STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Inspirational

3  

Sumit Sandeep Bari

Inspirational

बोधकथा

बोधकथा

2 mins
329

     एका गावात मंदिर बनत होते, त्या मंदिरात मूर्ती बनवण्याचे काम राजू मूर्तिकाराला देण्यात आले होते. त्याला सांगण्यात आले होते की , आपले मंदिर लहान आहे म्हणून मूर्ती लहान हवी पण मजबूत व वजनदार हवी हे सांगितल्यावर मूर्तिकार जंगलात गेला . तेथे तो मजबूत व वजनदार दगड शोधू लागला त्याला जसाच दगड सापडला त्याने लगेचच तो दगड घरी आणला व मूर्ती बनवू लागला . त्याने हतोडा व छिन्नी दगडाला मारताच दगडातून आवाज येऊ लागले "थांबून जा थांबून जा" मूर्तिकार आजू-बाजू बघू लागला पण त्याला तेथे कोणीही दिसले नाही. त्याने परत आपले काम सुरू केले पण पुन्हा आवाज येऊ लागला, मग त्याला समजले की हा तर दगडच बोलत आहे. तो आश्चर्यचकित झाला व विचार करू लागला की, दगड कसा बोलू शकतो. मग तो दगडच पुन्हा बोलला की, "आज तू मला बोलायला मजबूर केले." मूर्तिकार विचार करु लागला कस काय? तेव्हा दगड पुन्हा म्हणाला, "तू मला हतोडा का मारत आहेस? मला वेदना का देत आहेस? मूर्तिकार विचारात पडला मी मूर्ती बनवत आहे यापासून याला त्रास होत आहे, मग त्याने विचार केला याला जाऊ देऊ. त्याने त्या दगडाला बाजूला ठेवले व जंगलात दुसरा दगड शोधायला निघुन गेला.


         त्याला दगड सापडताच त्याने तेथेच तपासून घेतले की या दगडातून पण आवाज येत नाही ना, तपासल्यावर त्याच्या लक्षात आले की या दगडातुन कोणताही आवाज येत नाही आहे. मग त्याने लगेच त्या दगडाला घरी नेले व त्यापासून एक सुंदरशी मूर्ती बनवली. दोन दिवसानंतर ज्यांनी मूर्ती बनवायचे काम दिले होते ते लोकं आले व म्हणाले मूर्तिकार भाऊ मूर्ती तर तयार आहे ना? तेव्हा राजू मूर्तीकार म्हणाला हो भाऊ मूर्ती तर दोन दिवसा पहिलेच तयार आहे. चार लोकांनी मूर्ती गाडीत ठेवली व पाचव्याने विचार केला की मूर्तीच्या खाली नारळ फोडायला दगड हवा, त्याने एक दगड उचलला तो दगड तोच होता ज्याच्यातून आवाज येत होते.


         आता मूर्ती मंदिरात ठेवली गेली व त्याच्या खाली या दगडाला ठेवले गेले. रोज मूर्ती बनलेल्या दगडाचे पाणी , दूध याने स्नान व्हायचे व त्या दुसऱ्या दगडावर नारळ फोडले जायचे, एक दिवस नारळ फोडणारा दगड मूर्ती बनलेल्या दगडाला विचारू लागला भाऊ आपण तर एकाच जातीचे आहोत, तूही दगड मीही दगड तर तुला इतकी सेवा आणि मला इतके कष्ट का? तेव्हा मूर्ती बनलेला दगड त्या दगडाला म्हणाला भाऊ मी आधी कष्ट सहन केले, त्यामुळे मी आज राजाचे जीवन जगत आहे, मला सेवा मिळत आहे. तू अगोदरच आरामाचे जीवन जगले कष्ट सहन केले नाही म्हणून तुला असे जीवन जगावे लागत आहे. जर तू कष्ट सहन केले असते तर तू आज माझ्या जागेवर असला असता.


तात्पर्य: घनाचे घाव खाल्ल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational