Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Prashant Shinde

Inspirational

3.2  

Prashant Shinde

Inspirational

बोध...!

बोध...!

2 mins
16.5K


बोध...!

एकोणीसशेहे एकोणनव्वद ची गोष्ट.दुपारचे पावणे दोन वाजले होते.पोटात कावळे ओरडत होते. पुण्यातल्या टिळक रोड वरील बादशाही खानावळीत मला जेवायला जायचे होते.मेम्बर असल्या मुळे बाहेर कोठे जेवण्याचा पर्याय त्यावेळी उपयोगाचा नव्हता. खिश्यात बंदा रुपया पण असायचा नाही.

नशीब माझे फुटपाथवर परीक्षा घेण्यासाठी उभे होते मला माहित नव्हते.मी पटकन सायकल फुटपाथवर चढवली तेवढ्यात समोरून एक म्हातारा सद्गृहस्थ आला.ब्रेक लावला आणि खाली पाय टेकले.

पुणेरी अहंकार प्रज्वलित होऊन भडकला, अहो फुटपाथ माणसांसाठी आहे!त्याने खडसावले.

क्षणभर काय झाले कळाले नाही.त्यांना धक्का पण लागला नव्हता आणि भडकण्याचे तसे काही कारण ही नव्हते.

इतक्यात माझ्या तोंडून एक सहज वाक्य बाहेर पडले

,मी इतकेच सहज म्हणालो..आपण कसे वरून..?

आणि लगेच सायकल पार्किंग मध्ये लावून खानावळीत शिरलो.

जेवण वगैरे करून मी बाहेर पडलो तोपर्यंत तो गृहस्थ बाहेर माझी वाट पहात थांबला होता.मी जसा बाहेर आलो तसे त्याने मला गाठले आणि इतकेच सांगितले,

बाळ, मी माणूसच आहे म्हणून फुटपाटवरून जात होतो.तू सायकल फुटपाथवर आणलीस म्हणून मी तुला बोललो.

मी म्हंटल असुदे,इतकं सांगण्यासाठी कशाला तसदी घेतला?माझी चूक माझ्या लक्षात आली पण पुणेरी माणसाला तिथेच चेपल्याचे समाधान त्यावेळी मला मिळाले ते फार कौतुकास्पद वाटले कारण ,कारण नसताना हिडीस फिडीस करण्याची त्यांची तोऱ्यातली वागणूक मला खटकली होती.

आजही मला तो म्हातारा आठवतो आणि तो प्रसंगही आठवतो तेंव्हा माझ्यात झालेली सुधारणाही बरेच काही सांगून जाते.त्या दिवसापाससून मी एकदाही फुटपाथवर सायकल चालवली नाही,फक्त नकळत त्या म्हाताऱ्याच्या आठवणी साठी मी ते व्रत जपले आहे.

इतक्या दिवसानंतर ही ते व्रत अजूनही चालू आहे.आता सायकल निघून गेली पण फुटपाथवर चालताना त्यांची आठवण मात्र माझी साथ करते आणि बरे वाटते...!


Rate this content
Log in

More marathi story from Prashant Shinde

Similar marathi story from Inspirational