकी ती बाई किंचाळत एकदम वाऱ्यासारखी माझ्यावर झेपावली..

आता किंचाळायची वेळ माझी होती..

हाताच्या मुठी आवळल्या गेल्या, डोळे घट्ट मिटत एक जोरात किंचाळी दिली..

पण ती हवेतच दबून गेली,

सर्वांग एका क्षणासाठी पूर्णपणे शहारून गेलं..

२ मिनिटं गेले, मग ३ मिनिटं..

पण काहिच झाले नाही..

मी हळू हळू डोळे उघडले, समोर कोणीच नव्हतं..

माझे स्वतःचे हृदयाचे ठोके पण त्या शांततेत भय आणत होते..

केबिन मधली लाईट मात्र गेलेली, एक लाईट होती ती चालूबंद होत होती..


आता इकडचा एक क्षण सुद्धा माझ्यासाठी एका वर्षासारखी नरक यातना होती..


मी ताबडतोब माझे सर्वसामान गोळा करून तिकडून काढता पाय घेतला..

पण कदाचित आज माझा दिवस नव्हता..

क्षणाक्षणाला संकटांची भिंत डोळ्यासमोर डोंगरासारखी आडवी येत होती..

चालत चालत दरवाज्या पर्यन्त येईस्तोवर दरवाजा खड्दिशी आवाज करत माझ्या

समोर बंद झाला..

माझ्या सुटकेच्या शेवटच्या मार्गाने सुध्दा माझी साथ सोडलेली..

मी एकटक फक्त दरवाज्याकडेच बघत बसलो..

धावत धावत दरवाज्यापर्यंत गेलो,

दरवाजा बाहेरून बंद झालेला, मी जिवाच्या आकांतानेदार ठोठावुन Watchman

काकांना हाक मारत सुटलो..

पूर्ण Office च्या भयाण शांततेत माझ्या दार ठोठावण्याचा आवाज माझ्या

रडवलेल्या हाकांच्या सुरात मिसळत होता..

लांब लांबपर्यंत ती हाक ऐकण्यासाठी देखील कोणी नव्हते..

माझ्या किंचाळण्याचा आणि दार ठोठावण्याचा अवधी काही काळ गेला असेल..

की त्या आवाजात अजून एक आवाज नकळत मिक्स व्हायला लागला होता..

मी तातडीने माझ्या सर्वकृती थांबवल्या आणि आवाजाचा मागोवा घ्यायला

लागलो..

आवाज ओळखायला मला काही सेकंदांचा वेळ पुरेसा होता..

कारण तो आवाज पुन्हा तेच गाणं गुणगु गुणगु न्याचा होता..

आणि हा आवाज माझ्या बरोबर पाठीमागूनगू येत होता..

आवाजाची तीव्रता कमी होती, पण आवाजा मध्येना धड स्त्रीत्व होतं ना पुरुषत्व..

दोघांचं एकत्रितपणे मिश्रण केलेलंअसंतेआवाज होतं..

पाठीमागेबघण्याची क्षमता तर मगाशीच हारून बसलेलो..

आता तर फक्त औपचारिकताच बाकी होती..

नकळत आलेली घामाची धार डोक्यावरुन वाहताना सुद्धा अंगातून एक शिरशीरी

जात होती..

एक मोठा आवंढा गिळत पाठीमागे बघण्याचे होते नव्हते तेवढे धाडस केले..

लाईटच्या लुकलुकत्या प्रकाशात एक दूरवरून माझ्याजवळ रांगत येणारी एक

पुसटशी आकृती मला दिसली...

हे स्वप्न होतं की सत्यता?

की माझंच मन मलाच धोका देत होतं..

इतकं भयानक दृश्य जे आतापर्यंत फक्त मूव्हीज्आणि शोज मध्ये बघायचो ते

आता माझ्या डोळ्या समक्ष....

आणि तेही इतक्या भयंकर रूपात..


हे बघायच्या आधी जीव गेला असता, किंवा अटॅक येऊन मेलो असतो तर..

मी डोळे व्यवस्थित चोळून परत एकदा त्या आकृतीकडे पाहायला लागलो..

आणि हे काय?

माझ्या डोळे चोळण्याला फक्त २ ते३ सेकंद झालेअसतील..

त्या आकृतीने ह्या वेळे मध्ये तिच्यातलं आणि माझ्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार

सुद्धा केलेलं..

हे कसं शक्य आहे???

पण आता मात्र ती आकृती स्पष्ट दिसायला लागली..

तिचा चेहरा तिच्या केसांमुळे पूर्ण झाकला गेलेला..

तिचे रांगणे म्हणजे एखाद्या जखमी पशुसारखे अमानवीय होते..

पायाची पाऊलेही हातांच्या पावलांच्या पण पुढे पडत होती..

आणि कर्णकर्कश आवाजात गाणी गुणगु गुणत गु , एक एक पाऊल टाकत ती

माझ्याकडे सरकत होती..

जेव्हा तिचे पाऊल पडायचे तेव्हा मध्येमध्ये केसांची बट बाजूला सरकून तिचेबिना

बुबुळांचे पांढरेफटक डोळे माझ्या काळजाचा चिर घेत होते..

एकतर लाईटचे सतत चालुबंद होणेआणि त्यात ही अमानवीय आकृती माझा जीव

घेण्यासाठी पुढे सरकत होती..

ह्यापेक्षा भयावह कोणतं दृश्य असेल तर ते फक्त टी. वी. मधेच..

माझे सर्वांग घामाने निथळत होते, हृदयाची धड धड तर एव्हाना हाय डेसीबल मध्ये

होती..

हात पाय जागीच गार झालेले..

किंचाळु तर ऐकणारा कोणी नव्हता, आवाज देऊ तर कोणी मदतीला येणार

नव्हता..

तोच क्षण होता ज्यावेळी अक्षरशः रडू कोसळले..समोरून येणाऱ्या त्या आकृतीचं

वेग काही केल्या कमी होत नव्हते..वाचण्याचे सर्व पर्याय पण निरर्थक वाटत होते..


हनुमान चाळीसा पाठ नसली तरी, ३३ कोटी देवांची नाव एका क्षणात तोंडावर

आली..

तेभूत माझ्या अजून जवळ येऊ लागलं,

माझ्यापेक्षा ४-५ फुटांवर, आणि मध्येच एका ठिकाणी लुकलूकत्या लाईटच्या

प्रकाशात अजून एक प्रकाश मिक्स झाला आणि तिची आकृती आता त्या उजेडात

आलेली..

अचानक हा उजेड कुठून आला?

तिच्यात आणि माझ्यात काही फुटांचाच अंतर होता, आणि तितक्यात मला तिच्या

बाजूला असलेली खिडकी दिसली, त्या खिडकीतूनच तो प्रकाश येऊन तिच्यावर

पडत होता..

बुडत्याला काठीचा आधार,,,

ती उघडी खिडकी बघून किती आनंद वाटत होता..

जणू देवाने हा शेवटचा पर्याय माझ्यासाठी ठेवलेला..


काहीही करून मला तिथपर्यंत पोहोचायचंच होतं..

मी ना आव बघितला ना ताव आणि जोरात धाव ठोकली ती थेट खिडकीपाशी..

पण रस्त्यात ते भूत,,,

मला अडवण्यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केला, पण तिला चुकवत,,, झटके देत

कसंबसं खिडकीपाशी पोहोचलो..

खिडकीतून खाली पाहिले, साधारण १० मिटरचे अंतर होते खाली उडी मारण्यात..

मी आधीच ऍक्रोफोबियाचा शिकार होतो, आणि त्यात हे समोर आव्हान..

पण ह्यावेळी मात्र मनाला ज्ञानेंद्रियांनी पुरेपूर साथ दिली..

पाठीमागच्या संकटापेक्षा हे उडी मारून जीव वाचवणं बेहत्तर वाटत होतं..

एकदा पाठीमागे.बघून डोळे घट्ट मिटून घेतले आणि खाली उडी मारली..

माझ्या उडी मारण्याच्या आवाजामध्ये त्या भूताची किंचाळी सुद्धा ऐकू आली..

खाली पडून उठायला थोडा वेळ लागला, जागोजागी खरचटलं, रक्त आलेलं,

पायावर पडलो म्हणून पायाला अत्यंत तीक्ष्ण वेदना जाणवत होती..

पण आनंद ह्या गोष्टीचा होता कि हातचं नखांवर निभावलेलं..

घड्याळात बाघितलेतर रात्रीचे २ वाजलेले..

मी लंगडत लंगडत हायवेच्या कडेला गेलो, कोणी लिफ्ट देतोय का बघायला..

खूप वेळ वाट बघितल्या नंतर एका टेम्पो थांबला आणि त्यात बसून घरी जायला

लागलो..

टेंपो मध्ये बसल्या बसल्या परत एकदा पाठीमागे Office बघितले,

Office कसले?

एक जुने आणि पडके खंडर होतेते,

लांबून एखाद्या भूतबंगल्या सारखे भासणारे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror