sarika k Aiwale

Abstract

4  

sarika k Aiwale

Abstract

भेट शेवटची

भेट शेवटची

2 mins
377


संध्याकाळच्या त्या वारूवर नियम नाहीत कोरले मी मनीचे..

एकदा भेट त्या क्षितिजाला जिथे भेट ठरली असते तुझी माझी..

कळतील कथा व्यथाही माझ्या तुझ्या मनीच्या..

नसतील कळलेल्या भावना ही मग सहजच कळतील तुला..

एक दिवस होता तिच्या कडे सिद्ध करायच होत अस्तित्व तिच.. शेवटच्या या संध्या भेटीत अनपेक्षित अशी घटना घडली..

नकोच भेटू पुन्हा पुन्हा अशी वेंधळी सांज तिला सांगत होती.

नजर तिची मात्र आठवणी च्या वारू वर तरळली होती..

घेतो का श्वास माझा इतक रुदन का यावेळी..

मृत्यू समीप असता जीवनाची का आस जागी..

नात्या गोत्याचा माग मुस नव्हता इतकी गोतावली कुठून गोळा झाली ... सरणावर प्रेत जळत होत... आसमंत धुराने भरला होता.. त्या मृत्युच्या शय्येवर कोणी निवांत झोपला होता.  असंख्य वेदना होतात जळताना.. मग तो असा का निश्ब्द होता .. तिच्या डोळ्यात त्याच्या वेदना बोलक्या होत होता..

पापणीत आसवांची गर्दी साचत होती अनोळखी त्या प्रेतास पाहून मन तिचे ही रडत होत..

मनात आले किती स्वार्थी होता तो आजचा दिवस सहज बोलून भेट अशी त्या घटनशी तिची ठरलेली नव्हती .. . प्रेत !....

मनाशीच... कृपाली उद्गारली...

काय वाटत असेल त्याच्या मनी किती वाजत गाजत आज त्याची संस्कार करत होते..

अंत विधी ही सगे सोयरे त्यात ही भांडत होते ..

काय बरोबर काय चुक त्याचा वाद आज ही चालूच होता..

फक्त एकच वेगळ होत ते त्या प्रेतासाठी भांडत होते

जे काही काळ अगोदर जगण्यसाठी धडपडत होत..

अखेर हरुन प्राण ज्योत मालवली होती..

त्याच्य अखंड अयुष्यात त्याला हे नातेवाईक कधी दिसले नाहीत आज तेच त्यचया मरणाच्या कार्यात अग्रेसर होते. कारण निस्वार्थ उद्देश असावा हा तर्क खोटा होता... गेलेल्या आत्म्यास सरणावरच  कोर्ट मार्शल चालू होत...

शेवटची भेट .. म्हणून आलेले.. एकमेकांच्या कानात कुजबुजत होती.. जगला तो एकटा... सुटला बिचारा ..हे ऐकताना त्याच मात्र विचार वेगळे ऐकायला येत होते.. मी तर जगायच ठरवल होत .. परिस्थिती सुधारते होती.. मग अचानकमी मृत कसा ... ?

येणार प्रत्येक जण फुल वाहुन उपस्थीत ती लावत होते.. प्रेत मात्र त्यांच्या मनात  त्या त्या माणसाची त्याच्याशी असलेली नाळ तपासत होता.. सख्खे.. निख्खे.. स्वार्थी.. निस्वर्थी गट पडत चाल्ले होते.. मन त्याच खजिल झाल.. हे काय करतोय मी.. माणुस आहे न मी येणारच सगळे या प्रसंगी पण आपुलकी ने नाही .. काय माग उरल की नाही बेवरास नको जायला म्हणून आजवर सर्वाची काळजी घेतली.. या हाताने कर्म त्याच्यासाठी मंगल कामना करुन तो ही आत्मा अनंतात विलीन झाला.

कृपाली मात्र तिथेच थांबली होती.

तिच्या गच्चीवरुंं समोर काही अंतरावर स्मशान होत..

रोज प्रेत येत असत... पण आज ती मुकमती झाली..

ते जळणार प्रेत तिला विचार करयला भाग पाडत होत ..

एक शेवटची भेट अख्ख्या आयुष्याची आवर्तन देवून जात होती.. पण ज्याच ते आयुष्य होत  तो मात्र निर्विकार जळत होता.. आज अग्नि काही जास्त च भडकला होत जणु वर नभाला ज्वाला भिडत होत्या. ती त्या ज्वाला कडे पहात होती.. निद्राधीन व्हावं असच विचरातती गुंग झाली होती..

जर आज तो जिवंत असता तर त्याला असंख्य यातना होत असत्या.. अन हे जे त्याच्या जवळ रडत आहेत ते त्याच्यापासून लांब पळत असते.. वेगवेगळ्या कारण देवून स्वत: ला सुरक्षित करत असते.

मरण यातना सोप करत.. इतकच तिला यातुन कळल होत..

ती भेट स्वत: शीच होती. शेवटची ठरणार होती ..

पण त्या शेवटच्या प्रसंगाने ती मात्र सावरली होती.. पण त्या ज्वाला नी तिच लक्ष केद्रीत केल.. तिला एक वेगळाच भान दिल जे आजही तिला शेवटची भेट कधीच शेवटची ठरत नसते त्यातून नवी उदय जन्म घेतो..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract