छ.शिवाजी उत्तम प्रशिक्षक होते२
छ.शिवाजी उत्तम प्रशिक्षक होते२
अनेकदा तह करण्यासाठी आलेल्या शत्रूला कशाप्रकारे भेटायचे. शत्रुची भेट कुठे घ्यायची. शत्रु सोबत भेटताना सोबत कोणाला घ्यायचे. किती माणसे सोबत असायला पाहिजेत. शस्त्रे कुठची घ्यायची. छुपे शस्त्रे घ्यायची की नेहमीची.त्या प्रकारे शत्रुकडून सुद्धा माणसांची कपात करून नेमकी माणसे भेटीच्या वेळी शत्रूकडून उपस्थित रहावीत याची खातरजमा करून घेणे.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पारंगत होते. तसे करायला भेटीच्या दरम्यान ते शत्रुपक्षाला भाग पाडायचे. ही शिकवणी ते शत्रुपक्षाला द्यायचे. अक्षरशः शत्रूला त्यांच्या निरोपातून आणि नियमामधून म्हणजेच शिस्तीतून अप्रत्यक्षरित्या ते शिकवायचे. इतका त्यांचा बिनचूकपणा शिक्षकी वृत्तीने अचुक बनला होता.कुणाला काय शिकवायचे आणि कुणाला कसे प्रशिक्षणासाठी तयार करायचे. कुणाला आपली गरज आहे. हे ओळखण्यात शिवाजी महाराज तरबेज होते. हा तरबेजपणा त्यांच्या शिक्षकी वृत्तीमुळे त्यांना मिळाला होता.हे ही येथे नमूद करण्यासारखे आहे. निरीक्षण करण्याच्या त्यांच्या सवयीने त्यांना अधिकच महान बनवले होते.
कुणाला भेट द्यावी.कुणाची भेट घ्यावीकुणाला देऊ द्यावी.कुणाला भेटू नये.शिवाजी महाराजांना हे चांगले माहीत होते. त्याचाच उत्तम दाखला किंवा उदाहरण आहे.अफजलखानला भेटून त्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढले.म्हणूनच शिवाजी राजे उत्तम शिक्षक आहेत. हे बिरुद त्यांना पूर्णपणे लागू होते. त्यांच्या शिरपेचात त्यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
शिवाजी महाराज एखाद्याची परीक्षा घेण्यामध्ये अव्वल होते.परीक्षा तोच घेतो जो स्वतः जातीचा परिक्षक असतो. संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला शिवाजी महाराज जेव्हा पोचले. तेव्हा संत तुकारामांनी त्यांना बसायला स्वतःचे उपरणे दिले. मात्र शिवाजी महाराजांनी त्याला पाय न लावता त्याच्यावर बसले.जो सच्चा शिक्षक असतो. तो दुसऱ्याचा सन्मान करू लागतो.इथे या गोष्टीने हे सिद्ध होते. शिवाजी महाराज संत तुकारामांना स्वतःहून भेटण्यास गेले ही गोष्ट खूप मोठी आहे. ते एक राजा होते. जेव्हा राजा प्रजेच्या भेटीला जातो तेव्हा प्रजेचा सम्मान मोठा वाढतो. ही गोष्ट जेव्हा इतर लोकांना कळते. तेव्हा राज्याचा आणखीनच सन्मान होतो.
जनतेच्या मनात अशा राज्याबद्दल आदर निर्माण होतो. तो आदर निर्माण करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी स्वतःहून केले नाही. ते आपोआप घडलेले आहे. तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी शिवाजी महाराज गेले. तेव्हा त्यांनी तुकाराम महाराजांना दागदागिने दिले. मात्र तुकाराम महाराजांनी त्याकडे पाहिले सुद्धा नाही किंवा त्याला हात सुद्धा लावला नाही. परंतु तुकाराम महाराजांच्या पत्नी आवली उर्फ जिजा यांनी त्या दागिन्यांना हात लावला.ते दागिने आपल्या अंगावर घालून पाहिले. मात्र तुकाराम महाराजांनी दागिने शिवाजी महाराजांना साभार परत केले. हा सच्च्या गुरू शिष्या मधला प्रसंग आहे. अर्थात त्या प्रसंगांमध्ये त्यांचे गुरु तुकाराम महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे शिष्य बनले होते. असा गुरु शिष्याचा विहंगम कार्यक्रम मावळ्यांच्या वाट्याला पहायला येतो. तेव्हा अस्मान ठेंगणे होते. तुकाराम महाराजांच्या भेटीच्या वेळी विद्यार्थी बनले होते स्वतः छत्रपती महाराज. आता भूमिका उलट झाली होती. जे शिवाजी महाराज अनेक मावळ्यांच्या शिक्षकांच्या भूमिकेत होते.तेच राजे संत तुकाराम महाराजांचे शिष्य बनले होते. शिष्य आणि गुरुची जोडी आता बदलली होती. त्याच्या भूमिकांसुद्धा बदलल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः राजा असून सुद्धा आता त्यांच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी तुकाराम महाराजांवर येऊन पडली होती. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यायला गेले होते.त्यांना भेटायला गेले होते.मात्र तुकाराम महाराजांनी ओळखले होते शिवाजी राजे आपल्याकडे येत आहेत म्हणजे राजांचा काहीतरी हेतू असणार.मात्र त्या परीक्षेत तुकाराम महाराज पूर्णपणे सत्य उतरले होते. एक सच्चा संत आणि एक सच्चा राजा यांची ती भेट होती. त्या भेटी मध्येच स्वराज्याची पुढची वाटचाल ठरली होती.
शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी भेटण्यासाठी स्वतः आमंत्रण दिलेले.नव्हते.तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना बोलावलेलेही नव्हते. परंतु शिवाजी महाराज स्वतः त्याच्यांकडे गेले होते. त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकायला.कीर्तनात शिवाजी महाराज रमले असताना. त्यांचा माग काढत तिथे मोगल सैनिक पोचले होते.परंतु शिवाजी महाराजांच्या प्रशिक्षिकी सवयीने तिथूनही ते सहीसलामत सुटले. त्यांच्या जवळ उत्तम प्रशिक्षण गुण असल्यामुळे अनेक मावळ्यांना उत्तमरित्या राजानी तयार केले. त्यामुळे येणाऱ्या संकटांची चाहूल घेत. त्यांचे मावळे दक्ष राहून संकट ओळखत होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मोगल सैनिक पोचले. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांच्या भक्तीने तिथे अनेक शिवाजी महाराजांची रुपे असलेली लोकं तयार केली. त्या संभ्रमात मोगल सैन्य असताना. शिवाजीराजांनी लगेचच तिथून प्रस्थान केले आणि सुरक्षित जागी छत्रपती शिवाजी महाराज पोचले. त्या कीर्तनामध्ये असा प्रकार झाला होता.असे म्हणतात की मुघल सैनिकांना जिथे-तिथे शिवाजी महाराज दिसत होते. इतकी शक्ती आणि भक्ती तुकाराम महाराजांनी तिथे निर्माण केली होती. प्रत्येक मनुष्य हा शिवाजी राजांच्या रूपात तेथे दिसत होता. त्यामुळे गोंधळून मोगल सैनिक निघून गेले. त्याच वेळी वेगाने हालचाल करत छत्रपती महाराज सुखरूपपणे दुसऱ्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे तुकाराम महाराजांना एकदम हायसे वाटले. त्यांच्या शिष्याचे त्यांनी संरक्षण केले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांनी आलेल्या भेटी दागिने स्वीकारले नाहीत या गोष्टीवरून त्या भेटीची कीर्ती सर्वदूर पसरली आणि लोकांच्या कायम स्मरणात राहिली. असे म्हटले जाते की समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितले होते. महाराज मी तुमच्या स्वराज्या मध्ये आलेलो आहे. आपण माझी उत्तम व्यवस्था करण्यास आपल्या माणसांना सांगावे. मात्र ही एकदम वेगळी गोष्ट आहे. शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक आणि शिक्षक होते.याचा मोठा दाखला म्हणजे हिरकणीचा प्रसंग. हिरकणी नावाची गवळण गडावर दूध विकायला आली होती.दूध विकताना तिला वेळेचे भान राहिले नाही. संध्याकाळच्या समयी गडाचे दरवाजे बंद झाले. तिला सत्वर घरी जायचे होते. तिने गडाचा दरवाजा बंद करणाऱ्याला विचारून पाहिले दादा गडाखाली मला सोडा.गडाच्या खाली मला जायचे आहे.माझ्या घरी माझे लहान बाळ आहे.ते दूध पिणारे बाळ आहे .त्यासाठी मला खाली सोडा.
पण काळोख पडायला सुरुवात होणार होती. त्यामुळे एकदम कडक आदेश असल्यामुळे गडाचे दरवाजे उघडले नाहीत. मात्र ती हिरकणी तिची हिंमत हरली नाही. हिरकणी नावाची गवळण गडावरून कुठे खाली उतरायला जागा मिळते कां बघत बघत फिरत होती आणि तिला एक जागा सापडली. तिने क्षणात जीवाची पर्वा न करता त्या बाजूने गड उतरायला सुरुवात केली. एकेक पाऊल टाकत ती गडावरून खाली उतरु लागली. गडावरचे मावळे बघत होते. हिरकणी खाली उतरते आहे. अनेकांचा श्वास रोखला गेला होता.त्यांनी तिला पुन्हा अडवले सुद्धा.परंतु हिरकणी गवळण त्यांना म्हणाली. घरात माझे तान्हे बाळ आहे. त्याला माझे दूध पाजायचे आहे.मी जर गेले नाही तर माझे बाळ रडून केविलवाणे होईल. भुकेने व्याकुळ होईल. मला जायलाच पाहिजे.मला जाऊ द्या आणि ती गड उतरून खाली सुद्धा आली. तेव्हा गडावर असणारे मावळे आणि गडाचा कारभारी आश्चर्यचकित झाला. या गडाच्या नैसर्गिक तटबंदीला त्यांनी अभेद्य मानले होते. त्या गडावरून एक हिरकणी नावाची स्त्री जीवाची पर्वा न करता काळोखा मध्ये भराभरा गड उतरत खाली जाते म्हणजे काय? तीने तसे करून गडाच्या तटबंदीला जणू खिंडारच पाडले होते. ही गोष्ट जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली. शिवाजी महाराजांचा चेहरा बदलला. एकाएकी ते रागावले. किल्लेदाराला ते म्हणाले.अरे तुम्ही तिला जाऊ कसे दिले? तुम्हाला किल्ल्याचे नियम माहीत नाहीत.महाराज त्या हिरकणी नावाच्या गवळणीचे लहान बाळ घरी होते. त्यामुळे ती ऐकेना. ती बाळाच्या ओढीने खाली उतरून गेली. आम्हाला माफ करा.बरं,राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. ते म्हणाले.ठीक आहे. बघतो मी काय ते.शिवाजी महाराज जागेवरून उठले. त्यांची पावले हिरकनी जिथुन उतरली.त्या दिशेला पडू लागली.छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थितीची जाणीव घेतली.ते शांतपणे विचार करू लागले. जर या जागेवरून,या ठिकाणावरून हिरकणी नावाची स्त्री आपल्या मुलाच्या ओढीने खाली उतरते. त्याचा अर्थ ही जागा आणि गडाची ती बाजू कमकुवत आहे,त्यांच्या मनातला शिक्षक जागा झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेचच आज्ञा सोडली. गडाच्या बाजूला उतरण्याची जी जागा आहे. जिथून हिरकणी खाली उतरली. तिथे लगेच बंदोबस्त म्हणून भिंत घालून घ्या. गड एकदम सुरक्षित करून घ्या. लगोलग तिथे बुरुज बांधायला सुरुवात झाली. थोड्या दिवसात अभेद्य अशी किल्ला तटबंदी तिथे निर्माण झाली. त्या ठिकाणी गडाची कमकुवत जागा आहे. ती एका हिरकणीच्या धाडसामुळे समजली होती. शिवाजीराजांनी मनात हिरकणीचा गौरव करण्याचे ठरवले.जेथून हिरकणी गडावरून खाली उतरली होती. तिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले. त्यांनी वरून खाली पाहिले. एकदम अवघड रस्ता.
तरीही ती स्त्री कशी काय उतरली. याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तात्काळ तिथल्यातिथे निर्णय घेतला. त्या बुरूजाला नाव दिले. हिरकणी बुरुज.शिवाजी महाराज पुटपुटले. धन्य धन्य ती हिरकणी आणि तिचे पुत्रप्रेम.महाड मधल्या रायगडावर ज्या ठिकाणी जिथून हिरकणी गड खाली उतरली. त्या ठिकाणाला नाव आहे. हिरकणीचा बुरुज,आजही जर रायगड किल्ला बघायला गेलो तर तशी तिथं पाटी सुद्धा लावलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी जर दुसरे कोणी असते तर त्यांनी कामात गल्लत केली म्हणून तिथल्या किल्लेदाराला शिक्षा केली असती. ज्या जागेवरून हिरकणी गवळण खाली उतरली. त्याच जागेवरून किल्लेदाराचा कडेलोट केला असता. परंतु जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काहीच केले नाही.त्यांनी मांसाहेबांच्या सल्ल्याने हिरकणीचे बुरुजाला नाव दिले होते आणि किल्ल्यावरील मावळ्यांना हिरकणीच्या बुरुजाच्या पाशी दिवस-रात्र तेल घालून डोळ्यात पहारा करायला सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या गोष्टीपासून शिकले होते ते शिक्षण त्यांना शिकवले हिरकणी गवळणीने, ते त्यांनी इतरांना शिकवले. तुम्ही असं करा. तुम्ही असं नाव द्या.तुम्ही पहारा वाढवा . छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शिक्षक होते. ही गोष्ट इथे पटते. कारण जो हाडाचा शिक्षक आहे. तो स्वतःला शिकवत राहतो. तो इतरांना प्रेमाने शिकवतो. काहीवेळा काय शिकवायचे आहे. याचा शिकवणाऱ्याला चटकन अभ्यास करावा लागतो. निर्णय घ्यावा लागतो. कोणता मुद्दा पटवून सांगायचा आहे. कोणत्या मुद्द्यावरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे. हे उत्तम जाणकार शिक्षक शिकून घेतोत्यात त्याला कमीपणा अजिबात वाटत नाही.शिवाजी महाराज आयुष्यभर स्वतः शिकत राहिले. इतरांना शिकवत राहिले .इतरांचे जे काही आहे.विचार ,कल्पना,धाडस,साहस यांचा निश्चितपणे आदर करीत राहिले. त्यांच्या या स्वभावामुळे, त्यांच्या या समंजसपणामुळे अनेक मावळे त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते.लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो. अशी म्हणून त्या काळात त्यावरून पडली होती.
