Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sanjay Raghunath Sonawane

Others


0.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others


गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

2 mins 1.2K 2 mins 1.2K

गुरुपौर्णिमा ह्या दिवसाचे महत्त्व भारतात का आहे? तर भारत संस्कार भरलेला देश आहे. अनेक संत-महात्मा यांनी ह्या देशाला आदर्श संस्कृतीचा मान मिळवून दिला आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय. साऱ्या जगाला बंधू आणि भगिनी म्हणणारे स्वामी विवेकानंद हे भारतातील संस्काराचे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांचे अनेक शिष्य देश आणि विदेशात आजही आहेत म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागचा महत्त्वाचा हेतू गुरुचे पावित्र्य जपणे होय. संस्काराचे जतन करणे होय.


आपल्या देशाला संतांची भूमी म्हणतात. ह्या भूमीतील संस्कार आज जग स्वीकारत आहे. संस्काराच्या बाबतीत भारत महासत्ता म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे भारताचे अनेक राष्ट्र मित्र बनले आहे. त्याचा परिणाम म्हणजे गुरूचे महात्म्य आहे. आपल्यावर संस्कार करणारे आपले आई-वडिल, शिक्षक, संत, आदर्श महापुरुष हे उत्तम गुरु आहेत. गुरु जीवनात असावा. तो स्त्री किंवा पुरुष असू शकतो. त्यांची प्रेरणा, आदर्श विचार आपले जीवन परिवर्तन करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली जे आज खऱ्या अर्थाने गुरु आहेत, त्यांचे विचार म्हणजे अमृताची शिदोरी आहे. ती जो सोबत घेईल त्याचे कुटूंब सुखी राहते, संस्कारीत राहते, परिवर्तनशील राहते.


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक गुरुच्या आदरस्थानी व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. भारत ह्या महागुरुंना कधीच विसरू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. अनेक शाळांतून, महाविद्यालयांतून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा साजरी करणे म्हणजे संतांचे स्मरण करणे होय. आपल्या जीवनात चांगला बदल घडवून आणणे. गुरु आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो. त्याला वयाचे बंधन नसते. दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करून आदर्श भारताचे विचार जगाला देणे हे एक भारताचे फलित आहे. जीवनात सत्संगाची फार गरज आहे. बदलणाऱ्या जगासोबत ग़ुरुचे आदर्श विचार नवीन पिढीला परिवर्तनाच्या वाटेवर, ध्येयावर निश्चित पोहचवतात.


Rate this content
Log in