छ.शिवाजी उत्तम प्रशिक्षक होते.
छ.शिवाजी उत्तम प्रशिक्षक होते.
प्रस्तावना:
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून असल्याचे लोकांना माहित नाही. स्वराज्याच्या इतिहासाच्या पानांमध्ये शिवाजी महाराज हे सर्व जनतेला, मावळ्यांना ,त्यांच्या सरदारांना रायगडावरून शिकवत होते. सुरुवातीच्या काळामध्ये राजगडावरुन ते अनेक सरदारांना मार्गदर्शन करत होते. त्यानंतर जसा जसा राज्याचा कारभार वाढला .
तसा तसा त्यांनी रायगड किल्ल्यावरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्यावर असलेल्या त्यांच्या किल्लेदाराला दूरवरून शाळेतल्या वर्गाप्रमाणे शिक्षण शिकवले. आणि प्रशिक्षित सुद्धा केले होते. थोडक्यात स्वराज्याच्या शाळेतील शिवाजी महाराजांचे शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय रायगडावर होते. त्यांनी जिंकलेले किल्ले अगदी कुलाब्यापासून रायगड रत्नागिरी अगदी उत्तरेपर्यंत तंजावर खानदेशपर्यंत शिवाजीराजांच्या स्वराज्याचा विस्तार झाला होता. त्या सर्वांना शिस्तीत ठेवण्यासाठी राजे स्वतः प्रशिक्षक आणि शिक्षक बनले... शिवाजी राजांच्या जीवनाचा हा आणखी एक नवा पैलू जसा दिसला तसा तो वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केला. एक जून रोजी शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केला. त्याचे औचित्य साधून सदर लिखाण पूर्ण करण्याचा योग आला. यात खूप समाधान वाटले...
....शिवाजीराजांच्या या पराक्रमाला माझ्यासारख्या विद्यार्थी पामराचा मानाचा मुजरा.....
-------------------------------------------------------------------
परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना शिकवले होते. त्यांना प्रशिक्षित केले होते .त्याच प्रमाणे छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे दुसरे पुत्र होते .त्यांनाही त्यांनी शिकवले. प्रशिक्षित केले. छत्रपती शिवाजी राजांनी अख्ख्या महाराष्ट्राला लढायला शिकवले.... स्वराज्यवाद ,राष्ट्रवाद यांची शिकवण त्यांनी दिली. राष्ट्रवादाचे प्रशिक्षण त्यांनी घडवलेल्या इतिहासातून दिले. ज्वलंत राष्ट्रप्रेम कसे असते.
याची शाळाच त्यांनी जणू स्वराज्यामध्ये भरवली होती. त्यातून निरनिराळे मावळे विद्यार्थीरत्न रूपाने शिकून बाहेर पडले होते...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा विचार आला कसा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा विचार येण्यासाठी कारणीभूत आहेत .छत्रपती महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले.ते शिवाजी महाराजांसमोर प्रेरणास्थान म्हणून उभे होते..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर दोनदा त्यांनी बंड केले होते. ते बंड नंतर बादशहाने मोडून टाकले . त्या बदल्यात शहाजीराजेंना मोठी किंमत चुकवावी लागली . त्यांचे बंड दडपून टाकण्यात आले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे रोहीडेश्वराचे गड घेण्याचे महाकार्य होतं . त्याचा सर्वांनी प्रथम धसकाच घेतला तसे करण्याला अनेक लोकांचा विरोध होता. वयस्कर मंडळीच्या मनात तर धडकी भरली होती. बादशहा मोठी कारवाई करील. तो जाळपोळ करील. अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती .परंतु त्यांना धीर देत शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वर गडावर स्वारी केली. तो गड ताब्यात घेतला . पहिल्याच धडकेत रोहिडेश्वर गड स्वराज्यात आणला. ते बघून सर्व मावळ्यांचा उत्साह वाढला. हे असले महाप्रचंड कार्य करताना शिवाजीीमहाराजांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. महाराजांनी रोहिडेश्वराची पूजा केली. परंतु लिंबू मिरच्या बांधून त्याची अंधश्रद्धा बाळगली नाही. कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला नाही. मावळ्यांना सुद्धा त्यांनी तशीच चांगली सवय लावली. हे सर्व त्यांच्या शिक्षणामुळे झाले आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडेश्वर गड प्रथम जिंकला . पाठोपाठ तोरणा गड जिंकला. तोरणा गडावर शिवाजी महाराजांना धन सापडलं. धनाची बातमी त्यांना सांगितली तानाजी मालुसरे यांनी.
तेव्हा महाराज म्हणाले तानाजी तुम्हीच घेऊन या ते धन.
मात्र तानाजी म्हणाले. नाही मी नाही येणार तुम्ही चला. माझ्यासोबत
तेव्हा शिवाजी महाराज तानाजीला म्हणाले .
अरे मला खबर कोणी सांगितली गडावर धन सापडल्याची तूच ना. मग तूच घेऊन ये. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे . मावळ्यांच्या पहाऱ्यात धन महालात आलं...मग शिवाजी महाराजांच्या मागे साक्षात भवानीदेवी उभी आहे. असा एकच जल्लोष झाला. जय भवानी. जय शिवाजी नारा गुंजला.
