भटकणारा आत्मा
भटकणारा आत्मा


एकदा आम्ही सर्व मित्र सहलीवरून रात्रीच्या वेळी मुंबईला परत येत होतो. आमचा प्रवास कारमधून सुरु होता. वेळ रात्री दोनची होती. आम्ही सर्व झोपेत होतो. राष्ट्रीय महामार्गावरून कार सुसाट धावत होती. थंडगार हवेची झुळक काचेतून आत येत होती. महामार्ग संपला आणि वळणावळणाचा घाट सुरू झाला. ड्राइवर अनुभवी असल्याने गाडी वळणे घेत धावत होती. आजूबाजूला गडद अंधार पसरलेला होता. मागची वाहने वेगाने धावत होती. घाटाला लागून मोठी दरी होती. त्यामुळे वाहन चालक सतरकतेने वाहन चालवत होता. तेव्हा अचानक
एक भले मोठे रान डुक्कर आडवे आले आणि अचानक गाडीचा ब्रेक दाबला. पण गाडी कंट्रोल न होता रस्त्याला उभ्या असलेल्या झाडाला ठोकली. पण सुदैवाने सर्वच वाचले. नंतर ड्रायवरने गाडी अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या गॅरेजमधे आणली. मेकॅनिकला गाडी दाखवली. नुकसान काही झाले नव्हते.
परंतु त्या इसमाने फार भयानक अनुभव सांगितला की तुमचे नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात. तिथे एका विवाहितेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यात तिचे बाळ वाचले होते. त्या बाळासाठी तिचा आत्मा त्या जागेत भटकत असतो व त्याचा तुमच्या सारख्या लोकांना त्रास होत असतो. अशाप्रकारे तिथे नेहमी अपघात होतात आणि एक तरी जीव जातोच जातो. तो जीव कधी गाय होतो, कधी सुंदर स्त्री तर कधी रान डुक्कर होतो. त्यामुळे तिथे कधी ही गाडी थांबवू नये. अमावस्येला तर तो जीव वेगवेगळ्या अवस्था प्राप्त करतो. वेगवेगळे आवाज काढतो. त्या जीवाचा आत्मा ठराविक वेळेत भटकतो. त्या वेळेत कुणी सापडले तर त्यांना नुकसान पोहचवतो.
आम्ही त्वरीत तेवढ्याच वेगाने घरी पोहचलो पण आजही तो भय कंपित अनुभव अविस्मरणीय होता.