End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Ashutosh Purohit

Inspirational


3  

Ashutosh Purohit

Inspirational


"चार युक्तीच्या गोष्टी"

"चार युक्तीच्या गोष्टी"

1 min 8.8K 1 min 8.8K

तो: जर प्रेमात पडून, आपण तिला कधी विचारूच शकणार नसू, तर का पडायचं प्रेमात? आयुष्याच्या शेवटी जर लग्नाच्या बायकोबरोबरही interpretations आणि expectations च्या जंजाळात प्रेम करणंच हरवणार असेल, तर का करायचं लग्न?
 ती: इथे आलेल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी मरायचंय... तरीही, जगतोच ना रे तो? तेही धडपडीने? मग का जगतो माणूस? मरून जावं ना प्रत्येकानेच!
 तो: कारण, त्याला दुसरा काही पर्याय नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला मरणाची भीती वाटते.
 ती: नाही.
 तो: मग?
 ती: त्याला जगायला आवडतं. तुला आवडतं, मला आवडतं! इथे, "जो आला, तो रमला!"
 तो: पण या सगळ्यामागे logic काय?
 ती: स्वतःची आवड!
 तो: म्हणजे, स्वतःला आवडतं, म्हणून अशा निरर्थक गोष्टी करत राहायच्या?
 ती: नको करूस तू! तुला कोणीच बंधन केलं नाहीये! खरंच! अगदी genuinely सांगत्ये. तू या गोष्टी केल्या नाहीस, तर लोकांना काही फरक पडणार नाहीये.. आणि केल्यास, तरी पडणार नाहीये...
 तो: मग ?
 ती: फरक पडणारे तो तुला.. तुझ्या आयुष्यात "सुखाची गोळाबेरीज" करताना! बाकी सगळे जातील, त्यांचे आनंदाचे क्षण घेऊन पुढे! तू मात्र मागेच राहशील.. स्वतःचं "का?" हे प्रश्नचिन्ह कुरवाळत. अन् स्वतःच्या मनाला मारत. बघ. विचार कर.

 ती पुन्हा मागे गेली.. अनेक शिंपले किनाऱ्यावरंच सोडून!

 तो समुद्रकिनाऱ्यावर बसला होता.
 ती त्याची पावलं स्वच्छ करत, त्याला "चार युक्तीच्या गोष्टी" सांगत होती.
 येणाऱ्या प्रत्येक लाटेपाशी तो मोकळा होत होता.
 


Rate this content
Log in

More marathi story from Ashutosh Purohit

Similar marathi story from Inspirational