STORYMIRROR

Ujwala Rahane

Inspirational

4  

Ujwala Rahane

Inspirational

बोल अनुभवाचे

बोल अनुभवाचे

3 mins
380

   आठ मार्च आपण महिला दिन म्हणून मस्त साजरा करू या तुला आवडते ना व्यासपीठावरून भाषण करायला? अभिषेक नम्रताला मनवत होता. पण नम्रता ढिम्म... अचानक हात दुखायचे निमित्त घरगुती उपाय. परत मेडिकल उपाय चाचण्या आणि निष्पन्न कॅन्सर? सतत अ‍ॅक्टिव्ह असणारी नम्रता कोमेजली. डॉ. सांगितले. फस्ट टेज बऱ्या होणार. वेळीच लक्षात आले. परमेश्वराचेच आभार.


  किमोथेरपी, औषधोपचार चांगलाच रिस्पॉन्स मिळत होता. सगळे उपाय सुरू होते. पण शरीर साथ देत होते पण नम्रता मनाने खूप खचली होती.

तिचा उत्साह मावळला होता. ना मुलांकडे लक्ष ना अभिषेककडे.  स्वच्छता, टापटीप व सोशलवर्कची आवड असणारी नम्रता सतत मुलांची काळजी करणारी आता नुसती पडून राहत होती. मुले केविलवाणे होऊन मुले आईकडे आशाळभूत नजरेने पाहत पण, या सगळ्याचा तसूभरही परिणाम नम्रतावर होत नव्हता. मुले व अभिषेक हवालदिल झाले होते. शेवटी काहीही करून या परिस्थितीतून तिला बाहेर काढायचेच अभिषेकने मनोमन ठरवले. 


  तिच्या मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने आठ मार्च महिलांदिंनाचे औचित्य साधून एक सुंदर कार्यक्रमाचे त्याने आयोजन केले. आणि छोट्या मोठ्या स्पर्धा व सहभोजन ठेवले. पण फक्त आता नम्रताची उपस्थिती अनिवार्य होती. आज या निमित्ताने तिला बोलायला तो भाग पाडणार होता. आठ मार्च उगवला. अभिषेकच्या मनाची चलबिचल. तयारी तर पूर्ण झाली. पण नम्रताला मनवणे खूप कष्टाचे काम होते. ही जबाबदारी नम्रताची जिवश्च कंठश्च मैत्रीण अनुजाने उचलली. गणेशाची माफी मागून ती नम्रताकडे पोहोचली. 


 वेगळ्याच शैलीत ती म्हणाली. नमू मी अजुन काही घरी बोलले नाही. पण त्याआधी तुझ्याशी मला बोलावेसे वाटले कसं सांगू, पण मला पण थोडाफार फरकाने तुझेच सिम्प्टम्स माझ्यामध्ये दिसतायेत. म्हणून आले तुझ्याकडेच बोलू नको इतक्यात कोणाला. पण करशील का तू मला मदत गुपचूप जाऊन आपण टेस्ट करून घेऊ तू येशील माझ्याबरोबर? 


   बापरे परत तीच पुनरावृत्ती? नम्रता क्षणभर स्थब्द झाली. तिच्या डोळ्यासमोर अनुजा, तिची दोन चिमणे आणि तिचा नवरा आणि त्यांची अवस्था हा चित्रपट आला. जणूकाही आपलीच व्यथा? अचानक ती ओरडली नाही अनुजा असे होता कामा नये. चल ताबडतोब मी येते तुझ्याबरोबर मी जे भोगले ते तुला नाही भोगु देणार. पण नमु एक काम आहे. आज महिलादिन, मला एका ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करायचे आहे. तो रोल तू निभावशील कारण माझी मनःस्थिती पाहता मला नाही वाटत मला शक्य आहे?

अगॆ मी तर काहीच तयारी केली नाही. खूप दिवस झाले याचा विचार पण केला नाही मला तरी कसे जमेल?

नम्रता तुला काहीच अशक्य नाही. फक्त तू मनावर घेतले पाहिजेस बस्स. चल लाग तयारीला. तो कार्यक्रम आटोपून माझ्याबरोबर येशील ना तू हॉस्पिटलला? 


नम्रता निरुत्तर झाली. पण तिला आपण जे भोगले ते तिला अनुजाला भोगू द्यायचे नव्हते. कारण ती सच्च्या दिलाची मैत्री होती. कुठेच स्वार्थाचा लवलेशही नव्हता. नम्रता तयारीला लागली. एकेक मुद्दे कागदावर उतरले. अध्यक्षीय भाषण तयार झाले. अगदी मुद्देसूद.


आपण कोण होतो, काय झालो याचा ती विचार करू लागली. निराश मनाची लक्तरे तिने दूर लोटली. आशावादी मनाने तयार होऊन, अभिषेकला म्हणाली, मला गाडीची चावी देशील? एका महत्वाच्या कामगिरीवर मला जायचे. एक आगळावेगळा रोल मला निभावायाचा आहे. येतोस का तू ही माझ्याबरोबर? अभिषेक नम्रताचे बदललेले हे रूप अचंबित होऊन बघत होता...


खरंच कधीकधी आपल्या माणसाच्या भल्यासाठी खोटे बोलले तर पाप नसते ना... अनुजा गणेशापुढे हात जोडून विनवणी करत होती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational