प्रेमातील घटस्फोट-कथा
प्रेमातील घटस्फोट-कथा


"प्रेमातील घटस्फोट"-कथा
तिचे लग्न होऊन एक वर्ष झाले होते. तिचा नवरा एका सरकारी नोकरीत होता.ती देखील एका नामांकित कंपनीत कामाला होती. सुखाचा संसार चालू होता. कुटुंबात कुठलीही अडचण नव्हती. घरात दोघेच असल्याने सुख दुःख वाटून घेत होते. एकमेकांच्या विचारांचा आदर असायचा. सर्व काही सुरळीत चालले होते. गावाकडे शेती व घर होते. शहरात राहून त्या दोघांनाही गावाकडचे खूप आकर्षण होते. त्यामुळे ते दोघेही महिन्या दोन महिन्यातून गावाकडे जात असे. तेथील रात्रीची थंड व शुद्ध हवा त्यांना मानवायची.
उन्हाळ्याचे दिवस होते.गावी जाण्यासाठी तिच्या सुटट्या संपल्या होत्या. त्यामुळे आता दोघे जाण्याऐवजी तिचा नवरा गावी गेला होता. गावच्या काही मित्रानी बरेच दिवसांनी भेट झाली म्हणून एका बियरबारमध्ये जाऊन पार्टी करायचे ठरवले. तिच्या नवऱ्याने परत शहराकडे जायचे असल्याने नकार दिला होता. दारू पिऊन मी मला ड्राईविंग करता येणार नाही असे सांगितले होते; पण ते काही ऐकायला तयार नव्हते. तू थोडीच पी आम्ही तुला जबरदस्ती करणार नाही असे सांगून दारू पिण्यास भाग पाडले. जर दारू पिली नाही किंवा पाजली नाही तर मित्र दुरावतात.ते सर्व एकाच गावचे असल्याने त्यांचे मन राखावे लागले. संध्याकाळी रात्री आठपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत ती मंडळी बेशुद्ध होईपर्यंत दारू पिले होते. बियरबारचे बिल तिच्या नवऱ्याकडून भरले. गावचे मित्र दुचाकीवर बसून घरी गावात पोहचले होते. तिचा नवरा नशेत रात्रीची गाडी चालवत होता. त्याचा तोल सुटला होता. अनेक गाड्याना त्याने ओव्हरटेक केले होते. गाडीचा वेग आवश्यकतेपेक्षा वाढला होता.
अचानक ताबा सुटला व कार एका झाडाला जोरदार जाऊन धडकली.त्यात त्याचा मेंदू फुटून साफ झाला होता. त्याला तेथून उचलून दवाखाण्यात वाचविण्यासाठी प्रयत्न केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. ही बातमी परत त्याच्या गाववाल्याना कळली.त्यांनी ताबडतोब त्यांच्या पत्नीला फोन करून दुःखद बातमी कळवली.तिला अश्रु आवरेना. तिच्या आयुष्यात हा फार मोठा धक्का होता. शेवटी गावाकडे तिच्या नवऱ्याला अग्नीडाग देण्यात आला. दहावे, तेरावे गावाकडेच केले. ते सर्व आटोपुन परत मुंबईला आली. तिचे स्वतःचे घर होते. तिच्या पतीची पेंशन होती. तरीपण तिला आधाराची गरज होती. तिच्या कंपनीत एक बिन लग्नाचा मुलगा होता. तोही तिथेच कामाला होता. त्याला तिच्या नवऱ्या ची मृत्युची माहीती होती. त्याने तिला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन दिले. तिलाही विश्वास वाटला. बरेच दिवस तो तिला भेटावयास येत होता. त्यातून मैत्री वाढली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. बरेच दिवस ते बिन लग्नाचे एकत्र राहू लागले. पण तो संशयी तेव्हढाच होता. ती कुणाशी कामासाठी बोलली तरी तिला मारझोड करीत होता. शेवटी ती कंटाळली व तिचा प्रेमाचा निर्णय बदलला व एकटी राहू लागली. तिला तिचे जगण्याचे स्वातंत्र्य हवे होते ते तिला मिळाले. ती आता खूप खंबीरपणे एकटी राहते. तीच तिचा मजबूत आधार झाली .काळाबरोबर ती आता सक्षम झाली होती. प्रेमाचा घटस्फोट घेतल्याने ती वेळीच सावध झाली व मुक्त झाली.