Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy


2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy


ड्राईवरची व्यथा-लेख-संजयसोनवणे

ड्राईवरची व्यथा-लेख-संजयसोनवणे

2 mins 1.1K 2 mins 1.1K

ड्राईवरची व्यथा-


बऱ्याच वेळा अनेक कुटूंब खाजगी वाहन भाड्याने घेतात. त्यातून ते लांब पल्ल्याचा प्रवास करत असतात.त्यात मोठ मोठे अधिकारी व अति श्रीमंत लोकही असतात.त्यांच्या सोबत ड्रायव्हर देखील असतो. कमीत कमी पाचशे ते सहाशे किलोमीटर पर्यंत गाडीचा प्रवास असतो. गाडी सलग चालू असते. पण त्या गाडीतील अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे गाडीचालक असतो. तो आपल्याला सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहचवत असतो. त्यात त्याला ठरलेले भाडे मिळत असते. तो त्या दिवसापुरता आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपली भूमिका बजावत असतो.पण त्या गाडीतील सदस्य त्याला आपल्या कुटूंबाप्रमाणे वागणूक देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कुठे गाडी जेवणासाठी थांबवली तर गाडीतील सर्व सदस्य पोटभर जेवतात. पण ड्रायव्हरला साधे जेवणासाठी विचारत नाही. ही दुय्यम वागणूक देत असतात. पण सर्वच तसे नसतात. काहीना माणुसकी खूप असते. ते ड्रायव्हरला आपल्या कुटूंबासारखी एकसमान वागणूक देतात. त्यामुळे ड्रायव्हर मानसिकदृष्टया सक्षम बनतो 

     या उलट काही लोक दांभिकपणाचा आव आणतात. स्वतःला मोठे धार्मिक समजतात.आध्यात्मिक समजतात. त्यांच्यातील भूतदया जागृत होते. पण अशी माणसे ड्रायव्हरला तुच्छ समजतात .त्यांना माणुसकीहीन वागणूक देतात. त्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करत नाही. वेळेवर तुटपुंजा पगार देत नाही. ही माणसे कुत्रे पाळतात. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक खास नोकर ठेवतात. त्याला वीस हजार पगार देतात. त्याला मांस, मासे, दूध, अंडी असा सकस आहार देतात. पण ड्राईवरला पगार देतांना नाकतोंड मुरडतात.अशा माणुसकी नसलेल्या माणसांकडे ड्रायव्हर अजिबात टिकत नाही. ड्रायव्हरची मानसिकता त्याच्या मालकाबद्दल चिडचिडी झालेली असते. त्यातुनच ते ड्रायव्हर अचानक नोकरी सोडण्याचा मार्ग निवडतात. म्हणजे कुत्र्याला किंमत पण माणसाला किमत नाही. त्यामुळे बहुतेक ड्रायव्हरचे मानसिक संतुलन राखण्यास अयशस्वी ठरतात. तेही नंतर मालकाचा आदर करत नाही. मालकाबद्दल त्यांच्या मनात कायम राग भरलेला असतो. याच्या उलट जे ड्रायव्हरला आपल्या कुटुंबासारखी वागणूक देतात तिथे वर्षानुवर्षे ड्रायव्हर नोकरी करतात. गाडीमालकाचा आदर राखतात.


Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Raghunath Sonawane

Similar marathi story from Tragedy