Chandrakant Pawar

Others

2.6  

Chandrakant Pawar

Others

श्रीराम अध्यात्मिक पर्यटक होते

श्रीराम अध्यात्मिक पर्यटक होते

3 mins
101


भगवान प्रभू श्रीरामचंद्र एक कुशल संघटक होते. असे म्हटले तर कोणाचे कान टवकारले जायला नकोत. ही गोष्ट खरी आहे. प्रभू श्रीरामचंद्र संघटना तयार करण्यात व प्रशिक्षण देण्यात उत्तम व्यक्तिमत्व होते. श्री प्रभू रामचंद्र समाजातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या सहाय्याने आपल्या अपहरण झालेल्या प्रिय पत्नीचा शोध घेत होते. त्यामध्ये वानर सेना आघाडीवर होती. श्री हनुमान बलशाली शक्तीचे प्रतीक होते. वाली होते. सुग्रीव होते. या सर्वांची संघटना तयार करायला प्रभू रामचंद्रांना खूपच कष्ट पडले असणार. वाली आणि सुग्रीवाला आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले होते. इतकेच नव्हे तर खारुताईला सुद्धा त्यांनी आपल्या कडे आकर्षित केले होते. खारुताई सुद्धा रामसेतू बनवण्याच्या कार्यामध्ये आघाडीवर होती. 

  जटायू पक्षी सुद्धा श्री रामचंद्रांना मदत करण्यास तयार झाला होता. अनेक लहान-मोठे वानर सुद्धा होते. अहिल्या नावाची शिळा सुद्धा होती. म्हणजे दगड-गोटे नदी भूमी सर्व श्रीरामाला सीता मातेचा शोध घेण्यास सहाय्य करत होते. सिताई भूमीची मुलगी होती. शेतात सापडलेली मुलगी. तिचा सांभाळ जनक राजाने केला. त्यामुळे तिला जानकी असे ओळखले जाते. जनकपुर हे नेपाळ मध्ये आहे. सितामाताई नेपाळची राजकन्या होती. सितामाई भूमिकन्या असल्यामुळे तिला झाडे,झुडपे,वेली, क्म दगड धोंडे,खडक, जलचर, पक्षी,प्राणी, नद्या-नाले पर्वत यांची. 

श्रीराम वनवासात असताना प्राणी, पक्षी, निसर्ग यांना प्रभू रामचंद्रा बद्दल प्रेम निर्माण झाले होते. त्यांची संघटना श्रीरामचंद्रांनी तयार केली होती. हे साधे काम नव्हते. त्यासाठी उत्तम संघटन कला आत्मसात असायला लागते. ती कला श्रीरामाकडे होती. श्रीरामांचा विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय तेरा वर्षे होते.सीतेचे वय सहा वर्षे होते. त्यांच्या लग्नानंतर सीतामाता बारा वर्ष तिच्या माहेरी म्हणजे राजा जनकाकडे राहत होती. तिच्या वयाला १८ वर्षे झाल्यानंतर ती अयोध्या मध्ये आली. श्रीराम उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना त्यांनी अनेक प्रकारचा अध्यात्मिक प्रचार केला आणि कुशल संघटना बांधली.दक्षिणेकडे श्रीराम कुणाला फारसे माहिती नव्हते.तुळशीदासांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथाद्वारे श्रीरामाचा प्रचार दक्षिणेकडे केला. अख्ख्या जगात केला. तशी तुळशीदासांची कथा फार वेगळी आहे. तुळशीदासांची पत्नी तुळशीदासांना एक दिवस म्हणते की तुम्ही माझ्या मध्ये गुंतून घरीच आहात. जरा घराबाहेर पडा आणि बघा.त्यामुळे तुळशीदास घरा बाहेर पडून  तुलसी रामायण लिहिले आणि त्याचा प्रसार झाला.

प्रभू श्री रामचंद्र हे शक्तिमान होते.त्यांनी शंकराचे शिवधनुष्य सीता स्वयंवराच्या वेळी उचलले आणि तोडून टाकले.ते प्रचंड वजनाचे होते. ते परशुरामाने जनक राजाला शिवधनुष्य दिले होते. श्रीशंकराने श्री परशुरामांना दिले होते .शंकराच्या त्या धनुष्यबाणाचे नाव पिनाक होते. शंकर परशुरामाचे गुरू होते. महापराक्रमी रावणाचे नाव भगवान श्री शंकरांनी ठेवले होते. रावण मोठा शिवभक्त होता. त्याने अनेक पुस्तके लिहिली होती. तो उत्तम वैज्ञानिक होता. तो नाडी परीक्षेत प्रवीण होता. रावणाने आपल्या राज्यामध्ये शनीला बंदी करून ठेवले होते. तसेच अनेक देवांना सुद्धा त्याने त्याच्या कैदेत ठेवले होते.

श्रीरामाने स्वतःच्या तीन भावंडांना संघटित करून घेतले होते.त्यात लक्ष्मणाला तर जरा जास्तच श्रीरामाचा लळा होता. श्री भरताने तर प्रभू रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य कारभार करायला सुरुवात केली होती. त्याच्यासोबत शत्रुघ्न होता. ते वेगवेगळ्या मातेंचे चार भाऊ होते. सावत्र, परंतु सख्ख्या भावाप्रमाणे ते एकमेकांवर प्रेम करत होते.

१४ वर्षे वनवासाला निघाल्यानंतर सोबत सीता मातेला घेऊन ते जंगलात आले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी श्रीराम वनवासाला गेले. त्यावेळी दहा वर्ष त्यांनी दंडकारण्यात वास्तव्य केले. जंगलामध्ये भटकंती करत करत अनेक ठिकाणी फिरले. एक प्रकारे त्यांचे पर्यटन सुरू झालं. पर्यटनातून त्यांनी स्वतःचे अनेक मित्र निर्माण केले. मात्र रावणासारखा कट्टर दुश्मनही पैदा झाला होता. जंगलातून फिरत फिरत राम सीता लक्ष्मण मजल दरमजल करीत होते.नैसर्गिक रंगमंचावर चालत ते तिघेही पर्यटन करीत होते. ते तिघेही त्यावेळचे पर्यटक होते. श्री रामचंद्र हे अध्यात्मिक पर्यटक होते. ऋषींना ते यज्ञात मदत करीत. वनवासात फिरत.  

श्रीरामाची वाट बघत थांबलेली रामभक्त शबरीची उष्टी बोरे चाखून त्यांनी रानमेव्याची चव घेतली होती. त्याचे त्यांनी उदाहरण घालून दिले होते. जंगलातील दुर्लक्षित फळांना शोधून त्यांनी स्वतःची नावे त्यांना बहाल केली होती. रामफळ आणि सिताफळ अशा मधुर फळांचा शोध त्यांनी लावला होता. फळांना लोकांनी ओळखावे म्हणून स्वतःचे नाव दिले होते. सीताफळा पेक्षा रामफळ मोठे असते.ते पिवळसर रंगाचे असते. रामफळ गोड खारट रामफळ औषधी फळ होते. त्या फळाचा औषधी गुण श्रीरामाला माहीत होता. गंभीर आजारात हे फळ खूपच उपयोगी पडते ते फळ गंभीर आजार दूर करते.सीताफळ हे हिरव्या रंगाचे असते. सीताफळ सुद्धा औषधी आहे. महाराष्ट्रा मध्ये सीताफळाची शेती केली जाते .त्याचे पीक सुद्धा भरपूर येते. बोरे, रामफळ, सिताफळ हा रानमेवा होता. त्याची ओळख त्यांनी जगाला करून दिली. विविध प्रकारची कंदमुळे त्यांनी शोधली होती. रामकंद हा त्याचाच एक प्रकार आहे. त्याचीसुद्धा जगाला ओळख करून दिली. जमिनीमध्ये दोनतीन फूट खोल तो असते. मोठ्या फणसाच्या आकाराएवढे कंदमूळ जमिनीत असते.  


Rate this content
Log in