चुटक्या
चुटक्या
राजवीर सरदेसाईचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं, राजवीरच्या आजीच्या मावस बहिणीची नात,”राजश्री” आजीच्या मनात भरली होती, राजश्री तशी दिसायला छान, कामसू, स्वभावाचे मृदू स्वभावाची, गुणी मुलगी. पण राजवीर च्या मनात त्याची कॉलेजची मैत्रीण आणि सध्याची कंपनीमधली कलीग आराधना होती. म्हातारी आजीची इच्छा आणि तिच्या प्रोपर्टीवरती डोळा असल्यामुळे राजवीरला आजीच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागली. जरी मनात नसल्यावर तरी राजवीरन सुखी असल्याचं नाटक मात्र व्यवस्थित केलं. तशी राजश्री काही वाईट नव्हती, कामसू ,सेवा करणारी तिने लवकरच घरातल्या सगळ्यांचे मन जिंकले.
घरामध्ये जरी राजवीर सुखी असल्याचा बहाणा करत असला तरी कंपनीमध्ये मात्र आराधना ला तोंड देताना त्याला नाकीनऊ येत. कारण त्यांनी आराधनाला लग्नाचे वचन देऊन तिच्याकडून वेळोवेळी शारीरिक सुख वसूल केले होते, आणि त्या कारणास्तव आराधना फारच आक्रस्ताळेपणा करायला लागली होती. राजवीरच्या घरी एकत्र कुटुंब, आई बाबा, आजी, धाकटा भाऊ, तसेच शेजारच्या बंगल्यात राहणारे काका-काकू, चुलत भावंडे. बहुतेक सण एकत्र साजरे होत, आणि एवढ्या सगळ्या लोकांसमोर राजवीर जणूकाही अडचणीत सापडून गेला होता. आराधनाच्या मते राजश्रीचा काटा काढणे हे राजवीर ध्येय असले पाहिजे होतं, तिने तर त्या दोघांचे फोटो दाखवून आता राजवीर लाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केलं होतं.
राजश्री चे वडील लहानपणीच वारल्यामुळे तिला आईनेच वाढवले होते, तशी घरची गरीबी होती, आजी सोडली तर विशेष कोणी नातेवाईक पण नव्हतं. राजश्री चे आई मालतीबाई, राजवीर च्या जावई होण्यामुळे अतिशय खूश होत्या. त्यांच्या मुलीला फारच श्रीमंत आणि सुस्थितीत असलेलं स्थळ मिळालं होतं. राजवीरच्या मनामध्ये देखील राजश्रीच्या पासून कसे काय दूर होता येईल याचे आराखडे तयार करणे चालू होते. त्याची आजी जिवंत असेपर्यंत घटस्फोट वगैरे प्रकार घरात चालणारच नव्हते, आजी आणि तिची मावस बहिणीने गावाकडील शेतजमीन राजश्री च्या नावावर केली होती, राजेश्री ला सोडून देण्यात राजवीर चे नुकसानच होणार होतं, म्हणून तो आराधना ने कितीही त्रास दिला तरीही तो राजेश्री ला सोडण्यास तयार नव्हता. दिवसावर दिवस आणि महिने पुढे जाऊ लागले, राजश्री ने घरात गोड बातमी दिली, त्यामुळे दोन्ही घरं आनंदाने उजळून निघाले.
दिवाळी सण वगैरे आधी धडाक्यात पार पडला, आणि आजी आणि तिची मावस बहीण पणजी व्हायचं स्वप्न बघायला लागले. आराधनाने बातमी ऐकली आणि तिची तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. आता बाळ झाल्यानंतर राजवीर कधीही राजश्री ला सोडू शकणार नव्हता. वैतागुन आराधनाने तीन महिन्यासाठी अमेरिकेला ट्रेनिंग ला जाण्यासाठी होकार दिला. आणि ती निघून गेली. मात्र तिने जाताना राज ला धमकावले जर त्यांनी पुढच्या सहा महिन्यात काही हालचाल केली नाही तर ती त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या घरी आणून दाखवेल.
...................
योग्य वेळ आल्यानंतर राजश्री ने एका गोड बाळाला जन्म दिला, नातू बघून सगळेजण एकदम हरखून गेले. राजवीर पण मनातून फार खुश झाला.
पण त्याच्या खुशीला कायम एका भीतीचे किनार होती. अमेरिकेहून परत आल्यावर आराधना काय करेल? बाराव्या दिवशी बारसे केल्यानंतर राजश्री आणि बाळाला घेऊन मालतीबाई गावी गेल्या. आता तीन महिने राजश्री बाळा सकट गावाकड राहणार होती. गावाकडची थंड आणि स्वच्छ हवा बाळासाठी आणि तिच्यासाठी योग्य होती.
बाळाचं तेल मालिश करून अंघोळ घालणे, त्याला पावडर लावून मस्तपैकी तयार करणे,, त्याच्यासाठी गाणं म्हणणं, झोक्यावर स्वतः गाणं गुणगुणणे, राजश्री या अतिशय आवडत. राजवीर ने कितीही सूचना केल्या तरीही राजश्री बाळाला पावडर लावणे आणि गाणे म्हणणे यामध्ये खंड पडत नव्हती. राजश्री ला नेहमी सवय होती, बाळ फार रडायला लागले ती त्याच्या कानाजवळ येऊन शुक शुक शुक करायची, मंद, मऊ, गोड , आवाजात काहीतरी गुणगुणायची आणि त्या आवाजात बाळाला झोपायची. कधी कधीच बाळाच्या गालाला आणि तिच्या गालाला सारखाच वास यायचा.
आराधना अमेरिकेहून परत आली. राजवीर ला सुखी बघून परत तिचं डोकं सटकलं. राजने चक्क सुट्टी टाकली आणि तो मालतीबाई यांच्या गावा कडे रवाना झाला. गाव डोंगरदऱ्यांमध्ये होता, प्रत्येक शेतावरती त्यांच्या स्वतःच्या विहिरी होत्या, झाडाझुडपात कधीकधी जंगली जनावर देखील येत. कोकणातलं गाव अमराई, केळी सुपारीच्या बागा, आणि जंगली जनावर, कोल्हे लांडगे, कधीकधी दिसणारे वाघ, ह्यासाठीदेखील प्रसिद्ध होता.
गावी आल्यानंतर राजवीर ने एक पायंडा पाडला, रोज रात्री तो राजश्री ला ग्लासभर गरम दूध आग्रहाने प्यायला लावायचा. कधी साखर घालून, कधी हळद घालून, कधी वेळ वेलदोडा जायफळ घालून, कधी नुसतं. त्याचं हे प्रेम बघून मालतीबाई ना अगदी भरून यायचं. मनातल्या मनात त्या दोघांची पण दृष्ट काढत असत.
बराच विचार करून राजवीर न स्वतःच्या मनाशी एक आराखडा तयार केला. आठवडाभर गावाकडे राहिल्यावरती मालतीबाई पण त्याच्या विश्वासावरती राजश्री आणि बाळाला सोडून शेतामध्ये कामाला जाऊ लागल्या. काम म्हणजे देखरेख असायची. राजवीर पण त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याबरोबर शेतावरती जाऊ लागला. त्यादिवशी पण रोजच्या प्रमाणे राजवीर, मस्तपैकी वेलदोडा जायफळ घालून गरम गरम दूध घेऊन राजश्री पाशी आला. राजश्री ने आढेवेढे घेत दूध पिऊन टाकलं आणि गाढ झोपून गेली आणि रात्री...
......................
पहाटे सुमारास पोलिस पाटील दरवाजावरती आले, ऍम्ब्युलन्स घेऊनच आले होते, कारण आदल्या दिवशी रात्री झोपलेल्या राजेश्री ला वाघाने ओढून नेले होते, आणि तिचा रक्तबंबाळ देह शेताच्या कडेवर पडला होता. अजूनही राजश्री जिवंत होती. तिला बरंच काही सांगायचं होतं, पण राजवीर च्या आग्रहास्तव तिला सतत वेदनाशामक चे इंजेक्शन्स देऊन झोपवण्यात आलं. जखमा खोल होत्या, रक्तस्त्राव पण पुष्कळ झालेला होता, पोट पाठ मांड्या चेहरा सगळं काही वाघाने जणू चावलेलं होतं. राजश्रीच्या अंगावरच्या वाघाने ओरबाडले याच्या खुणा देखील फारच खोल होत्या. जणूकाही एखाद्या लोखंडी वाघनखांनी ओरबाडले आहे, तिला जिथेजिथे वाघाने चावले होते तिथली जागा काळी पडली होती, जणू काही एखाद्या लोखंडी हत्याराने तिथे चिमटे काढले आहेत.
राजश्रीला भेटायला जाताना राजवीर कायम बाळाला घेऊन जात होता. त्यामुळे राजश्री जरी त्याच्याकडे बोट दाखवत होती तरी सगळ्यांनी असा समज करुन घेतला की ती त्याला बाळाला संभाळायला सांगत आहे. खोल जखमांमुळे आणि अतिशय रक्तस्त्रावामुळे राजश्री, राजविर आणि बाळाला सोडून गेली. मालतीबाई, आजी, आई, बाबा आणि राजवीर यांच्या शोकाला पारावारच राहिला नाही.
गाववाले चकितच झाले कारण जरी वाघाच्या पायाचे ठसे शेतांमध्ये दिसत असले तरी वाघाने कधीही मनुष्य बळी घेतला नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त राजश्री कशी काय ओढली गेली होती? झोपलेलं बाळ मात्र व्यवस्थित होतं. तसेच राजवीरलादेखील काहीही झालेलं नव्हतं. शिकारी बोलवून वाघाचा शोध घेण्यात आला पण कुठेही वाघाचा थांगपत्ता लागला नाही. वाघाच्या पावलाचे ठसे मात्र मालतीबाई यांच्या शेतामध्ये ठळकपणे जाणवत होते. आता मालतीबाई पण घाबरल्या होत्या. त्यांनी बाळा सकट शहरात जायचे ठरवले. राजश्री चे दिवस करून सगळेजण शहरांमध्ये परत आले आणि राजवीर नेहमीप्रमाणे कंपनी मध्ये कामासाठी रुजू झाला.
त्याच्या सहकार्यांनी खूप शोक दर्शवला पण आराधना ला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. राजवीर सुकलेला चेहरा, सुतकी वागणे बघून त्याच्या आई-बाबांना फारच दुःख होत असे. आजीने तर बोलणेच बंद केले होते. शेवटी आई-वडिलांच्या आग्रहास्तव, आलेल्या पहिल्याच स्थळाला राजवीर ने होकार दिला. मुलगी राजवीरचाच कंपनीमध्ये कामास होती, आणि बाळाची ती योग्यप्रकारे काळजी घेणार होती असं तिने वचन दिलं होतं. शिवाय दोन्हीकडच्या आजीदेखील बाळाकडे व्यवस्थित लक्ष देणार होत्या. नाईलाजास्तव राजवीर लग्नाला तयार झाला. त्यांनी कितीही नकार दिला तरी आई बाबांची इच्छा म्हणून तो तयार झाला. लग्न तरी कोणाशी होतं.
…………………
लग्नानंतरचे आठ दिवस कसे तरी घरी काढून, आराधना आणि राजवीर हनीमून साठी निघून गेले. घरी वरून राजवीर खूप दुखी असल्याचं नाटक करत होता तरी मनातून मात्र तो एकदम सुखावला होता. एका बाजूचे मन त्याला खात होतं की राजश्री ला उगीचच मारलं पण दुसरीकडे आराधना त्याला जिवंतपणे मारत होती.
घरी आल्यावरती त्यानी जेव्हा बाळाला जवळ घेतलं, तेव्हा तो आश्चर्याने चमकून उठला, बाळाच्या अंगाला राजश्री सारखाच वास येत होता.
बाळ आनंदाने खेळत होता. खोलीमध्ये एकटा असल्यावरती बाळ नेहमी खिडकी कडे बघून आनंदाने आवाज करत असे. रात्रीच्या वेळेस जरी बाळ मालती आजीजवळ झोपत असे तरीही रडल्यावरती जर कुठून चुटकीचा आवाज आला किंवा पावडरचा वास आला तर तो एकदम शांत होत असे. राजश्रीला सवय होती, गाणं म्हणताना किंवा बाळाला झोपवताना ती चुटक्या मारून झोपवायची. कधीकधी राजवीर ला राजश्री चुटक्या वाजवत आहे असा भास होई.
बहुतेक वेळेला जेव्हा राजवीर आणि आराधना रंगात यायचे, बाळ अचानक रडायला सुरुवात करायचा. रात्र-रात्र राजवीर आपल्या हातात धरून फिरवत फिरवत झोपायचा प्रयत्न करायचा. या सगळ्यामुळे आराधना फार वैतागून गेली होती. तिला आता बाळाचा फार संताप यायला लागला होता.
एक-दोन वेळा ती म्हणाली पण,"सूड घेते राजश्री, तिला जावे लागले म्हणून आता बाळाला ठेवले आहे आपल्याला त्रास द्यायला."
तिचं वाक्य राजवीरला अजिबात आवडलं नव्हतं, तरी पण त्याला काही इलाज नव्हता.
त्या दिवशी असंच झालं, रात्री बाळ काही झोपत नव्हतं, म्हणून त्याला हातावर घेऊन राजवीर खोलीमध्ये येरझार्या घालत होता. अचानक बाळ रडायचं थांबलं, आणि खिडकीकडे बघू लागला, खिडकीमधून राजश्रीच्या पावडरचा वास, आणि चुटक्या ऐकू आल्या. बाळ एकदम शांत झालं आणि राजवीरच्या हातामध्ये झोपून गेले. मात्र राजवीरची झोप उडाली. रात्री अचानक खिडकीपासून चुटकीचा आवाज आला, त्याच्या मागोमाग शब्दही
शुक शुक! मी बाळाला घेऊन जाईन येथे ठेवणार नाही
राजवीर खाडकन उठला, त्यानी मनोमन राजश्रीची लाख वेळेला क्षमा मागितली. असं वारंवार व्हायला लागलं, आराधना न घरी वचन दिलं होतं बाळाला सांभाळायचं तरी तिच्या कडून काही बाळ सांभाळत जात नसे. आराधना न एक-दोन वेळा पावडर चा वास आणि चुटकी यासंबंधी राजवीर ला सांगितलं होतं.
एक-दोन महिने गेले सुरू झाला पावसाळा सुरू झाला. नेहमीच्या तपासणीसाठी बाळाला दवाखान्यात न्यायचं होतं, त्याप्रमाणे राजवीर त्याला घेऊन गेला, नेमकी मालती आजी गावाकडे गेली होती करण पावसाळ्यामध्ये, झाडांना खत घालायचं असे. आराधना नि देखील मिटिंगचा बहाणा केला आणि राजवीर बरोबर आली नाही.संध्याकाळची वेळ होती आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राजवीर एकटाच बाळाला घेऊन गेला होता त्यामुळे त्यानी स्वतःची कार नेली नव्हती. कितीही प्रयत्न करूनही कुठलीही टॅक्सी त्याला मिळाली नाही. शेवटी मिळेल त्या रिक्षात बसून राजवीर बाळाला घेऊन घरी आला, रिक्षामध्ये बाळावरती आणि राजवीर वरती पावसाचे भरपूर फवारे उडाले आणि दोघेही चिंब भिजून गेले. पावसाचा जरी राजवीरवर काही परिणाम झाला नाही, बाळ मात्र आजारी पडलं. आधी सर्दी झाली, मग सर्दीचा खोकला झाला, शेवटी त्याच्या छातीतून आवाज यायला सुरुवात झाला. बाळाची छाती कफामुळे पूर्ण भरून गेली. डॉक्टरांनी त्याला न्यूमोनिया झाला आहे असं सांगितलं.
काहीही झालं तरी राजवीर बाळावर फार प्रेम होतं. रात्री बाळाला झोपता नाही आलं, राजवीर त्याला हातात धरून फिरवत फिरवत झोपे. राजश्री सारखं गाणं पण म्हणण्याचा प्रयत्न करे, पण त्याला ते काही जमत नसे. घरातले सगळे बाळाच्या आजारामुळे फारच चिंतित झाले होते. लहान मुलांचा न्यूमोनिया हा जीवघेणा ठरू शकतो. सतत येणाऱ्या तापामुळे, बाळ फारच आजारी झालं, बाळ फारच जोरात आजारी पडलं. इतकं की डॉक्टरांनी सांगितलं
की, “काही खरं नाही.”
त्या रात्री तसाच पावडरचा वास, मागोमाग चुटक्या ऐकू आल्या,
" बाळाला घेऊन जाते "
राजश्रीचा आवाज आला.
राजवीरन रडत रडत किती वेळ माफी मागितली तरीही ऐकणारे तिथे कोणीच नव्हता. राजवीर बाळाच्या पाळण्या कडे आला, तर बाळाचा अंग थंड पडलं होतं. पावडर चा वास पण बाळ मात्र आता थंड झालं होतं. घरामध्ये परत शोकाचा डोंब उसळला. आजी म्हणाली "शेवटी आईच ती आपल्या बाळाला कसे एकटा सोडून जाईल? घेऊन गेली बघ त्याला" आजी आई-बाबा सगळे फार दुःखी झाले. आराधना देखील संकोचून गेली, तिला वाटले बाळाच्या मृत्यूला ती जबाबदार होती. मालती बाईंचा तर जगण्याचा आधार संपला, मुली पाठीमागे नातू हा जगण्यासाठी आधार होता पण तो पण आता निघून गेला होता.
दुःखी वातावरणातून वर येण्यासाठी म्हणून आई-बाबांनी राजवीर आणि आराधनाला थोडे दिवस हवापालटासाठी दुसऱ्या गावी जायला सांगितले.
जरी राजवीर मनातून खुपच दुखावला गेला होता, तरीही त्यांनी जाण्याचे कबूल केले कारण की आता त्याला आराधनाबरोबर राहायचे होते. दोघेजण महाबळेश्वरच्या थंड वातावरणामध्ये चार दिवसासाठी म्हणून गेले. दिवसभर न बोलता हातात हात गुंफून दोघेजण हिंडत राहिले. आराधना अतिशय आनंदात होती, पण राजवीर मात्र चिंता मग्न होता. त्याला पण आनंद झाला होता पण बाळाच्या जाण्याने त्याला गालबोट लागले होते. दिवसभर दमून दोघेजण हॉटेलवर परत आले. डिनरनंतर मंद संगीतI वरती दोघांनी समरसून नृत्य केले. त्यांच्या चित्तवृत्ती जणू उफाळून आल्या होत्या, खोलीवरती आल्यावर ताजेतवाने होण्यासाठी आराधना बाथरूममध्ये गेली, आणि खिडकीपाशी उभा राहून राजवीर महाबळेश्वरचे रात्रीचे आकाश न्याहाळत होता.
तेवढ्यात त्याला परिचित असा पावडरचा वास आला, आणि त्यापाठोपाठ चुटक्या.
शुक शुक! मला मारून तुला आनंदात राहता येणार नाही, मी तिला पण घेऊन जाईन
राजश्रीचे मंद हसणे हवेवर तरंगत बाहेर गेले आणि त्यापाठोपाठ आराधनाची बाथरूममधून उठलेले किंकाळी. बाथरूमभर परिचित असा पावडरचा सुगंध दरवळत होता. गिझरची तुटलेली वायर बाथटबच्या पाण्यामध्ये लोंबत होती, वायरमधून ठिणग्या उडत होत्या. शॉर्टसर्किटमुळे बाथटबमध्ये विजेचा प्रवाह आल्यामुळे, आराधना काळी ठिक्कर होऊन मरून पडली होती.
################################################################################

