निराधार
निराधार


निराधार
तिला लग्न होऊन दहा वर्षे झाली होती. दोन मुली झाल्या होत्या. परंतु नवऱ्याला दारुचे व्यसन होते. ते एक निमित्त होते कारण ती नवऱ्याच्या काही गोष्टी ऐकत नव्हती. त्याला तिच्या अति स्वातंत्र्याचा कंटाळा आला होता. त्याच्यासमोर ती अनोळखी मुलांबरोबर तासनतास गप्पा मारायची. पतीप्रेम तिने कधी केलेच नाही. त्याची आतून घुसमट झाली होती. त्याच्या समोर ती अनोळखी माणसाना स्पर्श करायची. नवऱ्याला शरीर स्पर्शही करून देत नव्हती. इतकी ती बेईमान झाली होती. त्याच्या विरोधात तिने पोलिस तक्रारही केली होती. तो मानसिकदृष्टया त्रासलेला होता. त्याला जीवन नको नकोसे झाले होते.आपल्या नवऱ्याशी मारक्या जनावरासारखी कायम रागात असायची. त्यामुळे तो अति दारू प्यायला लागला. वेळेवर जेवण करत नसे. त्याला ते जीवन नकोसे वाटू लागले. पत्नी म्हणून तिने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. तिला तो मुळातच आवडत नव्हता ; पणआईवडिलांच्या धाकामुळे तिने जबरस्तीने लग्न केले होते. त्याचे मात्र तिच्यावर खूप प्रेम होते. पण तिचे मन इतरत्र भटकत होते. तो कामावरून आल्यावर त्याला साधे पाण्यालासुद्धा विचारत नव्हती. त्यामुळे तो अजूनच चिडायचा. महिन्याचा पगार दारु व जुगारीवर उडवायचा. त्याला दारुडे व जुगारांची संगत लाभली. असे बरेच दिवस चालू होते. एक दिवस तो वैतागला आणि नोकरीच सोडून दिली. त्यानंतर तर त्याला जेवणच बंद केले. तो उपासी पोटी राहू लागला. त्यात दारू पिऊ लागला. त्यातच त्याने कंपनीतील दोन लाख रुपये फंड काढून घेतला व चार दिवसातच पत्ते व दारूच्या आहारी जाऊन पूर्ण खर्च केला. अति दारुमुळे त्याला टी. बी. झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत भाड्याने राहत असल्याने तिला जगण्यासाठी नोकरीची गरज होती. दहावे व तेरावे झाल्यानंतर तिला एकाने नोकरीला लावले. ती एकटी राहू लागली. तिला हवे तसे राहण्याचे स्वातंत्र्य मिळाले. मैत्रीणीपेक्षा तिला बॉयफ्रेंड आवडू लागले. अनेक बॉयफ़्रेंडचे मोबाइल नंबर होते. रात्रीबेरात्री ते तिला कधीही फोन करतात. तिही त्यांना चांगला प्रतिसाद देते. तिला ही नवरा नसल्याने तरुणवर्ग तिच्याकडे आकर्षित झाला होता. ते सर्व काही करायचे. तिला त्यात आनंदही मिळायचा; पण आर्थिक मदतीचा हात त्यापैकी कुणीही केला नाही. ती आता आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. कर्जबाजारी झाली आहे. तिला कुठुनही आर्थिक मदत मुलांच्या शिक्षणासाठी मिळत नाही. आता ती निराधार आहे. अनेकदा समजावून सांगितले तरी ती इतरांना तुच्छ लेखते. उद्धट बोलते. तिचा स्वैराचार वाढला आहे. तिला कुणाचे मार्गदर्शनही नकोसे असते.