Chandrakant Pawar

Others

2  

Chandrakant Pawar

Others

छ.शिवाजी प्रशिक्षक शिक्षक होते - 3

छ.शिवाजी प्रशिक्षक शिक्षक होते - 3

11 mins
88


त्या निमित्ताने अनेकांचे समुपदेशन होणार होते. अनेकांचे समुपदेशन अगोदर सुद्धा झाले होते. शिवाजी महाराज समुपदेशकाच्या नात्याने राज्याभिषेकाला तयार झाले होते. त्यांच्या त्या कृतीने सर्व महाराष्ट्राचे दुहेरी समुपदेशन होणार होते. सर्वजण झोपेतून खाडकन पुन्हा जागे होणार होते. पुन्हा महाराष्ट्रातील लोकांना महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा पाहायला मिळणार होता. समुपदेशनाचे फायदे काय असतात ते लोकांनाही कळायला हवेत... समूपदेशनाचे दीर्घ परिणाम काय होतात . हे दरबार तील अनेकांना माहित पडावेत. त्याबाबत महाराजांनी जाणीवपूर्वक विचार केला होता. ची नाराज आहेत त्यांना राजी करण्याची आवश्यकता होती.२४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा तांत्रिक आणि वैदिक पद्धतीने केला गेलेला राज्याभिषेक पार पडला. त्यामुळे पहिला राज्याभिषेक जे मानायला तयार नव्हते. ते दुसरा राज्याभिषेक पार पाडायला उपस्थित झाले होते. सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले. आपला जाणता राजा हा एक मोठा राजा आहे.हे पुन्हा लोकांना माहीत झाले. मात्र या दुसऱ्या राज्याभिषेकाला जास्त मंडळी उपस्थित नव्हती. तो एकदम साध्या पद्धतीने पार पडला.

साधी पद्धत म्हणजे वैदिक पद्धत... असे होय... आजही लग्न समारंभ कार्यात एकदम साध्या पद्धतीने लग्नकार्य करायचे झाल्यास .लोकं वैदिक लग्न पद्धतीचा आग्रह धरतात आणि साधी सोपी व स्वस्त खर्च पद्धत म्हणजे वैदिक पद्धत मानली जाते. याचासुद्धा पांयडा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता. त्याचा लोकांनी आपल्या मुला-मुलींची लग्ने लावण्यास फायदा करून घेतला . स्वतःची लग्ने सुद्धा लोकांनी वैदिक पद्धतीने लावून स्वस्त आणि कायदेशीर पद्धतीचा अधिक अवलंब करून त्या पद्धतीचा प्रसार केला . लग्नाच्या खर्च प्रथांना वैदिक लग्न पद्धतीने फाटा देऊन पैसे वाचवण्याचे लोकांना नकळतपणे शिकवले.

जरी शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक साध्या पद्धतीने केला गेला होता. तरी दुसरा राज्याभिषेक करावा लागेल असा आग्रह धरणार्‍या लोकांनी शिवाजी महाराजांकडून भरघोस दक्षिणा मिळवण्यासाठी तो खटाटोपीचा विचार पुढे आणला होता. अशी कुजबूज तेव्हाही ऐकायला मिळाली होती.शिवाजी महाराजांनी त्यामध्ये जास्त आढेवेढे घेतले नाहीत. त्यांनी तो आग्रह मान्य केला आणि सन्माननीय पद्धतीने स्वतःला दुसरा राज्याभिषेक करून घेतला.

खरंच शिवाजी महाराज खूप दयाळू होते आणि दानशूरही होते. त्यामुळे दुसऱ्या राज्यभिषेका निमित्ताने जे महाराजांवर रुसलेले लोकं होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणा व देणग्या, बक्षिसे देऊन त्यांचाही यथोचित मानसन्मान केला त्यांना मानवस्त्रे सुद्धा दिली. स्वराज्याला जे लोक मानायला तयार नव्हते. ते सुद्धा लोकं आता स्वराज्य मानायला तयार झाले . स्वराज्याची गाडी सुरळीतपणे मार्गावर येऊन कायदेशीररित्या धावू लागली. दोन राज्यभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या राजेपदावर व सम्राट पदावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याचा छत्रपतींना एक प्रकारे आपोआप फायदाच झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची पहिली राजगादी निर्माण झाली.

        पुढील नेतृत्वासाठी शिवाजींच्या वारसांना ती गोष्ट अधिकच उपयोगी ठरली. भविष्यात होणारी भांडणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाने थोडीफार सोपी केली होती‌. जरी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला नसता तरी पुढेही भांडणे झालीच असती. ती होणारच होती.

त्यामुळे राज्याभिषेक करण्याशिवाय शिवाजी महाराजांना गत्यंतर नव्हते. मात्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात आणखी अधिक राजगाद्या निर्माण झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दुसरा राज्याभिषेक केला होता. तो तांत्रिक प्रकाराचा राज्याभिषेक होता... पहिला राज्याभिषेक सोहळा जो केला होता तो धार्मिक प्रकारचा होता...

छत्रपती राजांनी जो पहिला राज्याभिषेक सोहळा केला होता आणि त्यासाठी जे नाराज लोक होते. त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी हे होते. निश्चलपुरी गोसावी हे गागाभटांच्या विरुद्ध होते. गागाभट हे पंडित होते तर निश्चलपुरी हे गोसावी होते. निश्चलपुरींनी राजांना सांगितले की राजे गागाभट्टांनी जो राज्याभिषेक केला त्यामध्ये खूप उणीवा राहिल्या आहेत. त्यामुळे राजांनी निश्चलपुरी गोसावीसाठी दुसरा राज्याभिषेक सोहळा करण्याचा सन्मान दिला. निश्चल पुरी गोसावींनी जे राहिलेले कार्य होते ते केले. ग्रामदेवता स्थानदेवता या नावाने पानाचे विडे ठेवले. त्या त्या शक्तीप्रमाणे त्यांनी दुसरा राज्याभिषेक सोहळा केला. निश्चलपुरी गोसावी राजावर प्रसन्न झाले.राजांनी त्यांचा सुद्धा व्यवस्थित मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला. त्यांना उंची मानवस्त्रे दिली. त्याच राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी कवी भूषण यांनी राजांसाठी एक काव्य गायलं. ते काव्य संभाजी राजांचा मित्र कवी कलश श्रद्धेने ऐकत होते... कवी कलश शिवाजी राजांबद्दल वर्णन करीत काव्यगायनात म्हणाले की...

चार वर्ण धर्म छोडी कलमा निवाज पढी

शिवाजी न होतो तो सुंता होत सबकी..सुंता होत सबकी

ते काव्य गागाभट सुद्धा ऐकत होते. त्या काव्याने गागा भटांचा ऊर सुद्धा भरून आला . गागाभट्ट उत्तरेत गेले. तेव्हा त्यांनी कवि भूषण यांचं काव्य तिकडे खूप वेळा गाउन दाखवलं . त्यामुळे शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कशासाठी आहे. हे उत्तरेतील लोकांना समजलं. उत्तरेतील मुघलांचे अत्याचार सहन करणाऱ्या लोकांमध्ये त्यामुळे मोगलाईचा द्वेष संचार होऊन गेला... त्यांच्या भावना अत्यंत संतप्त झाल्या होत्या.

उत्तरेमध्ये शिवाजी महाराजांचा आदर आणि योग्यता आता खुपच वाढली होती.... शिवाजीराजांना राज्याभिषेकाचा असाही फायदा मोठा झाला होता. राज्याभिषेकाच्या उत्सवा वेळी अनेक कलागुणांना वाव दिला गेला. नृत्य, गायन ,पोवाडा,लावणी, तमाशा याप्रमाणे अनेक कलांची तिथे उधळण झाली..

राज्याभिषेकाच्या अनेक विधी आणि दानधर्म करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रायचित्त विधी सुद्धा करण्यात आले होते. आठ दिवस अखंड होम हवने झाली.

राजांकडून काही चुका झाल्या असतील...

कोणाचा मान अपमान झाला असेल .

त्याबद्दल प्रायश्चित विधी करण्यात आला होता...

मात्र राजे शांत होते. ते निश्चल होते .

त्यांची धर्मात ढवळाढवळ नव्हती. जे काही चालले आहे ते त्याने निमुटपणे करून घेतले. आपणाकडून प्रायश्चित विधी करून घेतला म्हणून त्यांना अजिबात राग आला नव्हता... राज्याभिषेकाच्या वेळी शस्त्रपूजा करून ढाल-तलवार भाला पूजन. धनुष्यबाण, तोफा, बंदुका यांचे सुद्धा पूजन केले गेले. सर्वत्र मंत्रघोष सुरू होते... त्याच वेळी अनेक घोषणा पैकी एक घोषणेचा ध्वनी अनेकांच्या कानावर पडला....

छत्रिय कुलावंतस गणाधीश गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुपतपादशाही श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...

त्यासोबत शिवाजी महाराजांच्या मुखातून ध्वनी बाहेर पडला.जय भवानी ....

त्याच्यापाठोपाठ मावळ्यांनी एकच जयघोष केला.

जय शिवाजी...

त्यावेळी गागाभट्टांनी. आश्चर्यचकित होऊन मावळ्याकडे पाहिले....

स्वराज्य राष्ट्र भूमीला छत्रपती मिळाल्याची ती ग्वाही होती. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येत होते. अनेकांचे ऊर त्यावेळी भरून आले होते. स्वराज्याचा अंधकार नष्ट झाला होता.

स्वराज्याचा प्रकाश सर्वत्र पडला होता.

तो राज्याभिषेक सोहळा अधिक उत्साहात झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक सोहळा ६ जून. १६७४ ... साली झाला होता .

जो आजही महाराष्ट्रामध्ये रायगडावर अधिकृतपणे राज्याभिषेक सोहळा ६.जून रोजी दरवर्षी उत्साहाने व आनंदाने उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. त्यामध्ये हजारो लोकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सामील होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राज्यव्याप्ती कोकण, पश्चिम घाट ,सह्याद्रीच्या रांगा पासून नागपूर पर्यंत पुढे खानदेश पासून कर्नाटक तंजावर पर्यंत होती.

राज्याभिषेक सोहळ्याला जो खर्च झाला होता.तो जवळजवळ एक कोटी होन इतका होता. एक कोटी होनचे सध्याचे भारतीय रुपयात चलन म्हणजे एकहजार साडेआठशे कोटी रुपये. त्यामध्ये सगळा खर्च आला. अगदी संभाजीराजांनी कलावंतीणीना दिलेली देणगी सुध्दा धरली गेली होती.

संभाजीराजांना कलावंतीनीचे नृत्य पहाण्याचा नाद जडला होता. त्या कलावंतीणींला संभाजी राजे राज्याभिषेकाच्या वेळी विसरले नाहीत. त्यांनी त्यांना बिदागी देऊन त्यांची योग्य प्रकारे रवानगी केली. राजे एक कोटी होन खर्चाबद्दल विचार करून एक दिवस सर्वांना म्हणाले .

दिलेरखान औरंगजेबाचा खजिना घेऊन चाललेला आहे. त्या खजिना मध्ये एक कोटी होन पेक्षा जास्त रक्कम आहे. घोडे आहेत सोने-चांदी आहे. ते जर आपण स्वराज्यात आणले तर आपला राज्याभिषेकाचा खर्च भरून निघेल . लगोलग या मोहिमेवर त्यांनी विचार करून शेवटी एक कोटीहून औरंगजेबाचा खजिना लूट करून स्वराज्यात आणला. यावरून शिवाजी महाराजांची जमाखर्चाबाबतची भूमिका आणि दक्षता दिसून येते. शिवराज्याभिषेक सोहळा केला होता त्याबद्दल आता त्यांना जराही आता खर्च आला नव्हता कारण एक कोटी होनाची भरपाई आता झाली होती.

शिवाजी राजांनी राज्याभिषेकानंतर होन या चलनाची निर्मिती केली होती आणि एक होन नाणे म्हणजे अडीच ग्रॅम सोने. म्हणजे होन नाणे सोन्याच्या चलनात होते. सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच राहते. त्यामुळे होनाची किंमत सतत वाढत राहणार. याचा विचार राजांनी केला होता.

एक प्रकारे आताच्या अमेरिकन डॉलरला तोडीस तोड असे हे होनाचे चलन होते. अमेरिकन डॉलर प्रमाणेच होनाची किंमत सुद्धा जास्त होती. त्याबाबत शिवाजीराजांची दूरदृष्टी किती दूरवर होती. याची चुणूक मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज अधिकारी सुद्धा हजर होते. इंग्रज वकीलाने राजांना नजराणा म्हणून एक अंगठी दिली होती. तलवारी दिल्या होत्या. मोतीसुद्धा दिले होते. त्यातलीच एक अंगठी शिवाजी महाराज वापरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा मध्ये जो इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्या इंग्रज वकीला सोबत त्याचा दुभाषा नारायण शेणवी होता.तो इंग्रज वकील एक प्रकारे इंग्लंडच्या राणीचा गुप्तहेर होता. राजांची श्रीमंती बघून त्याची मती गुंग झाली असणारच. त्याने त्या श्रीमंतीचा अहवाल लगोलग इंग्लंडमध्ये त्याच्या राणीला पाठवला असणारच. 

इंग्रज भारतामध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करीत होते. राजे इंग्रजांची ही चाल चांगलेच ओळखून होते. आपल्या दरबारात आलेला इंग्रज अधिकारी हा पाहूणा नसून गुप्तहेर आहे. त्याची भिरभिरती नजर काय शोधते आहे. राजांनी हे चाणाक्षपणे ओळखले होते... तो कुठची खबर काढण्यासाठी आलाय.

कशासाठी आला आहे .याची सुद्धा त्यांनी पारख केली होती.

राज्याभिषेकाच्या वेळी देवीचा गोंधळ घालण्यात आला.

उदे ग अंबे उदे ..उदे ग अंबे उदे...

उदे उदे उदे...

त्यानंतर भारुड. कीर्तन प्रवचन सुद्धा झाले. सर्वात शेवटी भजन झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या कला असणाऱ्या लोकांना तिथे संधी दिली गेली. त्याचप्रकारे त्यांना मानवस्त्रे आणि दक्षिणा व देणगी सुद्धा दिली. त्यांच्या बिदाग्या पूर्ण करण्यात आल्या. सर्वत्र आनंदी वातावरण होते. राज्याभिषेकाचा उत्सव सोहळा दिमाखात पार पडत होता.

६ जून सोळाशे १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला .त्यावेळी त्या दिवसापासून शिवाजीराजांनी नवीन कालगणना सुरु केली आणि नवा शिवराज्याभिषेक शक सुरू केला..

ते ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यापुढे सर्वांनी शिवाजी महाराजांना राजे म्हणायला सुरुवात केली होती. शिवाजीराजे आता जनतेचे पोशिंदे झाले होते त्यामुळे ते आपल्याला वरचढ ठरतील या भीतीने त्याने शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी नजराणा पाठवला नव्हता. उलट तो शिवाजीमहाराजांवर जास्तच चिडला होता.

राज्याभिषेकाच्या वेळी गागाभटांच्या आदेशाप्रमाणे छत्रपती बनलेल्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नीशी लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले होते. हीच प्रथा हल्ली काही वेळा आपल्याला पाहायला मिळते मात्र ती गोष्ट शिवाजीराजांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी केली होती.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या पुढे नंतर महाराष्ट्रामधील प्रथा म्हणून पुढे आल्या. त्याप्रमाणे लोक वागू लागलीत. एक समाज सुधारक या भूमिकेत शिवाजी महाराज शिरले होते. अनेक चांगल्या प्रथा, चालीरीती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचे वेळी निर्माण केल्या गेल्या होत्या. त्यानंतर जपल्या सुद्धा गेल्या होत्या. अर्थात त्याचा फायदा नंतर पुढील जनतेला झाला.

    शिवराज्याभिषेकाचा सोहळा आटोपला. गडावरचे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. शेवटच्या दिवशी गडावर समर्थ रामदास स्वामी आले . महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांना आनंद झाला. समर्थांचे दर्शन घडलं. राज्याभिषेकाच्या दगदगी मध्ये आईसाहेबांची प्रकृती बिघडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून राजांनी आईचे ऋण फेडले होते. रात्री आई साहेबांची प्रकृती आणखीनच बिघडली. रामदास स्वामींचे दर्शन घेऊन आईसाहेब शांतपणे पहूडल्या. त्याच रात्री आईसाहेबांनी या जगातून महाराजांचा निरोप घेतला. गडावर दुःखाची छाया पसरली. शिवाजी राजांच्या शोक तर अनावर झाला .त्यांच्या मनाचे बांध फुटले होत. त्यांना पोरकेपण झाले होते. संभाजीराजे सुद्धा ओक्साबोक्सी रडत होते. सोबत राजाराम राजे सुद्धा रडत होते.

 रामदास स्वामी गडावर येताच हे कसं काय घडलं. अशी चर्चा तिथे उमटली . रामदास स्वामींचे दर्शन शुभ की अशुभ याबाबत तिथे खल झाला. मात्र राजांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ते दुःखामध्ये बुडून गेले होते. मां साहेबांच्या आठवणीने राजांचे दुःख वाढले होते. त्यांचे अंतःकरण जड झाले होते. त्यांच्या मुखातून हुंदका फुटत होता. मात्र हळूहळू राजे सावरले आणि स्वराज्याच्या कार्यात पुन्हा सक्रिय झाले.... जिजाबाईंचा मृत्यू श्वास लागून झाला होता. त्यावेळी रात्रीची वेळ होती. आताच्या सारखे उपचार त्या काळी नव्हते. जर असते तर त्या रात्री जिजाबाई निश्चित वाचल्या असत्या. आता प्रमाणे ऑक्सिजन लावता आला असता तर... परंतु त्याकाळी रुग्णांसाठी ऑक्सिजनचा उपचार नव्हता. महाराजांच्या डोळ्यात दुखाश्रू साचले होते. गडावरच्या सर्वानाच जिजाबाईंचे असे एकाएकी जाणे. मनाला चटका लावून गेले होते...

छत्रपती शिवाजी महाराजांनी मदारी मेहतरला 32 मण सोन्याच्या सिंहासनाची व्यवस्था करण्यासाठी नेमले होते. त्यावेळी मदारी मेहतर सद्गदीत झाला. त्याला प्रेमाने जवळ घेऊन छत्रपती राजे म्हणाले.

मदारी तुझ्यामुळेच आज आम्ही सुवर्ण सिंहासनावर बसू शकलो .कारण तु नसतास तर दिल्लीतल्या आग्र्याच्या बंदिवासातून मी सुटलो नसतो... त्याचीच ही परतफेड .... हा सन्मान तु मोठ्या मनाने स्वीकार... शिवाजीराजांचे बोलणे ऐकून मदारी मेहतरच्या अंगावर मूठभर मांस चढले. त्याने शिवाजी महाराजांची विनंती मान्य केली...

शिवाजीराजांनी आपल्याजवळील लोकांची वतनदारी बंद केली. त्याबदल्यात पगारदारी चालू केली. राजांच्या सेवेत असलेले अधिकारी ,कर्मचारी आता वतनदार नव्हते तर पगारदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्या नंतर ' होन ' हे चलन वापरात आणले. त्याच होन चलना मार्फत त्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील म्हणजेच अष्टप्रधानमंडळातील मंत्र्यांना कोटी कोटी रुपये पगार दिले वार्षिक... म्हणजे अनेकांना तर आठ - आठ कोटी पगार होता. वार्षिक. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री मंडळाच्या निर्णयाने व सल्ल्याने राज्याचा कारभार चालवायचा. याची मुहूर्तमेढ घातली. मात्र हीच गोष्ट शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांना खटकत होती. कारण संभाजीराजांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय होती.

   मंत्रीमंडळ त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आडकाठी निर्माण करत होती. असा समज संभाजी राजेंना होता. त्यांचे आणि मंत्रिमंडळाचे अनेकदा खटके उडत. संभाजीमहाराज मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करत नाही. म्हणून अष्टप्रधान मंडळातील राजाराम महाराजांच्या बाजूचे मंत्री संभाजीराजांवर नाराज होते. ही गोष्ट संभाजी राजांसाठी पुढे खूपच घातक ठरली. संभाजी राजांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेक न करता त्यांचे भाऊ राजाराम महाराज यांना राज्याभिषेक केला गेला. त्यामुळे स्वराज्याच्या राजगादी मध्ये ठिणगी पडली. यामध्ये दोन गटांची भर पडली होती .एक संभाजी राजांचा गट आणि दुसरा छत्रपती राजाराम महाराजांचा गट. असे दोन गट शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्या वारसामध्ये निर्माण झाले होते. नंतर नंतर हे भांडण खूपच विकोपास गेले. जे मंत्री शिवाजी महाराजांच्या वेळी शिवाजी महाराजांसाठी जिवाचे रान करायला तयार होते .तेच मंत्री आता घरगुती राजकारण करू लागले.घरगुती राजकारणामुळे, मंत्रिमंडळातील राजकारणी मंडळींच्या स्वार्थ बाजीमुळे स्वराज्याची एकसंध फळी दुभंगली. ती कायम दुभंगलीच...

स्वराज्यातील मावळ्यांचा गनिमी कावा त्या वेळी खूपच नावारूपास आला होता.गनिमी कावा याचा अर्थ गुप्तकट किंवा शत्रूला फसवून ,बेसावध करून त्याचा धुव्वा उडवणे. आपल्याला अनुकूल पूरस्थिती निर्माण करून शत्रूला त्या परिस्थिती पर्यंत आणून नंतर शत्रूची दाणादाण उडवायची. असा या गनिमीकावा पद्धतीची एक पद्धत होती. गनिमी काव्याचे अनेक प्रकार होते आणि पद्धतीसुद्धा होत्या. प्रसंगानुरुप आणि परिस्थिती अनुरुप भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन आयत्या वेळी कोणती गनिमीकावा पद्धती युद्धासाठी वापरायची याचा निर्णय घेऊन त्या प्रकारे गनिमी कावे करणारे मावळे किंवा सैनिक त्याचा वापर करीत आणि विजय प्राप्त करीत... यासाठी गनिमी काव्याचे प्रशिक्षण देणारी संस्था शिवाजी महाराजांकडे होती. त्याच्याच सहाय्याने शिवाजी महाराज नवनवीन गनिमी काव्याचे अनोखे शिक्षण आणि प्रशिक्षण तरुणांना देत.

यामध्ये जे तरुण गनिमी काव्याचे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असत त्यांच्या याद्या तयार केल्या जायच्या. त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र दिलेली आहेत यांची सुद्धा माहिती गनिमी काव्याच्या प्रशिक्षण वर्गामध्ये ठेवलेली असायची. ती माहिती खूपच अद्यावत असायची... शिवाजी महाराज अनेकदा स्वतःहून अशा तरुणांना त्या प्रमाणे बोलून शिक्षण देऊन आणि प्रशिक्षणाच्या वेळी अनेक बारकावे व विविध गोष्टी सांगून त्यांचे समुपदेशन करीत असत. आज कालच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये शेवटच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी ज्या प्रमाणे प्रशिक्षण संपल्यावर शुभेच्छा द्यायला अथवा त्यांचे कौतुक करायला जसे नामवंत लोकं प्रक्षिक्षण गृहात येतात. त्या प्रकारे शिवाजी महाराज नवीन तयार होणाऱ्या मावळ्यांवर दुरून लक्ष ठेवून होते. त्यांची पारखी नजर नवीन प्रशिक्षण घेतलेल्या मावळ्यांना हेरून ठेवायची. नंतर वेगवेगळ्या लढाईच्या वेळी त्यांचा उपयोग कुठे कसा करायचा हे ठरवून ठेवायचे. तशी सूचना ते जुन्याजाणत्या मावळ्यांना देऊन ठेवत.


Rate this content
Log in